Akshay Yadav

Drama Horror

4  

Akshay Yadav

Drama Horror

अम्बायुः

अम्बायुः

29 mins
649


   अम्बायुः या शब्दाचा अर्थ आपल्या पैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल, या शब्दा मध्ये पूर्ण जग सामावलेले आहे. आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाप होऊन जो शब्द बनतो तो म्हणजे आई आणि अम्बायुः म्हणजे आई.देवाला जन्म घेण्यासाठी सुद्धा आई ची गरज लागली होती. आई आपल्या मुलांवर खुप प्रेम करते आणि जर तिच्या मुलाला कोणता धोका जाणवला तर ती रौद्र रूप पण धारण करते. सादर कथा असाच दोन आईची आहे त त्यांच्या संघर्षाची आहे पाहूया काय आहे कथे मध्ये?

   राधिका आणि मोहन सुखी जोडपे, शाळेत ओळख झाली वयात येताना प्रेम जुळले आणि कॉलेज पण एकत्र करून दोघांनी लग्नाचा प्रस्ताव त्याचा घरी मांडला. मोहन आणि राधिका दोघांना घरात ओळखत होते आणि त्याचे प्रेम घरी सर्वाना माहित होते त्या मुळे लग्नाला कुठे आडकाठी आली नाही. संसार सुखाने सुरु होता आणि साधारण वर्षभराने राधिका ने एक गोड बातमी मोहन ला दिली आणि ती ऐकून मोहन ला आकाश ठेंगणे झाले होत. राधिका ला दिवस गेले होते आणि मोहन तिची खुप काळजी घेत होता लवकरच ते दोनाचे तीन होणार होते. सातव्या महिन्यात तिचे डोहाळ जेवण झाले आणि ती बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. इकडे घरी राधिका नसल्यामुळे मोहन ला करमत नव्हते तसे त्याचे फोन वर बोलणे आणि अधून मधून भेटणे सुरु होते. असाच दुपारी मोहन चा फोन आला.

 हॅलो राधिका, काय करतेस? मोहन ने विचारले. इकडे राधिका बेड वरून हळूच उतरून खिडकी जवळ येत म्हणाली, काय करू? सांग बसले होते, अरे बसून बसून पण खुप कंटाळा आला आहे. आई तर बाहेर पण जाऊ देत नाही. बाहेर जाऊ का असे नुसते विचारले तर नाही हा शब्द ठरलेला असतो. राधिका वैतागून म्हणाली. अगं असे काय करतेस तुला आता नऊ महिने पूर्ण झाले आहेत आणि डॉक्टर ने दिलेली तारीख पण जवळ येत आहे त्यांना काळजी वाटत असेल म्ह्णून त्या तुला नाही म्हणत आहेत थोडे समजून घे ना? समजावणीच्या सुरात मोहन म्हणाला. वाह! आता तू पण आई सारखेच बोल, मला नाही बोलायचे कोणाशी इकडे मला कंटाळा आला आहे आणि बाळ झाले कि परत कुठे जात येणार नाही मला आणि तुम्ही फक्त उपदेश करत राहा मला वैतागून राधिका ने बोलून फोन ठेऊन दिला.

   मोहन ला समजले होते तिला राग आला आहे आणि गेले दोन महिने ती घरीच होती त्या मुळे तिची चीड चीड होणे पण स्वाभाविक होते.मोहन ने तिला पुन्हा फोन नाही केला कारण त्याला माहित होते केला तरी ती उचलणार नाही आणि उचलला तर चीड चीड होईल जे बाळा साठी चांगले नव्हते.

 हॅलो, मोहन अरे मी राज बोलतो आहे. राज, राज अरे हा बोल राज, काय रे आज आठवण आली का? साल्या, शाळा सोडून एवढे दिवस झाले परत ना कॉल ना टेक्स्ट कुठे होतास तू? मोहन ने विचारले. तसे हसून राज ने उत्तर दिले, अरे तुला तर माहित आहे ना बाबाची नोकरी, इकडे शाळा संपली आणि तिकडे बाबाची बदली झाली थेट हिमाचल मध्ये मग काय तिकडे होतो त्या मुळे कोणाला भेटलो पण नाही आणि कॉन्टॅक्ट पण नाही झाला पण आता आलो तेव्हा सहज शाळेत गेलो,खुप काही बदल झाला आहे. एक इमारत उभी राहिली आहे शाळेची मग काय जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि लागलो कामाला, आधी शाळेच्या ऑफिस मध्ये गेलो तिकडे जाऊन आपल्या ग्रुप चे पत्ते घेतले आणि मग नंबर फिरवला आणि विचार नाही करू शकणार आपली शेंबडी नेहा तिचा कडे आपल्या ग्रुप च्या सर्वांचे नंबर होते, माझा सोडून हे बोलून राज हसू लागला. अरे मग काय? आम्ही होतो एकमेकांच्या संपर्कात तू नव्हता तेवढा पण आता आला आहेस ना मग भेटूया ना सर्व? मोहन उत्सहात म्हणाला. भाऊ त्या साठी कॉल केला होता पण तुला जमेल का? नाही म्हणजे बाप होणार आहेस म्ह्णून विचारले आणि हो अभिनंदन लग्न आणि मला काका करतो आहे म्हणून सुद्धा हसत राज म्हणाला. हो, तुझे कधी आहे मग ? अरे मी एकटा मेलो तुम्ही सर्व अजून अविवाहित आहात मी एकटा शिक्षा भोगत आहे थोडं खोटं चिडून मोहन म्हणाला. अरे हो ,आता हि शिक्षा तू एकटा नाही भोगणार हसत हसत राज म्हणाला. म्हणजे? मोहन ने आश्चर्यानं विचारले. म्हणजे, आता मी पण लवकरच अडकणार आहे या बेडी मध्ये माझे पण लग्न ठरले आहे आणि त्याचे आमंत्रण देण्यासाठी मी इकडे आलो आहे राज खुश होऊन म्हणाला. काय सांगतोस काय? अभिनंदन मित्रा शेवटी तू लग्न करतो आहेस. नाही म्हणजे शाळेत असताना मुलींना लेटर लिहून देणारा तुझा सारखा मुलगा आज चक्क लग्न करतो आहे खुश होऊन मोहन म्हणाला. हो रे, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी, आता काय घरचे करून देत आहेत म्ह्णून करतो आहे.बरं, ते जाऊ दे मी या साठी तुला फोन केला होता या शनिवार आणि रविवारी मी एक छोटी पार्टी ठेवली आहे आपल्या ग्रुप ची तर तुला जमेल का येण्यासाठी राधिका चे मी नाही धरत आहे पण तुझे बोल? राज ने विचारले. हमम, ठीक आहे मी तयार आहे राधिका चे पण बगतो ती सकाळी म्हणत होती तिला कंटाळा आला आहे बघू आली तर येईल, हा पण स्टॉक घेऊन ये आणि पत्ता पाठव ठीक आहे मोहन म्हणाला. त्यावर ठीक आहे बोलून त्याने कॉल कट केला.

   हॅलो, राधिका ने कॉल उचलला, झाला का सकाळचा राग शांत?मोहन ने विचारले. हमम राधिकाचे उत्तर आले.आणि मोहन ने त्याचा मध्ये आणि राज मध्ये जे काही बोलणे झाले होते ते सर्व तिला सांगितले. काय सांगतोस काय? आपला राज जो पोरीच्या मागे पाळायचा तो लग्न करतो आहे आणि ते पण घरचे लावून देत आहेत त्या मुली बरोबर कसा काय बदल झाला देवाला ठाऊक? राधिका हसत म्हणाली. हो आणि पठ्याने पार्टी ठेवली आहे, मला आणि तुला दोघांना बोलावले आहे, पण तुला अश्या अवस्थे मध्ये घेऊन जायचे त्यात दिवस पण कमी राहील आहेत आणि घरी काय सांगायचे? थोडा घाबरत घाबरत मोहन बोलत होता कारण त्याला माहित होते सकाळीच बाहेर जाण्यावरून वाद झाला होता आणि आता मी एकटा जाणार हे ऐकून तर राधिकाच्या रागाचा पारा अजून चढेल. मोहन, अरे तू एकटा कुठे जाणार आहेस मी पण येणार आहे,आई ला काय सांगायचे ना ते ठराव पण मी येणार आणि जर आई ने नाही सोडले तर विसरू नको माझ्याशी गाठ आहे. राधिका रागात म्ह्णणाली आणि तिने कॉल कट केला. बिचारा मोहन आता त्याचा पुढे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. त्याला माहित होते सासू सोडणार नाही आणि राधिका ऐकणार नाही तरी पण त्याने प्रयन्त करायचा असे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी तो राधिकाच्या आई च्या घरी पोहोचला.

   नमस्कार मामी, बोलून मोहन ने आत प्रवेश केला. या, या जावई बापू या राधिकाच्या आई हसत म्हणाली. अहो मामी काय तुम्ही?मला लहान पणा पासून पाहत आला आहात तरी पण मला अशी हाक मारता हसत हसत मोहन म्हणाला. हा मग, नाही का तुम्ही जावई आमचे? राधिका ची आई हसत म्हणाली आणि स्वयंपाक घरात निघून गेल्या. घरी फक्त आई आणि राधिका होती वडील सैनिक होते आणि एका युद्धात त्यांना वीर मरण आले होते, तेव्हा राधिका बारा वर्षाची होती त्या नंतर राधिका साठी वडील आणि आई चे काम तिच्या आई नेच पार पाडले होते. तसे इकडे मोहन आणि राधिका राहत होते मोहन चे आई बाबा गावी गेले होते. मोहन आल्याचे समजताच राधिका बाहेर आली. तू बोला आई सोबत? हळूच खाली बसत राधिकाने विचारले. हा, काय? क... काय बोलायचे होते मला? मोहन ने थोडे घाबरत विचारले. अरे, आपण बाहेर जाणार आहोत हे तू आई ला सांगितले का मोहन? राधिकाने रागात विचारले. तसे मोहन काही न बोलता खाली पाहू लागला. वाह्ह ! छान म्हणजे नाही विचारले, मोहन का असे करतो आहेस मला कंटाळा आला आहे आपले बाळ पण कंटाळले आहे. दोन दिवसाचा प्रश्न आहे विचार ना मोहन थोडे रडवेले तोंड करून राधिका म्हणाली. मोहन ने तिचा हात पकडून तिला धीर दिला तसे राधिकाच्या आई बाहेर आली. काय रे मोहन काय झाले?हिचे तोड का असे झाले आहे आई ने विचारले. तसे झटकन राधिका म्हणाली, आई, मोहन काही तरी विचारण्यासाठी आला आहे. काय? राधिका च्या आई ने चहा देत मोहन ला विचारले. मामी, ते हे आपले ते,मोहन बोलताना कचरत बोलत होता. अरे काय ते हे करतोस, नीट सांग काय ते राधिका ची आई चिडून म्हणाली. मामी, मी राधिका ला घेऊन जरा बाहेर जाऊ का? मोहन ने धीर करून विचारले. अरे एवढेच ना, ठीक आहे जा पण, लवकर परत सोड जास्त भटकू नका दोन जीवाची आहे ती म्ह्णून म्हंटले एवढे बोलून त्या किचन मध्ये गेल्या. बाहेर असलेल्या राधिका ने एक जळजळीत कटाक्ष मोहन वर टाकला. तसे मोहन ला न बोलता बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या.तो तडक उठला आणि किचन कडे गेला. मामी मला राधिका ला दोन दिवस साठी बाहेर घेऊन जायचे होते?मोहन ने हलक्या स्वरात विचारले. काय? दोन दिवस, आणि ते कुठे राधिका च्या आई ने विचारले. माझ्या मित्राचे लग्न ठरले आहे तर तो आम्हाला पार्टी देणार आहे त्याने आम्हा दोघांना पण बोलावले आहे. राधिका पण घरी कंटाळली आहे तिला पण वेगळे पण मिळेल म्ह्णून मी विचार केला" मोहन अर्धवट बोलून गप्प झाला. हे बघ मोहन, राधिका माझी लेक आहे तशी तुझी बायको पण आहे आणि तिची अवस्था तू पहा डॉक्टर ने दिलेली तारीख जवळ आली आहे आणि या सर्व मध्ये तिला त्रास होणार नाही का आणि तिकडे देव ना करो पण काही झाले तर? माफ कर पण मी परवानगी नाही देऊ शकत. राधिकाच्या आई म्हणाली. तसे राधिका तिकडे आली आणि म्हणाली. आई मला खरचं खुप कंटाळा आला आहे. मी थोडं बाहेर गेले तर मी फ्रेश होईन आणि बाळ झाले कि जाणे पण बंद होईल, प्लीज आणि तिकडे सर्व आहेत आणि हा पण आहेच कि प्लीज आई प्लीज राधिका तोड लहान करून बारीक मुलां सारखा हट्ट करून बोलू लागली.ठीक आहे, पण मोहन राधिका आणि बाळ यांची जबाबदारी तुझ्यावर तिला किंवा बाळाला काही झाले तर याद राख राधिकाच्या आई म्हणाली आणि हसून राधिकाने तिला जवळ घेतले. 

    सर्व घेतले आहेस ना सोबत, गोळ्या आणि तिकडे जाऊन मस्ती करू नको आणि स्वतःची काळजी घे तसे मोहन आहे तरी पण तू घे आणि हो मला फोन करत राहा दर दोन तासाने राधिकाच्या आई सूचना देताच होत्या. हो आई मी लहान नाही मी घेईन माझी काळजी आणि मोहन सुद्धा आहेच कि? राधिका थोड्या चिडक्या स्वरात म्हणाली. बाळा मुलं किती हि मोठी झाली तरी आई साठी ती लहानच राहतात, लवकरच तुला अनुभव येईल आणि तेव्हा तुला माझी आठवण येईल राधिकाच्या आई म्हणाली. तसे राधिका ने तिला घट्ट मिठी मारली. तेवढयात मोहन आला त्याला पण त्याच सूचना देऊन राधिकाच्या आई ने तिला पाठवले.

    काय रे मोहन , कुठे ज्याचे आहे आपल्याला आणि कोण कोण येत आहे, राज आला तसे त्याने मला फोन पण नाही केला भेटू दे फटके देते त्याला" राधिका म्हणाली. मोहन कार चालवत होता आणि राधिका मागे बसली होती. अगं जास्त कोणी नाही आहे, आपलाच शाळेचा ग्रुप तू, मी, किशोर, राज आणि अनिता आपण पाच लोक फक्त त्यात पण तुला माहित आहे ना किशोर आणि अनिता याचे प्रकरण सुरु आहे, आणि जागा त्याने लोणावळा मध्ये एक फार्म हाऊस आहे तेच बुक केले आहे, म्हणत तर होता खुप मोठे आहे म्ह्णून आता पाहूया, तू ठीक आहेस ना मागे म्हणजे काही असेल तर सांग मी गाडी बाजूला उभी करतो उगीच माझ्या राजकुमारीला त्रास होयला नको. हसत हसत मोहन म्हणाला. हो का आणि राजकुमार असेल तर त्याला झाला तर चालेल का तुला" चिडून राधिकाने विचारले. अरे तू चिडू नको मला मुलगी हवी आहे आणि तुला मुलगा पण होणार काय हे त्या देवाला माहित मग भांडून काय उपयोग आणि तसे पण हल्ली तू खुप चीड चीड करतेस हे आपल्या बाळा साठी चांगले नाही आहे समजावत मोहन म्हणाला.

   मोहन आणि राधिकाच्या गाडी आता शहराबाहेर पडली होती, दिवस थंडीचे होते हवेत गारवा जाणवू लागला होता. राधिका पूर्ण तयारी मध्ये होती तिने थंडी साठी जे उपाय करावे लागतात ते सर्व केले होते. आता त्याची गाडी मस्त हिरवळ असलेल्या घाटातून जात होती उजव्या बाजूला डोंगर आणि डाव्या बाजूला खोल दारी आणि धुके सकाळचे साधारण साडेदहा झाले असतील पण धुके कमी झाले नव्हते. समोरून गाड्या येत जात होत्या आणि त्या मुळे तयार होणारी हवेची लाट अंगाला झोंबून जात होती बोचरी थंडी म्हणतात ना तसे काही तरी साधारण साडे अकराच्या सुमारास त्यांची गाडी एका जागी थांबली.

काय रे काय झाले? गाडी का थांबवली? राधिका ने विचारले. का म्हणजे पोहोचलो आपण हसत मोहन म्हणाला. काय? कुठे आहे इकडे तर फक्त शेतच दिसत आहे बाकी काही नाही आहे? राधिकाने आजू बाजूला पाहत विचारले. अगं हे शेत ओलांडलं कि आले घर आणि तुला नक्की आवडेल मोहन म्हणाला.म्हणजे तुला माहित आहे हि जागा? आश्चर्यानं राधिका ने विचारले. हो, माझ्या मित्राचे आहे ते ,ऑफिस मध्ये राजेश आहे ना त्याच्या काका चे आहे त्याने फोटो सेंड केले होते आणि मग मी ते फोटो राज ला दाखवले त्याला आवडले मला माहित होते तुझी थोडी अडचण होईल पण तू ऐकणार नाही मला माहित होते, म्हणून मी पुन्हा काहीही बोलो नाही पण तुला पण वेगळेपण हवा होता मग म्हंटले जाऊदे राधिका आणि साहित्य सांभाळत तो त्या घराकडे दिशने निघाला होता.

   थंडी चांगलीच जाणवत होती, आजूबाजूला उसाची शेती होती त्याला रात्रीच पाणी दिले होते त्या शेतातून जाण्यासाठी एक रस्ता होता थोडा कच्चा होता पण सामान्य माणूस जाऊ शकेल एवढी जागा होती. एका हाताने सामान आणि दुसऱ्या हाताने राधिका ला सावरत मोहन त्या वाटेने निघाला होता. सूर्याची किरणे इतर वेळी जी नकोशी वाटत असतात आज तीच हवी हवी वाटत होती. एक छोटे वळण घेतले आणि त्यांना ते बंगला वजा घर दिसले. सफेद रंगाचे ते घर बाहेरूनच त्याची भव्यता दाखवत होते. आजू बाजूला शेती आणि त्या यामध्ये घर असेच काहीसे स्वप्न होते राधिका चे आणि ते आता तिला समोर दिसत होते.दारातच राज उभा होता.

   या या या वाहिनी सरकार या राज हसत म्हणाला. काय रे वाहिनी सरकार काय तुला काय नाव माहित नाही का माझे?आणि शहाण्या इकडे आला पण मला एक कॉल पण नाही केला ना? किती दृष्ट असशील ना तू? लटक्या रागात त्याचा पाठीत राधिका ने धपाटा घातला. माफ कर राधिका मला, तुझा हात अजून लागतो यार तसाच एकदाच मारले होते शाळेत सहज म्ह्णून पण पाठीवर वळ उठला होता चेहरा वेडावाकडा करत राज म्हणाला. अरे तुझ्या लक्षात आहे का? आश्चर्याने राधिका ने विचारले. हो मग काय मी कसा विसरेन राज हसत म्हणाला. तुम्ही इकडे बोलत बसणार कि आत येणार? मोहन ने विचारले. आलो बाबा तू हो पुढे मी राधिकाला घेऊन येतो राज म्हणाला.

   राधिका ने आत पाऊल टाकले आणि ती आतून त्या भव्य वास्तु कडे पाहत राहिली. प्रशस्त दिवाणखाना, वरती जाणाऱ्या पायऱ्या आणि वर अश्या बहुदा चार रूम आणि किचन त्याला जोडून बाहेर जाणारा अजून एक दरवाजा राधिका सर्व निहाळत पुढे जात होती. तेवढयात तिच्या कानावर ओळखीचा आवाज आला. राधिका कशी आहेस? तिने वर पहिले तर समोरून अनिता खाली येत होती. राधिका ने तिचा कडे पहिले आणि आनंदाने स्मित केले. अनिता तू कधी पोहोचली राधिका ने विचारले. अरे मी सकाळी आले मी राज आणि किशोर,ते सोड तू कशी आहेस आणि बेबी कसा आहे मम्मी ला त्रास देतोस का रे? अनिताने तिच्या पोटावर हात फिरवत विचारले. हो मग, आतून लाथा सुरु असतात आणि त्या दोघी हसू लागत. हॅलो, अनिताच्या मागे किशोर उभा राहून राधिका ला हात हलवून म्हणतो. अरे किशोर मी तेच आता विचारणार होते तू कुठे आहेस आणि तू आला. तुम्ही कधी लग्न करणार राधिका ने दोघांकडे पाहत विचारले तसे दोघांचे पण चेहरे पडले. का ग काय झाले? राधिकाने विचारले. तुला तर माहित आहे ना माझ्या घरचे कसे वागतात ते, मुलगी म्हणजे त्यांच्यासाठी ओझं आहे आणि प्रेम विवाह केला तर तोंड पण नाही पाहणार असे म्हणाले आहेत बाबा आता तू सांग मी काय करू? रडत अनिता म्हणाली तिला शांत करत राधिका म्हणाली, हे बघ तुमचे प्रेम आहे ना एकमेकांवर झाले तर मग तुम्ही जगाचा विचार नका करू आणि एक मुल झाले कि होईल सर्व शांत घरी पण तुम्ही एकत्र आहात आता तर हा वेळ मजेत घालवा नंतर चे पाहू आपण आणि कोणी नाही आले तर आम्ही येऊ आणि आता काय आपण सहा मेंबर होणार तीन तीन वाटून येऊ कोर्ट मध्ये सही करायला हो कि नाही राज त्यावर राज ने मान हलवली. काय सुरु आहे सामान रूम मध्ये ठेऊन मोहन बाहेर आला तसे त्याला सर्व सांगितले आणि त्याला पण राधिका चे बोलणे पटले. राधिका एक काम कर तू आता थोडा आराम कर कारण आपण आज पूर्ण रात्र जगणार आहोत राज म्हणाला. हा, तू आराम कर तो पर्यंत आमचे सुरु करतो राज बॉटल घेऊन आला असेल ना? किशोर म्हणाला. गाईज मी काय बोलतो आता नको आपण रात्री सुरु करू ना आता आपण जेऊन गप्पा मारू मग थोडे झोपून रात्री जागु काय बोलता? मोहन ने विचारले आणि सर्वाना ते पटले. तसे सर्वानी घर फिरून पहिले आणि मग गप्पा मारत बसले तेवढयात तिकडे घराचा राखणदार आला आणि म्हणाला, साहेब जेवण दोन वेळेचे केले आहे तुम्ही मज्जा करा मी जातो उद्या सकाळी येईन काही लागले तर तुमचा कडे नंबर आहे मला फोन करा बोलून तो निघून जातो.

 दिवसभर सर्वानी मस्त आराम केला आणि संध्याकाळी सर्व जण पार्टी च्या मूड मध्ये आले होते.राजचा चुलत भाऊ पण आला होता. राज ने सर्वचि ओळख करून दिली. मित्रानो हा माझ्या काकाचा मुलगा अर्जुन आहे त्याने सर्वांशी ओळख करून घेतली आणि पार्टी ला सुरुवात झाली. एकटी राधिका ठेवढी शुद्धी मध्ये होती, गप्पा गाणी नाच सर्व रंगात आले होते बाहेर थंडी वाढली होती आणि धुक्याची एक चादर पसरली होती. सर्व जण पार्टी एन्जॉय करत होते.

   राज ने मोबाईल काढला आणि शूट करू लागला पण अचानक त्याचा मोबाईल वाजला आणि ते पाहून तो जोर जोरात हसू लागला. त्याला पाहून सर्व जण थांबले आणि त्याला विचारू लागले काय रे काय झाले एवढे हसायला तसे तो स्वतःचे हसणे आवारात म्हणाला अरे मला एका अनोळखी नंबर वरून मेसेज आला आहे तो वाचून मला हसायला येते आहे. काय आहे तो मेसेज आम्हाला पण तर सांग? किशोर म्हणाला तसे राज ने तो मेसेज सर्वाना पाठवला. किशोर ने तो मोठयाने वाचायला सुरु केले.

  असे म्हणतात कि हे करू नका, नाही तर ती येईल आणि तुम्हाला मारून टाकेल.अरे, पण ती कोण आणि का मारून टाकेल? अनिता ने विचारले. हो... हो सांगतो थांब एक तर नीट दिसत नाही दारू मुळे किशोर म्हणाला आणि पुढे वाचू लागला. लाल दिवा सुरु करायचा बाकी सर्व दिवे मालवून टाकायचे एका मोठ्या आरश्या समोर उभे राहून हातात मेणबत्ती घेऊन एका विशिष्ट्य वेळे मध्ये तीन वेळा फक्त बोलायचे आहे, सुनीता मी तुझ्या मुलीला आणि तुला मारले आहे. हे सर्व तुम्हाला रात्री अकरा पंचाव्वान ते बारा च्या दरम्यान करायचे आहे. अजून एक लिंक आहे त्या मध्ये तिची कथा आहे. काय माणसे आहेत यार काही पण पाठवतात, काय तर म्हणे तू तुम्हाला मारले सगळे खोटे असते. ते नाही का येत हा संदेश अकरा लोकांना पाठवा नाही तर वाईट होईल तसेच काही से आहे किशोर म्हणाला आणि सर्व हसू लागले. अचानक अनिता म्हणाली अरे वाजले किती अनिता थोडी अडखळत बोलत होती तिच्यावर दारूचा अमल चढला होता. वाजले साडे दहा किशोर म्हणाला. का? तुला कशाला हवे किती वाजले ते? राज ने विचारले तसे ती हसली आणि म्हणाली आपण करूया का हा प्रयोग पाहूया का ती संगीता का सुनीता जे कोणी आहे ती येते का ते?कल्पना छान आहे, राज म्हणाला अजून वेळ आहे आणि माझ्या रूम मध्ये मोठा आरसा पण आहे मेणबत्ती पण आहे आणि लाल दिवा काय तो तर मोबाईल मध्ये पण लाल प्रकाश करता येतो ठरले तर करूया राज म्हणाला. हो करूया काय? मला भीती वाटत आहे असे काही करायला राधिका घाबरत म्हणाली. अरे काही नाही होणार एवढे का घाबरतेस? आणि काही झाले तर आम्ही आहोत ना तू नको काळजी करू राज म्हणाला आणि ते सर्व पुढच्या तयारी ला लागले. इकडे हॉल मध्ये असलेल्या राधिका ला सर्व विचित्र वाटत होते. तिने ती लिंक ओपन केलेली आणि ती वाचू लागली. त्या मध्ये विधी होते जे किशोर ने वाचले होते, पण तिच्या बरोबर असे काय झाले हे जाणून घेण्याची इच्छा तिच्या मनात जागृत झाली. तिने सुनीता केस शोधायला सुरु केले तिच्या शेजारी बसून मोहन ती काय करते आहे ते पाहत होता. तिला एक लिंक मिळाली त्यात लिहिले होते सुनीताची खरी कथा तिने लगेच ती लिंक ओपन केली आणि वाचू लागली.

   गावाचे नाव किंवा ती नक्की कधी घडली हे माहित नाही पण आता पर्यंत जे ऐकले आहे त्या प्रमाणे, सुनीता एका गरीब घरात जन्मलेली मुलगी होती तिच्या पुढे एक भाऊ आणि तिच्या मागे दोन बहिणी होत्या. सुरेखा च्या घरची परिस्थती चांगली नव्हती,चार मुल आणि आई वडील असा मोठा परिवार होता, भावाचे लग्न झाले आणि अजून एक तोंड वाढले होते खायला तसे सुनीताच्या वडिलांनी सुनीता साठी स्थळ पाहायला सुरुवात केली. जसे भिकारीच्या झोळीत कोहिनूर असावा अशी सुनीता त्या झोपडीत वाटत होते. लांब सडक काळेभोर केस, नितळ पाणीदार काळे डोळे, गोरा वर्ण, चाफेकळी नाक, हसली कि गालावर खळी पडायची हनुवटीवर तीळ होता तिच्या ,जणू नक्षत्र जन्माला आले आहे असे होती ती एवढया सुंदर मुली साठी स्थळ शोधताना तिच्या वडिलांनी खुप खस्ता खाल्या कधी मुलगी जास्त उजवी आहे म्हणून तर कधी हुंडा जास्त मिळावा म्हणून तिचे लग्न मोडत होते. अशात गावात एक दिवशी आपल्या पाहुण्यांकडे रामदास भाऊ आले आणि त्यांनी सुरेख ला पाहिले आणि पाहताच क्षणी त्यांनी आपल्या मुलासाठी म्हणजे सदाशिव साठी तिला पसंत केले. साधारण चार दिवसांनी रामभाऊ त्याचा पत्नी आणि सदाशिव याना घेऊन पुन्हा त्याच गावी आले आणि ते थेट पोहोचले ते सुनीताच्या घरी सुनीताचे घर म्हणजे एक छोटी झोपडी होती सदाशिव आणि रामभाऊ याना सुनीता पसंत होती पण हुंडा न मिळाल्याने सदाशिव ची आई मात्र नाराज होती पण त्या दोघांपुढे काही चालेल नाही आणि ती नाईलाजाने ती लग्नाला तयार झाली. पण नंतर सुनीता चा छळ वाढला होता त्यात तिला दिवस जाऊन पहिली मुलगी झाली याचा पण राग तिच्या सासूला होता असेच दिवस जात असताना तिला नामी युक्ती सुचली आणि तिने सदाशिव च्या डोकयात भरवले कि सुनीता चे प्रेमप्रकरण सुरु आहे. संशय वाढत गेला दोघं मध्ये भांडण वाढले आणि राग अनावर होऊन सुनीता आणि तिच्या मुलीला त्याने विहिरीत ढकलून मारून टाकले. हा सर्व प्रकार रात्री अकरा पंचावन्न ते बारा च्या मध्ये झाला म्ह्णून म्हणतात कि जर कोणी या वेळी आरश्या समोर उभे राहून लाल दिव्या मध्ये हातात मेणबत्ती घेऊन तीन वेळा बोले कि सुनीता मी तुला आणि तुझा मुलीला मारले तर सुनीता येऊन त्यांचा नाश करते. हे सर्व वाचून राधिका च्या अंगावर शहरे आले होते.

   बाप रे ! हे तर खुपच भयानक आहे, मोहन आपण याना थांबवले पाहिजे जर का हे सर्व खरे असेल तर ती कोणाला नाही सोडणार घाबरत राधिका म्हणाली. हो मी.. मी बोलतो त्याचा सोबत मोहन जागेवरून उठला आणि वर जाणार तेवढयात ते सर्व आरसा आणि मेणबत्ती घेऊन खाली येत होते. गाणी म्हणत थोडे अडखत चोघे पण खाली येत होते. त्याच्यावर दारूचा अमल अजून होतच. मोहन त्यांना पाहून पुढे जातो, मी काय म्हणतो हे नको करूया आपण म्हणजे आपण इकडे गप्पा गाणी हवे असेल तर नाच करू पण हे नको प्लीज मोहन काकुळतीने म्हणाला. अरे मोहन, एवढा का घाबरतोस काही होणार नाही विश्वास ठेव किशोर म्हणाला. अरे असे किती तरी संदेश येत असतात त्यावर तू विश्वास ठेवतो का ? नाही ना? झाले तर मग हे पण तसेच एक आहे आणि जर पण हे केले आणि कोणी नाही आले तर आपण ज्याने मेसेज पाठवला आहे त्याला बोलू शकतो ना कि काही पण अफवा पसरू नकोस म्ह्णून राज अडखळत बोलत होता. हे पहा हे नका करू उगीच विषाची परीक्षा का घेत आहात मोहन पुन्हा आर्जव करत म्हणाला. अरे काही नाही होणार तू नको काळजी करू आणि काही झाले ना तर तू आणि राधिका पाहिले बाहेर जा आम्ही थांबवू सुनीता संगीता जे कोणी आहे तिला ठीक आहे चल आता बाजूला हो आरसा ठेऊ दे वेळ कमी आहे बोलून त्याला अनिता ने बाजूला केले. त्यांना समजावून काहीच उपयोग नाही हे राधिका आणि मोहन दोघांना पण समजले होत.

   आरसा त्यांनी हॉल मध्ये लावून ठेवला, एक मेणबत्ती पेटवली. वाजले किती रे राज ने अर्जुन ला विचारले. दोन मिनिट आहे अर्जुन म्हणाला. तसे राज जोर जोरात हसू लागला २ मिन मध्ये समजेल सुनीता आहे कि तिचे नाव घेऊन लोकांना वेडे करतात. अर्जुन ने दिवे मालवले, राधिकाच्या मनात भीती दाटून येत होती. सुरु करणार तेवढ्यत राधिका म्हणाली. थांबा, शांततेत राधिका आवाज मोठा वाटला, सर्वानी तिच्याकडे वळून पहिले. काय झाले राधिका? वैतागून किशोर ने विचारले. हे पहा मी अजून सांगते आहे नका करू असे अन्यथा परिणाम काही पण होऊ शकतील. त्यावर हसून अनिता म्हणाली, राधिका तू ना अजिबात बदली नाही म्हणजे शाळेत होती ना अगदी तशीच आहे अजून सुद्धा म्हणजे मला आठवते ते शाळेत असताना आम्ही एका मुलाच्या मागे फटाक्याची माळ लावत होतो आणि तू तेव्हा पण अशीच बोली होती. हे नका करू परिणाम वाईट होतील वैगैरे पण काही झाले का नाही ना अरे त्या मुलाला शेवट पर्यंत समजले पण नाही त्याचा सोबत हे कोणी केले होते अनिता नशेमध्ये हलत हलत बोलत होती. अरे मोहन, एवढी कशी रे तुझी बायको घाबरट आयुष्यात काही तरी मज्जा हवी कि नको आणि आपण इकडे काय करायला आलो आहे, नाही सांग तू काय करायला आलो आहे मज्जा ना मग तेच करतो आहे आम्ही, राधिका तू नको काळजी करू अनिता म्हणाली. अनिता तुम्हाला झाले तरी काय, अरे पण लहान होती तेव्हा मी समजू शकत होतो ते ज्या मुलाला फटाके लावले होते त्याचा पाय भाजला होता हे तुम्हाला आठवत नसेल पण मला आठवते, आपल्या मज्जे साठी कोणाला त्रास देऊ नये अशी शिकवण मला घरी दिली आहे आणि तुम्हाला हे करायचे असेल ना खुशाल करा पण एकदा त्या सुनीतावर काय प्रसंग ओढवला होता ना ते पण एकदा वाचून बघा जमलं तर म्हणजे मी का नको बोलते आहे ते समजेल थोडं रागात बोलून राधिका आपल्या रूम मध्ये गेली. काय रे मोहन तुझी बायको अशी किशोर म्हणाला. नाही रे तिने वाचली आहे सर्व कथा आणि शेवटी ती सुनीता पण आई होती आणि ती पण आता आई होणार आहे म्हणून असेल कदाचित म्हणजे अनिताने विचारले.म्हणजे, काही नाही मोहन तू सारी कथा हिला नंतर सविस्तर सांग आता वेळ नाही सर्व दिवे घालवून मोबाईल मध्ये लाल प्रकाश केला होता आणि राज मेणबत्ती घेऊन आरश्या समोर उभा होता.

   सर्वात पुढे राज त्याचा बाजूने अर्जुन किशोर आणि अनिता उभे होत सर्वात मागे मोहन उभा असतो. दिवे बंद करतात आणि मोबाईल मधील लाल प्रकाश सुरु करतात. बाहेर वातावरण शांत होते रातकिड्याच्या आवाजाशिवाय कोणताच आवाज येत नव्हता. मेणबत्ती घेऊन राज आरश्या समोर उभा होता आणि आरशात पाहून त्याने बोलायला सुरुवात केली. सुनीता तुला आणि तुझ्या मुलीला मीच मारले आहे, सुनीता तुला आणि तुझ्या मुलीला मीच मारले आहे, अचानक एक घुबड ओरडत जाताना ऐकू येते. तो पुन्हा शेवटचे बोलतो सुनीता तुझ्या मुलीला मी मारले आहे. राज एवढे बोलतो आणि शांत होतो. एक भयाण शांतता वातावरणात पसरलेली असते. काही मिनिट सर्व शांतात मध्ये जातो. ह्या काहीच झाले नाही कोण सुनीता कुठली सुनीता कोणी नाही आहे आरशात पाहून राज म्हणाला आणि जोरात हसू लागला आणि हसत हसत तो मागे वळतो. तसे मागे जे उभे असतात त्याच्या तोंडावर भीती चे भाव दिसू लागतात, राज त्याचे तसे चेहरे पाहू हसणे थांबवतो आणि ते काय पाहत आहेत म्हणून तो मागे वळून पाहतो तर त्या मेणबत्तीच्या प्रकाशात तो आरश्यात काळे धुक्या सारखे जमा झालेले दिसते आणि अचानक त्या आरशातून एक हात बाहेर येतो आणि तो हात राजचा गळा पकडतो आणि हवेत उचलेल जाते. तो हात सफेद दिसत होता माश्याने खाल्या सारखा जागोजाई खाल्ले होते,नख लांब होती आणि हातून पाणी गळत होते. हा प्रकार पाहून सर्वांची पाय जमिनीत रुतल्या सारखे झाले होते. कोणाला जागचे हालत येत नव्हते. एक आकृती त्या आरशातून बाहेर येत असते. केस मोकळे सोडलेले होते, पूर्ण शरीर सफेद झालेले होते, हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर रुपया एवढे मोठे कुंकू पूर्ण शरीर माश्यानी जागोजागी लचके तोडले होते आणि डोळ्याच्या जागी फक्त खोबण्या होत्या तिच्या सर्व अंगातून पाणी गळत होते. हळू हळू ती आरशातून बाहेर येते आणि जोरात ओरडते कोणी मारले माझा बाळाला तुम्ही ना हा तुम्हीच भरवले ना माझ्या नवर्याच्या मनात हा तुमच्या मुळे आज माझी हे अवस्था झाली आहे. माझ्या मुलीला पण तुम्ही मारले मी कोणाला नाही सोडणार कोणाला नाही आणि ती जोरात रडू लागते ते पाहून सर्वांची पाचावर धारण बसते. काय करावे ते कोणाला समाजात नाही तेव्हड्यात कर्कट आवाज येतो तसे सर्व समोर पाहतात त्या मेणबत्तीच्या उजेडात समोरचे दृश्य अजूनच भयानक दिसत होते. सुनीताने राज चे मुंडके धडा वेगळे केले होते, रक्ताच्या चिळकांड्या सर्वत्र उडत होत्या ते पाहून अनिताने किंकाळी फोडली . तिची नजर आता त्या सर्वांवर फिरत होती. एक भयानक चित्कार करत ती त्याचा दिशेने निघाली. तसे सर्व आपला जीव वाचवणासाठी सैर वैर पळू लागले. मोहन धावत राधिका च्या रूम मध्ये आला आणि त्याने दरवाजा लावून झोपलेल्या राधिकाला उठवले. राधिका, राधिका उठ चल आपल्याला निघावे लागेल बाहेर खुप मोठा प्रॉब्लेम झाला आहे मोहन म्हणाला. प्रॉब्लेम म्हणजे नक्की काय झाले आहे सांगणार आहेस का तू? राधिका ने चिडून विचारले. ते ते बाहेर तेवढ्यात बाहेरून सुनीताच्या विचीत्र ओरडण्याचा आवाज आला. राधिका तो आवाज ऐकून घाबरली, प्रॉब्लेम म्हणजे सुनीता ते सर्व खरे होते घाबरत राधिका म्हणाली, हो आणि तिने राज ला एवढे बोलून मोहन रडू लागला. तिने राज ला काय मोहन? राधिकाने काळजीने विचारले. तिने राज ला मारून टाकले आहे एवढे बोलून मोहन रडू लागला आणि आता आपल्या सर्वाना ती मारून टाकणार तिला असे वाटते कि आपण तिच्या नवऱ्याचे कान भरले होते तिच्या विरुद्ध आणि म्हणून ती आता आपल्या सर्वच्या मागे लागली आहे ती कोणाला नाही सोडणार, मला माझी चिंता नाही पण तू आणि आपले बाळ याची काळजी वाटत आहे. मला तर काहीच समजत नाही काय करू मोहन रडू लागला.

   बाहेर एकच गदारोळ उठला होता जो तो वाट दिसेल तसे पळत होता. अंधार असल्यामुळे जास्त दिसत नव्हतं चाचपडत ठेचकाळत सर्व जण पांगले होते. अर्जुन वरच्या बाथरूम मध्ये तर किशोर आणि अनिता वरच्या रूम मध्ये लपून बसले होते. खालच्या खोलीत राधिका आणि मोहन होते. मोहन आता काय करायचे राधिका रडत विचारते. हळू बोल मी पाहो तू इकडे थांब काही झाले तरी पण दरवाजा उघडू नकोस. बोलून मोहन दिवे बंद करतो आणि हळूच बाहेर मान काढली आणि कानोसा घेऊ लागला. बाहेर एक निरव शांतता होती. अंधार एवढी कि डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही. तेवढयात एक फोन ची रिंग चा आवाज होतो आणि सुनीता त्या आवाजाच्या दिशेने गुरगुरत जाते. तिचे गुरगुरणे ऐकून मोहन घाबरतो पण आवाज लांबून येत होता त्या मुळे हीच ती संधी आहे असे समजून तो राधिका ला घेऊन बाहेर पडतो पण अंधार आणि त्यात राधिका गरोदर त्या मुळे तिला भरभर चालणे शक्य नसते. इकडे अर्जुन आपला फोन पाहतो आणि चिडून म्हणतो साला कधी पण वाजतो आणि तो फोन बंद करतो तेवढयात बाथरूमच्या दार कोणी तरी जोर जोरात वाजवू लागले होते. अर्जुन ची भीतीने पूर्ती गाळण उडाली होती त्याला काय करावे सुचत नव्हते. तो भीती ने कापत आत सरकत होता. काही सेकंड मध्ये त्याचा दरवाजा तोडला गेला होता आणि त्याचा समोर तिचे ते हिडीस वाले रूप घेऊन ती उभी होती. माझ्या मुलीला आणि मला तुमच्या मुळे मारावे लागले तुम्ही पण असेच मारणार बोलून ती त्याचे डोके सिंक वर आपटते. रक्ताची एक धार त्याचा डोक्यातून खाली आली. तिने पुन्हा अर्जुन चे डोके आरश्यावर आपटले, आरश्याचा सर्व काचा आता त्याच्या चेहऱ्यावर घुसल्या होत्या अर्जुन अर्धमेला झाला होता. तिने रागाने त्याचे डोके एवढ्या जोरात दाबले कि ते असे फुटले जसे कोणते कलिंगड जमिनीवर पडून फुटते. बाथरूम ची जमीन पूर्ण लाल झाली होती. अर्जुनाचा मेंदू त्याच्या डोक्यातून बाहेर आला होता. तिचा राग शांत झाला नव्हता.

   बाजूच्या खोलीमध्ये अनिता आणि किशोर दोघे एका कपाटात लपले होते. धुळी मुळे एवढा वेळ रोखून धरलेला खोकला अचानक अनिता च्या तोंडातून बाहेर पडला तसे सुनीता ने त्या आवाजाच्या दिशेने पहिले आणि हवेत उडतच ती त्या खोलीच्या दरवाजा जवळ पोहोचली आणि तिने जोरात त्या दरवाजा वर लाथ मारली आणि दरवाजा तोडला. तिने आत मध्ये प्रवेश केलाआहे हे किशोर आणि अनिताच्या लक्षात आले होते. ते दोघे पण आपला श्वास रोखून त्या बंद कपाटामध्ये उभे होते. बाहेर फक्त तिच्या गुरगुरण्याचा आवाज येत होता. किशोर ने दरवाजा उघडून बाहेर पाहण्यासाठी काडीला हात लावला होता तसे जोरात बाहेरून तिने दरवाजा खेचला तिचा जोर एवढा होता कि दरवाजा तुटून गेला होता तिच्या अश्या वागण्यामुळे अनिता किंचाळी तसे तिने आपला पंजा अनिताच्या छातीच्या आरपार केला होता. किशोर ने दृश्य पाहिले आणि त्याची बोबडी वळली आणि तो घाबरून तिकडुन पळू लागला. सुनीता ने त्याला पहिले आणि तिने अनिताच्या शरीरात घुसवलेला तो रक्ताळेला पंजा बाहेर काढला आणि ती आता किशोर च्या मागावर निघाली. किशोर ओरडत किंचाळत बाहेर आला आणि जिन्यावरून खाली उतरताना तो पडला आणि गडगडत खाली आला. तसे सुनीता हवेत तरंगत त्याचा समोर उभी होती. तिने त्याला हवेत उचलून धरले आणि भिंतीवर आपटले तसे त्याचे डोके फुटून त्यातून रक्त बाहेर पडू लागले. का मारले काय बिघडवले होते मी आणि माझ्या मुली ने का मारले सांग बोलून ती त्याचे डोके भिंतीवर आपटत होती तिचा तो घोघरा आवाज आणि चित्कार ऐकून मोहन नाव राधिका घाबरले होते. आपटून आपटून तिने किशोर ला पण मारून टाकले होते.

   मोहन आपण किचन मध्ये का आलो आहोत राधिकाने विचारले. तसे मोहन ने तिला हळू बोलायला सांगून म्हणाला आपण इकडून बाहेर पडू, म्हणजे? राधिकाने विचारले. म्हणजे? हा दरवाजा आपल्याला बाहेर घेऊन जाईल तिकडे आपण जे पीक आहे तिकडे लपू आणि सकाळी मदत येईल तेव्हा बाहेर येऊ. मोहन म्हणाला आणि त्याने दरवाजा उघडला. इकडे सुनीता रडत होती ओरडत होती. राधिका आधी बाहेर निघाली आणि मोहन बाहेर निघणार तेवढयात त्याचा शर्ट मांडणी मध्ये अडकला आणि तो जसा बाहेर पडला शर्ट सोडवण्याचा नादात भांडी हि पडली. त्या आवाजाने सुनीता चे लक्ष मोहन वर गेले त्याने तिला पाहून त्याने कसे तरी आपले शर्ट सोडवले आणि दरवाजा बंद करून आणि बाहेरून कडी घातली. सुनीता ओरडत त्याचा दिशने येत होती. हे बघ तिने मला पहिले आहे आता आपल्याकडे पर्याय नाही तिने तुला पहिले नाही तर तू एक काम कर हा मोबाईल घे आणि शेतात थांब अश्यास ठिकाणी जिकडे तू दिसणार नाही मोहन भरभर बोलत होता आणि तू राधिका चा कंठ दाटून आला होता. इकडे ती दरवाजा तोडण्यासाठी त्यावर धक्के मारत होती. हे बघ राधिका आपल्याकडे वेळ कमी आहे त्या मुळे मी जे सांगतो आहे ते तू कर नाही तर आपण दोघे पण जिवंत नाही राहणार. म्हणजे? तू? रडत राधिका म्हणाली.हो, माझ्याकडे दुसऱ्या पर्याय नाही आहे मी तिचे ध्यान भटकवतो तू जागा पाहून तिकडे लपून बस मोहन रडत म्हणाला. इकडे अजून एक जोरात धक्का दरवाजा वर पडला होत. मोहन बोलून तिने त्याला मिठी मारली राधिका माझे तुझ्यावर प्रेम होते आणि राहील आणि एक आपला बाळ मोठे झाले कि त्याला सांग त्याचा बाबा घाबरत नव्हता कशाला आणि जमले तर दुसरे लग्न कर मोहन रडत रडत म्हणाला तसे राधिका अजून जोरात रडू लागली त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला मानेन रडत रडत नकार दिला. हा मोबाइल घे आणि मदत बोलावं मोहन म्हणाला आणि त्याने तिच्या पोटात असणाऱ्या आपल्या बाळावर शेवटचा हात फिरवला आणि तिला जायला सांगितले. तसे दरवाजा तुटला ते पाहून मोहन पळाला आणि राधिका तिकडे असलेल्या शेतात जे पीक होते तिकडे लपली. मोहन पळत होता आणि तिच्या मागे सुनीता होती. राधिका त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृति कडे पाहत होती. तिला माहित होते मोहन आता परत कधीच येणार नाही. ती रडत होती.

   साधारण एक पाच मिनिट मध्ये मोहन ची आर्त किंकाळी तिच्या कानी पडली. तसे तिने तोंडावर हात धरून रडू लागली. माझे नशीब एवढे खराब का आहे? देवा आम्ही तुझे असे काय केले होते ज्याची शिक्षा तू मला आणि माझ्या न जन्मलेल्या बाळा देतो आहेस? राधिका रडतच होती. अचानक तिला कोणाच्या तरी जोर जोरात रडण्याचा आवाज आला तो आवाज तिचा पासून लांबून येत होता. ती हिम्मत करून जागेवरून उठली आणि पुढे पुढे जाऊ लागली साधारण पंधरा ते वीस पाऊले पुढे गेली असेल तसे तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मोहन चे शव दिसले आणि ती त्या पिकांमधुन हळू हळू बाहेर येऊ लागली. आजुबाजुंचा कानोसा घेऊन ती मोहन च्या शवजवळ आली तिला मोकळे पणाने रडता पण येत नव्हते कारण जर तिचा आवाज सुनीता ने ऐकला तर ती आणि तिचे बाळ दोघाना धोका होता. मोहन च्या पोटातून रक्त वाहत होते त्याचा पोटातली आतडी बाहेर येऊन लोम्बत होती. त्याचे सताड उघडे डोळे जणू राधिका आणि त्याचा होणाऱ्या बाळाला पाहत होते. रडत रडत राधिकाने ने त्याचे डोळे बंद केले, तसे तिला जाणवले कि कोणी तरी पुन्हा त्या दिशने येत आहे . राधिका जागेवरून उठली आणि पुन्हा पिका मध्ये शिरली. उसा मुळे तिला लपणे सोपे झाले होते पण पात्यांना धार होती त्यामुळे आत जाताना तिच्या हाताला कापले होते आणि त्यातून रक्त येत होते. सुनीता अमानुष पणे चित्कार करत फिरत होती. पहाट होण्यासाठी अजून एक तास शिलक्क होता. पुन्हा एकदा राधिका ने मोहन च्या कलेवराकडे पहिले आणि ह्याचा बदला घायचा असे मनात ठरून तिने मोबाईल सुरु केला त्याचा प्रकाश कमी केला आणि मगाशी जिकडे सुनीता ची माहिती वाचली होती त्या वर पुन्हा गेली. सुनीता च्या माहिती शिवाय तिकडे अजून एक ओळ होती. जर सुनीता तुमच्या पुढे असेल तर काय करावे तिचा अंत आहे कि नाही? पहा आणि लिंक वर क्लिक करा.तिने लिंक वर क्लिक केले तसे एक पेज ओपन झाले. सुनीता गेली असे सर्वाना वाटले पण तसे झाले नव्हते सुनीता आणि तिच्या मुलीचा खून केला म्ह्णून सदाशिव आणि त्याच्या आई ला अटक झाली आणि त्यांचा पण मृत्यू तुरुंगात झाला ते पण हृदयविकाराचा झटका आला म्हणून पण मेले तेव्हा त्याचे डोळे मोठे झाले होते जणू त्यांनी काही तरी भयानक पहिले होते. गावात सुनीता हे प्रेत फिरत होते एका मांत्रिक ने तिचा आत्मा आरशात बंद केला पण जर कोणी तिला बोलावले तर ती अजून येते. अशीच तिने कित्येक लोकांचे प्राण घेतले आहेत .जर तुम्ही सुनीताला जागे केले असेल तर ती तुमच्यावर हल्ला करून तुम्हाला मारून टाकणार पण तिच्या पासून वाचण्याचा उपाय आहे तो म्हणजे तिला विहिरीत पाडणे. असे म्हणतात कि माणूस ज्या गोष्टी ने मारला गेला आहे त्या गोष्टीला तो मरणा नंतर पण घाबरतो. सुनीता चा मृत्यू हा विहिरीत पडून झाला होता त्या मुळे तिला विहिरीत पडून मारणे गरजेचे आहे. हे वाचून कदाचित हे खरे असेल आणि आपण मोहन च्या मृत्यूचा बदला घेतला पाहिजे असे राधिकाच्या मनात आले आणि सुड भावनेने ती पेटून उठली. सुनीता अजून तिकडेच फिरत होती तिचे बाळ आणि मुलगी शोधात ती हळू हळू घराच्या दिशेने निघाली होती आणि राधिकाला हेच हवे होते. ती त्या वाढलेल्या उसा मधून होऊ हळू पुढे सरकू लागली सुनीता ला तिची चाहूल लागू द्याची नव्हती. सुनीता माझे बाळ माझी मुलगी कुठे आहात तुम्ही असे घोघार्या आवाजात ओरडत पुढे जात होती. इकडे राधिका विहिरी जवळ पोहोचली. विहिरीवर कागद टाकला होता जेणे करून पाण्यात काही पडू नये. राधिका ने स्वतःला सावरत तो कागद धरला आणि हळू हळू सरकवु लागली. विहीर पाण्याने भरली होती. त्या विहिरीच्या पाण्यात चांदणे दिसत होत.

   राधिका ने कागद बाजूला केला आणि ती रडत रडत जोरात आवाज देते सुनीता, सुनीता तसे काही सेकंड मध्ये सुनीता तिच्या समोर उभी असते. तिचे ते हिडीस वाणी रूप ओले मोकळे केस हातावर आणि चेहऱ्यावर लागलेले रक्त, सडलेले शरीर आणि डोळ्यांच्या जागी मोकळ्या खोबण्या आणि तिचे ते काळे दात कोणाला हि तिचे रूप पाहून धडकी भरेल.राधिका चा पारा तिला पाहून चढतो आणि ती रागात जोर जोरात बोलू लागते. तुझ्यावर अन्याय झाला मान्य आहे पण तुझे बाळ गेले त्याला तुझा नवरा आणि सासू जबाबदार होते, त्यांचा बदला तू घेतला मग आता बाकीच्या निरपराध लोकांना मारून तुला काय मिळणार आहे? का त्यांना मारतेस, तुला काय वाटते तू असे करून तुला तुझी मुलगी आणि तुझं बाळ परत मिळेल का? हा तुझा गैरसमज आहे मी पण एका बाळाची आई होणार आहे आणि मी माझा सोबत माझ्या बाळाला घेऊन आता या विहिरीत जीव देते म्हणजे तुझा आत्मा शांत होतील राधिका चिडून म्हणाली. प्रेतयोनी मध्ये जरी असली तरी सुनीता एक आई होती तिला तिचा बाळा सारखी अवस्था राधिका ची होऊ द्याची नव्हती. राधिका वळली आणि विहीर मध्ये वाकली तसे सुनीता तिला वाचण्यासाठी पुढे आली तसे राधिका ने प्रसंगावधान राखून बाजूला झाली आणि सुनीताला मागून धक्का दिला. सुनीता किंचाळत पुन्हा पाण्यात पडली होती. इकडे राधिका तिला पाहत काही क्षण तिकडे उभी राहिली. सूर्याची एक कोवळी किरण राधिका च्या चेहऱ्यावर पडली होती ती जिंकली होती पण तिने तिचे सर्वस्व हरली होती. ती हळू हळू मोहन जिकडे पडला होता तिकडे आली त्याच्या डोक्यावर हात फिरून माथ्याचे चुंबन घेतले तिच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. हळू हळू तिचे डोळे बंद झाले.

   राधिका आता शुद्धीवर आली होती, तिच्या शेजारी डॉक्टर , पोलीस आणि त्या घराचा नोकर उभा होता. पोलिसानी चौकशी करतात राधिका त्यांना सर्व खरे सांगते पण त्यावर कोणाचा विश्वास बसत नाही आणि राधिका हे सर्व करेल असे पोलिसाना वाटत नव्हते. काही दिवसानी राधिका ने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मोहन च्या फोटो समोर उभी राहत राधिका म्हणाली. मोहन तू म्हणाला ते खरे झाले आपल्याला राजकुमारी झाली आहे आणि राधिका रडू लागते.

   रसिकांनो, तुम्हाला काय वाटते सुनीता विहिरीत पडली म्हणजे तिचा अंत झाला का? कि पहाट झाली म्हणून ती बाहेर आली नाही? जर तिचा अंत नाही आहे तर मग तिने राधिकाला का जिवंत सोडले? हि कथा लिहून झाली आहे आता मी माझा दिवा बंद करून लाल दिवा सुरु केला आहे हातात माझ्या मेणबत्ती आहे आरसा माझ्या समोर आहे आणि मी ते तीन वेळा बोलो आहे आणि माझ्या समोर ते ती .... हो नकीच ती..... तीच आहे.... तुम्ही पण करून बघा तुम्हाला दिसते का?

   कथा पूर्णतः काल्पनिक आहे पण तुम्ही प्रयोग करून पाहू शकता जर सुनीता आली तर उपाय तुम्हाला माहीत आहे पण त्या साठी तुम्ही जिवंत राहणार का? तर भेटू पुढील कथेमध्ये .......



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama