STORYMIRROR

Akshay Yadav

Drama Horror

3.4  

Akshay Yadav

Drama Horror

अजाण सावज

अजाण सावज

75 mins
581


भाग पहिला : कौतुकाचा वर्षाव....

      "पोरांनो ,तुम्हाला किती वेळा सांगितले त्या गडाच्या दिशने जायचे नाही म्ह्णून, अरे पोरांनो तो गड नाही मृत्यूचा सापळा आहे तिकडे जाऊ नका चला निघा इकडून" पोरांना पळवून एक साधारण साठ -पासष्टी वय असलेले आजोबा आपल्या थकल्या डोळ्याने त्या गडाकडे पाहत उभे राहिले आणि म्हणाले, "हा गड कधी मुक्त होणार हे त्या महादेवाला ठाऊक."

   इकडे मुंबई मध्ये पुरातत्त्व विभाग मुख्यलयात,

"हॅलो जरा अस्मि, आरुषी , मल्हार आणि ओजस ला केबिन मध्ये पाठवा" बोलून टेमकर यांनी फोन ठेऊन दिला.

साधारण एक मिनिटभरात …..

"सर आत येऊ का?" ओजस ने विचारले.

 तसे त्यांचा कडे न पाहता आपल्या हातातील फाईल मध्ये पाहत ," ये आत ये" टेमकर म्हणाले.

ओजस त्या मागे अस्मि, मल्हार आणि आरुषी आत आले.

" तुम्ही बोलवले सर आम्हाला?" ओजस ने विचारले.

टेमकरानी समोर पहिले तर चौघे पण उभे "हे बाकी तिघे कधी आले?" टेमकरानी विचारले.

तसे ओजस म्हणाला, "मी विचारले तेव्हा आम्ही सर्व आत आलो"

ओजस चे हे उत्तर ऐकून टेमकर हसू लागले आणि त्यांना असे हसताना पाहून त्या चौघांना काय झाले समजले नाही, ते टेमकरांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होते.

“अरे तुम्हाला असे येताना पाहून मला शाळेचे दिवस ठेवले. तेव्हा पण आम्ही बाहेर असायचो पाच ते सात जण पण वर्गात येऊ का? विचारणार एकच आणि घुसणार सर्व, त्या आठवणी जाग्या झाल्या आणि हसू आले” टेमकर म्हणाले तसे सर्व जण हसू लागले.

“बसा, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करायला बोलावले आहे तुमच्या नेतुर्त्वाखाली जे अवशेष सापडले ते साधारण दोन हजार वर्षांपूर्वी चे होते आणि सरकार कडून आपल्या ऑफिस ला अभिनंदन चे पत्र आले आहे आणि त्यात तुम्हा चौघांचे विशेष नाव दिले आहे. स्वतः मुख्यमंत्री यांनी कौतुक केले आहे आणि असेच काम करत राहा असे सुचवले आहे. तुमच्या ह्या कामगिरी मुळे आपल्या कार्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे आणि तुमची पहिली कामगिरी असून तुम्ही ती उत्तम पार पडली त्या साठी माझ्याकडून पण तुमचे अभिनंदन, तुम्ही दिलेली कामगिरी उत्तम रीतीने पार पडली आहे आणि आता तुमच्याकडून कडून अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे कामावर नीट लक्ष द्या, टेमकर म्हणाले तसे सर्व धन्यवाद करून निघाले.

   “अरे यार मी तर एवढा घाबरलो होतो ना म्हंटले आज काही खरे नाही टेमकर साहेब ओरडणार वाटतं पण झाले भलतेच, एवढे कौतुक केले आणि त्यात भर म्हणजे राज्यसरकार स्वतः मुख्यमंत्री यांनी पण कौतुक केले मला तर वाटत आहे मी आकाशात तरंगतो आहे” ओजस खुश होऊन म्हणाला.

” हॅलो, ओजस साहेब या जमिनीवर या एवढे हवेत तरंगायला काय एवढे मोठे झाले नाही आज कौतुक होते आहे एक चुकी होऊ दे मग बघ कशी मज्जा येते आजचे कौतुक कधी उलटून शिव्या होतील सांगता येत नाही त्या मुळे जमिनीवर राहा” अस्मि हसत म्हणाली.

“हो ना, एकदा मी आणि अस्मि एका प्रोजेक्ट वर काम करत होतो काम व्यवस्थित सुरु होते, पण जेवढा विचार केला होता तेवढे इनपुट आले नाही मग काय? झाले .....दोघांवर पण टेमकर साहेब तुटून पडले मग जी आमची लेफ्ट राईट झाली आहे, काय सांगू..... त्यामुळे पहिले यश आहे एन्जॉय कर पण लगेच हवेत जाऊ नको “मल्हार म्हणाला.

“ताई खुप बोलतात का टेमकर सर ?”आरुषी ने घाबरत विचारले.

“नाही ,फक्त चुकी झाली कि आरती करतात, काय विचारते? बोलणार नाही तर काय करणार ?कारण त्यांना पण पुढे पण उत्तर द्यावे लागते आणि टेमकर सर तर आपल्या सौम्य शब्दात ओरडतात पण त्यांना एवढी बोलणी येतात आम्ही स्वतः एकदा ऐकले आहे काय रे मल्हार? “अस्मि मल्हार कडे पाहून म्हणाली. त्यावर त्याने फक्त मानेने होकार दिला.

“चला लंच टाइम संपला, आता कामाला लागले पाहिजे ” अस्मि म्हणाली आणि ते सर्व पुन्हा आपल्या जागेवर आले.

   अस्मि आणि आरुषी दोघी बहिणी अस्मि तीन वर्ष मोठी होती आरुषीला, दोघी अगदी मिळून मिसळून राहायच्या आणि एकमेकींचे गुपित एकमेकींना सांगायच्या मल्हार हा अस्मिचा ऑफिस मधला मित्र पण त्याचे नाते मैत्रीच्या पलीकडे जाऊन त्याचे प्रेमात रूपांतर कधी झाले हे त्यांना समजले नव्हते आणि ओजस हा आरुषी चा लहानपणापासूनचा मित्र आणि त्यांच्या मध्ये जे होते ते प्रेम कि मैत्री हे समजणे अवघड होते, कारण दोघे पण चांगले मित्र पण असू शकतील किंवा एक उत्तम जोडपे ,ओजस च्या मनात आरुषी बदल काही तरी होते आणि ते आरुषी च्या मनात पण होते पण दोघे व्यक्त झाले नव्हते आणि हे सर्व अस्मि ला माहित होते. आरुषी आणि अस्मि दोघी योगायोगाने एकाच खात्यामध्ये आणि एकच विभागात कामाला लागल्या, घरी त्या दोन बहिणी आणि आई वडील होते. वडील राजेंद्र हे एका खाजगी कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत होते तर आई घर सांभाळत होती. मुली आहेत म्ह्णून त्या दोघांनी काही कमी पडू दिले नव्हते. असेच सुखाने दिवस जात होते पण एक दिवशी अचानक .......

  "अस्मि मॅडम तुम्हाला आरुषी मॅडम आणि मल्हार सर आणि ओजस सर याना टेमकर साहेबानी बोलावले आहे" लवकर असे बोलून शिपाई निघून गेला.

 अस्मि ने त्याने दिलेला निरोप सर्वाना सांगितला आणि ते टेमकर च्या केबिन च्या दिशेने निघाले. दार वाजून त्यांना परवानगी साठी विचारणार तेव्हड्यात टेमकर यांनी हाताने आत येणाची खून केली. तसे चौघे पण आत आले टेमकर फोन वर कोणाशी तरी बोलत होते,

"नक्की सर ,तुम्ही काळजी करू नका बेस्ट टीम आहे माझ्या कडे हो तरुण आहेत, हा कोणत्याही कामाला नाही बोलणार नाही , हो आताच एक कामगिरी पार पडली आहे. हो आजच बोलून घेतो ,नाही त्यांनाच देणार साहेब" फोन वर टेमकराचे बोलणे चालूं असताना इकडे बसलेल्या चौघांना पण अंदाज आला होता कि हे आपल्या बद्दल बोलत होते आणि कोणती तरी नवी कामगिरी आपल्याला मिळणार आहे. "जयहिंद सर" बोलून टेमकरानी फोन ठेऊन दिला त्यांना हाताने बसण्याचा इशारा केला आणि पाण्याचा ग्लास तोंडाला लावून सर्व पाणी घटा घटा प्यायले.

"आता कोणाचा फोन होता माहित आहे का?" टेमकरानी हसून विचारले.

त्यावर सर्वानी नकार मध्ये मान हलवली.

"स्वतः मुख्यमंत्री यांनी फोन केला होता त्याच्या वाचनात एक जागा आली आहे तिकडे कोणतेहि काम आपल्या तर्फे झाले नाही त्या जागी त्यांना आशा आहे कि काही तरी मिळणार हे नक्की ज्या वस्तू मिळतील त्यांना त्याच गावात एक संग्रहालय सुरु करून तिकडील लोकांना पर्यटनाद्वारे हाताला काम मिळवून देता येईल आणि महाराष्ट्र मध्ये अजून एक पर्यटन स्थळ सुरु होईल. ह्या प्रोजेक्ट साठी त्यांनी मला तुमची नावे सुचवली आहेत कारण मागील प्रोजेक्ट मध्ये तुम्ही छान काम केले होते." टेमकराचे हे वाक्य ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद दिसत होता.

"आज मला तुमचा अभिमान वाटतो आहे, पोरांनो खुप कमी वयात तुम्ही मोठे काम केले आहे अशीच प्रगती करत राहा" टेमकर खुश होऊन म्हणाले.

   "सर ह्या वेळी ठिकाण आहे जिकडे अजून उत्खनन झाले नाही?" आरुषी ने विचारले.

" हा समरगड नावाचा गड आहे तिकडे अजून कोणी गेले नाही आणि त्याचे कारण तिकडचे गावकरी ते कोणाला त्या गडावर जाऊ देत नाहीत त्याच्या मते हा गड श्रपित आहे आणि जो जाईल तो पुन्हा येऊ शकणार नाही "टेमकर म्हणाले आणि त्याचे बोलणे ऐकून आरुषी हसू लागली

" काय? हे खरे आहे का सर ?"स्वतःचे हसणे आवरत आरुषी म्हणाली.

टेमकर तिच्याकडे रागाने पाहून म्हणाले " आरुषी काही गोष्टी ह्या विज्ञानच्या पलीकडे असतात तुम्ही विस्वास ठेवा किंवा ठेऊ नका. प्रोजेक्ट मिळाले आहे पण अभ्यास करून जा आणि सुरुवातीचे काही दिवस म्हणजे जो पर्यंत ते गावातले तयार होत नाही तो पर्यंत मी सोबत असेन नंतर पुढील प्रोजेक्ट अस्मि लीड करेल आणि तुम्हा सर्वाना तिचे ऐकावे लागेल बहीण असली तरीही " एक कटाक्ष आरुषी कडे टाकत टेमकर म्हणाले

"चला लागा कामाला" बोलून टेमकर स्वतःच्या कामाला लागले.


काय आहे नेमके त्या गडावर आणि ते आजोबा असे का त्या मुलांना ओरडले. चौघांची टीम काय करणार पुढे वाचायला विसरू नका पुढील भाग...

क्रमश:


भाग दुसरा : बहिणीचे भांडण आणि गडाचा थोडा अभ्यास.....

टेमकर सर ह्यांचा केबिन बाहेर येऊन...

"आरु तू वेडी आहेस का? कुठे पण काय हसतेस, हे बघ तुला इकडे काम करताना दीड वर्ष झाले आहे आणि मला तीन वर्षे, आज टेमकर काही बोले नाही पण प्लीज असे नको वागूस हे सिरीयस प्रोजेक्ट आहे त्यात असे हसणे बरे नाही." समजावण्याचा स्वरात अस्मि म्हणाली.

"तुला तीन वर्ष झाली असतील म्ह्णून मला नको शिकाऊ समजले, मला समजते कुठे काय आणि कसे बोलायचे आणि वागायचे, तू नको सांगू मला समजले ना?" रागात आरुषी बोलून आपल्या जागेवर जाऊन बसली.

तिला रागावलेले पाहून अस्मि तिच्या मागे जाणार तेवढयात मल्हार ने हात पकडून तिला थांबवले आणि म्हणाला, "हे बघ आता जाऊ नको तिच्याकडे आधीच टेमकर सर यांनी तिला सौम्य शब्दात झापले आहे त्यात तू बोली त्याचा तिला राग आला आहे. ओजस तू तिला समजावं हे बघ ह्यात अस्मि ची चुक नव्हती ती तिच्या चांगल्यासाठी बोली हे तिला सांग" मल्हार शांत पणे म्हणाला.

"हो सर मी बोलतो तिच्यासोबत , ताई नेहमी चांगले सांगते पण तिला समजत नाही, तुम्ही काळजी करू नका मी समजावतो तिला घरी जाणताना" ओजस म्हणाला आणि सर्व आपल्या जागेवर जाऊन बसले.

   काम संपवून जेव्हा अस्मि आरुषी च्या टेबल जवळ गेली तेव्हा ती काही तरी माहिती वाचण्यात मग्न होती.

"आरु काम संपले नाही का?" अस्मि ने विचारले.

पण आरुषी ने काही उत्तर दिले नाही ती आपल्या समोरील संगणकामध्ये काही तरी वाचण्यात मग्न होती.

"आरु मी काय विचारते आहे? काम संपले नाही का? मी थांबू का?" अस्मि ने विचारले.

"नाही, गरज नाही मी येईन घरी मला माहित आहे घर कुठे आहे "आरुषी रागात नजर संगणकावरची नजर न हलवता म्हणाली.

"हे बघ मी आई ला सांगेन तू कशी वागतेस ते "अस्मि चिडून म्हणाली.

"हा सांग ,मी पण नाही घाबरत आई ला जा सांग" चिडून आरुषी म्हणाली .

"ठीक आहे मी जाते तू बस..." बोलून अस्मि ने मागे वळून पहिले तर तिकडे ओजस होता त्याने हाताने मी आहे असे सांगून इशारा केला आणि रागात बाय बोलून अस्मि निघाली

काही झाले किती भांडली तरी अस्मिला आरु ची काळजी होती.

"चला मॅडम झाले कि नाही काम कि इकडे बसणार आहे "ओजस अस्मि गेल्यानंतर साधारण अर्धातासाने आला आणि आरुषी ला विचारले.

"का तुला घाई असेल तर तू जा, मला कोणाची गरज नाही आहे" आरुषी चिडून म्हणाली.

"पण मला आहे ना...." ओजस म्हणाला तसे आरुषी ने त्याचा कडे पहिले आणि स्वतःचे वाक्य सावरत तो म्हणाला. "म्हणजे ,मला घरी एकटा जायचा कंटाळा येतो ताई लवकर गेली आणि माझे काम बाकी होते शिवाय तू पण होती मग म्हंटले कोणी तरी कंपनी आहे ना? मग बसलो." ओजस ने वेळ मारून नेली.

"आरु झाले का नाही तुझे चल ना उद्या कर ना बाकी" ओजस चिडून म्हणाला.

"हे बघ, मी गेलो ना तर कोणी नाही इकडे आणि आपल्या ऑफिस मध्ये भूत फिरतात कोणी नसले तर मी पण गेलो ना तर तुला घेऊन जातील"ओजस हसत म्हणाला तसे आरु हसू लागली आणि हसत म्हणाली

"ये पागल मी काय भुताला घाबरते असे वाटते का तुला? अरे मी समोर आली ना कि भूत आपला रस्ता बदलून जाईल समजले का ?" आरु ओजस ला हसत म्हणाली

" म्हणजे एवढी भयानक दिसते का तू?"आरुषी चे वाक्य पूर्ण होण्या आधी ओजस म्हणाला.

"ओजस तू ना थांब तुला बघते..." असे बोलून तिने त्याला हातात असलेल्या वही ने मारायला सुरुवात केली.

"ये अगं लागते आहे थांब...." ओजस हसत म्हणाला.

"एक मिन एक मिन" ओजस चा चेहरा गंभीर झाला आणि तो आरुषी च्या मागे पाहू लागला. "आरु तिकडे कोणी तरी आहे काळे कपडे घातले आहे त्याने आपल्या कडे पाहत आहे" मागे पाहून ओजस म्हणाला आणि आरुषी मागे वळून पाहू लागली तसे तो हळू हळू दरवाजा कडे पोहोचला आणि जोरात ओरडला गेला " तुझा चेहरा पाहून ते भूत पण पळून गेले. ...." ओजस जोरात म्हणाला तसे आरुषी त्याला मारायला त्याचा मागे पळाली.

 "अस्मि मला वाटेत तू सर्वां समोर आरु ला बोलायला नको होतेस, म्हणजे आधीच तिला टेमकर सर बोले होते त्यात तू पण रागावली लहान आहे ती...." मल्हार अस्मिला समजावत म्हणाला.

"हो मल्हार, माहित आहे मला ती लहान आहे पण हे शाळा किंवा कॉलेज नाही हे ऑफिस आहे आणि इकडे कसे वागायचे याची समज तिला असायला हवी" अस्मि चिडून म्हणाली.

"हो तू बोलते आहेस ते बरोबर आहे ,पण असे सर्वांसमोर बोलून नाही तर तिचे काय चुकते हे तिला प्रेमाने समजव" मल्हार म्हणाला.

"हा तू बोलतो ते पण बरोबर आहे ,चल माझी बस आली मी निघते" बोलून अस्मि बस मध्ये चढते.

इकडे ऑफिस मधून घरी येताना ओजस आरुषी ला म्हणतो "तू का चिडली आहेस आरु, ताई काही चुकीचे नाही बोली" तसे आरु ने एक जळजळीत कटाक्ष ओजस वर टाकला.

" मला माहित आहे तुला राग आला आहे आणि मी तिची बाजू घेतो म्हणून पण आला असेल पण मला एक सांग ना शाळेत जेव्हा तुला कोणी चिडत असेल तर मध्ये कोण पडले ताई, तुला अभ्यास करायला मदत कोणी केली ताई ने, तू इकडे सिलेक्ट व्हावे यासाठी तुझ्यावर मेहनत कोणी घेतली ताई ने आणि ती मोठी बहीण आहे आणि ऑफिस मध्ये आपल्याला सिनियर आहे त्या मुळे बोली तरी मनाला लावून घेऊ नकोस ताई ती ऑफिस च्या बाहेर आहे पण ऑफिस मध्ये ती सिनियर आहे आपल्याला, तर राग सोड आणि तिच्या आवडीचे काही घेऊन जा घरी" ओजस ने समजावले.

आरु ला तिची चुकी समजली आणि ती जाताना अस्मि चे आवडीचे गुलाबजाम घेऊन गेली. घरी गेल्यावर तिने पहिले अस्मिला आवाज दिला तिला मिठी मारली आणि तिला गुलाबजाम भरवला आणि माफी मागितली . त्याचे हे प्रेम पाहून आई ने विचारले,

" काय झाले?" त्यावर अस्मि ने आई सर्व सांगितले.

" हो बरोबर केले तू अस्मि .....नाही तरी तूच डोक्यावर चढवून ठेवले होते हिला "आई म्हणाली.

" हो आहेच मी ताईच्या लाडाची" आरु म्हणाली आणि सर्व हसू लागले.

जेवताना आरु म्हणाली "ताई मी त्या गावाबद्दल वाचत होते म्हणून मला उशीर झाला उद्या रविवार आहे तू मी ओजस आणि मल्हार कुठे तरी बाहेर जाऊ तिकडे मी तुम्हाला सर्व सांगते इकडे घरी नको आधीच आईला आवडत नाही आपण हे काम करतो ते त्यात अजून ह्याची भर नको" आरु म्हणाली आणि अस्मि ने होकारात मान हलवली.

   संध्याकाळी सर्वानी जवळच्या बागेत भेटायचे ठरवतात आणि संध्याकाळी त्या दोघी ओजस ला घेऊन ठरलेल्या पार्क मध्ये जातात तिकडे मल्हार आधीच येऊन त्यांची वाट पाहत असतो. सर्व बसतात आणि थोडा गप्पा होतात मग विषयाला सुरुवात होते.

"गाईज काल टेमकर सर जे बोले त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मी माहिती शोधली आहे आता ती किती खरी आहे ते माहित नाही.पण नेट वर तेवढेच होते. समरगड हा साधारण सोळाव्या शतकात तयार केला होता तिकडे कोणी सयाजी राव राजे राज्य करत होते पण नंतर काय झाले ते समजले नाही पण त्या गडावर कोणाचे राज्य टिकले नाही तिकडे जो राजा गड घेई तो चौथ्या दिवशी मृत सापडे त्या गडावर काय आहे कोणाला समजले नाही. पहारा झाला ,भूत असेल म्ह्णून किती ओझा मांत्रिक झाले पण कोणाला काहीच जमले नाही त्या नंतर सर्वानी तो गड सोडून दिला तिकडे आता काही नाही पण त्या गडावर जायला अजून कोणी धजावत नाही . आज पासून साधारण पाच वर्षांपूर्वी चार कॉलेज ची मुले त्या गडावर गेली होती गावकऱयांनी त्यांना अडवले त्यांना समजावले पण काही उपयोग झाला नाही रात्री ते कोणाला न सांगता त्या गडावर गेले आणि पुन्हा आलेच नाही सकाळी वीस पोलीस घेऊन गडावर गेले तेव्हा त्यांची प्रेत मिळाली ती पण अशी होती जसे कोणी त्यांना मारून आपला राग व्यक्त करण्यासाठी त्याचे शरीर छिन्न विछिन्न केले होते. अजून तरी एवढी माहिती आहे नेट वर पण तिकडे काय झाले ?आणि कोण करते? हे कोणाला माहित नाही ?" आरुषी ने जी माहिती सांगितली त्याने ह्या गडाचे जे गांभीर्य आहे ते सर्वांच्या लक्षात आले.

"हे तर भयानक प्रकरण दिसत आहे “ओजस म्हणाला.

हा भयानक तर आहे पण तिकडे रात्री असे काही होत असेल असे मला नाही वाटत ती मुलं दारू पिले असतील किंवा नसतील सुद्धा पण त्याच्यावर कोणी जंगली श्वापदाने हल्ला पण केला असू शकतो त्या मुळे त्यांची प्रेत तसे दिसत असतील हे बघा मला ह्या गोष्टीवर विश्वास नाही आहे मी जे काही वाचले ते मी सांगितले" आरू म्हणाली.

"मला काय वाटते, आपल्याला जायला हवे कारण जर आपण गेलो आणि आपल्याला काही झाले नाही तर हे सिद्ध होईल कि तिकडे काही नाही आणि सर्व अफवा आहे आणि तसे पण टेमकर सर याना नाही बोलू शकत नाही शेवटी नोकरी आहे आपली" मल्हार म्हणाला.

"बरोबर आहे मल्हारचे आणि आपल्याला हे काम खुद्द मुख्यमंत्री यांनी दिले आहे तर आपण नाही कसे बोलणार आणि राहता राहिला तिकडे जे काही आहे तर ते जुन्या काळात राजे आपला खजिना लपवायचे आणि अशी अफवा उठवायचे जेणे करून त्या गडावर कोणी हल्ला करू नये "अस्मि म्हणाली आणि तिचे मत सर्वाना पटले.


काय वाटते खरेच असेल का कोणी जंगली स्वपद गडावर कि काही वेगळे जे रक्तासाठी जगात असेल. पाहूया पुढील भागात.....

क्रमश:


 भाग तिसरा : गडाच्या दिशने प्रवास आणि गडाची ओळख ....

    जायचा दिवस उजाडला समरगड हा सातारा मध्ये जावळीच्या खोऱ्यात वसलेला होता. आजूबाजूला पहिले जंगल होते पण जसा गड झाला तशी लोकवस्ती वाढली. त्या गडावरून गावाला नाव दिले होते ,समरगाव तिकडे जाण्याची सर्व तयारी करून चौघे निघाले त्यांचा सोबत टेमकर सर पण येणार होते त्या मुळे सर्वानी एकच गाडी करायचे ठरवले आणि टेमकर सर यांनी स्वतःची गाडी केली आणि त्या चौघांना पिक करून ते गावाच्या दिशेने निघाले .ताफा आता सातारच्या दिशेने निघाला वाटेत गप्पा आणि गाणी या मुळे रस्ता कधी संपला समजले नाही, संध्याकाळी ते एका माळावर पोहोचले आणि युनिट मध्ये मुली फक्त दोन असल्यामुळे त्यांच्या राहण्यासाठी गावात कोणते घर भाड्याने मिळते आहे का? हे पाहणायसाठी ते चौघे आणि टेमकर गावाच्या दिशेने निघाले. गावापासून गड चांगला एक किलोमीटर लांब होता आणि तो माळ जिकडे ते होते तो पण एक किलोमीटर अंतरावर होता. गावात जाताना तो गड नजरेस पडला मावळतीची किरणे त्याला सोनेरी झळाळी देत होती पडझड झाली होती पण आपल्या उमेदीच्या काळात तो किती भव्य असेल याचे उदहारण म्हणजे अजून शाबूत असलेले बुरुज देत होते.

   "सर ....हा तो गड असेल ना?" ओजस चालता चालता त्या गडाकडे पाहत म्हणाला.

"हो हा समरगड आहे, ह्याचा अभ्यास केला का तुम्ही ?"टेमकर सर एकाजागी थांबले आणि त्यांनी विचारले.

तसे आरुषी पुढे आली आणि म्हणाली "मी केला आहे सर, पण जास्त माहिती नाही मिळाली" तिला जे काही मिळाले होते ते तिने सांगितले.

"वाह्ह शाबास! आरुषी एक लक्षात ठेवा गडाची माहिती हि कोणते हि पुस्तक किंवा नेट पेक्षा तिकडे राहणारे जे लोक असतात त्याना माहिती असते मग काही वेळा ती दंतकथा असते तर काही वेळा खरे आता ह्या गडाबद्दल जे आरुषी ने सांगितलॆ ह्यात किती खरे आणि किती खोटे माहित नाही पण एक लक्षात ठेवा ह्या सर्व कथेचा कामावर परिणाम झाला नाही पहिजे समजले?" टेमकरानी विचारले तसे सर्वानी होकार माना हलवल्या.

   गावात पोहोचतात तसे गावातील सर्व त्यांचा कडे पाहू लागतात.

"हे सर्व असे का पाहत आहेत आपल्या कडे?" अस्मिने मल्हार ला विचारले .

"मला पण तेच समजत नाही आहे?" मल्हार म्हणाला आणि ते टेमकरच्या मागे चालत राहिले .

एका वीस बावीस वर्षाचा मुलगा जो पारावर बसला होता त्याला पाहून टेमकर त्याचा कडे गेले आणि त्यांनी त्याला विचारले

"मला सरपंच साहेबाना भेटायचे आहे" त्याने एकदा टेमकर याना वरून खालपर्यंत निहाळले. आणि एकदम उठून म्हणाला "या माझ्या मागे" बोलून तो चालूं लागला.

गाव तसे पुढारलेले वाटत नव्हते आणि गावात लोकसंख्या पण कमी जाणवत होती. काही घरे बंद दिसत होती म्हणजे जसे गावाचा विचार आपल्या डोक्यात आला कि जसे भाव डोळ्यासमोर उभे राहतात तसे हे गाव नव्हते. एक प्रकारचा भकासपण त्या गावात जाणवत होते. दोन ते तीन मिन पायपीट केल्या नंतर ते सर्व एका दुमजली घराजवळ पोहोचले.

"हा, हे घर आहे सरपंचाचे "एवढे बोलून तो मुलगा निघून गेला. टेमकर पुढे झाले आणि त्या घरचा दरवाजा जवळ गेले.

"सरपंच आहेत का घरात ? "टेमकरानी विचारले..

"कोण आहे? "विचारत साधारण एक सत्तरीच्या आसपास आजोबा बाहेर आले.

 अंगात बंडी खाली धोतर डोक्यला पागोटे असा त्यांचा पेहराव वयाने जरी म्हातारे झाले तरी शरीर काटक वाटत होते त्याचे कोरडे डोळे तरतरीत नाक आणि ओठावर भरदार मिशी त्या मध्ये त्यांचे व्यक्तिमत्व खुप उठून दिसत होते.

"हा बोला कोण पाहिजे?" त्या आजोबानी विचारले.

"नमस्कार, मी टेमकर मला सरपंच याना भेटायचे आहे." टेमकर नम्रतेने म्हणाले

" अहो मी सरपंच आहे ह्या गावचा, बोला तुमचे माझा कडे काय काम आहे?" तोच म्हातारा म्हणाला.

 तसे टेमकर थोडे हसले आणि म्हणाले "नमस्कार सरपंच, मी पुरातत्व खात्यामधून आलो आहे म्हणजे ते खोदकाम करतात आणि जमिनीमध्ये पुरातन गोष्टी शोधून काढतात त्या विभागातून मी सरकारी कर्मचारी आहे" टेमकराचे बोलणे ऐकून आजोबा हसू लागेल.

" अहो मला समजते मी पण शिकलो आहे टपाल विभागात कामाला होतो मी आता निवृत्त झालो मला माहित आहे पुरातत्व विभाग, पण माझ्याकडे कडे काय काम काढले? सरपंचानी विचारले.

 तसे टेमकर हसले आणि म्हणाले "तुम्ही सरपंच आहात आणि कामाची सुरुवात तुमच्याकडून होते."

 म्हणजे, मी समजलो नाही? सरपंच म्हणाले.

"अहो तुमच्या गावात एक खजिना आहे आणि तो आम्ही काढायला आलो आहोत" टेमकर हसत म्हणाले.

तसे सरपंच यांच्या बायको ने त्यांना पाणी आणि बसायला टाकले.

"खजिना आणि तो पण इथे? नाही तुम्हाला कोणी तरी चुकीचे सांगितले असेल "सरपंच विचार करत म्हणाले.

"अहो ह्या गावात माणसे राहत नाही खजिना काय राहणार? बोलून सरपंच हसू लागले.

"नाही, मला माहित आहे तो आहे आणि इथे या गावात आहे समरगड वर" टेमकर यांचा कडून हे नाव ऐकताच सरपंच शांत झाले त्याचा हसरा चेहरा गंभीर झाला.

"साहेब, त्या जागेचे नाव पण काढू नका,ती जागा चांगली नाही आहे " सरपंच म्हणाले.

"अहो ,पण हा आदेश मला स्वतः मुख्यामंत्री यांनी दिला आहे त्यांना नाही कसे बोलू?" टेमकरानी विचारले.

 तसे आजोबा रागावले आणि म्हणाले "हे पाहा साहेब, तो गड चांगला नाही श्रपित आहे त्याचा नाद सोडा आणि जा. मुख्यामंत्रीचे ऐकले तर जीव गमवावा लागेल" आजोबा गंभीर पणे म्हणाले.

" हे पहा सरपंच, मी समजू शकतो तुमची काळजी पण ती चार मुलं मेली म्हणून हा गड श्रपित नाही होत आणि जर का तिकडे त्या काळच्या वस्तू किंवा अजून ज्या काही गोष्टी मिळतील सरकार त्यासाठी इकडे एक संग्रहालय बनवणार आहे आणि एकदा का ते झाले कि इकडे या गड आणि संग्रहालय पाहायला माणसे येऊ लागतील आणि गावात लोकांना काम भेटेल. अहो गावचा विकास होईल" टेमकर समजावत म्हणाले.

आजोबाच्या चेहर्यावरुन तरी असे वाटत होते कि त्यांना गोष्टी समजल्या पण एक अनामिक भीती दिसत होती. "साहेब तुम्ही सांगता तेवढे सोपे सर्व नाही आहे . तुम्हाला त्या चार मुलाचे माहित आहे पण इकडे गावात आम्ही त्या पेक्षा जास्त अनुभव घेतला आहे" आजोबा थोडे घाबरत म्हणाले.

"म्हणजे? आरू ने उत्सुकतेने विचारले.

"तो गड चांगला नाही श्राप आहे त्याला आणि तुम्हाला फक्त एक घटना माहित आहे पण मला त्याचा पूर्ण इतिहास माहित आहे." आजोबा गूढ आवाजात म्हणाले.

"आजोबा सांगाल का मला तो इतिहास " आरू उत्सुकतेने म्हणाली आणि तिचा उतावळे पणा पाहून टेमकरानी तिच्याकडे रागाने पहिले.

"हो पोरी सांगतो कमीत कमी त्याने तरी तुम्हाला ह्याचे गांभीर्य समजेल".एवढे बोलून आजोबा सांगू लागले.

     "मी लहान होतो तेव्हाची गोष्ट आहे गाव आता दिसते तसे नव्हते खुप मोठे आणि गजबजलेले होते त्या गडाची कथा आम्ही रोज ऐकत असू, गावात एक नाना म्ह्णून म्हातारे बाबा होते ते सांगायचे आणि आम्ही असेच ऐकत बसायचो जसे आता हि मुलगी ऐकत आहे." आरुषी कडे पाहत सरपंच म्हणाले. "हे सर्व सुरु झाले तो काळ होता सोळाव्या शतकाच्या अखेरचा नुकताच हा गड मराठ्यांनी मुघलां कडून जिंकून घेतला होता. नवीन राजा आणि तो पण आपल्या मातीतला मराठी म्ह्णून सर्व जनता राजाला पाहायला आणि मुजरा करायला गडावर जमली होती. राजाचा एक प्रधान सेवक होता काय बरे नाव त्याचे.... हा हिम्मतराव ,तो पण तिकडे होता.ते सर्व राजाच्या भेटीला गेलो असताना त्याने सर्वाना अडवले आणि राजे आता भेटणार नाही असे सांगितले आणि उद्या येणास सांगितले. तोंडावरून तर तो मग्रूर वाटत होता पण लोकांना वाटले ठीक आहे राजे कामात असतील नाही तर आराम करत असतील म्हणूंन सर्व माघारी फिरले तसे मागून कोणाचा तरी भारदस्त आवाज आला.

"थांबा आम्हाला भेटायला आलात आणि न भेटताच निघालात" आवाज ऐकून सर्वानी मागे वळून पाहिले तर मागे राजे उभे होते. "आम्ही आमच्या जनतेसाठी कायम तत्पर असतो आम्ही तुम्हाला येताना पहिले होते पण आम्ही वर्दीची वाट पाहत होतो तसे कोणी सांगायला आले नाही मग आम्ही स्वतः बाहेर आलो" महाराज म्हणाले.

"महाराज माफ करा पण तुमचा हा प्रधान आम्हाला भेटू देत नव्हता ,म्हणाला राजे भेटणार नाही " त्या घोळक्यातून एक अठरा एकोणीस वर्षाची मुलगी म्हणाली. तसे तिच्याशेजारी उभी असलेली तिच्या आई ने तिचा हात दाबला आणि म्हणाली "काय पण काय बोलतेस शांत राहा जरा" तो प्रकार पाहून राजे म्हणाले

" हे पहा मुली, तू कोणाला घाबरू नको मला नाव सांग तुझे?"

राजांनी विचारलेल्या प्रश्नावरती मुलगी पुढे आली आणि म्हणाली मी मंजुळा"

"हा आता सांग कोणी अडवले आणि असे सांगितले कि महाराज भेटणार नाही" महाराजांनी विचारले.

"हा तुमचा प्रधान का शिपाई आहे तो म्हणाला महाराज भेटणार नाही मंजुळा एका व्यक्तीकडे पाहून म्हणाली.

"प्रधान तुम्हाला हे शोभत नाही ,अहो प्रजा म्हणजे आमचे कुटुंब आहे या पुढे कोणाला हि आम्हाला भेटायला अडवायचे नाही समजले" राजांनी प्रधान याना दम भरला तसे एक वृद्ध पुढे झाले आणि म्हणाले

"जाऊ दे महाराज,आम्ही तुम्हाला धन्यवाद देण्यास आलो होतो आज तुमचा मुळे ह्या गावात मराठी माणसाचे राज्य आले आहे नाही तर ते मोघल नुसता त्रास होता पण आता होईल सर्व ठीक तुम्ही आला आहात ना " तो वृद्ध खुश होऊन म्हणाला.

 सर्व राजांना मुजरा करून निघाले आणि राजे पण आत निघून गेले पण तो प्रधान तिकडे उभा राहून त्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहू लागला ती मुलगी मंजुळा जणू त्या प्रधानाच्या मनात भरली होती हिला काही करून मिळवायची आणि आज केलेल्या अपमानाचा बदला घ्याचा असे त्याने मनोमन ठरवले होते.

   राजे एकाठिकाणी जास्त दिवस राहत नसत तसे ते ह्या गडावर पण नाही थांबले मोहीम असल्याकारणाने ते कर्नाटक च्या दिशने निघाले आणि जाताना गड आणि गावाच्या रक्षणाची जबाबदारी ते प्रधान ह्याच्यावर देऊन गेले जसे कोल्ह्याला आयते कोलीत दिल्या सारखे होते. प्रधान ने गावावरचा कर वाढवला तसे गावकरी मिळून प्रधानांकडे गेले आणि त्याला करामध्ये सवलत देण्यास देण्यास विनंती करू लागले सुरुवातीला प्रधान ने ती विनंती मान्य केली नाही पण एक अट ठेवली जर का त्याचे लग्न मंजुळा सोबत करून दिले तर तो गावचा कर माफ करेल प्रधान हा कसा होता संपूर्ण गावाला माहित होते त्याची नजर चांगली नव्हती आणि गावातली मुलगी त्याचा सोबत लग्न करून पाठवणे शक्य नव्हते सर्व जण परत माघारी फिरले. प्रधान चे अत्याचार दिवसापाठी वाढत होते ह्या सर्वात त्याचा कानावर बातमी पोहोचते कि मंजुळा चे लग्न शेजारील गावच्या मुलासोबत ठरले आहे आणि हे ऐकून त्याच्या तळपायाची मस्तकात गेली आणि तो आपल्या खास माणसांना सांगून त्या कुटुंबाचा शोध घेतला आणि त्या संपूर्ण कुटुंबाचा नाश केला . त्याला वाटते कि असे केले तर भीती ने का होईना मंजुळा आपला स्वीकार करेल पण होते उलट मंजुळा भरलेल्या सभेत येऊन त्याला वाईट बोलून निघून गेली . त्याचा राग मनात ठेऊन तो तिच्या वडिलांना गडावर बोलावून त्याला चाबकाचे फटके देतो. एवढा अत्याचार करून सुद्धा मंजुळा लग्न साठी तयार होत नाही हे पाहून एका रात्री तो मंजुळा ला घरातून उचलतो आणि जबरदस्ती लग्न करायचा प्रयन्त करत असताना नेमके महाराज त्या ठिकाणी येतात

 "अरे मूर्ख आम्ही तुला त्या दिवशी समजावले होते हि प्रजा म्हणजे आमचे कुटुंब आहे आणि तू असे कृत करत आहेस तुला लाज वाटली पाहिजे तू प्रधान असुन असे काळे कृत्य करताना आम्हाला सर्व समजले आहे ह्या मुलीच्या होणाऱ्या सासर कडच्यांना हि तू संपवलास आणि आता हिच्या सोबत जबरदस्ती विवाह करत आहेस ते एक बरे झाले सेनापती ने माझाकडे निरोप धाडला आणि मला सत्य समजले नाही तर तू गाव आणि ह्या मुलीचे आयुष्य दोन्ही बरबाद केले असते. या साठी तुला मृत्यूदंड का देऊ नये ह्याचे एक तरी कारण सांग ?" महाराज चिडून म्हणाले.

