STORYMIRROR

Akshay Yadav

Drama Horror

3  

Akshay Yadav

Drama Horror

ओसाड घर

ओसाड घर

1 min
402


सादर कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे आणि तिचे वास्तविक जीवनात कोणता समंध नाही असल्यास एक निव्वळ योगायोग....

"नमस्कार, मी समीर आज मी तुम्हाला माझा सोबत जे घडले ते सांगणार आहे, मला माहित आहे तुमचा ह्या सर्वावर विश्वास बसणार नाही पण हे माझा सोबत घडले आहे"...

हि घटना घडली होती साधारण २००९ साली जेव्हा मी माझा मित्र संजय ला भेटायला भुसावळ ला गेलो होतो. दारावरची बेल वाजून मी संजय दार उघडण्याची वाट पाहू लागलो. आज रविवार होता आणि माझ्या मते तरी संजय घरी होता. " अरे सम्या... तू ... आणि इकडे " संजय आश्चर्याने म्हणाला. "का? मी येऊ शकत नाही का?" मी विचारले तसे संजय हसला आणि म्हणाला, " नाही रे, असे काही नाही पण तू एवढा लांब आलास मला भेटायला म्हणजे मला अपेक्षित नव्हते तुझं येणे". त्यावर मी म्हणालो " मित्रा तुझा साठी आपण कुठे पण येऊ शकतो, आपण मेलो ना तरी भूत बनून एकत्र असू" आम्ही हसू लागलो.माझ्या मागून एक मुलगा घरात आला आणि एका बेडरूम मध्ये जाऊन झोपला. मला वाटले कोणी संजय चा रूममेट असेल आणि रात्रपाळी करून आला असेल थकला म्हणून झोपला असेल. घर खुप प्रशस्त होते. दोन खोल्या, किचन बाथरूम आणि टेरेस फ्लॅट म्हणजे गच्ची आमच्या बापाची असे काही तरी समीकरण असते. त्याच्या फ्लॅट मध्ये मला फक्त एक गोष्ट नाही आवडली ती म्हणजे त्याचा फ्लॅट समोर जे भग्न अवस्थे मध्ये उभे असलेले घर होते. " यार संज्या, हे समोरच भंगार कोणाचं आहे रे?" मी संजय ला विचारले. "कोणते रे, ते समोरच? अरे त्याचा कडे बघू पण नको. लय बेकार घर आहे ते, त्या घरात म्हणे एक फॅमिली राहत होती, एकदा त्या घराला आग लागली आणि त्यात ती फॅमिली जाळून गेली. पण त्या नंतर तिकडे त्यांना भरपूर लोकांनी पहिले आहे रात्रीच्या वेळी, अजून कोणाला इजा केली नाही पण तिकडे त्याचे अस्तित्व आहे" संजय म्हणाला. तसे मी हसून त्याचा कडे पहिले आणि म्हणालो "संज्या ठीक आहे मी नाही थांबत पण असे काही पण सांगू नको रे" मी हसू लागलो. " अरे ठोकल्या मी खरे बोलतो आहे" संजय चिडून म्हणाला. " ठीक आहे, लावतो का पैज मी त्या घरात रात्री जाऊन तुला फोन करतो आणि विडिओ पण घेऊन येतो". माझ्या ह्या बोलण्यावर संजय हसला आणि म्हणाला," बाबा, नको घेऊस विषाची परीक्षा उगीच काही झाले तर माझ्यावर येईल" संजय चे ते बोलणे ऐकून मी ठरवले काही झाले तरी आज त्या घरात जाऊन पाहायचे. 

   दिवसभर गप्पा मूवी पाहून आम्ही रात्री गच्चीवर दारू पीत बसलो होतो. साधारण रात्री ११ वाजता मला पुन्हा त्या घराची आठवण आली. " संज्या, ये संज्या, अरे मी त्या घरात जाऊन दाखवतो तुला आणि विडिओ पण काढतो मग बघ तुला विश्वास बसेल". त्याला वाटत होते मला जास्त झाली आहे आणि मी काही तरी बडबडत आहे. "सम्या, मित्रा तुला दारू जास्त झाली आहे तू आराम कर उगीच नको जाऊ सांगतो आहे ऐक जरा" संजय माझं हात पकडत म्हणाला. मला दारूचा अमल चढला आहे असे त्याला वाटले. तसा मी थोडा नशे मध्ये होतो पण मला काय सुरु आहे हे समजत होते. मी मोबाईल घेतला आणि त्यातली लाईट सुरु करून मी निघालो संजय ला सांगितले कि गच्ची वरून मला पाहत राहा. रात्रीचे साडे अकरा पावणे बारा झाले असतील. थोडा शुद्धी मध्ये आणि थोडा नशेत मी खाली आलो. खाली कोणतीच वर्दळ नव्हती त्याची इमारत सर्वात शेवटच्या टोकाला होती. इमारतीमध्ये जास्त फ्लॅट विकले गेले नव्हते त्यामुळे त्याची इमारत पण बर्यापैकी मोकळी होती. मी त्या घराच्या दिशने चालू लागलो. सर्वत्र अंधार पसरला होता, डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हते मी माझ्याकडील बॅटरी

 सुरु केली आणि चालण्यास सुरुवात केली. दरवाजा ढकलून मी आत आलो तसे कबुतरांचा आवाज माझ्या कानावर पडला. मी आत शिरलो आणि माझे रेकॉडरिंग चे बट्टण सुरु केले. आत मध्ये सडका आणि कुचका वास येत होता. ते घर जास्त मोठे नव्हते एक हॉल बेड रूम आणि किचन, मी हॉल मधून बेडरूम कडे वळलो तसे मला माझा मागून काही तरी सरकले असे जाणवले. मी मागे पहिले तर मागे काही नव्हते. मी हळू हळू पुढे सरकू लागलो. मोबाईल लाईट मध्ये मला काळोखात स्पस्ट दिसत होते तसे किचन मध्ये काही तरी पडल्याचा आवाज आला आणि मी त्या दिशेला वळलो. पण तिकडे काहीच नव्हते ना भांडी ना अजून काही मग पडले काय आणि हा.... हा आवाज झालं कसला. मागून कोणी तरी लहान मूल हसत आहे असे मला वाटले. मी मागे वळलो तर एक खेळणे ते टाळी वाजवणारे माकड टाळ्या वाजवत उभे होते. मी घाबरलो कारण तिकडे कोणी नव्हते, कदाचित ह्या घरात संजय म्हणत असेल तसे असेल. मी बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागलो भिंतींना वर पहिले तर अनेक लोकांचे लहान मोठे असे पंजे छापले होते. कदाचित आगीतून वाचण्यासाठीची ती केवीलवाली धडपड असेल. पुन्हा मागून कोणी तरी गेले पण ह्या वेळी ते एक नाही तर दोन होते. आता मात्र माझा धीर सुटू लागला होता. "क..... कोण आहे...... मी कापत्या आवाजात विचारले"? काही वेळ शांती मध्ये गेला आणि पुन्हा त्या मुलाचे हसणे ऐकू आले आणि पुन्हा ते खेळणे वाजू लागले. माझी सर्व दारू उतरली होती. अचानक एक भयाण जळालेला चेहरा समोर आला आणि मला म्हणाला " तू आला आहेस आमच्या घरात मी नाही" असे बोलून ती सावली विचित्र हसू लागली. तसे माझ्या पायातली शक्ती निघून गेल्यास सारखे झाले. आता तो चेहरा माझ्या जवळ येत होता. डोक्यावर केस नव्हते त्वचा जळाली होती आणि त्याचा अंगातून एक भयानक दर्प येत होता तसे मी माझे डोळे बंद केले आणि जोरात ओरडलो. तसे सर्व शांत झाले. पुन्हा सर्व ठीक झाले पण हे थोड्या वेळासाठी होते पुन्हा तोच लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. " माझा सोबत खेळ ना , खेळ ना " असा आवाज एका लहान मुलाचा आला आणि पुन्हा ते हास्य घुमले आता मात्र माझी हिम्मत संपली आणि मी कसे बसे त्या घरातून बाहेर पळालो तसे मागून आवाज आला पुन्हा या घर आपले आहे आणि तेच हास्य घुमले मी मागे पहिले नाही आणि तडक पळत संजय च्या इमारतीमध्ये शिरलो. माझी किंकाळी ऐकून संजय घरी आला होता मी दरवाजा वाजवायला सुरुवात केली. तसे संजय चा कापरा आवाज आला." कोण आहे?" :अरे दरवाजा उघड संज्या मी आहे" तसे त्याने दरवाजा उघडला आणि मी आत आलो. "अरे तुझी किंकाळी ऐकली आणि मी घरात पळून आलो" संजय म्हणाला. मी त्याला तिकडे जे घडले तर सर्व सांगितले विडिओ पहिला पण त्यात पण काही आढळून आले नाही त्यात फक्त माझा आवाज येत होता. " सम्या तरी तुला बोलो होतो ,नको जायला पण तू ऐकलं नाही" संजय म्हणाला. " हो रे समजले मला आता , बरं तो तुझा रूम मेट गेला का?" मी विचारले तसे संजय ने माझ्याकडे पहिले आणि डोक्याला हात लावून म्हणाला 

तझी तबियत बरी आहे ना? कि तुझी एवढे झाले तरी तुझी उतरली नाही?" मला पण समजले नाही. मी विचारले" अरे, असे काय करतोस मी आलो तेव्हा माझा नंतर पाच मिन मध्ये तर तो आला होता मी पहिले होते " पण त्या नंतर जे संजय ने उत्तर दिले त्या नंतर आम्ही दोघांनी पण तो फ्लॅट दुसऱ्या दिवशी रिकामा केला. तो म्हणाला ह्या पूर्ण फ्लॅट मध्ये मी एकटा राहतो मग तो कोण होता ज्याला मी पहिले होते माझ्या मागे येताना? 

समाप्त.....

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama