प्रतारणा
प्रतारणा


नमस्कार माझे नाव राजीव आहे मी आज तुम्हाला काही सांगण्यासाठी इकडे आलो आहे. काही लोकांना हे सत्य वाटेल तर काहींना मी काही पण बोलतो आहे असे वाटेल. हे मी रात्री रेकॉर्ड करत आहे.
मी एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये कामाला आहे. माझ्या घरात माझी आई मी आम्ही दोघेच राहत होतो. साधारण चार वर्षांपूर्वी माझे बाबा आजारात गेले. त्यानंतर आई ला सुद्धा काम करणे थोडे अवघडत होत होते आणि वयाने तिची तबियत थोडी खराब राहत होती. तिने माझ्या मागे लग्नाचा लकडा लावला. तिची अवस्था पाहून मी सुद्धा लग्नासाठी तयार झालो. मुली पाहण्याचे कार्यक्रम सुरू झाले. चार पाच स्थळे पाहिले आमच्या नात्यातील एका ने वसुधा चे स्थळ सुचवले. वसुधा माझ्यापेक्षा तीन वर्षाने लहान, नाकी डोळी नीटस , सावली होती. पाहतच मी तिला पसंत केले. त्यानंतर महिन्याभरात साखरपुडा आणि लग्न उरकले. वसुधाचा स्वभाव उथळ होता. पैसे खर्च करताना ती मागे पुढे पाहत नसे. मागे काही शिक्कल राहील कि नाही ह्याची फिकर ती करत नसायची. तिच्या ह्या उथळ स्वभावाचा आई ला राग येत असे मग दोघांमध्ये खडाजंगी होत असे. रोज ती आईचे गार्हाणे घेऊन माझ्या समोर रडत असे आणि रोज वेगळे होऊया म्ह्णून मागे लागत असे. पण आईला सोडून वेगळे राहण्याचा विचार मी करू शकत नव्हतो. लग्नानंतर दोन वर्षांनी आई पण गेली आणि वसुधा ला रान मोकळे झाले. घरात पार्टी होऊ लागली, रोज काही ना काही वस्तू घरात येऊ लागली. वसुधा उशिरा पर्यंत बाहेर राहू लागली. तिला जाब विचारता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. हळू हळू तिने ड्रिंक्स घेणे पण सुरु केले आणि तिच्या सोबत एक मुलगा आता तिला घरी सोडायला येऊ लागला होता. त्याचा बद्दल विचारले असता तो मित्र आहे असे सांगितले. पण त्या दिवशी कहर झाला. त्या दिवशी मी कामावरून लवकर घरी आलो आणि नेहमी प्रमाणे वसुधा घरात नसेल असा अनुमान बांधून मी दरवाजा माझ्या कडील चावी ने उघडला . फ्रेश होण्यासाठी मी माझ्या रूमचा दरवाजा उघडला तर .....
तिचा तो मित्र आणि ती दोघे मला संदिग्ध अवस्थेमध्ये माझ्या बेड वर दिसले. मी जाब विचारला तर तिने नेहमी प्रमाणे उडवा उडवी ची उत्तरे दिली. माझा राग अनावर झाला आणि मी बाजूच्या टेबलावरची फुलदाणी उचलून तिच्या डोक्यात मारली. एक रक्ताची चिळकांडी भिंतीवर उडाली आणि वसुधा निपचित पडली. काही वेळाने मी भानावर आलो तेव्हा मला माझ्या हातून काय घडले हे समजले. मी बेड बाजूला घेतला आणि जमीन खोदून तिला त्याचा मध्ये टाकून दिले. खड्डा कसा तरी भरला आणि दरवाजा बंद करून मी बाहेर पडलो, बाजरातून काही लाद्या आणि सिमेंट घेऊन ते पुन्हा नीट केले. पण त्या दिवसा पासून रोज मला तिचा भास होतो आहे आणि मला वाटत आहे कि मला मारून टाकेल आणि तिच्या सारखे कुठे तरी गायब करेल. आता रात्रीचे बारा वाजले आहेत आणि या खोलीमधून दरवाजा वाजवण्याचा आवाज येतो आहे. दरवाजा जोर जोरात वाजत आहे. आता दरवाजा तुटेल कि काय? नाही ... दरवाजा तुटला .... माझ्या समोर ती उभी आहे. रक्ताने भिजलेले तिचे केस मातीने भरलेले अंग, पूर्ण काळ्या डोळ्यांने ती माझ्याकडे पाहून हसत आहे. माझ्या जवळ येते आहे .. अरे देवा मी काय करू मुख्य दरवाजा सुद्धा बंद आहे.. देवा वाचावं मला ... आणि एक आर्त किंकाळी हवेत विरली आणि रेकॉर्डिंग बंद झाले.
" वाह राजीव मानला तुला... काय नाटक रचले वाह्ह .... " एका स्त्रीचा मादक आवाज आला.
<p>" काय करू सोनिया ... तुझ्या सारख्या लावण्यवती साठी माझ्या बायकोचा बळी द्यावा लागला आणि ती गायब झाली त्याने पोलिसाचा ससेमिरा माझ्या मागे लागला . माझ्या गरीब साध्या संसारी काटकसर करणाऱ्या बायकोला मारले आहे आणि त्या साठी मी जेल मध्ये का जाऊ.उद्याच आपण हे घर आणि शहर सोडून जाऊ आणि पोलिसाना मिळेल माझी हि टेप आणि त्यांना वाटेल कि माझ्या बायकोच्या आत्म्याने माझा खून केले आणि ते माझे प्रेत शोधू लागतील तोपर्यंत आपण देश सोडून जाऊ. " आपल्या साठी दारूचे ग्लास तयार करत राजीव म्हणाला.
" पण राजीव तू तिला एवढा का कंटाळा होता? म्हणजे सर्वगुण संपन्न होती तुझी बायको ना पार्टी जायची , तुझ्या आईची काळजी घ्याची, घर काटकसरीने सांभाळत होती.मग काय झाले?" सोनिया ने विचारले.
" तेच तर ना मला नाही आवडले, मला अशी मॉड ,पार्टी करणारी , माझ्या सोबत फिरायला येणारी पैशाचा जास्त विचार न करणारी हवी होती पण पदरी पडली हि काकूबाई ... त्यात आईची पसंत मग काय ... त्यात तुझी माझी ओळख झाली आणि तू अगदी तशीच आहे जशी मला हवी आहेस" बोलून राजीवने सोनियाच्या हाताचे चुंबन घेतले आणि त्याने हात पाहिले तर सोनीयाचे ते नाजूक हात आता कडक आणि सफेद वाटत होते, तिची नखे काळी आणि मोठी वाटत होती. त्याने घाबरत वरती पाहिले तर त्याच्या समोर सोनिया नसून वसुधा बसली होती. मोकळे सोडलेले केस आणि त्यातून वाहणारे रक्ताचे थेम्ब जमिनीवर पडत होते.तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि पूर्ण चेहऱयावर माती लागली होती. ती राजीव कडे पाहून विक्षिप्त पणे हसत होती. राजीव ने झटकन तिचा हात सोडला आणि मागे सरकला.
" अरे काय झाले तुम्ही असे का घाबरता ... मी आहे तुमची बायको वसुधा ... मला का घाबरता हा... माझ्या बद्दल सर्वाना खोटे सांगितले ना मी कसे पैसे उडवले तुमच्या आई ला कसा त्रास दिला. पण एक सत्य जगाला सांगा त्या दिवशी बेडरूम मध्ये मी नाही तर तुम्ही होता सोनिया सोबत ... आणि भांडण झाले त्या मध्ये तुम्ही माझ्या डोक्यावर वार केला ज्यामध्ये मी गेले आणि तुम्ही आणि सोनियाने मिळून मला गाडून टाकले.आज मी तुम्हाला घेऊन जायला आले आहे." बोलत वसुधा पुढे पुढे येऊ लागली.
" ये ... ये ... पुढे येऊ नकोस ... हे बघ पुढे येऊ नकोस .." बोलत बोलत राजीव मागे सरकत सरकत भिंतीला टेकला.
" काय नाही केले मी तुमचा साठी आणि ह्या घरासाठी ... तुमच्या आईला आपली आई समजून सेवा केली. तुम्हाला हवे नको ते पाहिले पण तुम्ही काय केले प्रतारणा ... ह्याची शिक्षा तुम्हाला मी देऊन राहणार ..." बोलून तिने आपली धारधार नखे राजीवच्या डाव्या छातीमध्ये घुसवली आणि त्याचे धधडणारे हृदय बाहेर काढले. राजीव जमिनीवर निपचित पडला. तिने एक नजर सोफ्याच्या मागे टाकली तिकडे सोनीयाचे प्रेत पडले होते.तिची ती आकृती बेडरूमच्या दिशेने जात हवेत विरून गेली.
साधारण तीन दिवसांनी घरातून कुबट सडका वास येऊ लागला तसे आजूबाजूवाल्याची पोलीस मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसानी दरवाजा तोडला तसे त्यांना राजीव आणि सोनिया चे प्रेत मिळाले. तसेच सोबत एक टेप रेकॉर्ड सुद्धा ज्यामध्ये राजीव ने आपले म्हणणे मांडले होते. ज्याने गोष्टीचा खुलासा झाला आणि वसुधाचे प्रेत सुद्धा बाहेर काढले गेले. वसुधा ने आपला बदला घेतला होता पण खरी प्रतारणा राजीव ने केली हे ती सिद्ध करू शकली नाही.
(समाप्त)