तसे प्रधान राजाच्या पायावर लोळण घेऊ लागला "माफी असावी सरकार माफी असावी माझा कडून चूक झाली एकदा माफ करा मी पुन्हा असे काही करणार नाही हे गाव सोडून मी निघून जाईन एक डाव माफ करा" प्रधान गयावया करत म्हणाला

पण महाराजनी आपले मत बदलले नाही "ह्याला तीन दिवस अन्न देऊ नका आणि चौथ्या दिवशी पहाटे सूर्य उगवायच्या आत ह्याला तोफेच्या तोंडी द्या." सर्व गावाला पण समजुद्या स्त्री वर जबरदस्ती करणाऱ्याला माफी नाही" बोलून महाराज निघून गेले.इकडे प्रधान त्याचा पाठमोऱ्या आकृती कडे पाहून दयाने याचना करत राहिला.

   ठरल्याप्रमाणे त्याला गावाच्या समोर तोफेच्या तोंडी उभे केले गेले. तो शेवट पर्यंत दया आणि जीवनाची भीक मागत होता राजा आपल्या मतावर ठाम आहे हे पाहून रागात त्याने एक आरोळी ठोकली आणि म्हणाला

"मी प्रधान श्राप देतो कि ह्या गडावर जो येईल त्याला कोणी परत जाणार नाही. जो इकडे राज्य करायचा प्रयन्त करेल तो जिवंत राहणार नाही आणि मंजुळा आज तुझ्यामुळे हे सर्व झाले आहे ना मी तुझा निर्वंश करेन हा माझा प्रतिशोध असेल "त्याचे वाक्य संपले आणि तोफ डागली गेली ज्याने त्याचा शरीराचे तुकडे झाले.

पुढे मंजुळा चे लग्न झाले आणि ती गाव सोडून गेली तिला भाऊ नव्हता त्या मुळे परत ती कधी ह्या गावात आली नाही आता तिची पिढी कुठे असेल...... असेल कि नाही ते पण माहित नाही पण त्या प्रधानाच्या मृत्यू नंतर पंधरा दिवसात गड पुन्हा मोघल च्या ताब्यात गेला पण तिकडे जो शासक होता तो फक्त चार दिवस जगू शकला मग त्याचा पण मृत्यू झाला हळू हळू सैनिक पण मरू लागले कोणाला काहीच समजत नव्हते देव झाले देवऋषी सर्व करून पहिले पण तो गड काही मुक्त झाला नाही. त्या नंतर गडावर दोन तीन शासक आले पण त्यांचा पण मृत्यू झाला आणि सर्वाना समजले कि हा गड श्रपित झाला आहे तसेच बऱ्याच लोकांनी प्रधानाचे भूत पहिले होते. पुन्हा ह्या गडावर कोणी राज्य केले नाही.. नानाचे वय होते ऐंशी वर्षे जेव्हा ते आम्हाला हि कथा सांगायचे त्यांनी असे पण सांगितले होते कि प्रधानाला बऱ्याच लोकांनी त्या गडावर पाहिले आहे तो गड सोडून खाली येत नाही .पण जो गडावर जातो त्याला चार दिवसात त्याचा मृत्यू नक्की आहे या आधी पण बरीच माणसे त्या गडाने खाल्ली आहेत तरी त्याचे पोट रिकामे आहे नाना नि स्वतः त्या प्रधानाचे भूत पहिले आहे आणि तेच फक्त त्यातून वाचले आहेत" एवढे बोलून सरपंचानी उसासा घेतला.

काय वाटते? खरंच असे काही झाले असेल का ? कि हि फक्त भाकड कथा आहे? काय आहे खरे पाहूया पुढील भागात.....

क्रमश:


भाग चौथा : धोक्याची पूर्वसूचना आणि गावची सफर 

 सरपंचानी गडाचा पूर्ण इतिहास सागंगून झाल्यावर ,

" हे सर्व भयानक आहे पण अजून तिकडे दिसते का ते प्रधानाचे भूत?" आरुषी ने उत्सुकतेने विचारले. तिच्या ह्या प्रश्नावर सरपंच हसले आणि म्हणाले

"काय माहित नाही बघ? कारण भीतीने तिकडे जायची हिंमत कधी झाली नाही आणि अजून पण कोणी त्या गडाजवळ जात नाही अमावस्या ला आवाज येत असतात कोणी तरी ओरडत आहे किंवा रडत असल्याचा पण आम्ही कोणी पण घराच्या बाहेर जात नाही उगीच विषाची परीक्षा कोण घेईल?" सरपंच हसून म्हणाले.

   "सरपंच तुम्ही थोडे समजून घ्या, काय आहे तुम्ही बोलता ते आम्हाला पटले पण पुढे सरकार ला पटेल असेल नाही, मला तुमच्या कडून फक्त थोडी मदत हवी आहे जेणे करून गावातून मला विरोध होणार नाही आणि हे फक्त तुम्ही करू शकता "टेमकर हात जोडून म्हणाले.

"हे पहा, गावात सर्वाना माहित आहे तो गड शापित आहे त्या मुळे तिकडे कोणी येणार नाही पण मदत म्हणाल तर कोणत्या स्वरूपाची आहे त्यावर मी गावकरीयांचाशी बोलतो." सरपंच टेमकराना पाहत म्हणाले.

"एक म्हणजे गावात जे मी तुम्हाला सांगितले ते उद्या सांगेन त्यावेळी गावात अनेक प्रतिक्रया येतील तेव्हा त्यांना तुम्हाला समजवावे लागेल आणि आमची काही राहण्याची व्यवस्था झाली तर खुप बरे होईल." टेमकर हसून म्हणाले.

 त्यावर सरपंच हसले आणि म्हणाले "हरकत नाही, माझा कडे वरती दोन खोल्या रिकाम्या आहेत तिकडे तुम्ही राहू शकता आणि जेवण माझा कडे राहिले कारण तुम्ही पाऊणे आहात आणि राहता राहिले जर तुमचे कामगार आले तर गावात बंद घरे आहेत त्यातले कोणी तरी देईल वापरयाला. तसे पण आमची मुलं बाकीच्या मुलानं सारखी शहरात गेली आहेत तेवढीच आम्हाला ह्याची साथ लाभेल . इकडे ह्या शिडी ने वर गेले कि दोन खोली आहे तिकडे त्या मध्ये तुम्ही आरामात राहू शकता, पण रात्री बाहेर जायचे नाही."सरपंचानी सांगितले आणि त्या दोघीनी पण ते कबूल केले.

"आम्ही सामान घेऊन येतो" त्या दोघी म्हणाल्या तसे सरपंच म्हणाले,

"आतच सांगितले होते ना तुम्हाला कुठे जायचे नाही म्ह्णून हि पोरं कशाला आहेत, पोरांनो ह्याचे सामान घेऊन या तसे त्या दोघांनी नाराजी ने मान हलवली आणि काही लागलं तर सांगा पोरींनो तुम्ही वर जा आणि फ्रेश होऊन घ्या" सरपंच म्हणाले.

"सरपंच तुमचे खुप आभार म्हणजे तुम्ही एवढे करत आहात त्यासाठी" टेमकर म्हणाले.

"अहो त्यात आभार कसले तुम्ही आमचे पाहुणे आणि त्याचे स्वागत करणे आमचे भाग्य आहे उद्या मी संध्याकाळी चार ला गावात सभा बोलावतो मग बोला तुम्ही काय ?सरपंचांनी विचारले. त्यावर टेमकरानी होकारात मान हलवली.

"टेमकर , मल्हार आणि ओजस सामान घेऊन येण्यासाठी निघाले. सामान घेऊन परत जात असताना रात्रीचे साडेआठ झाले होते.

"यार मल्हार तू कधी ताईचे सामान घेऊन गेला नाही ना? बघ आज तुला ते सौभाग्य प्राप्त झाले आहे" ओजस हसत म्हणाला.

"हो का? अरे लेका एक दिवशी तुझ्या ताई लापण घेऊन जाणार आहे ह्या सामानासोबत " मल्हार हसत म्हणाला.

 "हा ते माहित आहे आणि ताई साठी तू परफेक्ट आहेस" ओजस म्हणाला.

"आणि तू आरुषी साठी" मल्हार म्हणाला तसे ओजस हसला आणि म्हणाला

"आम्ही फक्त मित्र आहोत बाकी काही नाही."

"हो दिसते तुमची मैत्री डोळ्यात दोघांच्या, विचारून का नाही टाकत तुम्ही एकमेकांना?" मल्हार म्हणाला त्यावर ओजस हसला आणि म्हणाला

"अरे आमची मैत्री लहान असल्यापासुन आहे आणि तिच्या मनात काही नसेल तर त्या मैत्रीला गालबोट लागेल ना?"ओजस म्हणाला.

एक सल्ला देऊ? हे काम झाले कि विचार तिला ती नाही बोलणार नाही आणि अस्मि आहे काही झाले तर समजून घ्यायला काय?" मल्हार म्हणाला त्यावर ओजस मान डोलावली.

सामान घेऊन येताना ते असेच गप्पा मारत येत होते.

"मल्हार तू मला सिनियर आहेस तुला असा काही अनुभव आला का रे म्हणजे ते आजोबा सांगत होते तसा गड पाहून?" ओजस विचारले .

"नाही रे, मी पण पहिल्यांदा अनुभवत आहे पण एक बरे आहे ते जे कोण प्रधान का कोण आहे ते खाली येत नाही ,नाही तर पंचायत झाली असती " मल्हार म्हणाला आणि ते दोघे हसू लागतात.

 पण त्यांना हे माहित नव्हते कि त्या गडाच्या टोकावरून अंधारातून त्यांचा वर नजर ठेवली जात होती.

"याल, तुम्ही पण याल आणि मराल इकडेच कोणी जिवंत जाणार नाही.जो पर्यंत माझा प्रतिशोध पूर्ण होत नाही तो पर्यंत मी कोणाला नाही सोडणार" एवढे बोलून एक भयानक हास्य गडावर घुमले आणि त्याचा आवाज खाली चालत असलेल्या दोघांचा कानावर पण पडला.

"काय होते रे ते ?"ओजस ने विचारले

" काय माहित कदाचित भास असेल" मल्हार म्हणाला आणि ते दोघे सरपंचाच्या घराजवळ पोहोचले.

 सकाळी सर्वानी आजीचा हातचा गरम गरम नास्ता केला आणि ते सर्व सरपंच सोबत बोलत बसले.

"सरपंच मला सांगा तुम्हाला काय वाटते लोकांचे काय मत असेल ह्या सर्वावर ?" टेमकरानी विचारले.

त्यावर सरपंच हसले आणि म्हणाले "लोकांचे मत काय असेल हे समजेल कि संध्याकाळी तुम्ही एक काम करा आता आराम करा ,मी जातो आहे शेतावर आणि जाता जाता गावात सांगतो, एकाला सांगितले म्हणजे ते पोहोचते सर्वां पर्यंत" सरपंच म्हणाले.

"मी पण येऊ का शेतावर मला पण खुप आवडते शेती करायला एकदा का ह्या नोकरी मधून निवृत्त झालो कि शेती करणार हे ठरवले आहे मी, म्हणजे मातीची संप्रर्क येत राहील" टेमकर उत्साहात म्हणाले.

सरपंच हसले आणि म्हणाले ठीक आहे जाऊया चला.

"मुलांनो मी जाऊन येतो तुम्ही गाव फिरून घ्या पण जास्त लांब जाऊ नका समजले का? आणि त्या गडाच्या दिशने तर बिलकुल नाही" टेमकर ताकीद देत म्हणाले आणि ते सरपंच सोबत निघाले.

   "काय यार इकडे किती बोर होते आहे, ताई बसली आहे आजी ला मदत करत आणि मल्हार बसला आहे ताई ला बघत आणि राहिलो आपण दोघे,"

 मग मी पण तुला बघत बसू का?" आरु चे वाक्य तोडत ओजस म्हणाला.

"ह्या तसे नाही रे पण इकडे बघ ना कोणी नाही आहे गाव म्हणजे कसे पाहिजे गजबजाट माणसे दुकाने इकडे तर तसे काहीच नाही साधे नेटवर्क पण येत नाही" आरु बोलत असताना अस्मि आणि मल्हार येतात.

"काय रे काय गप्पा सुरु आहेत? मल्हार ने विचारले.

"काही नाही रे असेच आपले आम्ही बोलत होतो" ओजस म्हणाला.

"ताई खुप बोर होते आहे, काही काम पण नाही आहे, चल ना कुठे तरी फिरून येऊ" आरु म्हणाली.

"ठीक आहे चल आजी ने मला एक जागा सांगितली आहे तिकडे जाऊ" अस्मि म्हणाली आणि ते सर्व निघाले.

रस्ता विचारात विचारत ते गावाच्या वेशी जवळ असलेल्या पुरातन शिव मंदिर जवळ पोहोचले.

"वाह्ह!!! काय सुंदर मंदिर आहे" अस्मि म्हणाली.

"हो खरंच खुप छान आहे ह्याचे नक्षीकाम पाहून कदाचित हे पंधराव्या शतकातील असू शकेल एका कातळात कोरलेले आणि एवढे सुंदर नक्षी काम असलेलं मंदिर मी खुप कमी ठिकाणी मी पहिले आहे" मल्हार म्हणाला.

त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि काही वेळ ते तिकडे विसावले. तिकडे त्याचा वेळ कसा गेला त्यांना समजले नाही हे मंदिर म्हणजे त्यांच्या साठी एक पर्वणी होती . तिकडे काही वेळ घालून ते सर्व जेवायला घरी येतात. जेऊन थोडा वेळ गप्पा मारत असताना तिकडे टेमकर सर येतात आणि त्या सर्वाना घेऊन ते चार वाजता ग्रामसभेच्या चौकात सरपंच सोबत निघतात.


काय होईल सभेमध्ये? लोक ऐकून घेतील आणि त्यांना परवानगी देतील का? कि मोकळ्या हाताने माघारी फिरावे लागेल? पाहूया पुढील भागात ......

क्रमशः


भाग पाच : गावाची बैठक आणि आरुषी चा हट्ट ...

   "मंडळी आज मी सर्वाना इकडे काही कारणाने बोलावले आहे "सरपंच म्हणाले. गावातले सर्व त्या नवीन पाहुण्यांना पाहत होते, गावात सहसा कोणी बाहेरचे पाहुणे येत नाही त्या मुळे हे कोण आहेत? हे जाणून घेणायची उत्सुकता प्रत्येकाला होती.

"हे सरकारी कामासाठी इकडे आले आहेत ते काय काम आहे ते स्वतः सांगतील ,तर ते गोंधळ न करता ऐकून घ्या" सरपंच म्हणाले.

एक साठ एक माणसे असतील त्याचा समोर टेमकर उभे राहिले आणि त्यांनी काय काम आहे आणि त्याचे फायदे काय हे समजून सांगितले गावातील लोकांनी ते नीट ऐकून घेतले आणि त्यातला एक जण उठला आणि म्हणाला,

 "सरपंच ह्यांना माहित आहे ना? तिकडे काय आहे आणि ते किती भयानक आहे ते तरी पण ह्यांना जायचे आहे तिकडे?" त्या माणसाने विचारले.

 तसे टेमकर उभे राहिले आणि म्हणाले," आम्हाला सर्व इतिहास कालच सरपंचानी सांगितला आहे आणि तरी पण आम्ही जाणार आहोत. हे पाहा, हे आमचे काम आहे आणि हा गड तुमच्या गावाच्या अख्यारीत आहे त्या मुळे मला तुमची परवानगी हवी आहे" टेमकर म्हणाले.

गावकर्यांना मध्ये कुजबुज सुरु झाली. त्यातला एक जण उठला आणि म्हणाला

"हे पाहा असे काही झाले तर ह्याने गावचा विकास होणार आहे पण त्या साठी कोणाचे प्राण गमावणे आम्हाला मान्य नाही आहे" तो इसम म्हणाला.

"ह्यात कोणाचे प्राण जाणार नाही आणि गेले तरी गाव त्याला जबाबदार नसेल तसे हवे तर मी लिहून देतो" टेमकर म्हणाले तसे गावकऱ्यांची चर्चा पुन्हा सुरु झाली.

सर्वानू मते ठरवले गेले कि काम करायला द्याचे पण काही झाले तर गाव किंवा गावकरी जबाबदार नाही टेमकरानी ते मान्य केले आणि सर्वांचे धन्यवाद देऊन सभा संपली. आता गावात त्यांना सर्व ओळखु लागले होते. ते कोण कश्यासाठी आले आहेत हे सर्वाना समजले होते. अनोळखी नजरा पण ओळखत दाखवत होत्या.

"सरपंच तुमचे खरंच खुप धन्यवाद तुम्ही आमच्या साठी एवढे केले" टेमकर हात जोडून म्हणाले तसे सरपंच आजोबानी त्याचे हात पकडले आणि म्हणाले

"हात नका जोडू, अहो जर का तुम्हाला यश आले तर गावचे भलेच होणार आहे नोकरी साठी शहारत गेलेली काही माणसे परत येतील आणि इकडे त्यांना काम मिळेल आणि आमचे हे शापित गाव पुन्हा वसलेलं असेल."

 दुसऱ्या दिवशी टेमकर यांनी सर्व जबाबदारी अस्मि च्या खांद्यावर वर दिली आणि तिला म्हणाले,

"अस्मि हा प्रोजेक्ट आपल्या साठी खुप महत्वाचा आहे आणि ह्याला तू लीड करते आहेस तर लक्षात ठेव असे काही झाले नाही पाहिजे जेणे करून कोणाचा जीवाला धोका पोहोचेल. मी मुंबई ला जाऊन दोन दिवसात बाकी कागदी कारवाही करून जाधव त्याचा सोबत काही माणसे आणि त्या जागेच्या उत्खनाचा सरकारी कागद सोबत पाठवून देतो. तुम्ही सर्व स्वतःचा ची काळजी घ्या आणि नीट राहा" टेमकर म्हणाले आणि सर्वांचा निरोप घेऊन निघाले.

जसे टेमकर गेले तसे आरु ने सुटकेचा निश्वास सोडला...

"बरे झाले गेले नाही तर मला असे फ्री राहता आले नसते" आरु म्हणाली.

"म्हणजे ?अस्मि ने आश्चर्याने विचारले.

"म्हणजे ताई आता पण मोकळे कुठे पण फिरायला नाही का ?" आरु हसत म्हणाली.

"नाही हा, कुठे हि जायचे नाही तुम्हा सर्वांची जबादारी माझ्यावर आहे त्या मुळे कुठे जायचे नाही" अस्मि थोडे रागावून म्हणाली.

"ठीक आहे गावात तर जाऊ शकतो ना ?तसे पण मला इकडे खुप बोर होते आहे काही काम पण नाही आहे" आरु म्हणाली .

दारात मल्हार आणि ओजस उभे होते.

"आम्ही गावात जात आहोत तुम्ही येणार का कोणी?" ओजस ने विचारले.

"हा मी तयार आहे"आरु उत्साहात म्हणाली.

"ठीक आहे आणि अस्मि तू , तू नाही येत आहेस का?" मल्हार ने विचारले त्यावर अस्मि म्हणाली

"मी नाही येत आहे तुम्ही जाऊन या मी वाचत बसते.”

ते तिघे गप्पा मारत गावात निघाले ज्या नजर काल अनोळखी होत्या त्या ओळखीच्या झाल्या होत्या एका घरातून त्याना चहा साठी आमंत्रण आले तसे ते तिघे तिकडे गेले गप्पाच्या ओघात विषय गडावर गेला.

"ताई साहेब गड खुप सुंदर होता असे म्हणतात, कोणी गेले नाही पण ती चार पोर आली होती ना ती जाऊन आली होती रातच्याला ते सांगत होते गड रातीला खुप सुंदर दिसतो म्हणून आता काय खरे काय खोटे एकदा जाऊन आली पण चार दिवसानी पुन्हा गेली ती परत आली नाही त्यांनी काही फोटो पण काढले होते इकडे माझा कडे होते राहायला ते चार जण पण एकदा जाऊंन आले आम्हाला वाटले श्राप संपला पण झाले वेगळे, हे काय हे बघा एक त्यांनी मला एक फोटो दिला आहे आठवण म्ह्णून " त्या बाई ने त्याना तो फोटो दाखवला तो फोटो खरचं खुप च सुंदर दिसत होता. 

जेव्हा तो गड पहिल्यांदा पहिला होता तेव्हाच आरु ला भुरळ पडली होती आणि आता फोटो पाहून तर ती तिकडे जायला चंग बांधला होता. चहा घेऊन ते बाहेर निघत असताना आरु ने त्या फोटो चा एक फोटो मोबाईल मध्ये काढला.

"काय सुंदर दिसत होता ना गड रात्रीचा मला तर खुप आवडला,मी काय म्हणते आहे? आपण जाऊन पाहायचे का तो गड रात्रीचा" आरुषी म्हणाली तसे त्या दोघांनी तिच्याकडे पहिले आणि हसू लागले.

आरु ला काय झाले समजले नाही तिने त्या दोघांकडे पहिले आणि विचारले

"काय झाले? तुम्ही असे का हसत आहात?" तसे ओझस म्हणाला

"तुला माहित आहे आपला प्रोजेक्ट हेड कोण आहे?" त्यावर निरागस पणे आरु म्हणाली

"हो माहित आहे ताई आहे त्यात हसण्यासारखे काय आहे?" आरु चिडून म्हणाली.

" हसायला ह्याचे येत नाही कि ती प्रोजेक्ट हेड आहे ती सोडणार नाही हे माहित असून सुद्धा तू जायचा हट्ट करणार आणि तो चेहरा डोळ्यासमोर आणून आम्ही हसत आहोत हो कि नाही मल्हार" त्यावर त्याने फक्त मानेने होकार दिला.

"तुम्ही दोघं पण सामील आहात एकमेकांना तुम्ही बघा मी ताईची परवानगी काढते कि नाही" आरु म्हणाली आणि रागाने घराकडे निघाली.

काय होईल पुढे, आरुषी जाईल का गडावर? कि तिला परवानगी मिळणार नाही? ती चार मुले गेली हे खरे आहे पण गड अजून खरंच श्रपित आहे का? पाहूया पुढील भागात .....


भाग सहा : आरु गडाच्या दिशने प्रवास...

 अस्मि आजीला मदत करत असताना आरु आली ते दारातून ताई ताई आवाज देत रागात कदाचित ती हे विसरली होती कि ती स्वतःच्या घरात नाही तर गावात सरपंच आजोबांच्या घरी आहे. आरूचा आवाज ऐकून अस्मि पळत बाहेर आली.

"काय झाले एवढे का ओरडतेस?" अस्मि ने रागावून विचारले.

"मला बोलायचे आहे तुझ्याशी आता" आरु अजून मोठयाने बोलत होती.

"हे बघ आरु .आपण आपल्या घरी नाही आहोत इकडे आपण दुसऱ्याच्या घरी आहोत त्या मुळे तुला जे काही बोलायचे आहे ते हळू बोल." चिडून अस्मि म्हणाली .

"ठीक आहे तर, मग आताच आता वर चल आपल्या रूम मध्ये मला तुला काही तरी दाखवायचे आहे आणि विचारायचे पण आहे?आरुषी उतेजीत होत म्हणाली.

"काय झाले सांग?" अस्मि ने आश्चर्यने विचारले.

"नाही, आधी वर चल" असे बोलून ती अस्मिचा हात धरून वरती घेऊन गेली.

"ताई हा फोटो बघ किती छान आहे" आरुषी ने उत्सुकतेने विचारले .

"हा दिसतो तर आहे छान पण कोणता फोटो आहे हा?" अस्मि ने विचारले.

"तू गेस कर?" हसत आरु म्हणाली. 

"हा कोणता तरी गड आहे कारण बुरुज दिसत आहेत आणि त्याचा रात्रीचा काढलेला फोटो ज्यामध्ये काजवे आहेत जे चमकत आहेत आणि त्या मुळे असे वाटत आहे कि तारे इकडे ह्या गडावर आले आहेत "अस्मि फोटो निरखून पाहत म्हणाली.

"मस्त आहे कि नाही?" आरु ने विचारले त्यावर मानेने होकार देत अस्मि म्हणाली

"कोणता आहे ते तर सांग?" अस्मि ने विचारले

" हा गड आहे समरगड..." तिचे ते उत्तर ऐकून अस्मि ने तो फोटो पुन्हा नीट पहिला....

"आरु हा फोटो तुला कुठे मिळाला?" अस्मि ने आश्चर्याने विचारले.

त्यावर आरु ने त्या बाई ने जे सांगितले ते सर्व सांगितले.

"खुप सुंदर आहे "अस्मि पुन्हा तो नीट पाहत म्हणाली.

"मी काय म्हणते? आपण जाऊया का आज रात्री त्या गडावर कोणाला हि न सांगता? "आरु ने हळूच विचारले.

 "नाही कितीही सुंदर असले तरी रात्री तिकडे जायचे नाही ,काही झाले तरी मी पण नाही जाणार आणि तू किंवा अजून कोणी नाही जायचे" अस्मि चिडून म्हणाली.

" पण का? पाहायला काय हरकत आहे?" आरु ने विचारले.

"हे बघ आरु काही गोष्टी तुला सांगायची गरज मला वाटत नाही मी तुझी मोठी बहीण आणि प्रोजेक्ट हेड म्ह्णून सांगत आहे "अस्मि म्हणाली.

"ताई असे काय करतेस? आपण पुन्हा कधी येणार इकडे आणि तू फोटो बघ ना किती सुंदर आहे असा अनुभव पुन्हा नाही मिळणार ती मुलं पण ह्या साठी पुन्हा तिकडे गेली असतील?" आरु विनवनीच्या सुरात म्हणाली.

"हा गेली असतील पण ती परत आली नाहीत आपण पण येऊ कि नाही माहित नाही मला विषाची परीक्षा नको आहे "अस्मि म्हणाली.

आरु चिडली होती "हा मग उद्या ते कामगार आले तेव्हा तरी कशाला जायचे राहूया ना इकडेच भीती वाटते तर" आरु म्हणाली.

"हे बघ आरु माझ्यावर तुझी आणि टीमची जबाबदारी आहे आणि उद्या तुला काही झाले तर मी आई आणि बाबा ना काय सांगू ?त्यांनी तुला माझ्या जबाबदारी वर सोडले आहे नाही तर ते तुझ्या नोकरी ला पण विरोध करत होते माहित आहे ना तुला? "अस्मि चिडून म्हणाली.

"हा सर्व तुझ्या मुळे झाले आहे बस, मी नोकरी करते तुझा मुळे, शिक्षण झाले तुझा मुळे, सर्व तुझा मुळे झाले तू महान आहेस "असे बोलून रागाने आरु रूम मधून बाहेर गेली.

   मल्हार आणि ओजस ने आरुला चिडून बाहेर जाताना पहिले होते. तिला पाहून ते अस्मि कडे आले.

"अस्मि काय झाले? पुन्हा सुरू भांडली का?" मल्हार ने विचारले.

त्यावर अस्मि ने फक्त हुंकार दिला.

"ताई मी बोलू का तिच्या सोबत?" ओजस ने विचारले.

"नाही काही गरज नाही अति होते आहे तिचे आई बोलते ते बरोबर आहे मी जरा जास्तच डोक्यावर चढवले आहे" अस्मि म्हणाली.

"राग शांत झाला कि येईल ती परत तुम्ही उद्याच्या तयारी ला लागा उद्या मुंबई वरून माणसे येणार आहेत टेमकर सर आज रात्री माणसे पाठवत आहेत म्हणजे उद्या काम सुरु होईल. त्याचा राहण्यासाठी सोइ केली पाहिजे तुम्ही दोघे जाऊन गावात कुठे राहणायची सोय होते का पहा? आणि आरु सोबत कोणी काही बोलू नका ठीक आहे जा तुम्ही आणि मला रिपोर्ट करा" अस्मि म्हणाली आणि उद्याचे प्लॅनिंग करत बसली.

कितीही नाही म्हंटले तरी पण बहीण आहे काळजी वाटत होती म्ह्णून ती काम करताना सारखे दारा कडे पाहत होती साधारण संध्याकाळी सात वाजता आरु परत आली पण तिचा राग गेला नव्हता. ती कोणाशी काही बोली नाही जेऊन पुन्हा झोपी गेली.

   रात्री काही केल्या आरु ला झोप येत नव्हती, ती फक्त कूस बदलत होती, तिच्या डोळ्यासमोर अजून पण तो फोटो दिसत होता तिने मोबाईल सुरु केला आणि पुन्हा त्या फोटो ला पाहू लागली जणू काही त्या फोटो ने तिला मोहिनी घातली होती काही तरी मनात ठरून ती उठली आणि शेजारी झोपलेल्या आपल्या बहिणी ला एक नजर पहिले

"ताई सॉरी पण मला आता नाही राहवत आहे मला पण हा अनुभव घ्याचा आहे मी जाते पण लवकर येईन" अशी ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि हातात एक मोठी बॅटरी घेऊन ती निघाली.

आवाज न करता दरवाजा तिने उघडला आणि ती बाहेर आली. तिने आजूबाजूला कानोसा घेऊन पुन्हा दार लावून घेतले. थंडी चे दिवस असल्याने बोचरे वारे वाहत होते, बाहेर धुक्याची चादर पसरली होती बॅटरी चा प्रकाश जेमतेम एक हात अंतर एवढा पडत होता . एकदा तिच्या मनात आले कि ओजस ला पण उठवावे आणि सोबत घेऊन जावे पण नंतर विचार केला जर त्याला उठवले तर तो आधी येणार नाही कारण ताईचा हुकूम आहे ना आणि मला पण जाऊ देणार नाही त्या पेक्षा मी एकटी जाते ती चार मुले पण तर जाऊन आली त्यांना काही झाले नाही हि ताई ना उगीच काळजी करते, मान्य आहे मला कि प्रेम करते पण हे अति झाले जाऊदे मी एकटी जाते आणि पाहून येते असा विचार करून ती आवाज न करता खाली उतरली.

  दूर कुठे तरी कुत्रे भुंकत होते दाट धुके पसरले होते आणि त्यातून रस्ता काढत आरु चालत होती असे एकट्याने एवढ्या रात्री बाहेर पडणायची तिची पहिलीच वेळ होती. रातकिड्याचा किर्रर्र किर्रर्र आवाज वातावरण अजून गंभीर करत होता त्यात भर म्हणून घुबडाचे ओरडणे ऐकू येत होते. आरु मनातून घाबरली होती तिला वाटत होते कि परत फिरावे पण तिला त्या जागेने मोहिनी घातली होती आणि तिला ते पाहायचे होते. वातावरण भयाण होताना पाहून तिने सोबत आणलेला मोबाईल काढला आणि एका ठिकाणी थांबून तिने कानात हेडफोन घातले आणि त्यावर गाणे सुरु केले तिला असे वाटत होते कदाचित ह्या वातावरणाचा तिच्या मनावर परिणाम होत असेल आणि मोबाईल मध्ये पाहिले गाणे वाजले ते गुमनाम है कोई त्या गाण्यासोबत तिची भीती अजून वाढली.

"शी हे काय लागले त्या पेक्षा मरूदे मी अशीच चालते "बोलून तिने मोबाईल खिशात ठेवला चालत गावाच्या वेशी बाहेर आली होती. तिने बॅटरी मागे फिरवली आणि आपला कोणी पाठलाग तर करत नाही ना ह्याची खात्री करून ती पुढे निघाली.

     साधारण एक च्या सुमारास कसल्या तरी आवाजानं अस्मिची झोप मोड झाली. ती उठली आणि तांब्यातले पाणी पिऊन पुन्हा झोपणार तेवढ्यात तिला शेजारी आरु दिसली नाही, कदाचित बाथरूम मध्ये असेल त्या आवाजाने झोप मोड झाली असेल असे वाटून तिने मोबाईल हातात घेतला,त्यावर रात्री बारा ला टेमकर सर यानाचा मेसेज होता. टीम निघाली आहेत एकूण सात माणसे आणि सामान आहे त्याचा राहण्याची सोय केली असशील. कामाला उद्या दुपार पासून सुरुवात करा आणि रात्री तिकडे थांबण्याची गरज नाही बेस्ट ऑफ लक असा मेसेज अस्मि ने वाचला आणि त्यावर योग्य असा रिप्लाय केला पंधरा मिन झाले तरी आरु आली नाही अस्मि ला काळजी वाटली म्ह्णून तिने बाथरूमच्या दिशने निघाली. दरवाजा वाजून तिने आरु ला आवाज देण्यास सुरुवात केली पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही तिने दार वाजून पाहिले त्याचा पण काही उपयोग झाला नाही शेवटी तिने दरवाजा ढकलला तसा दरवाजा उघडला पण आत मध्ये आरु नाही हे पाहून अस्मि चे शरीर भीतीने गोठून गेले, आरु नक्की गेली कुठे हा विचार तिच्या डोक्यात आला आणि ती मुख्य दरवाजा जवळ आली आणि दरवाजा उघडण्याचा प्रयन्त करू लागली. पण दरवाजा उघडत नव्हता म्हणजे तो बाहेरून बंद करून आरु बाहेर गेली होती पण कुठे?एवढ्या रात्री नवीन गावात तिला काही झाले तर हा विचार मनात येताच अस्मि ला रडू कोसळले. तिने रडत रडत मल्हार ला फोन केला साधारण पाच रिंग नंतर झोपेत मल्हार ने फोन उचलला.

"हॅलो, मल्हार अरे आरु बेपत्ता झाली आहे" रडत रडत अस्मि म्हणाली.

"काय? बेपत्ता म्हणजे कधी आणि कुठे?" मल्हार ने विचारले. त्याची झोप पूर्ती उडाली होती आणि त्याचा आवाजाने ओजस ला पण जाग आली होती.

"माहित नाही पण तिने मला बाहेरून बंद केले आणि कुठे गेली मला काहीच माहित नाही" अस्मि रडत म्हणाली.

"तू ... तू काळजी करू नको मी येतो ... मी येतो बोलून मल्हार ने फोन ठेऊन दिला.

"काय रे काय झाले?" झोपेत ओजस ने विचारले.

"आरु बेपत्ता झाली आहे" मल्हार म्हणाला.

"काय आरु बेपत्ता झाली आहे?" आश्चर्याने ओजस ने विचारले.

 हो आणि तिने अस्मि ला बाहेरून कडी घातली आहे." मल्हार म्हणाला आणि दरवाजा उघउन बाहेर जाऊ लागला

"काय? आरु ने केले सर्व वेडी झाली आहे कि काय?" ओजस म्हणाला आणि तो पण उठला .

बाहेर येऊन त्यांनी अस्मि च्या रूमची कडी काढली तसे अस्मि रडत मल्हारला बिलगली.

"मल्हार कुठे गेली असेल आरु? एक तर गाव नवीन आहे आणि त्यात ती अशी गायब झाली आहे ?"अस्मि रडत म्हणाली.

" हे बघ आपण शोधू तिला तू नको काळजी करू चल आपण जाऊ" म्हणून ते दोघे खाली उतरले आणि ओजस मागून बॅटरी घेऊन आला.

"ओजस एक काम कर तू डाव्या बाजूला जा आणि मी आणि अस्मि उजव्या बाजूला पाहतो "मल्हार म्हणाला तसे तिघे पण निघाले.

   रात्रीच्या किर्रर्र अंधारात ते तिघे पण आरु ला शोधात असतात, धुक्याचा जाड थर पसरला असतो. गाव तसे जास्त मोठे नव्हते साधारण सत्तर एक घरे होती दाटीवाटीने वसलेली. गावात असेलेले कुत्रे त्यांना पाहून भुंकत होते. प्रत्येक ठिकाणी बॅटरी च्या प्रकाशात ते पाहत होते आवाज देऊ शकत नव्हते कारण तसे केले असते तर माणसे उठली असती आणि त्यांना हेच नको होते. इकडे आरु छोट्याश्या पायवाटेने पुढे सरकत होती. गड चढायला सोपा होता पण थंडीचा जोर वाढल्याने तिची चाल मंद होती.

"आज मी पाहूनच राहणार ती जागा किती सुंदर दिसत होती, ताई ला ना काही समजत नाही शहरात असे काही दिसते काय? आणि इकडे म्हणे त्या प्रधानाचे भूत आहे. एवढे शिकलेले आहेत तरी त्यांना समजत नाही कि भूत वैगेरे असे काहीच नसते. आता मी उद्या ह्यांची मज्जा करते उद्या मी जाऊन त्यांना माझ्या मोबाईल मधला काढलेला फोटो दाखवते म्हणजे त्यांना समजेल हि जागा किती सुंदर आहे आणि इकडे भूत वैगेरे काही नाही आहे. आता जर इकडे मला ओजस ने लग्ना साठी विचारले असते तर किती भारी वाटले असते ना? असा काजव्यांचा प्रकाशात त्याने मला लग्नाची मागणी घालणे आणि मी शरमेने मान खाली घालून त्याला होकार देणे आणि आमचे शूट करून पोस्ट केले असते तर किती वायरल झाले असते मी आणि तो फेमस झालो असतो पण नाही मला ताईचे ऐकायचे आहे प्रोजेक्ट हेड आहे ना ती आणि हा तिचा चमचा आला असता तर काय झाले असते" स्वतःशीच बडबडत आरु डोंगर चढत होती.

   इकडे तिघे पण गावात शोध घेते होते अंधारात बॅटरी चा प्रकाश हा एकच आधार त्यांना होता. गावात असलेले कुत्रे त्यांना पाहून भुंकत होते. पंधरा मिन शोध घेतल्या नंतर ते पुन्हा त्याच जागी आले.

"सापडली का?" त्यांनी एकमेकांना प्रश्न विचारला पण नकार ह्या शिवाय कोणाकडे काहीच उत्तर नव्हते. तसे अस्मि घाबरली आणि म्हणाली

"ती त्या गडावर तर गेली नसले आणि तसे असेल तर" एवढे बोलून अस्मि गडाच्या दिशेने पळू लागते आणि तिच्या मागे ओजस आणि मल्हार पळतात.


आरु कोणाला न सांगता गडावर जात आहे? तिकडे कोणी तिची वाट पाहत असेल का? कि खरंच तिने जसे पहिले तसे काजवे असतील.... काय होईल पुढे पाहूया पुढील भागात .....

क्रमश:


भाग सात : काळ्या सावलीशी प्रथम सामना ... 

आरु पूर्ण गड चढून वर पोहोचते...

"मी विचार केला तेवढे पण कठीण नव्हते चढणे" मागे बॅटरीच्या प्रकाशात दरी पाहत आरु म्हणाली.

 एक थंड हवेची झुळूक तिला स्पर्शून गेली जणू तिला कोणी तरी हाताने आत खेचत होते अशी भरल्या सारखी ती पुढे पुढे जाऊ लागली. ती आता गडाच्या जवळ पोहोचली आणि समोर एक भव्य कमान तिचे स्वागत करायला उभी होती. त्या कमानी कडे पाहत ती पुढे सरकू लागली.

"हि कमान किती वर्ष जुनी आहे काय माहिती "बॅटरीने ती कमानी कडे पाहत विचार करून स्वतःशी बोलत होती होती.

पण तिला हे माहित नव्हते त्या कमानीच्या आत मध्ये कोण तरी आहे जे लालबुंद डोळ्याने तिला पाहत होते, तिचे सौन्दर्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवत होते. कितीतरी वर्षानं आत असलेल्या ने स्त्री आणि तिचे सौन्दर्य पहिल

े होते, कधी हि आत येते आणि आपण हिचा उपभोग घेतोय असे त्याला झाले होते. आरुला आत वाट पाहत दबा धरून बसले आहे ह्याची काही कल्पना नव्हती. कमानीच्या आजूबाजूला बरीच झाडी वाढली होती. त्यामुळे जमिनीचा अंदाज येत नव्हता आणि त्यात भर होती अंधाराची असचं बघता बघता आरुचा पाय कश्यात तरी अडकला आणि तिचा तोल जाऊन ती पडली. तिने आपला उजवा दंड पकडला आणि ओरडली तिच्या हाताला काही तरी ओले लागले, पडल्यामुळे बॅटरी थोडी दूर पडली होती ती पुढे झाली आणि तिने बॅटरी हातात घेतली नशिबाने ती बंद झाली नव्हती तिने लगेच प्रकाश आपल्या हातावर टाकला तर तिकडे रक्त असल्याचे दिसले तिने त्याच प्रकाशात आपला दंड पहिला तर त्याला काही तरी लागले होते.

"आता हे काय नवीन लागेल. शी रक्त पण येत आहे उद्या ताई ने विचारले तर काय सांगू?" स्वतःशीच आरु बोलत होती.

रक्त थांबवण्यासाठी काही मिळते का ते आजूबाजूला पाहू लागली पण तिकडे काही नव्हते कसे तरी तिने ते रक्त दाबून ठरले.

"मला काय लागले ने शोधून काढते" असे बोलून त्वेषाने ती जागेवरून उठली आणि आजूबाजूला पाहू लागली तसे तिला झुडुपा मध्ये लपलेले एक त्रिशूल दिसले तिने जवळ जाऊन पहिले तर त्यावर पण रक्त लागले होते.

"अच्छा म्हणजे हे लागले तर, महादेव अहो तुम्ही कुठे कुठे विराजमान असता पण इकडे तुमचे असणे धोकादायक आहे एक काम करते तसे पण उद्या काम सुरु करायचे आहे तर त्याचा श्री गणेशा तुमच्या पासून करते आणि ती बॅटरीने त्या त्रिशूल निरखुन पाहू लागली बहुतेक हे पण त्याचा काळातले आहे "असं म्ह्णून ती उठली आणि हाताने हलून पहिले पण ते खुप घट्ट असल्याने निघाले नाही मग तिने शेजारी असलेला दगड उचला आणि जमीन खणू लागली साधारण पाच एक मिन मध्ये तिला तो बाहेर काढण्यात यश आले, ते जसा तो बाहेर काढला गेला तसे आत मध्ये एक विचित्र किनारी हास्य घुमले आणि ते ऐकून आरु च्या हातातील ते त्रिशुळ खाली पडले. अचानक तिच्या समोर एक काळी सावली आली तिला पाहून आरु प्रचंड घाबरली.

"क...क.. कोण आहेस तू ?"तिने घाबरत विचारले

पुन्हा एक हास्य गगन भेदत गेले आणि तिला त्या सावलीने तिला उचलले आणि गडावर घेऊन जाऊ लागली. आरु ने जोरात एक किंकाळी फोडली आणि ते हास्य आणि किंकाळी अस्मि मी ऐकली.

" हा आवाज तर आरुचा आहे काय झाले असेल तिला ? ती ठीक तर असेल ना? महादेव माझा आरुचे रक्षण कर बोलून ती अजून त्वेषाने गडावर चालू लागली.

आरुला त्या सावली ने मोकळ्या मैदानावर नेले आणि जमिनीवर फेकून दिले तशी आरु जोरात जमिनीवर आपटली तिच्या हाताच्या कोपऱ्याला लागलं होते आता ती सावली तिच्यावर हल्ला करणार तेवढ्यात आरु उठली आणि पळू लागली पण जास्त दूर जाऊ शकली नाही त्या काळ्या आकृतीने तिचा रस्ता अडवला आणि तिला केसांना पडकून फरफटत पुन्हा त्याच जागेवर घेऊन आला आता तो तिच्यावर ओणवा झाला पुढे काय होणार हे जणू आरु ला समजले होते आणि तिने एक गगनभेदी किंकाळी फोडली, हे सर्व सुरु असताना अस्मि ला आरुची बॅटरी आणि तिच्या शेजारी पडलेले ते त्रिशूल दिसले मल्हार आणि ओजस चा विचार न करता अस्मि ने ती बॅटरी आणि त्रिशूल घेऊन आत मध्ये प्रवेश केला. तिची चाहूल कदाचित त्या सावलीला जाणवली असेल आणि समोरचे दृश्य पाहून अस्मिच्या मनाचा थरकाप उडाला आरु खाली बेशुद्ध झाली होती आणि तिच्यावर ती काळी सावली ओणवी होती. त्रिशूल घेऊन अस्मि ने त्या दिशेने धाव घेतली आणि अस्मि ला त्रिशूल घेऊन आपल्या दिशेनं येताना पाहून ती काळी सावली ने तिकडून पळ काढला.

   अस्मि ने आरु चे डोके मांडीवर घेतले आणि रडत रडत ती आरु ला शुद्धीवर आणण्याचा पर्यंत करू लागली पण आरु काही शुद्धीवर येत नव्हती मागून ओजस आणि मल्हार पळत आले आणि त्यांनी काय झाले विचारले पण अस्मि काही बोलू शकत नव्हती ती सारखी रडत होती आणि आरु ला उठवणायचा पर्यंत करत होती. शेवटी मल्हार म्हणाला

"अस्मि धीर धर आपण हिला घेऊन आधी खाली जाऊ कारण पहाट होईल आणि कोणी गावात पहिले तर त्यांना उत्तर द्यावे लागेल."

अस्मिला ते पटले आणि तिने डोळे पुसले आणि उभी राहिली ओजस ने आरुला खांद्यांवर घेतले आणि ते हळू हळू गडावरून खाली येऊ लागले ,त्याना वाटत होते कि ते चार आहेत पण त्याचा सोबत अजून कोणाची तरी त्या गडावरून सुटका झाली होती आणि ते पण त्याचा सोबत होते.

   पहाटेचा सूर्य उगवण्याच्या आत त्यांना पुन्हा गावात प्रवेश करायचा होता तसे ते घाई ने गड उतरू लागले. सर्व जागे होण्याच्या आत ते आपल्या खोलीमध्ये आले होते आरु ची तशी अवस्था पाहून अस्मिचे डोळे वाहतच होते. तिने आरु ची जखम पहिले तिकडे रक्त सुकले होते. रडत रडत तिने जखम साफ केली आणि मलम लावत म्हणाली

"आई बोलते ना एकदम बरोबर आहे मी डोक्यावर चढवून ठेवले आहे. आरु ला किती नाही बोले तरी गेली तिकडे काय झाले काय नाही जाऊन बेशुद्ध कशी पडली काहीच कळायला मार्ग नाही आणि हिच्या हातावर हे कसे लागले काय माहित?" अस्मि रडत रडत म्हणाली.

"हे बघ अस्मि तू तिला नीट पहा आम्ही बाहेर जातो कारण जेव्हा मी तिला उचलेले तेवढा कमरेकडं काही तरी लागले आहे असे जाणवले तू नीट पहा आणि जर शुद्धीवर नाही आली तर डॉक्टर ला बोलावू आणि सरपंच याना सांगू ती पडली म्हणून, काही लागले तर सांग ?आम्ही येतो...." बोलून ओजस आणि मल्हार निघाले.

ती काळी आकृती त्याच्या रूमच्या कोपरात उभे राहून एक टक अस्मि कडे पाहत होती.अस्मि ने तिचे कपडे वर केले तर पाठीला खरचटले होते आणि तिकडे पण रक्त गोठले होते अस्मि ने जखम साफ करून औषध लावले आणि थोडावेळ झोपी गेली आणि कोपऱ्यात उभी असणाऱ्या आकृतीने आरुषी च्या शरीराचा ताबा घेतला.

  एक घोघरा आवाज अस्मि च्या कानाजवळ आला "मंजुळा......." तसे अस्मि दचकुन जागी झाली आणि इकडे तिकडे पाहू लागली पण शेजारी कोणी नव्हते फक्त आरु होती आणि तिला हळू हळू शुद्ध येत होती. तिला पाहून अस्मि ने आरूच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली आता कशी आहे तबियत तिचा आवाज ऐकून आरु ने हळू हळू डोळे उघडले आणि विचारले .

" मी इकडे कशी आली? मी तर गडावर होते"त्यावर अस्मि ने तिला बेशुद्ध पहिल्या पासून आता पर्यंत जे झाले ते सर्व सांगितले.

"ताई खरचं माफ कर मला मी गड चढत होते तेव्हा पडले आणि थकव्याने बेशुद्ध झाले" आरु ने खोटे सांगितले.

"ठीक आहे, पण आज माणसे येणार आहे कामाला सुरुवात होत आहे तू आराम कर आणि पुन्हा रात्री एकटी जाऊ नको"अस्मि म्हणाली

तसे आरु नकार देत म्हणाली "नाही ताई मी येते ,मी आता ठीक आहे आणि मला जास्त माहित आहे त्या गडाबद्दल मी मदत करेन कुठे काय आहे ते सांगायला" आरु म्हणाली. अस्मिला कळून चुकले कि आरु ऐकणार नाही त्यामुळे ती पण काही बोली नाही .

"तू जा पुढे मी येईन मागून तो पर्यंत मी थोडं पडते" आरु म्हणाली आणि अस्मिचा फोन वाजला.

"हो, तुम्ही एक तासात या मी भेटते तुम्हाला अस्मि म्हणाली आणि आरु कडे वळली.

:हे बघ आरु जमत नसले तर येऊ नको ठीक आहे, आपली कामगार आले आहे त्याचा साठी खोल्या तयार आहेत का ते मी पाहून येते तू आराम कर" बोलून अस्मि बाहेर जाते आणि दरवाजा बंद करते.

इकडे बेड वर बसलेली आरु चे डोळे पांढरे होतात आणि ती घोगऱ्या आवाजात म्हणते "हो मी आराम करणार आहे पण तुला संपून जुने हिशोब चुकते करायचे आहे तुझ्या सोबत आणि ते मी लवकरच करेन.

"आरु आली का शुद्धीवर?" मल्हार ने विचारले.

"हो आली आहे आणि माफी पण मागितली काल जे झाले त्यासाठी , मला एक शंका अजून आहे ती माझी आरु नाही आहे. अस्मि विचार करत म्हणाली.

"म्हणजे?तुला म्हणायचे काय आहे ? मल्हार ने आश्चर्यचने विचारले.

"म्हणजे, मी आरु ला लहान पणा पासून ओळखते तिला साधी सर्दी जरी झाली तरी ती बेड वरून उठत नाही आणि इकडे एवढे लागले आहे तरी तिला गडावर याचे आहे हि गोष्ट मला थोडी खटकली आणि ती काही झाले ना तरी एवढी हट्टी आहे कि ती माफि मागणे तर सोड तिला कोणाची गरज नाही असे वागली असती" अस्मि म्हणाली.

"अस्मि तू पण ना अगं आवडत असेल तिला काम करायला वय आणि जबाबदारी माणसाला खुप काही शिकवते तू नको एवढा विचार करू" मल्हार म्हणाला आणि ते दोघे कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था केलेले घर पाहायला निघाले.

आरु ला त्या शक्तीने पछाडले आहे पण ती शक्ती अस्मिच्या मागे का आहे? काय असेल ह्यामागचे रहस्य? पाहूया पुढील भागात....

क्रमश :


भाग आठ : गडावरील खजिना आणि आरु मधील बदल 

    साधारण बाराच्या नंतर सर्व कामगारांना घेऊन अस्मि मल्हार आणि ओजस गडावर पोहोचले होते.कामाला सुरुवात झाली आणि अचानक एक आवाज आला

"जिकडे खोदत आहात तिकडे काही मिळणार नाही. त्या जागेपासून वीस पाऊले पुढे जा तिकडे काही तरी असेल." सर्वजण त्या आवाजाच्या दिशेनं पाहू लागेल तर समोर आरुषी उभी होती.

" आरु तू इकडे कशाला आली जा जाऊन आराम कर" अस्मि काळजीने म्हणाली तसे आरु ने तिच्या कडे पहिले आणि हसून म्हणाली.

" आराम आता तर मी कामाला सुरुवात केली आहे अजून बरीच कामं बाकी आहेत"

एक कामगाराला खोदताना पायाला कुदळ लागली. तसे त्याने हातात असलेली कुदळ टाकून पाय पकडून ओरडू लागला. सर्व गोळा झाले. तसे त्याला पाहून आरु जोरात ओरडली,

" अरे ये मूर्खां काम जमत नाही का तुला नसेल जमत तर घरी जा इकडे तुझे काही काम नाही आणि एवढे लागलं नाही आहे जेवढा तू ओरडतोस समजले का? जमत नसले तर येऊ नको. माझं राज्य असते ना तर चाबकाने फोडला असता तुला निर्लज्ज कुठला "आरु चा असा अवतार पाहून ते तिघे पण चक्रावले.

 तो कामगार तर भीती ने कापत हात जोडून उभा होता.

"आरु तू काय बोलते आहेस तुला तरी समजत आहे का?" अस्मि ने रागात विचारले.

"हो मला चांगले समजत आहे ह्या किडयांना असेच पायाखाली ठेवायचे "आरु रागाचा एक कटाक्ष त्याच्यावर टाकत म्हणाली. तिच्या अश्या वागण्याचे अस्मि ला पण आश्चर्य वाटले.

"आरु तू शांत हो त्याला लागले आहे " ओजस...... अस्मि ने आवाज दिला तसे ओजस ने आरु वरची नजर न हलवता तोंडाने हुंकार दिला. "आरु ला जरा बाजूला घेऊन जा." तसे त्याने थरथरत्या हाताने आरूचा हात पकडला आणि तिला बाजूला घेऊन गेला.

"ये हात सोड माझा ,तू कोण रे माझा हात पकडणारा तुला माहित तरी आहे का मी कोण आहे ?"आरु अजून रागातच होती.

"अरे कोण तो दीड दमडीचा नोकर आणि त्याचा साठी मी शांत राहायचे" असे बोलून तिने अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या.

 तिचे असे वागणे ओजस साठी पण नवीन होते कधी तोंडातून शिवी न देणारी आणि शिव्या दिल्या तर चापट मारणारी आरु आज स्वतः शिव्या देत होती. हे पाहून ओजस च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. कदाचित तबियत खराब आहे म्ह्णून असे होत असे ओजस ला वाटत होते पण कदाचित आजारी असल्यांमुळे किंवा काल डोक्यला लागले असल्यानं होऊ शकते असा विचार करत असताना एक कामगार ओरडला त्या काही तरी मिळाले होते आणि तो अस्मि ला बोलावत होता.

अस्मि च्या आधी तिकडे आरु पोहोचली आणि तिने ती गोष्ट वरती मागितली ब्रश ने साफ करून पाहू लागली तिची नजर जरा विचित्र आहे असे अस्मि ला जाणवत होते. तिच्या हातात एक ग्लास होते.

"तुम्हाला माहित आहे का हे ग्लास कोणाचे आहे ?"आरु ने ग्लास हातात पकडत विचारले.

सर्वानी नाकारत मान हलवली तसे आरु हसली आणि म्हणाली "हे ग्लास ह्या गडावर राज्य करणारा शेवटचा राजा रविराज..... त्याचे हे ग्लास आहे रोज ह्याच ग्लासातून दारू प्यायचा हरामीसाला" आरु चिडून म्हणाली.

"आरु काय बोलतेस तू, आन ते ग्लास इकडे" अस्मि चिडून म्हणाली.

तसे आरु ने हसून ते ग्लास अस्मि कडे दिले त्या नंतर त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सापडल्या. आरु एक एक जागा सांगत होती आणि तिकडे खोदून पहिले तर काही ना काही तरी निघत होते एवढेच कशाला आरु तिकडे महाल कसा होता आणि कोण कुठे आणि कसे बसत होते राणी महाल कसा होता हे सर्व ती त्या तिघांना सांगत होती आणि हे सर्व ऐकून तिच्यावर विश्वास ठेऊ नये असे ठरवले तर ती ज्या जागा दाखवत होती तिकडे काही तरी मिळत होते आणि त्या जागा ती मेटल डिटेक्टर शिवाय दाखवत होती तिघांना पण समजत नव्हते नेमके काय झाले आहे. दुपार टळून गेली होती आता संध्याकाळचा सूर्य मावळतीला निघाला होता त्याचे ते विलोभनीय दृश्य पाहून त्याला पाहत राहावे असे वाटत होते पण टेमकर यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांना निघणे गरजेचे होते. सर्वाना आजचे काम थांबवायला सांगितले तसे कामगारांनी सर्व सामान तिकडे ठेवले तसे पण गडावर भुताच्या भीतीने कोणी येत नाही हे त्यांना माहित होते. जे काही मिळले ते सर्व समान घेऊन मल्हार कामगारासोबत खाली निघाला. आरु कुठे होती कोणाला माहित नव्हते गडावर आता फक्त ओजस आरु आणि अस्मि होती.

"ओजस तू जातोस तर जा मी आरु ला घेऊन येईन "अस्मि म्हणाली.

" नाही ताई राहू दे, आपण सोबत जाऊ" ओजस म्हणाला आणि त्या दोघांनी आरुला आवाज देण्यास सुरुवात केली.

थंडीचे दिवस असल्याने अंधार लवकर पडत होता. आरु..... आरु..... दोघे पण आवाज देत होते पण आरु त्यांना असे पाहत होती जसे एक वाघीण आपल्या शिकार पाहते.

"मरणार तुम्ही सर्व मरणार आणि सर्वात पहिली हि आरु ची बहीण मरणार लवकरच" असे बोलून तिच्या चेहऱ्यावर एक धूर्त स्मित उमटले.

तिला शोधात जेव्हा ते पुढे आले तिकडे आरु पाठमोरी बसलेली दिसली.

"ताई ती बघ तिकडे बसली आहे" ओजस म्हणाला.

तसे ते दोघे पण तिचा जवळ गेले आणि तिला मागून आवाज देऊ लागले पण तिने काही उत्तर दिले नाही म्हणून अस्मि ने तिच्या खांद्यावर हात ठेवला तसे तिने मागे वळून पहिले तिचे ते रूप पाहून दोघे पण दोन पावले मागे झाले. तिचा चेहरा आरु चा नव्हता तो कोणत्या तरी भयानक पुरुषाचा होता ज्याचे डोळे लाल होते, चेहऱ्यावर हसू पसरले होते जागोजागी माराच्या खुना होत्या.

"काय झाले असे मागे का गेलात?" आरु ने विचारले.

 त्यांनी पुन्हा तिचा चेहरा पहिला तर तो आरूचा होता ,मग हे होते काय भास कि अजून काही ?दोघे पण विचार करत होते. तसे आरु ने आपल्या कानात घातलेले हेडफोन काढले.

"तुमचे बरे आहे हे कानात घातले कि गाणे ऐक्याला मिळते ,नाही तर आमच्यावेळी त्यासाठी आम्ही खास नर्तकी आणि गायक ठेवायचो गडावर, माणूस एवढा पुढे जाईल वाटले नव्हते." आरु म्हणाली . ते दोघे पण आरु च्या तोंडाकडे पाहत होते.

"असे काय पाहत आहात माझ्याकडे मी थट्टा करत होते" आरु हसून म्हणाली. पण तिचे एकंदर वागणे पाहून तरी ती थट्टा असेल असे दोघांना वाटत नव्हते.

   गडावरून आता ते तिघे पण निघाले. आरु पुढे जात होती एका सरहिता प्रमाणे ती खाली उतरत होती. सूर्याची किरणे आता हळू हळू कमी होत जात होती.

"ताई मला ना थोडे बोलायचे आहे आरु बद्दल" हलक्या आवाजात ओजस म्हणाला.

"हमम बोल ना? "अस्मि म्हणाली

तसे त्याने एकदा आरु कडे पहिले आणि हाताने नंतर असा इशारा केला. कामगार त्याचा नेमून दिलेल्या खोली वर गेले आणि मल्हार ओजस आणि अस्मि आणि आरु हे सर्व सरपंचाकडे आले.

"काय पोरांनो काही मिळाले का नाही त्या भुताच्या गडावर " सरपंचानी हसत विचारले .

 तसे आरु ने त्याचा कडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाली "हो मिळाले ना आणि उद्या पण मिळेल पण परवा काही मिळाले हे पाहायला कदाचित तुम्ही जिवंत नसाल" आरु रागात म्हणाली आणि हसू लागली.

"नाही वय झाले आहे कधी पण काही पण होऊ शकते" आरु हसत म्हणाली.

"आरु काही पण काय बोलतेस "अस्मि चिडून म्हणाली.

"माफ करा हा सरपंच आजोबा ते थोडी विचित्र वागते आणि थट्टा करते ती "उसने हसत अस्मि म्हणाली.

"नाही पोरी मला राग नाही आला, ती बोली तेपण बरोबरच आहे मी किती दिवस असे जगणार आहे "बोलून सरपंच हसू लागले.

आरु ला घेऊन अस्मि रूम मध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला आणि तिचा कडे रागाने पाहून बोलू लागली. "काय गरज होती तुला असे काही बोलणायची सकाळी पण त्या कामगाराला तू अशी काही पण बोली, तू अशी का वागत आहेत आरु काय झाले आहे तुला ?" अस्मि ने विचारले तसे आरु हसू लागली आणि म्हणाली

"मला, मला काही नाही झाले पण लवकरच तुम्हाला आणि ह्या गावाला काही तरी होईल एवढी वर्ष बंद असलेले दार काल उघडले आहे आणि मी.. मी ह्या हवेत मोकळा श्वास घेतो आहे" बोलून आरु हसू लागली.

"तू काय बोलतेस काहीच समजत नाही आहे , समजेल असे काही तरी बोल" अस्मि म्हणाली.

"समजेल लवकरच समजेल...." आरु म्हणाली आणि फ्रेश होण्यासाठी ती बाथरूम मध्ये गेली.

अस्मि तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत राहिली.

   "आज मला मस्त मट्टन खायचे मन झाले आहे आज मी मस्त भरपेट खाणार खुप दिवसाचा उपाशी मी आज तृप्त होणार" आरु बाथरूम मधून बाहेर येत म्हणाली.

"एक काम करशील त्या म्हातारीला म्हणजे त्या आजी ला मट्टन करायला सांगशील का? हवे तर मोबदला देऊ त्यांना त्याचा" आरु म्हणाली.

अस्मि तिच्याकडे पाहून हिला नक्की काय झाले आहे त्याचा विचार करू लागली. अस्मि ने होकारात मान हलवली.

 "ठीक आहे मी जरा बाहेर जाऊन येते गावात नवीन काय बदल झाले आहेत ते पाहून येते" बोलून आरु निघाली आणि अस्मि तोंड उघडे ठेऊन तिच्याकडे पाहत होती.

हे सर्व काय सुरु आहे आणि आरु अशी का अचानक का वागत आहे काहीच समजत नव्हते?


आरु ला एवढे सगळे कसे माहित होते .... ती अशी का वागत होती .... हट्टी असली तरी असे कोणाला उलटे न बोलणारी आरु अशी का वागू लागली ...... अजून काय होणार आहे आरु सोबत पाहूया पुढील भागात .....

क्रमश :


भाग नऊ : आरुचा पाठलाग आणि तिचे खरे रूप 

   आरुला बाहेर जाताना पाहून मल्हार आणि ओजस अस्मि कडे आले.

"ताई नक्की काय झाले आहे आरु ला तिकडे गडावर तिचे वागणे पाहिले का? म्हणजे हे सर्व तिला कसे माहित कि कुठे काय आहे आणि कोणाचे आहे शिवाय त्या कामगारावर ती ज्या पद्धतीने ओरडली .अगं कधी शिव्या न देणारी आरु आज मात्र शिव्यांची लाखोळी वाहत होती" ओजस आश्चर्याने म्हणाला.

"हो ,म्हणजे मी तिला फार असे ओळखत नाही पण आज जी आरु होती ती वेगळी होती तिने महाल कसा होता हे अगदी तंतोतंत सांगितले आणि कदाचित ते खरे पण असेल पण जमिनी खाली कुठे काय आहे आणि ते कोणाचं आहे हे मात्र ती अचूक सांगत होती जर का हि दैवी देणगी आहे असेल आणि ती जर तिला आता प्राप्त झाली असेल तर आपल्यासाठी ते सोन्याहून पिवळे आहे" मल्हार म्हणाला.

"नाही हि कोणतीही दैवी देणगी नाही ना चमत्कार आहे, मला तर वेगळा संशय येतो आहे म्हणजे जी मुलगी कधी चिकन सोडून काही खात नाही आज अचानक ती मट्टन मागते आणि असे बोली जसे तिने खुप वर्ष झाली खाल्ले नाही. आणि ओजस तुला आठवते का? आपण जेव्हा गडावर ती एकटी बसली होती तेव्हा पाहिले ना तो चेहरा तिचा नव्हता काही सेकंड साठी तिच्या जागी कोणी तरी दुसरे आहे असे वाटले. मला तरी ह्या सर्वां मध्ये काही तरी वेगळे वाटत आहे. मी लहानपणा पासून ओळखते आरुला ती अशी नाही आहे काही तरी गडबड आहे आणि ती काय आहे हे जाणून घ्यावे लागेल" अस्मि विचार करत म्हणाली .

 रात्रीचे जेवण झाले आणि सर्व झोपी गेले. पण काही केल्या अस्मि ला झोप येत नव्हती त फक्त डोळे बंद करून पडली होती. अचानक कसला तरी आवाज झाला आणि अस्मि ने डोळे उघडले आणि पाहिले तर हा आवाज कोणी तरी दरवाजा बाहेरून बंद करून कडी लावताना येतो तसा होता. अस्मि ने शेजारी पाहिले तर तिकडे आरु जागेवर नव्हती दिवसभराचे तिचे ते विचित्र वागणे आणि आता असे अचानक गायब होणे हयात नक्की काही तरी गडबड आहे असे अस्मिला जाणवले आणि तिने मल्हार ला फोन केला. दोन रिंग मध्ये मल्हार ने फोन उचलला,

"हा अस्मि बोल काय झाले एवढा रात्री कॉल का केला सर्व ठीक आहे ना? त्याने जांभळी देत विचारले. नाही काही ठीक नाही आहे ,आरु आता पुन्हा गेली आहे बाहेरून कडी लावून मला काहीच समजत नाही आहे आरु ला काय झाले आहे?' बोलताना अस्मिचा कंठ दाटून आला होता.

"हे बघ तू नको काळजी करू मी आहे ना, आपण पाहू कायआहे ते ठीक आहे. आलोच मी" बोलून मल्हार ने कॉल ठेऊन दिला आणि त्याने ओजस ला उठवून आरु पुन्हा बाहेर गेली आहे हे सांगितले आणि ते ऐकताच ओजस ची झोप उडाली आणि मल्हार सोबत तो बाहेर आला आणि त्यांनी दरवाजा खोलला तसे अस्मि मल्हार ला मिठी मारून रडू लागली.

"काय झाले आहे माझ्या आरुला इकडे घेऊन आले ती माझी चुकी होती काल रात्री जर तिला अडवले असते तर आज हे असे काही झाले नसते." रडत अस्मि म्हणाली .

 मल्हार तिला शांत करत म्हणाला "हे बघ जे झाले ते झाले पण आता कुठे आहे ती हे शोधणे जास्त गरजेचे आहे."

"मला माहित आहे ती कुठे असू शकते? चला....." बोलून ओजस बॅटरी घेऊन निघाला

 ते तिघे पण बॅटरी च्या प्रकाशात रस्ता कापत गडाच्या पायथ्याशी पोहोचले.

"आरु इकडे कशाला येईल" मल्हार वरती पाहत म्हणाला.

"ताई माफ कर ,पण कदाचित गावातले माणसे जे सांगत आहेत ते खरे आहे कारण आरु चे एकंदरीत वागणे तिचे बोलणे सर्व जरा वेगळे वाटले आणि मला तर अशी शंका आहे कि गावात जे लोक सांगत आहेत ते कदाचित खरे आहे आणि आरुला त्या प्रधानाने तर झपाटले...."

" नाही असे काही झाले नाही आहे उगीच नको ते विचार मनात आणू नकोस" ओजस चे वाक्य मध्ये तोडत अस्मि चिडून म्हणाली.

"ताई मी फक्त शक्यता सांगितली आणि आपण जे पाहिलं ते तर नाकारू शकत नाही आपण, मला पण मनातून असेच वाटते कि जो मी विचार करतो आहे तो खोटा निघावा आरु माझी पण मैत्रीण आहे आणि माझे प्रेम आहे तिच्यावर मी अजून कोणाला बोलो नाही फक्त मल्हार ला ते माहित होते. ताई आपण वरती जाऊन पाहू कदाचित काल सारखी आरु ला आपली मदत हवी असेल "ओजस म्हणाला

 अस्मि ने डोळे पुसले आणि म्हणाली " आरु बाळा घाबरू नको मी येते आहे" आणि त्या तिघांनी पुन्हा तो गड चढण्यास सुरुवात केली.

   जस जशी रात्र पुढे सरकत होती तसे थंडीचा जोर पण काही कमी होत नव्हता. गड चढून ते वर आले आणि एक पुरुषी घोगरा आवाज त्यांचा कानावर पडला.

"मला, मला बंदिस्त केले होते ह्या गडावर तिला कुठे माहित होते नियतीचे फासे माझ्या बाजूने पडणार आहेत. आज मला माझी शपथ पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. अजून फक्त एक रात्र शिल्लक आहे मग त्या मंजुळा आणि तिच्या त्या साथीदारांचा खेळ संपेल. ह्या प्रधानाला समजली काय होती? माझा अपमान झाला तिच्या मुळे मी मेलो ह्या पडक्या गडावर बंदिस्त झालो आणि तिला मी दयेची भीक अजिबात घालणार नाही तिला मरावे लागेल आणि जसे माझे तुकडे झाले तसेच तिचे हाल करून मारणार मी प्रधान आहे प्रधान ....."बोलून आरु त्याच पुरुषी आवाजात हसू लागली.

ओजस आणि मल्हार चे समोरचे दृश्य पाहून डोळे भीतीने पांढरे झाले होते अस्मि डोक्याला हात लावून खाली बसली. त्यांची चाहूल कदाचित आरु म्हणजे प्रधान ला लागली होती तसे त्याने मोठयाने विचारले

कोण आहे तिकडे ?"तो आवाज ऐकताच मल्हार ओजस अस्मि ला घेऊन एका बाजूला लपून बसले.

काही वेळ शांततेत गेला आणि पुन्हा एक घर घर त्याचा कानावर पडली कदाचित त्याला समजले होते कि त्याचा शिवाय अजून कोणी तरी होते गडावर आता तिकडे थाबण्यात काहीच अर्थ नव्हता तसे ते तिघे अंधाराचा फायदा घेऊन निघाले.

 “मल्हार हे काय झाले आहे आरुला अशी का वागत आहे ती ?"रडत रडत अस्मि ने विचारले.

"हे बघ अस्मि शांत हो आपण ह्या सर्वावर उपाय काढू तू नको काळजी करू आम्ही आहोत ना" समजावत मल्हार म्हणाला आणि अस्मि चे डोळे पुसू लागला.

"ताई मला तर वाटत आहे कि त्या प्रधानाचे भूत आरु ला लागले आहे पहिले नाही का कशी पुरुषी आवाजात बोलत होती "ओजस म्हणाला.

"मला पण तेच वाटते" मल्हार ने दुजोरा दिला.

"असे असेल तर ह्यावर उपाय काय?" अस्मि ने विचारले .

" एक काम करू आता उपाय उद्या शोधू तू पहिले आत जा कारण तिने जर तुला बाहेर पहिले तर तिला शंका येईल त्यापेक्षा तू आत जा मी बाहेरून कडी लावतो आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा ती आरु आहे आणि तिचे हे प्रधान वाले रूप आपल्यला अजून समजले नाही आहे आणि अस्मि प्लीज तू तिच्या समोर फिकी पडू नकोस नाही तर तिचे सत्य आपल्याला माहित आहे हे तिला समजेल आणि मग ती आपल्याला संपवयाला मागे पुढे पाहणार नाही" मल्हार म्हणाला.

साधारण पहाटे सूर्य उगवण्याआधी आरु पुन्हा खोलीत आली आणि अस्मि च्या शेजारी येऊन झोपली जणू काही झाले नाही अश्या अविर्भावात ती होती पण तिला हे माहित नव्हते अस्मि ला तिचे सत्य समजले आहे.

   अस्मि रात्र भर झोपली नव्हती तिला आरु च्या काळजीने डोळा लागत नव्हता आणि एक भीती पण होती कदाचित झोपेत असताना आरु ने काही केले तर ह्या विचाराने तिला झोप येत नव्हती. साधारण सकाळी सात वाजता ती रूम च्या बाहेर आली. झोप नसल्याने आणि रडून तिचे डोळे लाल झाले होते. काय करावे ह्या विचारात असताना अचानक तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडतो तशी ती दचकून मागे वळते तर समोर मल्हार उभा असतो.

"अस्मि काय झाले झोप लागली नाही का?" मल्हार तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

 "माझ्या बहिणी सोबत असे काही घडताना तुला खरचं असे वाटते का कि मला झोप येईल? "अस्मि ने विचारले. "हे बघ मी समजू शकतो ह्यावर पण काही तरी उपाय असणार?" मल्हार म्हणाला.

"उपाय..... आणि उपाय असला तरी कोण सांगेल? सर्व घाबरतात त्या आत्म्याला आणि ह्या गावात त्याचा बद्दल सर्वात जास्त माहिती असलेला एकच माणूस आहे ते म्हणजे सरपंच" तसे अस्मि चे डोळे चमकले," मल्हार सरपंच, सरपंच असा एकच माणूस आहे जो मदत करू शकतो" अस्मि आशेने म्हणाली.

"असे असेल तर आपल्या आता लगेच त्यांना भेटून सर्व सांगितले पाहिजे" मल्हार म्हणाला आणि खाली जायला निघाला तसे त्याला अस्मि ने अडवले आणि म्हणाली

"नाही इकडे नाही बोलायचे आपण त्यांना त्यांच्या शेताकडे घेऊन जाऊ आणि तिकडे बोलू आणि इकडे जर आरु ला जाग आली तर ओजस ला इकडे ठेऊ जेणे करून तो आरु ला आपण कुठे आहोत हे शोधण्यापासून रोखेल."अस्मि ची हि कल्पना मल्हार ला आवडली आणि त्याने ओजस ला जाऊन सर्व सांगितले.

"हा तुम्ही जा ,काही माहिती मिळते का पहा? मी आहे आरु सोबत ओजस म्हणाला, तसे ते सर्व सरपंच च्या घरात खाली गेले.

नुकताच चहा घेऊन सरपंच बसले होते त्या दोघांना पाहून सरपंच यांनी त्याच स्वागत केले. "पोरी काय झाले? डोळे एवढे लाल आणि सुजले का आहेत भांडली का बहिणी शी?" सरपंचानी हसत विचारले.

"नाही तसे काही नाही सरपंच आजोबा थोडे बोलायचे होते "गंभीर आवाजात अस्मि म्हणाली.

"काय झाले पोरी बोल ना? सरपंच यांनी विचारले.

" नाही इकडे नको आपण शेतावर जाऊ मग बोलू" अस्मि म्हणाली.

"काही गंभीर आहे का?" आजोबानी विचारले तसे त्या दोघानी माना हलवल्या.

"चला तिकडे बोलू" असे बोलून सरपंच पुढे निघाले आणि दोघे मागे.


काय तोडगा निघेल का सरपंचांना सांगून .... कि सरपंच पण हतबल असतील? आरु ला त्या प्रधानाचे भूत सोडेल का जिवंत .... पाहूया पुढील भागात

क्रमश:



भाग दहा : सरपंचाचा उपाय आणि भैरवाचे आगमन... 

  सरपंच यांनी सर्व गंभीर पणे ऐकून घेतले आणि ते शांत पणे म्हणाले,

"तरी मी तुम्हाला सांगत होतो तिकडे जाऊ नका ती जागा चांगली नाही आहे, पण तुम्ही नाही ऐकलंत आता ह्यावर उपाय म्हणजे एकच आहे केले तर तोच काही तरी करू शकतो.

"सांगा, सांगा सरपंच मी माझ्या बहिणी साठी काही पण करू शकते" अस्मि रडत म्हणाली.

"हे बघ पोरी ज्याचे नाव मी तुला सांगणार आहे त्याचा कडे आधी पण आम्ही मदत मागितली होती, पण त्याने तेव्हा मदत करायला नकार दिला आणि म्हणाला योग्य वेळा आली कि मी नक्की मदत करणार पण आता ती वेळ नाही आहे." सरपंच म्हणाले .

"कोण आहे तो? मी मदत मागते त्याला काही पण करेन हात जोडेन , नाक घासीन काही पण करेन जर त्याने माझी बहीण मला परत मिळवून दिली पाहिजे" अस्मि रडत रडत म्हणाली.

"पोरी रडू नको तो मदत करेल कि नाही हे माहित नाही पण जर वेळ आली असेल तर तो नक्की उभा राहील त्याचे नाव आहे भैरव महादेवाचा मोठा भक्तआहे आणि त्याला सर्व समजते भूत भविष्य आणि वर्तमान याची माहिती आहे त्याला ,तोच एक आहे जो ह्या राक्षसाचा बंदोबस्त करू शकतो." सरपंच ठाम पणे म्हणाले.

" कुठे भेटेल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी मी त्याला शोधून घेऊन येईन....." अस्मि च्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली.

त्यावर सरपंच हसले आणि म्हणाले, "पोरी तू खरचं नशिबवान आहेस कारण तो दर अमावासेला महादेवाचे दर्शन घेत असतो आज पण अमावस्या आहे पण तो एकाच मंदिरात कधीच येत नाही तो फिरत असतो त्याला ना घर आहे ना संसार तो महादेवाचा सेवक अघोर आहे. त्याला आम्ही पाहिले होते ते जवळ जवळ वर्षभरापूर्वी ते पण मध्यरात्रीच्या वेळी पण आज तो येईल कि नाही माहित नाही पण तू प्रयन्त करून बघ कारण तो एकच आहे जो ह्या सर्वातून रक्षण करू शकेल." सरपंच म्हणाले.

 एक आशेचा किरण तिच्या समोर होता पण तो आज येईल का? ह्याची खात्री नव्हती.

   इकडे आरु ला जाग आली आणि ती बाहेर आली तसे दारात तिची वाट पाहत उभा असेलेला ओजस पुढे आला . "अरे आरु झाली का झोप?"तिला बाहेर येताना पाहून ओजस म्हणाला.

"तू काय माझ्यावर लक्ष ठेवत उभा आहेस का?" आरु ने खोचट सारखे विचारले.

तसे उसने हसू आणत ओजस म्हणाला "नाही असे काही नाही."

" तसे काही नसेल तरच बरे आहेत कारण काल रात्री कोणी तरी माझा मागावर होते आणि त्यांना वाटले कि मला समजले नाही पण मला इकडे बसून सर्व गोष्टी समजतात हे लक्षात असू द्या तसे पण जास्त दिवस नाही राहिले तुमचे हो कि नाही?" आरु ने विचारले आणि एक भयानक दृषी कटाक्ष त्याचावर टाकला तसे ओजस ने घाबरून दुसरी कडे पहिले.

"ते प्रेमी युगल कुठे गेले आहे? "आरु ने विचारले.

"ते मंदिरात गेले आहेत"ओजस म्हणाला.

"हा, जा मंदिरात जा नाही तर अजून कुठे पण जा काही होणार नाही, मला जे करायचे ते मी करणारच आणि ते पण उद्या रात्री ..."कुत्सिक हास्य करून आरु पुन्हा आत गेली.

   अस्मि आणि मल्हार दोघे पण आले होते.

" ताई काही समजले का ? उपाय किंवा काही , कारण आपल्या कडे जास्त वेळ नाही असे आरु म्हणत होती आपल्याला काही तरी लवकर करावे लागेल" ओजस म्हणाला.

"उपाय आहे पण त्या साठी आज मध्य रात्री मंदिरात जावे लागेल पण तो तिकडे येईल कि नाही माहित नाही" अस्मि म्हणाली.

"म्हणजे मला समजले नाही?" ओजस म्हणाला.

मला एक सांग आरु कुठे आहे?" अस्मि ने विचारले तसे ओजस म्हणाला

" ती गडावर गेली आहे आणि त्याने त्या दोघांमध्ये जे बोलणे झाले ते सांगितले.

"ह्याचा अर्थ ती उद्या आपल्याला मारणार पण आपण तिचे काय केले आहे? "मल्हार ने विचारले.

तिचे नाही कदाचित त्या आत्म्याचे केले आहे कारण आरु हि आरु नाही तिच्यात त्या गडावरचे भूत लागले आहे त्या मुळे ती आपल्याला मारणार आहे" अस्मि म्हणाली.

 पण का? ओजस ने विचारले.

"ह्याचे उत्तर आपल्यला भैरवच देऊ शकतो. अस्मि म्हणाली

" भैरव कोण आहे? " ओजस ने विचारले ज्यावावर अस्मि ने सरपंच आणि त्याचा मध्ये जे बोलणे झाले ते सर्व सांगितले.

"म्हणजे आज रात्री जर भैरव आला तरच ह्यावर तोडगा निघणार" ओजस म्हणाला.

"ओजस तू आज रात्री एक काम करायचे आरु मध्य रात्री जाते तिचा मागे जायचे आणि खाली उभे राहून लक्ष ठेवायचे तो पर्यंत मी आणि मल्हार मंदिरात थांबतो भैरवाची वाट पाहत." अस्मि म्हणाली

" ताई मी आरु च्या मागे?" थोडे घाबरत ओजस म्हणाला.

"हो असे समज हि परीक्षा आहे तुझ्या प्रेमाची" अस्मि म्हणाली.

"मल्हार तू आणि मी मंदिराजवळ थांबू जसे भैरव ची पूजा होतील आपण बोलू" अस्मि म्हणाली. जे काही होणार आहे ते सर्व आज रात्री होणार आहे.

     गडावर आज आरु सर्वात आधी गेली होती आणि काल रात्री पण ती उशिरा निघाली होती. सर्व कामगार घेऊन मल्हार, अस्मि आणि ओजस गडावर पोहोचले. तिकडे आरु ने काही ठिकाणी निशाण करून ठेवले होते.कामगारांना त्या निशाणावर खोदायला सांगितले आणि काय आश्चर्य त्या जागे खाली बराच पुरातन वस्तू निघू लागल्या. आरु ला हे सर्व कसे माहित हे आता विचारण्यात काही अर्थ नव्हता. इकडे आरु सर्व पाहत होती आणि कामगारांवर ओरडत होती. पन तिला बोलून काहीच अर्थ नव्हता हे त्यांना माहित होते. मल्हार तिकडे कामगारच जो मुख्य होता त्याचाशी काही तरी बोलत होता पण तो काय सांगत होता ते अस्मि ला समजले नाही त्याने त्याच्या पासून लांब उभ्या असलेल्या अस्मि कडे पहिले आणि तिची नजर त्याच्यावर आहे हे समजताच त्याने एक स्मित केलं. अस्मिच्या डोक्यात विचाराचे काहूर माजले होते. काय करावे काहीच सुचत नव्हते. जर का आज भैरव ने मदतीसाठी नकार दिला तर काय करायचे ?कारण त्यांचा कडे भैरव हा एकच पर्याय होता. विचार आणि काम ह्यात दिवस मावळतीला आला होता नेहमी सारखे सर्व कामगार निघाले त्याचा सोबत मल्हार पण पुढे गेला. गडावर फक्त आरु अस्मि ओजस राहिले होते. आरु आज तिकडे बसूंन होती.

"किती छान दिसतो ना सूर्य मावताना गडावरून असेच कोणाचा तरी सूर्य उद्या मावळेल "आरु हसू लागली तसे ओजस आणि अस्मिच्या काळजात धडकी भरली.

रात्री आरु पुन्हा आपल्या जागेवर नव्हती आणि ती गेली तेव्हा अस्मि जागीच होती. जसे आरु निघाली त्या नंतर पाच मिन मध्ये तिच्या मागे ओजस पण निघाला त्याला फक्त पायथ्याला जाऊन थांबायचे होते पण आरु ने जो रस्ता निवडला होता तो महादेवाच्या मंदिरावरून न जाता गावातून जात होता. आरु ने अजून तरी कोणाला नुकसान पोहोचवले नव्हते पण ती नुकसान करणार नाही ह्याची खात्री नव्हती. इकडे सरपंच आधीच मंदिराजवळ पोहोचले होते, कारण जर भैरव लवकर आला तर त्याला आरु बद्दल सांगून अस्मि येई पर्यंत थांबवावे लागले असते. रात्र पुढे पुढे सरकत होती आणि तसे थंडीचा जोर पण वाढत होता. साधारण मध्यरात्री साडेबारा वाजता अस्मि आणि मल्हार त्या मंदिराजवळ पोहोचले.

"सरपंच आजोबा आले का भैरव?" अस्मि ने विचारलेल्या प्रश्नावर सरपंचानी नकारात मान हलवली.

साधारण पावणे एक च्या सुमारास हर हर महादेव .... जय शिव शंभू नावाचा जयघोष मंदिरातून ऐकू येऊ लागला. सरपंच आजोंबा भैरव आले वाटत असे म्हणून अस्मि आत जाऊ लागली तसे मल्हार ने तिचा हात पकडून तिला मागे खेचले.

" मल्हार काय झाले. मला जाऊदे ना?" अस्मि म्हणाली तसे मल्हार ने तोंडावर बोट ठेऊन तिला शांत राहण्यास सांगितले.

"आरु ते अघोरी आहेत आणि जो पर्यंत त्याची पूजा संपत नाही तो पर्यंत आपण आत जायला नको अन्यथा ते आपली मदत तर सोड आपल्याकडे पाहणार पण नाही "मल्हार हळू आवाजात बोला.

"हा बोलतो ते बरोबर आहे पोरी, हे अघोरी महादेवाचे खुप मोठे भक्त असतात त्यांना पूजे मध्ये खन्ड केलेला त्यांना नाही आवडत" सरपंच दुजोरा देत म्हणाले.

पूजा जवळ जवळ एक तास सुरु होती पण आरु जर खोलीवर गेली असती आणि तिकडे तिने कोणाला पहिले नसते तर अनर्थ झाला असता. भैरव ने शेवटचा नाम घोष केला आणि पूजा संपन्न झाली, तसे अस्मि, मल्हार आणि सरपंच समोर आले. भैरव चे ते रूप पाहून कोणी हि घाबरले असते. डोक्यावर जटा, कपाळभर भस्म त्या मध्ये मोठे कुंकू, डोळे लाल भडक,कानात गळयात आणि हाताला रुद्राक्ष, दाढी आणि मिश्या वाढलेल्या हातात कमंडलू आणि त्रिशूल,अंगावर व्याघ चर्म परिधान करून भैरव उभा होता. 

कोण आहे भैरव आणि ती ह्या गांवात मदत करायला आला आहे का? पाहूया पुढील भागात.....

क्रमश:


भाग अकरा : भैरवाची ओळख आणि प्रधानाचे मृत्यूनंतरचे जग.....

"सरपंच तू पुन्हा इकडे ?"भैरव ने गर्जत विचारले.

"हो महाराज ह्यावेळी अडचण जरा वेगळी आहे." सरपंच हात जोडून म्हणाले.

"अडचण..... अरे अडचण ती असते जी परिस्तिथी तयार करते ती नाही जी मनुष्य स्वतः ओढवून घेतो. काय मंजुळा बरोबर आहे ना?" भैरव अस्मि कडे पाहून म्हणाले.

"माफ करा महाराज ,मी अस्मि आहे मंजुळा नाही" अस्मि म्हणाली.

त्यावर भैरव हसले आणि म्हणाले, "माणूस कधी समजणार कि जन्म झाला कि पुनर्जन्म सुद्धा होऊ शकतो कारण मागे जे काम अर्धवट राहिले ते पूर्ण करण्यासाठी" भैरव हसत हसत म्हणाला.

"म्हणजे मी समजले नाही बाबा?" अस्मि ने आश्चर्याने विचारले.

"सांगतो सर्व सांगतो पण एक लक्षात ठेव तुला जे काही सांगेन त्यावर विश्वास ठेवावा लागेल कारण दुसरा कोणता पर्याय तुझाकडे नाही" भैरव म्हणाले. आरु ने होकारात मान हलवली.

  " या गडावर प्रधान मेला त्यानंतर ज्यांनी राज्य केले त्याचे राज्य टिकले नाही. ज्याने हा गड जिंकला त्याचा मृत्यू चौथ्या दिवशी झाला हे माहित असेल तुम्हाला ?"भैरव ने विचारले तसे सर्वानी माना डोलावल्या. "आता पुढे काय झाले ते ऐका ...."बोलून त्यांनी सर्वाना बसण्याची खून केली.

"प्रधान च्या मृत्यू नंतर सर्वाना वाटले कि त्याचा जाच कमी झाला आणि सर्वानी सुखाचा निश्वास सोडला. मंजुळाला आत्याच्या घरी दिली आणि इकडे वर्षभरात समरगड मुघलानी काबीज केला. त्यानंतर गडावर विचीत्र आवाज येऊ लागले असे जसे कोणी तरी बोलवत आहे इकडे ये हे बघ इकडे सोन आहे, खोदून बाहेर काढ हे बघ इकडे हा इकडे..... रात्री जे पहारा करत होते त्यांना आधी हा आवाज अस्पष्ट होता पण दिवस वाढले तसे आवाज अजून स्पस्ट झाला त्यामधील तीन ते चार सैनिक त्या आवाजाला बळी पडले आणि त्यांनी जमीन खोदायला सुरु केली, सोन्याचा मोह आणि संमोहित करणारा तो आवाज ज्याने ते त्वेषाने खोदु लागले. काही फूट खाली गेल्यावर त्यांना छिन्न विछिन्न असे मानवी अवशेष दिसले तसे ते घाबरले पण तो पर्यंत वेळ गेली होती त्या प्रधानाची आत्मा मुक्त झाली होती. त्याने मुक्त होताच त्या सैनिकाचा बळी घेतला. त्यानंतर त्याने गडावर जे होते त्याचा पण बळी घेण्यास सुरुवात केली. पिशाच योनी मध्ये त्याची ताकत दस पटीने वाढली होती. गडावर त्याने मृत्यूचा नाच सुरु केला अनेक होम हवन नमाज सर्व करून पहिले पण त्याचा काही उपयोग नाही झाला. गड पूर्ण रिकामा झाला आणि त्याने आपला मोर्चा गावाकडे वळवला. दर चौथ्या दिवशी एक माणूस गायब होत असे आणि त्याचे प्रेत दुसऱ्या दिवशी तसेच छिन्न विछिन्न अवस्ते मध्ये मिळत असे, ह्याची सुरुवात मंजुळा च्या बापापासून झाली होती. त्याला गावात अनेक लोकांनी पहिले होते आणि त्याच्या भीतीने गाव पण सोडले होते. आता गाव पूर्ण ओसाड झाले होते तिकडे एक पक्षी पण येत नव्हता. आई आणि वडिलांचा अंत झाला ते पण त्या प्रधान मुळे ह्याचा राग मंजुळा ला आला होता तिने त्याचा कायमचा बंदोबस्त करायचे मनात ठरवले आणि ती घरातून निघाली. खुप ठिकाणी फिरून सुद्धा तिला त्याचा बंदोबस्त कसा करायचे हे समजत नव्हते. शेवटी एका महादेवच्या मंदिरात अघोरी तिला भेटला तिने त्याचा कडे आपले दुखणे मांडले त्यावर तो अघोरी हसला आणि म्हणाला,

"पोरी त्याला मारणे सोपे नाही कारण तो प्रेत योनी मध्ये आहे आणि त्याचा बदला हीच त्याची ताकत झाली आहे तो पहिल्या पेक्षा क्रूर झाला आहे आणि अशी आत्मा स्वतःहून कधी मुक्त होत नाही तिला मुक्ती द्यावी लागते पण त्यासाठी योग्य वेळा येणे गरजेचे आहे अघोरी म्हणाला.

 "महाराज पण ती वेळ कधी आहे, त्याने माझ्या आई वडिलाना मारले गावात लोकांना मारले आणि ह्याला मी कारण ठरले आहे" मंजुळा रडत रडत म्हणाली.

"हे बघ पोरी हे विधी चे विधान आहे ह्यात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. पण तुला एक सांगतो आता पण त्याच्या मरणाला कारणीभूत झाली तसे पुढे भविष्यात पण तूच त्याचा नाश करशील. आता मी तुला त्याला त्या गडावर अडकवण्याचा विधी सांगतो हा विधी केला तर तो पुन्हा त्या गडावरून खाली येऊन लोकांना त्रास नाही देणार पण काही झाले तरी कोणी त्या गडावर जायचे अन्यथा तो जिवंत येईल याची शाश्वती नाही"

एवढे बोलून त्या अघोरी ने तिला एक मंत्र आणि एक सिद्ध त्रिशूल दिला आणि तिला रात्री च्या वेळी मंत्र म्ह्णून तो त्रिशूल त्या गडाच्या दरवाजा शेजारी गाडायला सांगितले. मंजुळा घरी आली नवऱ्याला सर्व सांगितले,

"समजा मी नाही आले तर आपल्या बाळाची काळजी घ्या बोलून ती रात्री निघाली". तिला जाऊन तिकडे त्रिशूल गाडयाचा होता पण ते काम एवढे सोपे नव्हते.

तिने गावात प्रवेश केला गाव मध्ये स्मशान शांतात पसरली होती. लांब कुठे तरी कोल्ह्या चा आवाज येत होता. ती कंदील घेऊन गडावर आली. गडावर सर्व शांत आणि उद्वस्त केलेले होते. तिने कंदील खाली ठेऊन जमिनीमध्ये त्रिशुळासाठी खड्डा करायला सुरुवात केली होती तसे एक थंड हवेचा झोत तिच्या दिशने आला आणि काही समजण्याच्या आत ती गडाच्या आत खेचली गेली.

" मंजुळा किती वाट पहिली तुझी वेड्या सारखा मी इकडे एकटा फिरतो आहे" एक आवाज तिच्या कानावर पडत होता.

"बरं झाले तू आलीस नाही तर मला इकडे एकट्याला कंटाळा आला होता "असे बोलून तिला कोणी तरी तिला मागून धक्का दिला तशी ती जमिनीवर पडली. तिच्या पासून साधारण हात भर हवेत कोणी तरी तिच्यावर ओणवे झाले होते. त्याचा चेहरा पूर्ण रक्ताने माखला होता. दोन्ही डोळे जागेवर नव्हते. डोक्यातून मेंदू बाहेर दिसत होता हातची बोटे तुटली होती, मांडी फाटून त्यातले मास दिसत होते.

"मंजुळा नीट बघ माझा कडे माझी हि अवस्था तुझ्यामुळे झाली आहे आणि आता मी तुला नाही सोडणार "असे बोलून तो मंजुळाच्या अजून जवळ गेला त्याचे ते हिडीस रूप पाहून मंजुळा ला शिसारी आली. तिने मंत्र पठण सुरु केले तसे तो मागे सरकला जोरात ओरडू लागला,

" बंद कर ते बंद कर मला त्रास होतो आहे बंद कर "त्याला होणार त्रास पाहून मंजुळा अजून जोरात मंत्र पठाण करू लागली तसे तो अजून कळवळु लागला. मंजुळा उठली आणि बाहेर पळाली. तिने मंत्र म्हणत तो त्रिशूल शोधला आणि त्याला गडाच्या दरवाजाजवळ उजव्या बाजूला गाडून टाकला. जसे तो त्रिशूल गाडला गेला तसे तिने मंत्र पठण थांबवले.

"प्रधान आता तू कोणाचंही काहीच वाकडे करू शकत नाही." प्रधान चिडला आणि तिच्या वर हल्ला करायचा प्रयन्त करू लागला पण या त्रिशूळ मुळे त्याला बाहेर पडता येत नव्हते त्याने सर्व प्रकारे प्रयन्त केला पण काहीच उपाय झाला नाही कारण तो बाहेर पडू शकला नाही.

"मंजुळा तू पुन्हा मला मात दिली पण एक लक्षात ठेव एक दिवस असा येईल जेव्हा नशिबाचे फासे माझा बाजूने पडतील" हे ऐकून मंजुळा हसली आणि म्हणाली

"असे झाले तर तुझा वध हा माझा हातून होईल हे पण नक्की महादेवाकडे मी तशी प्रार्थना केलीय" आणि मंजुळा निघाली.

त्या नंतर अनेक वर्ष गेली पण ते त्रिशूल आपली ताकत दाखवत होते. तुझी बहीण पण आत जात असताना देवाने संकेत म्हणून ती पडली आणि तिला ते त्रिशूल लागले म्हणून तिने ते जमिनीतून बाहेर काढले जसे ते बाहेर निघाले तसे तो प्रधान पुन्हा मुक्त झाला त्याने तुझ्या बहिणीचा उपभोग घेण्याचा प्रयन्त केला पण त्याने तुला येताना पहिले तेच त्रिशुळ हातात घेऊन आणि तो घाबरला पण जेव्हा त्याला हे समजले कि तू मंजुळा नाही मग त्याने तुला बहिणी च्या शरीरात प्रवेश केला आणि तिच्या मार्फत मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

"पण महाराज ते चार दिवसानंतर कोणी तरी जाणार असे काही तरी ती बोली होती" मल्हार म्हणाला

तसे भैरव ने आपले डोळे त्यावर रोखले आणि म्हणाला "चार दिवस त्याने यातना भोगायला आहेत आणि म्हणून तो हिला पण चार दिवस यातना देणार मग हिला मारून टाकणार नंतर हिची बहीण आणि मग तुम्ही दोघे आणि नंतर गाव" भैरव म्हणाला.

"महाराज पण ह्याला काही उपाय आहे का? मला आरु ची अवस्था पाहवत नाही आहे "अस्मि रडत म्हणाली. "उपाय एक आहे आरुला मारून टाक म्हणजे तिच्या सोबत तो पण जाईल" भैरव म्हणाले.

"महाराज" अस्मि आस्चर्यने म्हणाली.

"हो, दुसरा पर्याय नाही" भैरव म्हणाले.

"नाही महाराज ती माझी बहीण आहे "अस्मि म्हणाली.

"हो पण सक्खी नाही" भैरव म्हणाले तसे मल्हार आणि सरपंच यांनी चमकून अस्मि कडे पहिले.

"माहित आहे महाराज मला पण मी तिला सख्या बहिणी सारखा जीव लावला आहे, त्याचा प्रतिशोध मला मारून संपेल ना ,मला मारू द्या पण तिला काही होऊ देऊ नका "हात जोडून रडत अस्मि म्हणाली.

भैरव हसले आणि म्हणाले "पोरी रडू नको मी तुझी परीक्षा घेत होतो ती तुझी सखी बहीण नाही आहे माहित आहे मला पण तुझे तिच्यावर किती प्रेम आहे ते पाहत होतो आणि तू पास झाली, बहिणी साठी तू जीव द्याला तयार झालीस खुप छान पोरी" भैरव हसत म्हणाले.

   "उपाय खुप जालीम आहे त्यात काही पण होऊ शकते,लक्ष देऊन ऐक" बोलून भैरव ने उपाय सांगितला. पुढे काय ते सर्व भैरव ने तिला समजावले.

"पण महाराज ह्यात तर खुप धोका आहे "सरपंच म्हणाले.

"धोका आहे पण पर्याय नाही आणि हो तो त्रिशूल घेऊन" ये मल्हार कडे पाहत अस्मि ला म्हणाले.

" उद्या मी तयारीत असें गडावर उद्या कोणाला हि तिकडे फिरकू देऊ नको" भैरव म्हणाले.

"पण आरु, तिला कसे अडवू "अस्मि ने विचारले

"त्याची काळजी करू नको तिच्या उशी खाली हे ठेव" असे बोलून त्यांनी एक रुद्राक्ष दिले

"हे तिला दिवसभर झोपून ठेवेल. पण रात्री याचा अमल कमी होईल आणि ती तुला घेऊन गडावर येईल. पुढे काय करायचे ते तुला माहित आहे पण ह्यात तुझी बहीण वाचेल आणि एक जवळचा व्यक्ती दुरावेल त्या साठी तयार राहा." हर हर महादेव चा जयघोष करत भैरव निघून गेले. आणि सर्व ते काय बोले ह्यावर विचार करत त्याचा पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागले.

     सर्व आता पुम्हा घरी जायला निघाले, ओजस ला फोन करून त्यांनी बोलावून घेतले. कोणी काहीच बोलत नव्हते. भैरव ने संगीत्याला प्रमाणे अस्मि ने ती रुद्राक्ष आरु च्या उशी खाली ठेवला आणि झोपी गेली. तिच्या मध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. तिला माहित होते कि आरु ला आता काही होणार नाही. नेहमी प्रमाणे उठवून सर्वानी सर्व उरकून घेतले मल्हार ने कामगारांना आज सुट्टी आहे असे सांगून टाकले.

क्रमशः

 

भाग बारा : अस्मि आरु खरे नाते आणि प्रधानाचा शेवट 

"अस्मि तू कधी बोली नाही कि आरु तुझी सक्खी बहीण नाही "मल्हार ने विचारले.

तसे हसून अस्मि म्हणाली "अरे त्यात काय सांगायचे होते मला सुद्धा कधी असे जाणवले नाही कि ती माझी सावत्र आई आणि सावत्र बहीण आहे. माझी आई मी दोन वर्षाची असताना एक आजारपणात गेली, बाबा दुसरे लग्न करायला तयार नव्हते पण आजी ने माझ्यासाठी त्यांना करायला सांगितले आणि त्यांनी माझासाठी दुसरे लग्न केले पण दुसऱ्या आई ने मला माझ्या आई ची कमी कधी जाणवू दिली नाही तिने माझ्यावर आरु पेक्षा जास्त प्रेम केले आणि अजून करते आहे हि गोष्ट कोणाला माहित नाही अगदी आरु ला सुद्धा नाही,या साठी मला तिचा जीव हा माझ्या पेक्षा जास्त प्रिया आहे" बोलताना अस्मिच्या डोळ्यात पाणी आले होते.

"ह्याचा अर्थ भैरव ला सर्व समजते" असे मनात विचार करत मल्हार चा चेहरा पडला आणि त्याने अस्मि कडे पाहत म्हणाला

"अस्मि मला तुला काही सांगायचे आहे," पण तेवढयात तिकडे ओजस आला

"ताई काल काय झाले म्हणजे मला एवढेच समजले कि भैरव तुम्हाला भेटला पण पुढे काय झाले हे त्यांनी सांगितले नाही" ओजस म्हणाला.

"हो, हो सांगते धीर धर, मल्हार तू काही तरी सांगत होता" अस्मि ने मल्हार कडे पाहत विचारले तसे तो भानावर आला आणि म्हणाला

"नाही काही नाही आज रात्री साठी आपला पण काही तरी प्लॅन केला पाहिजे ना हे सुचवत होतो".

" नक्की दुसरे काही नाही ना?" अस्मि ने पुन्हा विचारले.

"नाही नक्की काही नाही ..."मल्हार म्हणाला.

ओजस ला सर्व सांगितले आणि पुढचा प्लॅन त्यांनी बनवला.

रुद्राक्षाच्या मुळेआरु ला दिवसभर जाग आली नव्हती पण रात्री झोपण्यापूर्वी अस्मि ने ते तिच्या डोक्याखालून ते रुद्राक्ष काढून घेतले होते.

    साधारण रात्री बाराच्या दरम्यान आरु ला जाग आली आणि तिने बाहेर पाहिले,

"मी उठले नव्हते म्हणजे ह्यांनी नक्कीच काही तरी केले होते आता मी कोणाला नाही सोडणार बस झाले ह्याचे जीवन आता मी माझा बदला पूर्ण करणार" दात ओठ खात आरु म्हणाली.

तिने रागाने डोळे बंद केले आणि उघडले तर त्यात बुबळं नव्हते पूर्ण सफेद झाले होते. तिच्या चेहरयावर अनेक ठिकाणी जखमा दिसू लागल्या ज्यामधून रक्त गोठल्या सारखे दिसत होते. तिने अस्मि ला हलकेच हवेत उचलेल आणि दरवाजा न हात लावता उघडला. अस्मि ला गुंगी आली असेल असे समजून आरु तिला सोबत घेऊन जात होती. तिकडे बाहेर अंधारात सरपंच आणि मल्हर आणि ओजस लपून बसले होते. आरु अस्मि ला घेऊन गडावर पोहोचली, तसे तिला तिकडे कोणती तरी सकारात्मक शक्ती जाणवली. माझ्या शिवाय अजून कोणीतरी आहे ह्या गडावर म्हणजे माझ्या सोबत धोका झाला आहे असे बोलून आरु ने अस्मि वर हल्ला करण्यासाठी तिची मान पकडली आणि ती जोराने दाबू लागली अस्मि ला आरु चा तो भयानक चेहरा समोर दिसू लागली.

"आरु सोड मला मी तुझी बहीण आहे आरु" अस्मि दबक्या स्वरात बोलत होती पण अरुची पकड सैल होत नव्हती.

ते पाहून मल्हार पळत आला आणि त्याने आरु ला जोरात धक्का दिला. हा अनपेक्षित धक्क्या मुळे आरु बाजूला पडली.

"तू पण ह्यात सामील आहेस तर? बरे झाले आज प्रेमी युगलांची हत्या करून दोघंपण संपून टाकते "बोलून आरु ने दोघांच्या दिशेने धाव घेतली. तिला रोखण्यासाठी मल्हार पुढे आला त्याने तिला मारण्यासाठी हवेत हात उगारला जो आरु ने हात हवेत पकडला आणि त्याला आपल्या दोन्ही हाताने तिने मल्हार ला उचलेले आणि भरकावुन दिले तसे मल्हार जाऊन भिंतीवर आपटला. तिने पुन्हा आपला मोर्चा अस्मि कडे तिने अस्मिला उचलले आणि भिरकावणार तेवढयात आरूच्या पायावर काही तरी आपटले. आणि आरु ची पकड सुटली. तिने मागे वळून पहिले तर हातात एक लाकडी काठी घेऊन ओजस उभा होता.

"तुझ्या .... ला "एक अर्वाच्य भाषेत शिवी आरु ने त्याला दिली,

"आज सर्व मरणार वाटत एकच दिवशी "असे बोलून ती ओजस कडे वळली.

ओजस ने हातातली लाकडी काठी आरूच्या हातावर मारली काठी तुटली पण आरु ला काही झाले नाही. आरु हसू लागली आणि म्हणाली

"तुला काय वाटते ह्या सर्वाने मला काही होणार आहे. अरे मूर्ख माणसा, तुला अजून समजले नाही का? मी कोण आहे. जर का मी जिवन्त असतो तर मला काही झाले असते पण माझ्या सारख्या प्रेताला काही होणार नाही. पण तुला बरच काही होऊ शकते" असे बोलून आरु ने त्याला एक गुद्दा दिला तसे तो हवेत उडाला आणि समोरच्या दगडावर जाऊन आपटला त्यात त्याचा डोक्याला लागेल आणि तो बेशुद्ध झाला.

"आता तू, तुला वाचवणारे यार गेले आता कोण येणार तुला वाचायला?" बोलत आरु पुढे येऊ लागली.

"हे बघ आरु मी तुझी बहीण आहे मला मारून तुला काय मिळणार?" अस्मि रडत म्हणाली.

"बहीण .... हा हा हा आरु जोरात हसली , तू हिची बहीण आहेस पण माझी शत्रू आहेस आज तुझा मुळे माझी हि अवस्था झाली आहे. माझ्या ह्या अवस्थेला तू जबाबदार आहेस. तुझ्या मुळे मी ह्या नरकात सडलो तो राजा वाचला नाही तर त्याचा पण अंत झाला असता मला तोफेचा तोंडी दिले गेले तुझा मुळे, मला ह्या गडावर बंद व्हावे लागले त्याला पण तू कारण आहेस आणि आता माझी शपत मी पूर्ण करणार आज तुझा बळी मी देणार" एवढे बोलून आरु हसू लागली.

तिचा चेहरा रक्ताने माखला होता तिचे केस हवेत उडत होते, शरीरावर जागो जागी जखमा झाल्या होत्या आणि त्यात गोठलेले काळे रक्त दिसत होते. डोक्यावर खोच पडली होती, डोळे सफेद झाले होते भयानक हास्य करत ती अस्मि कडे येत होती. अस्मि ला समजले आपल्याला वाचायचे असेल तर सामना करावा लागेल. आरु समोर येत होती तिला पाहून अस्मि ने तिला चिथावण्यास सुरुवात केली. अस्मि ने डोळे पुसले आणि म्हणाली,

"अरे ये भेकडा माझा बहिणी आधार घेऊन मला संपवयाला निघाला आहेस तुझी हिम्मत तरी कशी झाली तू बोला ते अगदी बरोबर बोला म्हणजे तुला तोफेच्या तोंडी देण्यास भाग पडणारी मीच होते, तुला ह्या गडावर सडत ठेवणारी पण मीच होते आणि तू माझा बदला घेण्यासाठी माझ्या बहिणी चा वापर करतो, अरे थू तुझा मर्दपणावर तुझ्या हातून एकदा नाही दोनदा मी सुटले आणि तू काय केले माझ्या बहिणी चा वापर करून मला मारायचा प्रयन्त करतो आहेस हीच का तुझी मर्दानगी, अस्सल मर्द अशील तर तिचे शरीर सोड आणि लढ माझा सोबत आज एकतर तू राहशील नाही तर मी" बोलत बोलत अस्मि मागे सरकत होती आणि आरु पुढे येत होती एका ठिकाणी अस्मि थांबली आणि म्हणाली

"आता तरी स्वतः लढायची हिम्मत कर" तिचे ते बोलणे ऐकून आरु ने गगनभेदी किंकाळी फोडली आणि आरूच्या शरीरातून तोंडातून एक काळी आकृती बाहेर पडली.

हळू हळू ती आकृती आकार घेऊ लागली, लांब मानेपर्यंत केस,कवटीचा अर्धा भाग डोक्या पर्यंत गेला होता तिकडे किडे लागले होते, एक हात तुटला होता, पोटातून रक्त वाहत होते. लंगडत लंगडत तो पुढे येत होता.

"बघ माझा कडे बघ हे अवस्था तुझ्यामुळे झाली आहे ह्याला तू जबाबदार आहेस आणि आता तुझा खेळ मी संपवणार "हसत हसत प्रधान म्हणाला.

त्याला पाहून अस्मि हसू लागली आणि तिने जोरात भैरव ला आवाज दिला. तसे हर हर महादेव चा जयघोष करत भैरव समोर आला आणि त्याने अभिमंत्रित जल जमिनीवर टाकले तसे एक आगीचे रिंगण तयार झाले जे प्रधानाला अनपेक्षित होते. तो आपल्या चहु बाजूने लागलेल्या आगी कडे पाहून जोरात ओरडू लागला.

"धोका, धोका केला आहे माझ्या सोबत तुम्ही सर्वानी मी कोणाला नाही सोडणार" त्याचा ह्या वाक्यावर अस्मि हसली आणि म्हणाली.

"तू ह्या चक्रातून बाहेर तर पडून दाखव आधी, अरे आम्ही काय तुला मूर्ख वाटलो का? तू मला इकडे घेऊन आला मी जागी होते मला मारायला आणले हे पण मी जाणत होते मल्हार मध्ये येणे, ओजस मध्ये येणे हे सर्व आमची चाल होती ह्या रिंगणा पर्यंत घेऊन यायचे होते तुला आणि तुझा गर्व तुझा अहंकार जागा करून माझा बहिणीचे शरीर सोडायला भाग पडायचे होते कारण तू जो पर्यंत तिच्या शरीरात आहे तो पर्यंत तुला मारणे शक्य झाले नसते ह्यात मल्हार,ओजस आणि माझ्या जीवाला धोका होता पण आम्ही तो धोका पत्करला कारण तुला संपवयचा होता आणि तू आमचा जाळ्यात अलगद अडकला पण तू काळजी करू नको तुला मी नाही मारणार तर तुला तीच मारेल जिने या आधी पण तुला दोन वेळा मात दिली आहे."अस्मि चिडून म्हणाली.

 भैरव ने मंत्र पठण सुरु केले आणि एक सफेद आकृती त्या दिशेने आली.

"मंजुळा तुझी शपत पूर्ण कर ह्या राक्षसाला शेवटची मात दे" भैरव म्हणाला आणि त्याने मल्हार कडून घेतेले त्रिशूल तिच्या हाती दिले.

"महाराज मी एकटी नाही ह्याला मारणार कारण हा माझा आणि अस्मिचा गुन्हेगार आहे याला आम्ही दोघी मिळून शिक्षा देणार. मंजुळा ने अस्मि मध्ये प्रवेश केला. प्रधान तुला आधी पण म्हणाले होते तू भूत योनी मध्ये आहेस म्हणून मी तुला मारू शकली नाही पण आता मी एकटी नाही तर माझ्या सोबत माझी प्रतिकृती आहे. देवाने हिल माझा सारखे रूप दिले आणि इकडे पाठवले कारण विधीला पण हेच मजूर होते ह्या वेळी पण फासे माझ्याबाजूने पडले, आता मारायला तयार हो तुझा अंत येतो आहे." मंजुळाने(अस्मि) ने तिला दिलेला मंत्र पुटपुटली आणि त्यावर अस्मिचे थोडे रक्त लावले. तो त्रिशूल प्रकाशमान झाला आणि मंजुळा (अस्मि) ने त्या रिंगणात उडी घेतली आणि तो त्रिशूल प्रधान च्या छातीमध्ये घुसवला.

ते दृश्य असे भासत होते जणू आई दुर्गा महिषासुराचा वध करते आहे. प्रधानाची जोरदार किंकाळी त्या गडावर घुमली आणि संपूर्ण गावात ऐकू आली. तसे गडावर काही तरी झाले असे समजून पूर्ण गाव गडाच्या पायथ्याला जमा झाले. इकडे प्रधानाच्या आत्मा तुकडे हवेत विरून मुक्त झाले.

 रिंगणाची आग शांत झाली. अस्मि मधून मंजुळा बाहेर आली. आरु ला आणि ओजस ला शुद्ध आली होती. सर्वानसमोर अस्मि आणि मंजुळा उभ्या होत्या त्या दोघी पण सारख्या दिसत होत्या हे पाहू कोणाचा विश्वास ठेवणे मुश्किल झाले होते.

   "अस्मि बाळा मी समजू शकते तू माझा कडे असे पाहणे पण तू माझा अंश आहेस आणि हे मला ह्या भैरव महाराजांनी तेव्हाच सांगितले होते जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटून मंत्र घेतला होता. तेव्हा ते मला म्हणाले होते. ह्या प्रधानाचा अंत नक्की होतील पण तो आता नाही योग्य वेळ आल्या नंतर आणि तो तुझ्या आणि तुझा अंश असलेल्या व्यक्ती कडून होईल आणि आज त्यांनी ते खरे केले."

 सर्वानी भैरव कडे पहिले त्याचे वय किती याचा अंदाज कोणी लावू शकले नाही.

"पोरी आज तुझा मुळे मी पुन्हा त्या राक्षसाला मात दिली आणि हा गड आणि हे गाव त्याचा पासून मुक्त केले आता मी पण मुक्त होऊ शकते." भैरव ला नमस्कार करून तिची सफेद आकृती अंतर्धान पावली.

ह्या सर्वानी भैरव ला नमस्कार केला तसे हर हर महवदेव चा जयघोष करून भैरव ने मल्हार कडे पहिले आणि म्हणाला :आता तरी खरे सांग ह्या पोरीला "बोलून सर्वाना आशीर्वाद देऊन भैरव निघाले.

   मल्हर अस्मि जवळ आला आणि हात जोडून म्हणाला. "अस्मि मला माफ कर हे सर्व माझ्या आणि टेमकर सर यांच्या मुळे झाले. टेमकर याना मुख्यमंत्रीचा कॉल आला नव्हता. त्यांची नजर ह्या गडावर पहिल्या पासून होती कारण आम्ही ह्यातून निघालेले सामान परस्पर सरकारात जमा न करता विकणार होतो आणि हे आम्ही पहिल्यांदा करत नाही ह्या आधी पण आम्ही भरपूर वेळा केले आहे आणि त्या दिवशी मी कामगाराला हेच सांगत होतो मला वाटले तुला समजले पण तसे नव्हते आणि हे जर आता तुझ्या पासून लपवले तर मी माझ्या नजरेतून उतरेन."अस्मि रडत रडत सर्व ऐकत होती. तिने मल्हार ला मिठी मारली, मल्हर तिला म्हणाला

"मी स्वतःला पोलिसच्या स्वाधीन होईन आणि त्यांना सर्व खरे सांगेन. आरु ला काय सुरु आहे हे समजत नव्हते. तिच्या जवळ ओजस आला आणि त्याने तिला विचारले लागले नाही ना तुला त्यावर हसून आरु म्हणाली,

"मला नाही लागेल पण तुला नक्की लागेल जर तू आता मला लग्नासाठी नाही विचारले तर?" ओजस आस्चर्यने तिच्या कडे पाहू लागला.

"हो मूर्खां मला माहित आहे तू माझ्यावर प्रेम करतो ते "आणि तिने ओजस ला मिठी मारली.

सरपंच देवांचे आभार मानत होते.

   सूर्यदेवाने दर्शन दिले आणि पूर्ण गड अंधारातून उडेजात गेला. सरपंच खाली आले आणि त्यांनी सर्वाना हि गोड बातमी दिली तसे सर्वानी त्या तिघांना डोक्यावर घेतले आणि गावाकडून सत्कार झाला तो हि ह्याच गडावर आणि मल्हार पोलिसाच्या स्वाधीन झाला सोबत जे होते त्याची नावे दिली खटला उभा राहिला आणि मल्हार ला पण शिक्षा झाली पण माफीचा साक्षीदार म्हणून कमी होती नंतर त्याने अस्मिच्या वडिलांची कंपनी मध्ये नोकरी करू लागला पण प्रामाणिक पणे आरु आणि ओजस आणि अस्मि आणि मल्हार चे लग्न झाले. पण अजून आरुला हे सत्य माहित नाही कि अस्मि तिची सक्खी बहीण नाही आहे. अजून त्या तिघांची मोहीम सुरूच आहे आणि भैरवचा शोध सुद्धा ....

समाप्त….


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama