STORYMIRROR

Akshay Yadav

Horror

4  

Akshay Yadav

Horror

अमानवीय ते – सामना एका गूढ शक्तीसोबत - भाग १

अमानवीय ते – सामना एका गूढ शक्तीसोबत - भाग १

4 mins
572


(गृहप्रवेश आणि अनोळखी भीती) - भाग १ 

  शीतल त्या दिवशी आपल्या दोन रूमच्या फ्लॅट मध्ये एकटीच होती. तिची मुले शाळेत आणि नवरा कामावर गेला होता. किचन मध्ये आपल्या हातातील कामे संपवत असताना तिला आपल्याकडे चोरून कोणीतरी पाहत आहे असा भास होऊ लागला होता. तिला असा भास होणे हे काही पहिल्यांदा होत नव्हते या आधी पण तिला असे वाटत होते कि किचन मध्ये हॉल मध्ये किंवा बेडरूम मध्ये कोणीतरी तिला पाहत आहे. एकदा तर हद्द झाली होती ती बाथरूम मध्ये बाथ घेत असताना तिला कोणाची तरी सावली दिसली होती पण कदाचित हा डोळ्यांचा धोका आहे असे समजून तिने दुर्लक्ष केले होत. पण आज होणार भास हा नेहमी सारखा जाणवत नव्हता. तिच्या मागे कोणीतरी उभे राहून आपल्या गरम गरम श्वास तिच्या मानेवर सोडत आहे असे तिला वाटू लागले. ती घाबरून झटक्याने मागे वळली पण तिकडे कोणी नव्हते. ती पुन्हा तिच्या कामाला लागली तसे कोणीतरी तिच्या कमरेला स्पर्श केला तो थंडगार स्पर्श तिला तिच्या कमरेवर जाणवला. साडी नेसल्याने तिची कंबर थोडी मोकळी होती. ती घाबरली आणि भीतीने कापत तिकडेच उभी राहिली. तिचे डोळे भीतीने विस्फारले होते, तिच्या तो गोरा आणि मनमोहक चेहऱ्यावर घामाचे थेम्ब जमा झाले होते अचानक होणार असा स्पर्श तिला अनपेक्षित होता ते हि कोणी घरात नसताना. तिने आपल्या डोळ्यांच्या कडेने मागे बघण्याचा प्रयन्त केला पण तो पण असफसल झाला पुन्हा तोच गरम श्वास तिने तिच्या पाठीवर अनुभवाला तिच्या कानात एक थंड आणि भसाडा आवाज घुमला... "काल रात्री तू वाचलीस आज कोण येणार तुला वाचवायला....." सोबत एक किन्नरी हास्य घुमले.  

ती गर्रर्र कन मागे फिरली तिच्या मागे थोड्या अंतरावर तिला एक काळी सावली दिसली तशी ती जीव मुठीत घेऊन घरातून बाहेर पळाली ती थेट इमारतीच्या बागेत जाऊन थांबली. . ती सलग चार मजले पळत उतरली होती, तिच्या श्वासोश्वासाची गती तीव्र झाली होती. परत एकदा तिने आपल्या घराच्या खिडकीच्या दिशेने पहिले तर तिकडे एक काळी सावली तिला उभी दिसली. त्या सावलीला पाहून शीतल अजून घाबरली आणि ती तिकडे एका बाकावर बसली. सकाळची अकराची वेळ होती, नुकतीच इमारत बांधली गेली असल्यानं तिकडे अजून कोणी राहायला आले नव्हते. शीतल च्या मजल्यावर तर फक्त शीतल चे कुटूंब रहायला आले होते. विचारात मग्न असताना तिला भूतकाळात झालेल्या गोष्टी आठवू लागल्या.

शीतल आणि राकेश च्या लग्नाला आता बारा वर्ष झाली होती, जेव्हा शीतल चे लग्न झाले तेव्हा ती फक्त २२ वर्षाची होती. तिला अजून पुढे शिकायचे होते पण स्थळ चांगले आले आणि मुलगा सरकारी नोकरी मध्ये आहे म्हणून तिच्या घरचो तिच्या मनाचा विचार न करता शीतल चे लग्न राकेश सोबत लावून दिले. लग्ना नंतर साधारण दोन वर्षांनी त्यांना कन्यारत्न झाले तिच्या जन्मांनंतर साधारण चार वर्षांनी त्यांना जुळे मुलगे झाले. राकेश ची सरकारी नोकरी असल्यानं त्याची वेळोवेळी बदली होत राहत असे. ह्या वेळी त्याची बदली शीतलच्या चुलत भावाच्या गावी झाली होती आणि हा फ्लॅट त्यानेच पाहून राकेश ला

भाड्याने घेण्यासाठी सुचवले होते. शीतल आणि राकेश दोघे जेव्हा फ्लॅट पाहायला आले तेव्हा घराचा दरवाजा उघडला तसे एक विचित्र आणि घाण दर्प त्यांच्या नाकपुडयांना स्पर्शून गेला होता.

" अरे दिनेश, हा घाण दर्प कसला?" राकेश ने आपला मेहुणा दिनेशला विचारले.        

" अहो भाऊजी काही नाही ते घर खुप दिवस बंद होते आणि मी जेव्हा घर पाहायला आलो ना तेव्हा इकडे कबुतर आणि इतर पक्षी होते तशी इमारत नवी आहे म्हणजे दोन - तीन वर्ष झाले असतील, पण त्याचे काय आहे ना इकडे किंमत जरा जास्त आहे त्यामुळे फ्लॅट विकले गेले नाहीत एवढेच आणि इकडे तुमच्या आधी एक जण राहत होता पण त्याने जागा खाली केली आणि हे घर त्याने इस्टेट एजन्ट ला कमी किमती मध्ये विकून निघून गेला. घरामध्ये तसे काही कमी नाही. दोन रूम सोबत बाथरूम मोठा हॉल आणि चोवीस तास वीज आणि पाणी अजून काय हवे.... हा फक्त इकडे शेजार नाही एवढेच...." दिनेश घर दाखवत बोलत होता.

" अरे ठीक आहे तू पाहिले ना बस आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं ते घराची सफाई करायला कोणी मिळते का पहा जरा आणि असले तर लगोलग कामाला लाव कारण माझ्याकडे जास्त दिवस सुट्टी नाही आणि इकडे मला लवकरत लवकर कामावर रुजू व्हावे लागणार आहे." राकेश म्हणाला.

" त्याची तुम्ही काळजी करू नका तुमचे घर एका दिवसात चकाचक करून देतो. अहो मला माहित होते तुम्हाला जागा आवडणार म्ह्णून मी आधीच एका ठिकाणी सफाई साठी बोलून ठेवले आहे." हसत दिनेश म्हणाला.

" अरे दादा, मला सांग ह्या बाथरूम वर पोटमाळा आहे का?" उत्सुकतेने किचन आणि तिकडे असलेल्याला बाथरूमच्या वर पाहत शीतल ने विचारले.

" कुठे इकडे ... हो हा पोटमाळा आहे, तुला जे सामान नको आहे किंवा ज्याची गरज तुला लागत नाही ते तू तिकडे टाकून दे, मी तो पण साफ करून घेतो." दिनेश म्हणाला आणि तिकडून निघाला पण शीतल मात्र तिकडे उभी राहून त्या पोटमाळ्याकडे एकटक पाहत होती जणू तिकडे कोणी तरी आहे आणि ते तिला पाहत आहे.

" चला भाऊजी घर पहिले आणि ते तुम्हला आवडले पण आता घरी जाऊ जेवण करू आणि संध्याकाळी त्या एजन्टला घरचे डिपॉझिट आणि तीन महिण्याचे भाडे पण देऊ म्हणजे किल्या आजच मिळून जातील काय?" दिनेश ने हसत विचारले त्यावर राकेश ने फक्त मान डोलावली.

" शीतल, चल आता किचन मध्ये काय आताच जेवण करतेस कि काय?" राकेश थट्टेच्या स्वरात म्हणाला. तसे शीतल ची तंद्री भंग पावली आणि ती काही न बोलता मागे त्या पोटमाळ्याकडे पाहत बाहेर गेली. ठरल्याप्रमाणे राकेश आणि दिनेश ने घराचे पैसे एजन्ट ला दिले आणि घराची चावी घेतली.


टीप: सादर कथेची कल्पना मला माझ्या एका वाचक मैत्रिणी ने दिली होती तिच्या आयुष्यात घडलेली घटना तिने मला सांगितली आणि मी त्या घटनेला कल्पनेची जोड देऊन सादर कथा पूर्ण केली आहे. ह्या मध्ये काही ठिकाणी शृगांरिक रस आणि काही प्रसंग थोडे वेगळे रेखाटले आहेत जे तुम्हाला वाचताना लक्षात येईल पण हे सर्व कथेची गरज म्ह्णून लिहिले आहे. कृपया समजून घ्यावे आणि सहकार्य करावे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror