कुमार भयकथासूर

Horror Thriller

3.9  

कुमार भयकथासूर

Horror Thriller

ती वाट पाहत आहे.

ती वाट पाहत आहे.

8 mins
323


सादर कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे .... ह्याचा कोणाशी कसला समंध नाही .... निव्वळ मनोरंजन म्हणून ह्या कथेकडे पाहावे....


शंतनू बस मध्ये बसून विचार करत होता, "आपण का जात आहोत त्या खेड्यात? बाबानी कधी का नाही सांगितले ह्या बद्दल ?आता अचानक ते गावचे घर का विकत आहेत? घरातून निघाले तेव्हा फक्त एवढे बोलून निघाले होते कि हिंजवडी जाऊन येतो तिकडे आपले घर आहे त्याचा सौदा करायचा आहे तीन दिवसात जाऊन येऊ असे बोलून गेलेले बाबा आज आठ दिवस झाले तरी आले नव्हते." खाजगी बस मध्ये विचार करत बसलेला शंतनू विचार करत आपल्या शर्टच्या वरच्या खिश्यात असलेल्या कागदाच्या एका चिटोऱ्यावर नजर फिरवली आणि त्यावर लिहिलेला पत्ता पुन्हा एकदा वाचला. किर्लोसकर वाडा, वरची आळी, हिंजवडी एवढा पत्ता त्याला त्याच्या बाबांच्या डायरी मध्ये मिळाला होता. तो पत्ता घेऊन तो बाबांच्या शोधात निघाला होता. आज तो वाड्यात जाऊन पाहणार होता जर काही मिळाले नसते तर पोलीस मध्ये जाऊन रीतसर तक्रार नोंदवणार होता.

साधारण रात्री नऊ च्या सुमारास तो एक थांब्यावर उतरला, रात्रीचा किर्रर्र अंधार आणि त्या अंधारात एक दिवा जो गावाची वेस आणि गावाचे नाव दोन्ही दाखवत होता. हिंजवडी फाटा .... हिंजवडी गाव आपले हार्दिक स्वागत करत आहे असा आशयाचा तो बोर्ड होता. शंतनू ने पुन्हा एकदा तो कागदाचा तुकडा काढला आणि त्यावर पुन्हा एकदा गावाचे नाव आणि समोरचे नाव एकच आहे ह्याची खात्री करून घेतली आणि तो गावाच्या दिशेने निघाला. गावाच्या आत भयाण शांतता पसरली होती, रात्री नऊ म्हणजे खेडेगावात अकरा वाजले असे वाटतं. अंधारात वाट तुडवत आणि आपल्या हातातील छोटी बॅग सावरत शंतनू हळू हळू अंतर कापत होता. पण एवढ्या गावात रात्रीचा तो वाडा कसा शोधायचा असा प्रश्न शंतनूला पडला होता. डोक्यावर चांदण्याचे छत होते आणि त्या प्रकाशात तो चालत होता. तेवढयात त्याला हातात बॅटरी घेऊन चालत येताना कोणीतरी दिसले. तसे शंतनू ने त्या माणसाला हटकले आणि विचारले, " साहेब इकडे किर्लोस्कर वाडा कुठे आहे?" शंतनू च्या ह्या प्रश्नावर त्या माणसाने एकदा त्याचा कडे वर पासून खाल पर्यंत निहाळले. " तुम्ही ह्या गावचे दिसत नाही?" तो इसम म्हणाला. "नाही मी शहरातून आलो आहे इकडे ते किर्लोस्कर वाडा आहे ना तो आमचा म्हणजे माझ्या बाबांचा आहे. आठ दिवसापूर्वी माझे बाबा आले होते इकडे पण परत घरी नाही आले" बॅग सावरत शंतनू म्हणाला. " तुमचे बाबा आणि त्या वाड्यात, काय मस्करी करता राव, अहो तो वाडा बंद आहे कितीतरी वर्ष झाले तिकडे कोणी फिरकत नाही गावचे आणि त्याचा शेजारी जी घरं होती ती पण बंद असतात. माझे ऐका वाड्याचा नाद सोडा आणि माघारी जा. नाही तर तुम्ही पण हरवून जाल तुमच्या बाबा सारखे" एवढे बोलून तो इसम हसू लागला. खरे तर शंतनू ला राग आला होता पण त्याला आता गरज होती म्हणून त्याने सुद्धा हसून त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणाला, " मालक तुम्ही वाडा तर सांगा कुठे आहे बाकी मी पाहून घेईन" शंतनूचे असे उत्तर ऐकून तो इसम हसायचा थांबला आणि थोडा रागात त्याने शंतनू कडे पाहिले आणि म्हणाला " इकडून थोडे पुढे गेले कि डावी कडे वळा तिकडून साधारण पंधरा पाउलांवर तो अंधारलेला वाडा आहे" बोलून तो इसम रागाने पाय आपटत निघून गेला. शंतनू ने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिले आणि हलकेच हसून आपली बॅग सावरत तो निघाला. गाव पूर्ण शांत होते, मधेच कुठे तरी कुत्रे भुंकत होते. त्याने एकदा घड्याळात पहिले तर रात्रीचे दहा वाजले होते. पाया खाली आलेले खच खळगे यांचा पासून वाचत तो वाड्याचा समोर उभा राहिला. काळोखात तो वाडा भव्य दिसत होता. समोर मोठा लाकडी दरवाजा, जुन्या पद्धतीचे बांधकाम होते.

शंतनू ने दरवाजा वाजवला साधारण पाच मिन मध्ये दिंडी दरवाजा उघडला.समोर साधारण पाच पाउलांवर एक म्हातारा हातात कंदील घेऊन उभा होता. वाढलेली पांढरी दाढी आणि केस, डोक्यावर मळलेलं पागोटे, अंगात निळा शर्ट आणि काळपट धोतर, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले होते, तोंडाच्या झालेल्या चंबू वरून तरी हेच वाटत होते कि त्यांच्या तोंडात दात नाही आहेत. शंतनू ने आत पाहिले पण त्या म्हाताऱ्या शिवाय तिकडे अजून कोणी नव्हते. " हे आजोबा एवढ्या लांब उभे आहेत मग दरवाजा कोणी उघडला?"शंतनूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तसे त्याचा कानावर एक आवाज पडला, " कोण आपण आणि कोण हवे आहे आपल्याला?" त्या आजोबांचा आवाज खुप लांबून आणि खुप खोल असा वाटत होता पण हे कसे शक्य आहे ते तर फक्त पाच पावले दूर उभे आहेत विचार करत शंतनू म्हणाला. " मी शंतनू किर्लोस्कर, ह्या वाड्याचे जे मालक आहेत श्रीपाद किर्लोस्कर त्याचा मी मुलगा" शंतनूचे बोलणं संपले आणि आजोबांच्या चेहर्यावर आनंद पसरला आणि ते शंतनू च्या जवळ आले. कंदील त्याच्या चेहऱ्या जवळ घेऊन त्या उजेडात त्याचा चेहरा निहाळत होते. चेहरा पाहता पाहता त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या त्यातून अश्रू गळू लागले, " तोच चेहरा, तेच डोळे. तेच नाक" आजोबा उजेडात शंतनू ला पाहून म्हणत होते पण शंतनूला काय सुरु आहे काहीच समजत नव्हते." आजोबा काय झाले? तुम्ही असे काय पाहत आहात? हे पहा मला माझे बाबा कुठे आहे ते हवे आहे? शंतनू थोडा घाबरून म्हणाला. "तूच आहेस तो हो मला खात्री आहे तूच आहेस तो" आजोबा खुश होऊन म्हणाले. पण शंतनूला ह्यातले काहीच समजत नव्हते. "आजोबा काय झाले? तुम्ही असे काय पाहत आहात? मी कोण आहे? काय बोलत आहात मला काहीच समजत नाही आहे? शंतनू वैतागून म्हणाला. " सांगतो पोरा सर्व सांगतो पण तू आधी चल माझ्या सोबत मी सर्व सांगतो" बोलून आजोबा सरळ चालू लागले. वाडा दुमजली होता. डावीकडे आणि उजवीकडे पायऱ्या वरती जात होत्या ,समोर मोठे अंगण होते आणि एक विहीर होती. " हे आजोबा कोण आणि इकडे काय करत आहेत? आणि ते मला आत घेऊन जात आहेत? मी जायला हवे का त्यांचा मागे? काही घातपात झाला तर? मी एकटा आहे आत अजून कोणी दबा धरून बसले असले तर? ह्या सर्व गडबडी मध्ये ते इकडे कसे आले हे विचारले नाही? " असे एक ना अनेक विचार शंतनू च्या डोक्यात येत होते, पण त्याची पाऊले आपोआप त्या आजोबांच्या मागे पडत होती. ते दोघे एका खोली समोर येऊन थांबले.

आजोबानी ती खोली उघडली तसे कसला तरी सडलेला वास त्याच्या नाकात शिरला. त्याने रुमाल काढून नाकावर धरला आणि आजोबांच्या मागे त्याने त्या खोलीमध्ये प्रवेश केला. खोलीमध्ये एक वृद्ध स्त्री बसली होती. तिचा अवतार थोडा वेगळा होता. केस अर्धे सफेद अर्धे काळे, अंगावर मळलेली साडी, एका काथ्याने विणलेल्या खाटेवर ती बसली होती. आजोबा तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले. वसू बघ कोण आले आहे ? तुझा मुलगा शंतनू तसे त्या स्त्रीनं वरती पहिले तर तिचा चेहरा आणि शंतनूचा चेहरा जवळपास सारखा दिसत होता. आता त्याला आठवले ते आजोबा असे का बोले कि तेच नाक, तेच डोळे, तोच चेहरा हे सर्व पाहून शंतनू थोडा घाबरला नाही हे शक्य नाही असा मनात विचार आला. त्या स्त्रीचा आणि शंतनूच्या चेहऱ्यात बरेच साम्य होते. "शंतनू पोरा हि तुझी आई आहे श्रीपाद किर्लोसकर ची पत्नी, वसुधा श्रीपाद किर्लोस्कर आणि मी तुझा आजा मोहन सुतार किती वर्ष आम्ही तुझी आणि तुझ्या बापाची वाट पाहिली आणि तू आज आला आहेस". शंतनू चे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते तो समोर असलेल्या स्त्री कडे एकटक पाहत होता. त्याला त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. " नाही, हे.... हे..... शक्य नाही, माझी आई तर तिकडे शहरात राहते. तुम्ही खोटे बोलत आहात हे खोटे आहे" शंतनू मागे सरकत म्हणाला. "हे बघ पोरं तू घाबरू नको, मी सर्व सांगतो तुला नक्की काय झाले होते."आजोबा म्हणाले आणि त्याला त्या स्त्रीच्या शेजारी बसवले.

"आज पासून साधारण वीस वर्षांपूर्वी हे घटना घडली होती,वसू आणि श्रीपाद चे लग्न लावून दिले होते , मला श्रीपाद पसंत नव्हता पण वसूचे त्याच्यावर प्रेम जडले होते. लग्न झाल्यावर वसू श्रीपाद आणि मी इकडे ह्या माझ्या वाड्यात राहू लागलो. दिवस भराभर जात होते, लग्नाला दोन वर्षे झाली आणि तू जन्म घेतला त्या नंतर श्रीपाद ने माझा पूर्ण व्यवसाय आणि शेत स्वतःच्या नावावर करून घेतले. तू जेमतेम वर्षाचा झाला तेव्हा एक दिवस अचानक श्रीपाद तुला घेऊन गायब झाला. शोधाशोध झाली पण काही सापडला नाही मग समजले कि तो माझे शेत आणि व्यवसाय विकून पळून गेला होता. आमचा हातात काही नव्हते शोधायचा प्रयन्त केला पण नाही झाले आणि त्यात

तू नव्हता म्हणून वसू ला वेड लागले होते. तिला संभाळतं सर्व करणे मला शक्य नव्हते म्हणून मी वाट पाहायचे ठरवले आणि आज तू आलास" हसत ते आजोबा म्हणाले. वसू पाहिले का कोण आले आहे? त्या आवाजाने त्या स्त्री ने वरती पाहिले. तुझा मुलगा शंतनू आला आहे". तिने एकदा त्या आजोबांकडे पाहिले आणि पुन्हा शंतनू कडे पाहिले. " माझे काम झाले, मी माझे वचन पूर्ण केले, श्रीपाद आणि शंतनू दोघे पण तुला भेटले आता मी जायला मोकळा" असे बोलून ते आजोबा दरवाजा पर्यंत जाऊन त्यांनी मागे वळून पाहिले आणि हवेत विरून गेले. हे पाहून शंतनू घाबरला त्याने जे पाहिले ते खरे होते कि त्याचा भास होता हे त्याला पण समजत नव्हते म्हणजे आता पर्यंत तो ज्या आजोबा सोबत बोलत होता ते अस्तित्वात नव्हते. त्याला आता समजले कि तो दरवाजा कसा उघडला. विचार करत असताना अचानक यांचा समोर एक भयानक हास्य घुमले ते हास्य होते वसू चे, ते पाहून शंतनू घाबरला. " तू माझा मुलगा ...... तू माझा मुलगा ..... शंतनू ...... तू माझा मुलगा शंतनू..... हसत हसत वसू बोलत होती. बोलताना तिचे हावभाव वेगळे होत होते जसे कोणी मानसिक रुग्ण करतो. कदाचित पोटचा गोळा दुरावल्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. तिने हसत हसत शंतनूच्या गालावर हात फिरवला आणि अचानक दोन्ही हाताने तीने त्याचा गळा पकडला आणि जोरात दाबू लागली. तू माझा शंतनू नाही आहे ..... तू माझा शंतनू नाही आहेस तो लहान होता माझे बाळ कुठे आहे सांग ....... चिडून ओरडून ती त्याचा गळा दाबू लागली. शंतनू ला काय होते आहे काहीच समजत नव्हते हळू हळू त्याची शुद्ध हरपली हळू हळू त्याची धडपड थांबली आणि त्याच्या देहातून प्राण निघून गेला. इकडे वासू शांत झाली. ती उठली आणि एकवार शंतनूच्या प्रेताकडे पाहिले. माझा शंतनू कुठे आहे नाही सांगत ना तू मी तुला पण बंद करून ठेवते असे बोलून तिने ती बाजेची खाट बाजूला करून तिने त्याचा खाली असलेल्या तळघराचा दरवाजा उघडला आणि तसे एक भयानक दर्प आला. खाली श्रीपाद चे प्रेत सडू लागले होते. त्या प्रेतावर तिने शंतनूचे कलेवर ढकलून दिले आणि दरवाजा बंद केला आणि ती पण हवेत विरून गेली.

जेव्हा श्रीपाद पळून गेल्यानंतर बरीच वर्ष वसुधा आणि मोहन आजोबा यांनी त्याचा शोध घेतला पण शोध काही लागला नाही.श्रीपाद ने सर्व पैसे घेऊन दुसरे राज्य गाठले आणि लग्न करून संसार सुरु केला पण स्वतःचा पैसा नव्हता म्हणून आलेलं वैभव हळू हळू गेले . देणेकरी मागे लागले आणि त्याला आठवले कि हा वाडा विकून तो देणेकरांचे पैसे देणार होता. शेवटी मुलाच्या आठवणी ने वसुधा ला वेड लागले. मोहन ह्यांना हे सर्व पाहवत नव्हते ते नेहमी म्हणायचे कि ते दोघे परत येतील, मी घेऊन येईन त्यांना पण नियतीला काही तरी वेगळे मान्य होते. मोहन ह्यांना तीव्र हृदयविकारचा झटका आला आणि ते जागीच गेले. वसुधा वेडी झाली होती तिला काही समजत नव्हते आणि तिच्या वेडापायी त्या घराकडे कोणी फिरकत पण नव्हते. आठ दिवसानी वास येऊ लागला तेव्हा लोकांनी दरवाजा तोडला तर समोर त्यांना दोन प्रेत दिसले एक होते मोहन सुतार आणि दुसरे वसुधाचे जिचा मृत्यू अन्नपाणी न मिळाल्याने झाला होता. सर्वाना वाटले कि ते दोघे पण सुटेल पण तसे नव्हते मृत्यू नंतर पण वाड्यात त्या दोघाना बरेच वेळा पाहिले गेले होते. तो वाडा पछाडला होता. अजून ती वाट पाहत आहे ...... तिच्या बाळाची शंतनूची


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror