Akshay Yadav

Drama Horror Thriller

3  

Akshay Yadav

Drama Horror Thriller

आत्म्याचा खेळ

आत्म्याचा खेळ

41 mins
545


मित्रानो आपण लहान असताना खुप खेळ खेळलो आहोत, लपाछपी, पकडा पकडी हे खेळ आपण आपल्या लहान पणी खेळेलेले आहे, पण आजकाच्या मुलांना हे खेळ आवडत नाही . त्याचे खेळ हे मोबाईल मधले झाले आहेत. पण अजून काही मुलं आहेत जे काही वेगळेच खेळ खेळात आहेत.ज्या खेळामुळे काही तरी भयानक दुसऱ्या जगातून ह्या जगात येत आहेत.

सादर कथा असाच मुलांची आहे ज्यांनी त्यांच्या भयानक खेळामुळे कोणाला तरी आपल्या जगात येण्याचा प्रवेश द्वार उघडून दिला आहे. पाहूया काय झाले आहे .....

 "हे पहा मिस पॉल, केविन माझे चांगले मित्र होते, म्हणून मी अजून शांत आहे पण जर का? मला पुढचा दोन महिना मध्ये पाच महिनेच भाडं नाही मिळाला तर तुम्हला हे घर खाली करावा लागेल. मागचे तीन आणि नंतर चे दोन असा मिळून मला पाच महिनाच भाडं हवे आहे." घर मालक जवळ जवळ धमकी देऊन गेला होता.

नोरा ला आता समजत नव्हता कि काय करायच दोन्ही मुलं शाळेत गेली होती. नोराच्या पतीचे निधन होऊन काही महिने झाले होते तिच्या घराचे भाडे थकले होते, शिवाय दुकानदार आणि इतर लोकांची कर्ज पण तिच्या डोक्यावर होती. ह्या सर्वातून मार्ग कसा काढायचा ह्याचा विचार करत असताना घर मालकाने तिला भाडे नाही दिले तर घर खाली करून घेईन अशी धमकी दिली होती. नोरा एक सिंगल आई एकटी कुठे पुरी पडणार होती. तिने वर्तमानपत्रामध्ये नोकरी साठी जाहिराती पहिल्या पण तिच्या साठी योग्य अशी एकही जागा कुठे उपलब्ध नव्हती. काही तरी करून लोकांची देणी द्याची आहेत असा विचार करत असताना तिची नजर एका जाहिरातीवर पडली. ती जाहिरात होती प्लँचेट करून आपल्या मृत व्यक्ती सोबत बोला. नोराला प्लँचेट म्हणजे काय हे माहित होते आणि त्या वेळी ह्या प्लँचेट चे खुप स्तोम माजले होते. लोक प्लँचेट करून आपल्या मृत स्वकीयांसोबत बोलत असत.नोराचा ह्या सर्वांवर विश्वास नव्हता पण बातमी वाचून तिच्या डोक्यात एक कल्पना आली ज्यामुळे ती पैसे कमाऊ शकत होती. 

दुसऱ्याच दिवशी नोरा ने वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात दिली . भूत,प्रेत,आत्मा आणि वशीकरण यांचा इलाज फक्त आमचा येथे.

अमेरिका देशात साधारण १९५० मध्ये प्लँचेट हे एक खेळ स्वरूपात पहिला जात होता, अनेक लोग त्याचा एक खेळ मानून प्रयोग करत होते. काही जण नसलेले भूत तयार करून लोकांकडून पैसे घेत होते आणि आता तोच व्यवसाय करून नोरा ला पण पैसे कमवयचे होते. केविन ने त्याचा साठी जे पैसे ठेवले होते त्या पैशातून तिने मुलांच्या शाळेची फी भरून घराची थोडी डागडुजी केली होती पण ते त्या घर मालकाला दिसत नव्हतं म्हणून नोरा ची जास्त चीड चीड होत होती. वृत्तपत्रातील जाहिरात वाचून एक जोडपं नोरा कडे आलं.

"नमस्कार, मी डेंनी आणि ही माझी बायको सुजेन आमची ६ वर्षाची मुलगी अचानक वारली आणि आमच्या घरात काही विचित्र घटना घडू लागल्या म्हणजे माझा मुलीचा आवाज मला येऊ लागला ती तिची आवडती बाहुली मागत असते. हा आवाज रोज रात्री साधारण १२:३० च्या जवळपास येतो आणि मग माझी पत्नी झोपतेतून रडत उठते. मला यावर काही तरी उपाय सांगा?" डेंनी त्याचा पत्नी च्या हात हातात घेऊन तिला धीर देत म्हणाला.

नोरा ने त्यांचा बोलणं समजून घेतला आणि आपल्याला यातलं सर्व येत ही दाखवण्यासाठी तिने प्लँचेट बोर्ड लाकडाचा तो बोर्ड ज्यावर वरती आकडे आणि खालच्या बाजूला इंग्रजी मधील वर्णाक्षरे लिहिली होती मध्ये एक लाल रंगाचा गोल आणि त्याच्या उजव्या बाजूला येस आणि डाव्या बाजूला नो असे लिहिले होते. हा बोर्ड आकर्षक दिसावा म्ह्णून त्यावर लाल आणि काळ्या रंगाची नक्षी काम केले होते. बोर्ड च्या मध्ये जो लाल रंगाचा गोल होता त्या वर नोरा ने एक नाणे ठेवले आणि तोंड्यातला तोंडात काही तरी पुटपुटू लागली. डेंनी वाटलं ती खरंच त्याचा मुलीशी संपर्क साधत आहे. तिने एकदा डेंनी कडे पाहून म्हणाली

"विचारा तुम्हाला काय हवे ते तुमची मुलगी माझा संपर्क मध्ये आहे." डेंनी घाबरत होकार दिला.

"पण प्रश्न हो किंवा नाही मध्ये असावे." नोरा पुन्हा एकदा म्हणाली. त्यावर डेंनी च्या पत्नी ने विचारले

" तू ठीक आहेस ना?"कॉइन वर फक्त नोराचे बोट होते म्हणजे ती तिला हवे ते उत्तर देऊ शकत होती .

जसा प्रश्न आला तसे तिचा बोटअसलेला कॉइन हो वर जातो.सुजेन रडायला सुरुवात करते आणि रडत विचारते "तुला आमची आठवण येते का?" पुन्हा कॉइन हो कडे वळतो. 

नोरा मनातला मनात विचार करते "आसामी श्रीमंत आहे, आपल्याला हवे तेवढे पैसे घेता येतील."

 डेंनी विचारतो "बाळा तुला काही हवे आहे का आमच्या कडून तुला काही सांगायचा आहे का ?" त्या वर पुन्हा बोट हो कडे वळलं.

"तुला काही हवे आहे का? "डेंनी ने पुनः विचारल, कॉइन हळू हळू सरकू लागला आणि वरती जी इंगर्जी आद्याक्षरे होती त्यावर फिरला आणि एक शब्द तयार झाला डॉल..... कारण नोरा ला आधी पासून माहित होत.

"ठीक आहे मी तुला देतो पण तू खुश राहा" डेंनी रडत रडत म्हणाला .

नोरा ने पुन्हा डोळे बंद केले आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागली. एक झटका लागल्या सारखा केले आणि डोळे उघडले.

"हे पहा, तुम्ही एक काम करा आज रात्री १२:३० ला तुमच्या मुलीचं शरीर जिथे डफन केला आहे तिकडे जाऊन ती डॉल तिच्या प्रेत सोबत ठेऊन पुन्हा गाडून टाका म्हणजे ती पुढचा प्रवास सुरु करेल ती तुमच्या दोघांना पण मिस करते आहे असं तिने मला सांगितलं." नोरा गंभीर आवाजात म्हणाली.

डेंनी आणि सुजेन ला तिच बोलणं पटलं. नोरा ने त्यांच्या कडून घराच्या सात महिनाच भाडं देऊन तिच्या आणि तिच्या मुलं साठी पैसे उरतील अशी किंमत सांगितली आणि त्यांनी काही का कु न करता तिला ती दिली.

नोराची पहिला गिराहीकाकडून उत्तम कमाई झाली होती. नोरा हा सर्व कारभार मुलं शाळेत असताना करायची, म्हणजे त्याना यातला काही सांगायची गरज पडली नसती घर मालक थकलेले आणि आगाऊ भाडं पण घेऊन गेला.

नोरा च्या कामाचा वेग वाढला होता आणि त्यातून कमाई पण चांगली होत होती. पण म्हणतात ना एक ना एक दिवस फसवून केलेला काम आणि कमाई कधी तरी उलटून आपल्या वरच येते.

साधारण एक महिना झाला असेल नोरा ला हा उद्योग करताना पण तिने मुलानं समोर कधीच हे केलं नव्हता, पण त्या दिवशी हेझल आणि लिझा दोघीना सुट्टी होती, नोरा ची दुपारची एक भेट होती पण ते मुलानं समोर कस करायच कारण काही झाल तरी तिची मुलं हेझल दहा तर लिझा बारा वर्षाची त्यांना जर समजलं तर ते पण माझा अनुकरण करायचा प्रयत्न करतील याची भीती नोरा ला होती. नोरा ने दोघीना जेवायला दिला आणि दुपारी घरी एक खास पाहुणे येणार आहेत तुम्ही दोघी पण तुमच्या खोलीचा बाहेर यायचा नाही अशी तंबी त्या दोघीना दिली.शेवटी मुलाचं ती, आपल्या आई ने असा का सांगितलं आहे हे बघायला ते बाहेर येणार.

"हेझल तुला काय वाटत मम्मी ने आपल्यला रूम मध्ये का राहायला सांगितलं असेल".लिझा ने बाहुली सोबत खेळत असलेला हेझल ला विचारल.

 बाहुली चे केश ठीक करत हेझल म्हणाली "माहित नाही पण मम्मी ने सांगितलं आहे तर असेल तसच काही महत्वाचे कारण आणि आपण मम्मी ला कसे विचारणार.?” हेझल म्हणाली.

"अगं पण काही समस्या असेल तर आणि मम्मी आपल्या पासून काही लपवत असेल तर, आधीच डॅड गेल्या पासून घरचा मालक भाडं मागायला येत होता मम्मी सांगितले नाही. पण मला समजत आणि एकदा तर मी पण ऐकलं होता कि त्याने मुदत आणि धमकी दिली आहे भाडं नाही दिला तर घर खाली करावा लागेल आणि त्याने मुदत दिली कारण तो डॅड च्या चांगला मित्र होता.कदाचित आज पण तोच येणार असेल आपल्याला एकदा जाऊन पाहायला हवे, नक्की काय चालूं आहे आणि मम्मी ला जर त्याने काही केला तर ..." लिझा ने सर्व शक्यता बोलून दाखवल्या. आता मात्र हेझल ला काय करावा तेच समजत नव्हता.तिला आता भीती वाटू लागली.

"लिझा तू खरा सांगत आहेस ना ?" हेझल ने विचारला .

"मम्मी ची शपत यातला सर्व खर आहे पण तू मम्मी ला काही बोलू नको." लिझा चिडून म्हणाली.

थोडा विचार करून हेझल म्हणाली ," चल आपण बघू "असे म्हणून लिझा ने दरवाजा हळूच उघडला आणि खाली जे काही बोलणे सुरु होते ते चोरून ऐकू लागल्या.

 खाली ३ माणसाचा आवाज येत होता त्यात २ पुरुष आणि १ महिला होती. ते जे काही बोलत होते त्याचे संवाद लिझा आणि हेझल च्या कानावर पडत होते. भेटायला आलेला माणसाचा घरात वाईट शक्ती च्या अनुभव येत होता आणि तेच तो नोरा ला सांगत होते. नोरा ने एका बॅग मधून एक लाकडी बोर्ड काढला आणि सुरुवात केली. ती दाखवत होती कि तिला यातलं सर्व माहित आहे. तिने तोंडात काही तरी पुटपुटल आणि कॉइन वर बोट ठेवला. त्यांना ज्याची उत्तरे हि किंवा नाही अशी येईल असे प्रश्न विचारायला सांगितले. तिच्या सांगण्या प्रमाणे त्यांनी प्रश्न विचारले आणि शेवटी तिने त्यांना यातून बाहेर पडायचा उपाय म्हणून चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करायला सांगितली आणि त्याचा कडून मोठी रक्कम घेतली. आपण सर्व पाहत आहोत असा कोणाला कळू न देता हेझल आणि लिझा दोघी पण पाहत होत्या. पाहुणे गेल्या नंतर त्या पण आपल्या रूम मध्ये परत आल्या.     

"लिसा मॉम काय करत होती ती अशी तोंडातल्या तोंडात काय बोलत होती? आणि तो बोर्ड कोणता होता? त्या वर कॉइन ठेवला तर काय होईल?" हेझल ने प्रश्नांची सरबत्ती लावली होती.

लिसा पण तेव्हडीच गोधली होती जेवढी हेझल. हेझल काय विचारत होती ते काही लिसा ला सांगता येत नव्हता. लिसा विचार करत असताना हेझल पुन्हा तिला हलवते आणि विचारते.

"सांग ना? मॉम काय करत होती त्या बोर्ड सोबत ?"

" हे बघ हेझल याचे उत्तर माझा कडे पण नाही आहे, पण मी उद्या तुला सांगते नक्की पण एक लक्षात ठेव यातला कोणाला काहीच सांगायचा नाही. नो फ्रेंड्स आणि मॉम ला तर अजिबात नाही लक्षात राहील ना ?" लिसा ने सांगितले त्या वर हेझल ने फक्त मान डोलावली.

"पण लिसा असा केल कि पैसे मिळतात का? मग मी पण मोठी झाली के हेच करणार म्हणजे मला पण खुप पैसे मिळतील." हेजल म्हणाली त्यावर लिसा हसून म्हणाली

"आधी शाळेचा अभ्यास पूर्ण कर नाही तर उद्या परत आऊट ऑफ क्लास असशील."

" मी नाही करणार मी आता थकले आहे आणि मला झोप येत आहे मी संध्याकाळी करेन.आता मला झोपू दे माझ्या बाहुली सोबत" बोलून हेझल झोपी गेली.

लिसा अभ्यास करत होती पण तिचा मन लागत नव्हते तिला सारखा सारखा तोच विचार डोक्यात येत होता. तो बोर्ड तिचा डोळ्या समोरून जात नव्हता. ती विचार करत होती कि कोणाला विचारल तर ते आपल्याला खर सांगेल तिचा डोक्यात पटकन एक नाव आला. तिला तिचा प्रश्नच खर उत्तर देणारा व्यक्ती तो दोघं एकमेकांना जवळून ओळखत होती. तिने मनात ठरवले कि उद्या काही झाले तरी त्या व्यक्तीला भेटायचे आणि सर्व माहिती त्या बॉक्स बद्दल जाणून घ्याची.

   दुसऱ्या दिवशी सकाळी लिसा ने शाळेत जायची तयारी लवकर केली आणि शाळेची बॅग घेऊन खाली आली.

" अरे लिसा आज लवकर उठून तयारी पण केली ते पण स्वतः आज नक्की सूर्य पश्चिम ला उगवला तर नाही ना?"नोरा लिसा साठी ब्रेकफास्ट तयार करत म्हणाली.

"नाही आज सूर्य पूर्वेला उगवला आहे, पण मला गॅरी काका कडे जायचा आहे. खुप दिवस त्याचा कडे गेले नाही. आणि ब्रेकफास्ट पण त्याचा कडे करणार आहे. तू हेझल ला रेडी कर मी स्कूल बस येण्याआधी परत येते. आता मी जाते नाही तर मला ब्रेकफास्ट ला उशीर होईल.बाय मम्मी मी तुला आफ्टरनून मध्ये भेटते. बोलून लिसा दरवाजा बंद करून बाहेर पडली. " बोलून पुढचे काही न ऐकता लिसा घरातून निघाली.

गॅरी हा केविन चा जुना आणि चांगला मित्र होता. केविन गेला त्या नंतर नोरा आणि तिचा मुलींना गॅरी आणि त्याचा बायको म्हणजे टीना ने उभा राह्यला मानसिक ताकद दिली होती, त्या दोघांना पण मुलं नाही म्हणून ते लिसा आणि हेझल च्या स्वतः च्या मुली प्रमाणे सांभाळ करत होते. आता पर्यंत त्यादोघांनी जी साथ दिली होती त्याचा वर नोरा खंबीर पणे उभी होती नाही तर केवीनच्या अचानक जाण्यानंतर तर नोरा पूर्ण खचली होती. काही वेळा त्या दोघांनी नोरा ला आर्थिक मदत पण केली होती.

    गॅरी च्या घराची बेल वाजून लिसा दार उघडण्याची वाट पाहत उभी असते, टीना दरवाजा उघडते.

"गुड मॉर्निग,आंटी " लिसा टीना विष करते .

"अरे आज सकाळी सकाळी सर्व ठीक है ना?" टीना थोड्या चिंतेने विचारते

"हो आंटी, सर्व छान आहे मी तुम्हाला आणि गॅरी काका ना भेटायला आली आहे." बोलत बोलत लिसा हॉल च्या दिशेनं पुढे होते.

 तेवढयात "टीना कोण आला आहे ?"विचारात गॅरी खाली येते.

"ओह्ह्ह्ह माझी लेक आली आहे का? आज काय काम काढले माझ्याकडे?" हसून गॅरी ने लिसा ला विचारले.

 "ये बस तू नास्ता केला का?" टीना ने विचारल.

" नाही पण मला थोडा दूध आणि टोस्ट मिळाले तर माझा दिवसाची छान सुरुवात होईल." लिसा म्हणाली

" तू बैस मी घेऊन येते" बोलून टीना किचन मध्ये जाते .

" बोल काय काम काढल काका कडे सकाळी सकाळी आणि माझा पेढा हेझल कुठे आहे, ती का नाही आली?" गॅरी ने लिसा ला विचारल.

"काका ती उठली नव्हती आता मम्मी तिची तयारी करेल मग आम्ही दोघी शाळेत जाऊ . काका, मला काही विचारायचा होतं तुम्हाला म्हणून मी सकाळी आले आहे ."लिसा हाताची चुळबुळ करत म्हणाली.

"हो बोल ना काही प्रॉब्लेम आहे का शाळेमध्ये? किंवा घरी मम्मी काही बोली का?मी बोलू का मम्मी शी ?" गॅरी म्हणाला तिची हाताची चुळबुळ बगुन गॅरी ला शंका आली कि नक्की काही तरी प्रॉब्लेम आहे.

"नाही काका मम्मी ला नका सांगू आणि मम्मी किंवा शाळेत काही प्रॉब्लेम नाही. एक विचारच होता ते प्लँचेट बोर्ड बद्दल तुम्हाला काही माहित आहे का?" लिसा ने नजर खाली ठेवत विचारला.

"का ग ? तुला का हवी आहे त्या बद्दल माहिती?" गॅरी ने संशयित स्वरात विचारला.

"नाही, असा काही नाही काल मी सिनेमा पाहत होते त्या मध्ये त्याचा उपयोग दाखवत होते पण मम्मी आली आणि तिने टीव्ही बंद केला आणि मी विचारल तर म्हणाली तुझे लक्ष सध्या अभ्यासात हवे. तेव्हा पासून मनात शंका होती.हे काय आहे आणि ह्याचा उपयोग काय? " मनातली सर्व शंका तिने गॅरी ला विचारली.

गॅरी ने तिचं बोलणं विचार पूर्वक एकूण घेतलं आणि मग जोरात हसला आणि म्हणाला,

"तू अजून तू लहान आहेस तुझी मम्मी बरोबर बोली तुला काही गरज नाही या सर्वांची" गॅरी तिच्या हातात हात देत म्हणाला.

"तुम्ही पण मम्मी सारखे आहेत मी आता मोठी झाली आहे. माझा शंका कोणीच समजून घेत नाही सर्व मला लहान समजतात."लिसा रागात म्हणाली आणि बॅग घेऊन जायला निघाली तेवढयात टीना आली.

"अरे काय झाला नास्ता तरी करून जा" टीना म्हणाली.

"नको मला काका ला द्या मला नको काहीच" बोलून लिसा रागात दरवाजा च्या दिशेने जाऊ लागली.

"लिसा थांब काय झाला मला सांग मी बोलते गॅरी शी ? टीना ने विचारल.

" मी काकाला काही तरी विचारल पण त्याने नाही सांगितलं. तोच पण मम्मी सारखा मला लहान समजत आहे" लिसा आत येत म्हणाली.

"थांब मी बोलते गॅरी सोबत, गॅरी तुला लिसा ने काय विचारला आणि तू तिला काय सांगितलं नाही?" टीना ने गॅरी कडे रागात पाहत विचारला.

"लिसा तू नास्ता कर गॅरी काका सांगेल तुला मी प्रॉमिसे करते."टीना लिसा ला ब्रेकफास्ट ची प्लेट देत म्हणाली. "टीना तुला माहित आहे का तिला काय विचारले आहे?"गॅरी ने टीना ला विचारल.

" ते मला काही माहित नाही माझ्या लेकी ने विचारला आहे आणि तू तिला उत्तर द्यावा असा मला वाटत." टीना लिसा च्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

"ठीक आहे पण लिसा प्रॉमिस मी तुला जे मी सांगतो आहे ते तू करायचा नाही ना कोणाला सांगायचे प्रॉमिस?." गॅरी हात पुढे करत म्हणाला. लिसा खुश होऊन त्याचा हातात हात देत म्हणाली " प्रॉमिस "

    "लिसा नीट एकूण घे, एक बोर्ड ज्या वर १-१० नंबर असतात वरती आणि A - Z अक्षर असतात त्या सोबत डावी कडे NO आणि उजवी कडे YES असा लिहिला असतं.त्यावर एक कॉइन ठेवायचा आणि डोळे बंद करू आपल्याला ज्याची आत्मा बोलवायचा आहे त्याचा नाव घ्याच. ती आत्मा आली कसं ओळखायच तर हे सर्व करून झाल कि, मेणबत्ती फडफड करून विजून जाते. मग समजून जायचा कि आत्मा आला.मग तुम्ही त्याला हवे ते प्रश्न विचारू शकता. आणि तुमचे सर्व विचारून झाले कि तुम्ही तिला गुड बाय करायचे .झालं मला पण एवढाच माहित आहे आता जसा कि तू प्रॉमिस केला आहे ना हे तू करायच ना कोणाला सांगयच" गॅरी लिसा कसे पाहत म्हणाला.

" पण काका तुला एवढे सर्व कसे ठाऊक? लिसा ने विचारलेल्या प्रश्नावर गॅरी कडे काहीच उत्तर नव्हते.

" हे बघ लिसा जसे तू मला विचारायला आली होती तसे मी पण एका माणसाला विचारले होते आणि त्याने मला हे सर्व सांगितले." गॅरी लिसाकडे पाहत म्हणाला.

ठीक आहे, थँक यु आंटी आज तुम्ही नसता तर काका ने मला काही सांगितले नसते." लिसा टीनाला मिठी मारू म्हणाली.

" वाह! हे बरं आहे म्हणजे सांगणार मी आणि थँक यु फक्त आंटी ला चल मला एक पापी दे आणि शाळेत जा अभ्य्सात लक्ष दे आणि जे सांगितलं आहे ते विसरून जा." गॅरी लिसाला म्हणाला.

" ठीक आहे मी विसरले पण आपले काय बोलणे झाले होते." लिसा दरवाजा उघडत म्हणाली.

"सावकास जा आणि काळजी घे आणि काही उद्योग करून पाहू नको" मागून टीना ओरडत म्हणाली.

लिसा कडे आता त्या बोर्ड बदल बरीच माहिती होती. ती घर जवळ आली हेझल तयार होती तिने तिची आणि हेझल ची बॅग घेतली आणि बस पकडली.

"लिसा तुला समजला का मम्मी काय करते ते? तू त्या साठीच गॅरी काका कडे गेली होती ना?" हेझल ने बस सुरु झाल्या झाल्या विचारला. त्या वर तिने फक्त होकार मध्ये मान हलवली.

"पण लक्षात ठेव हे गोष्ट कोणाला सांगायची नाही माहित आहे ना?" लिसा ने विचारल त्या वर मानेनंच हेझल ने होकार दिला.

     पूर्ण दिवस शाळेत लिसाच मन लागत नव्हता. तिच्या डोक्यात फक्त प्लँचेटचा विचार सुरु होता.त्या विचारातच ती शाळेतून घरी आली.

"कसा गेला आजचा दिवस" नोरा ने विचारला त्या वर लिसा ने "छान" एवढा उत्तर दिला आणि हेझल ने दिवस भर शाळेत जे काही केला ते सर्व नोरा ला सांगितलं तिच्या शाळेत तीच तिच्या कलसमेंट सोबत झालेले भांडण पण सांगितलं.

"हेझल असा भांडण नाही करायच फोर्गिव्ह इस बेस्ट. चला आता जेऊन घ्या आणि अभ्यासाला बसा." नोरा म्हणाली पण तिला लिसा चे हे वागणे थोडे खटकले होते.लिसा आधी अशी कधी वागली नव्हती.कदाचित वयात येत असताना जे बदल होतात तेच हो असतील असे समजून नोरा ने जास्त विचार केला नाही.

 लिसाचे मन अजून कशातच लागत नव्हता, तिच्या डोकयात फक्त तोच बोर्ड आणि त्याचा वापर याचा विचार येत होता.विचार करत असताना मधेच हेझल ने विचारले.

 "लिसा काय समजला तुला त्या बोर्ड बद्दल मला पण सांग ना?"

.हेझल च्या आवाजाने लिसा ची तंद्री भंग पावली. "हे बग हेझल मला जे समजला आहे ते विचित्र आहे, पण त्याने आपण फायदा करून घेऊ शकतो कसा वापर करायचा आणि काय उपयोग करायचा ते मी वेळ आली कि सांगते" लिसा म्हणाली.

संध्याकाळ तशी नॉर्मल गेली पण लिसा अजून हि विचारात होती, तिचे मन कशात लागत नव्हता तिच्या मधला हा बदल नोरा च्या लक्षात आला होता पण मुलगी वयात येते आहे आणि तस काही गंभीर असेल तर मला नक्की सांगेल. जेवताना तरी पण नोरा ने विचारलं,

"लिसा काही प्रॉब्लेम आहे का? शाळेतून आल्या पासून बघत आहे तुझा कशातच लक्ष नाही जेवण पण तू जेवत नाही फक्त बगतेस काही झाला आहे का शाळेत? असेल तर सांग मला मी तुझी मैत्रीण समजून सांग." नोरा लिसा कडे पाहत म्हणाली.

"मॉम मला डॅड ची खुप आठवण येते आहे, आज जर ते असते तर आपल्या सोबत जेवायला बसले असते माझ्याशी गप्पा मारल्या असत्या, जेऊन आम्ही बाहेर शतपाउली करायला गेलो असतो.मॉम मी डॅड ला खुप मिस करते आहे" एवढे बोलून एकदम लिसा रडायला लागते.

हेझलला काय चालू आहे ते समजत नाही. ती कधी लिसा तर कधी नोरा कडे पाहत जेवत असते. नोरा जागेवरून उठून लिसा जवळ जाते आणि तिला कुशीत घेते.

"हे बघ लिसा जे झाला ते आपण बदलू शकत नाही, आणि तुला कोणी सांगितलं डॅड आपल्या सोबत नाही म्हणून ते आहे आपल्या सोबतच आपल्याला पाहत आहे आणि जर तू रडलीस तर डॅड ला आवडणार नाही. असा रडू नको, डोळे पूस बघू " लिसा चे डोळे पुसत नोरा म्हणाली.

"मॉम डॅड खरच आपल्याला पाहत आहेत ते इकडे आहेत मग त्यांना सांग ना मी पण त्यांना मिस करते आहे" हेझल नोरा जवळ येत म्हणाली.

"ठीक आहे सांगते हा. आता तुम्ही दोघी पण शहाणा मुली सारखा अभ्यास करा आणि झोपा उद्या शाळेला सुट्टी आहे, पण मला एका ठिकाणी जायचा आहे टिना आंटी सोबत मला यायला उद्या उशीर होईल जेवण तयार असेल, फक्त लिसा तू ओव्हन मध्ये गरम करून घे आणि मस्ती नाही घर सोडून जायचा नाही, मी आल्या शिवाय दरवाजा उघडायचा नाही राहील ना लक्षात?" नोरा ने भांडी उचलून ठेवत विचारले..त्यावर लिसा ने फक्त मानेनंच होकार कळवला.

शुभ रात्री करून दोघी पण बेडरूम मध्ये गेल्या.

"हेझल उद्या मॉम नाही आहे. उद्या आपण प्लँचेट करायच का? मॉम च्या बोर्ड वर आणि डॅड ला बोलवायचा मॉम ला येत म्हणजे तिला डॅड अजून दिसतात कदाचित ती रोज डॅड शी बोलत पण असेल. आपण पण एकदा करून बघू ."लिसा शाळेची बॅग उघडत म्हणाली.

"उद्या,,,, पण मला भीती वाटते काही वेगळ झाला तर?" हेझल आश्चर्याभितीनी ने म्हणाली.

"वेगळा काय होणार आपण डॅड ला बोलवायच आणि भीती कसला वाटायला हवी त्यात आणि काही झाला तर मी आहे ना तू काळजी नको करू माझ्यावर विश्वास ठेव." लिसा म्हणाली आणि हेझल ने फक्त मान हलवून आपली सहमती दर्शवली.

 दुसऱ्या दिवशी सकाळी....

" चला मुलींनो आम्ही जाऊन येतो, लिसा हेझल ची काळजी घे. जेवण करून ठेवले आहे गरम करून खा. कोणी आले तरी दरवाजा उघडू नका काही वाटले तर शेजारी जे काका राहतात त्याचा नंबर मी लिहून फोन जवळ ठेवला आहे काही वाटले तर त्यांना कॉल करा. मस्ती करू नका आणि एकमेकींना सांभाळा" अश्या विशेष सूचना देऊन नोरा बाहेर पडली.

सकाळचे साधारण १० वाजले होते. लिसा आणि हेझल ने ब्रेकफास्ट केला आणि मम्मी च्या रूम मध्ये गेल्या.

"लिसा तुला खरा वाटतं का कि आपण डॅड शी बोलू शकु?" हेझल ने उत्सुकतेने विचारला.

"हो ……..आणि नाही बोलो तरी आपल्या समजेल ना हे खरंच काम करत का ते?" लिसा एका चामड्याच्या बॅग मध्ये हात घालत म्हणाली.

तिचा हात कशाला तरी थडकल, तिने ते बाहेर काढले. तर तो तोच बोर्ड होता. तसाच जसा गॅरी काका ने सांगितलं होता.लिसा ने तो हेझल ला दाखवला आणि आपल्या रूम मध्ये घेऊन जाऊन उघडला.

"हे काय आहे? नुसते अंक आणि अल्फाबेट्स एस नो या वर काय करायचा?" हेझल ने तोंड वाकडा करत विचारल.

" हाच तोच बोर्ड आहे आपला डॅड शी बोलायचा".लिसा ने पुनः हात बॅग मध्ये हात घालत म्हणाली.

"पण हा चालवायच कसा ?"हेझल ने पुन्हा विचारल.

"ते मी तुला सांगते पण हे कोणाला समजला नाही पाहिजे." लिसा कॉइन काढत म्हणाली.

पण मम्मी येण्याआधी तो परत जागेवर गेला पाहिजे तिला काही सांगायचा नाही, नाही तर आपली होईल बिना पाणी ची" हेझल हसत म्हणाली.

        लिसा ने सर्व दरवाजे आणि खिडकी बंद केल्या, हेझल ला एक मेणबत्ती घेऊन यायला सांगितलं.तो पर्यंत लिसा ने बोर्ड ओपन केला आणि त्याचा मधोमध तो कॉइन ठेवला. हेझल मेणबत्ती घेऊन आली.

"हे बघ आता इथे जे काही होईल ते मम्मी ला सांगायचा नाही लक्षात ठेव, काही अगदी काही झाला तरी पण, नाही तर मम्मी आपल्याला पुन्हा कधीच डॅड सोबत बोलू देणार नाही" लिसा समजावणीच्या स्वरात म्हणाली . त्यावर हेझल ने फक्त मानेनेच होकार दिला.

"लिसा मला भीती वाटत आहे, काही विचित्र तर नाही होणार ना ?" हेझल ने घाबरत विचारले.

"मी माझा बाहुली पण घेऊ का सोबत म्हणजे भीती कमी वाटेल?" हेझल बाहुली हातात घेत म्हणाली.

"ठीक आहे, पण एक लक्षात ठेव काही झाला तरी कॉइन वरून हात काढू नको" लिझा ने होकार दिला तसे हेझल खुश होऊन आपली बाहुली घेऊन बसली .

लिझाला काही गोष्टी गॅरी ने सांगितलं होत्या तर काही तिने त्या दिवशी तिचा आई ने जे केले त्यातून शिकली होती. कॉइन बोर्ड वर ठेवला आणि त्यांनी त्याचा वडिलांचा आत्माला आवाज देऊन बोलवायला सुरुवात केली.

"डॅड तुम्ही जर आमचा आवाज ऐकत असाल तर आम्हाला सांगा. डॅड तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर हिन्ट द्या? डॅड आम्हाला तुमची खुप आठवण येते तुम्ही आम्हाला रोज बघता असा मम्मी सांगते खरंच तुम्ही आमचा सोबत असाल तर हिन्ट द्या ? डॅड कृपा करून हिन्ट द्या तुम्ही आला आहेत का?"

 तेवढयात घरच्या खिडक्या वाजू लागतात. हवा जोरात वाहू लागते. मेणबत्ती फडफडू लागते. लिसा विचारते. "कोणती आत्मा आहे का आजू बाजूला ?" तिचा प्रश्न येतो आणि कॉइन हळू हळू सरकू लागतो. कॉइन येस कडे जाऊन थांबतो.

हे पाहून दोघी पण घाबरतात, हेझल त्या कॉइन वरून बोट काढायचा प्रयत्न करते पण लिसा तीला इशारा ने तस करू नको असा खुणावते.

 थोडा धीर करून लिसा "पुन्हा विचारते तुम्ही केविन आहेत ना?" त्यावर तो कॉइन नो कडे जातो. आता मात्र दोघी प्रचंड घाबरतात, हेझल घाबरून पुन्हा हात काढायचा प्रयन्त करते लिसा तिला तस करू देत नाही.

" कोण आहात तुम्ही?" लिसा घाबरून विचारते, त्या वर तो कॉइन अल्फाबेट कडे सरकतो आणि एक हळू हळू एक एक करून अक्षर तयार होऊ लागते D.E.V.I.L.

डेव्हिल असं नाव येताच हेझल आपला हात घाबरून मागे खेचून घेण्याचा प्रयन्त करते पण लिसा तिला तसे करण्यापासून रोखते . कॉइन आपोआप फिरतो आणि शब्द दाखवले जातात,

"मी इकडे आलो आहे तुम्हाला सर्वाना मारायला मला मुक्त करून बोलवलं त्या साठी आभारी आता तुम्ही सर्व मृत होत नाही तो पर्यंत मी जाणार नाही." तेवढयात खिडकीची काच तुटते आणि मेणबत्ती विजून जाते.

त्या दोघी तो बोर्ड घाबरून तसाच बंद करतात आणि रूम मधून पळत बाहेर पळून येतात आणि बोर्ड पुन्हा त्याचा जागेवर नेऊन ठेऊन त्या पळत हॉल च्या दिशेने पळतात .आता त्या दोघीमध्ये पण हिम्मत नसते पुन्हा रूम मध्ये जायची. त्यांच्या रूम चा दरवाजा जोरात बंद होताना त्या हॉल मधून बघतात. त्यांना माहित होते कि त्यांनी जे काही केले ते चुकले आहे आणि त्याच्या चुकीमुळे एक वाईट आत्मा ने त्या जगातून ह्या जगात प्रवेश केला आहे. 

"हे बघ हेझल मला माहित आहे हे सर्व विचित्र आहे, पण हे सर्व खर नाही यातला मम्मी ला काही सांगू नको नाही तर तिला अजून त्रास होईल. हवा होती म्हणून दरवाजा बंद झाला आणि खिडकी हवा होती म्हणून आपटून तुटली आणि बोर्ड वर जे झाला ते खर नव्हत ते सर्व हवेनेच झाल आहे. तू काळजी नको करू सर्व ठीक आहे. हेझल तुला भूक लागली असेल ना? थांब तुला जेवायला देते." असा म्हणून तिने हेझल ला टीव्ही सुरु करून दिला आणि किचन मध्ये आली.

"आपण हेझल ची समजूत तर घातली पण ते खर नव्हते .पण अस कस झाल ? मी तर डॅडला बोलवलं होत मग हे कोण आलं." अचानक झालेला ओव्हन चा आवाज ने ती दचकली.

मम्मी येई पर्यंत रूम मध्ये जायचा नाही असा लिसा ने ठरवलं. साधारण ०४ चा सुमारास नोरा घरी आली आणि तिच्या सोबत टीना आंटी पण होती. चहा आणि नास्ता झाला.

"मम्मी, इकडे खुप जास्त हवा सुरु झाली होती आणि त्यामुळे आपली खिडकी जोरात आपटली आणि तिची काच फुटली." लिसा ने घाबरत आपल्या आई ला सांगितले.

"तुम्हाला कुठे लागले नाही ना?नोरा ने काळजीने विचारले. त्यावर दोघीनी पण नकारत मान हलवली.  

"ठीक आहे लिसा आपण उद्या मिस्त्री बोलून लावून घेऊ. आज काय केल दोघीनी दिवसभर?" नोरा ने विचारल तस हेझल ने लिसा कडे पहिल

"मम्मी आज आम्ही खुप मस्ती केली खाल टी व्ही वर माझ्या आवडीचा कार्टून पाहिलं आणि लिसा ने मला नवीन खेळ पण शिकवला" हेझल ने हसत सर्व सांगून टाकलं. तीच उत्तर ऐकून लिसा चा जीव भांड्यात पडला.

"अरे वाह्ह्ह खुपच मज्जा केली दोघीनी तर तुम्ही दोघी आज शहाण्यासारख्या वागल्या ना म्ह्णून मग आम्ही दोघीनी तुम्हा दोघीं साठी काही तरी आणले आहे. "टीना हसत म्हणाली.

 "काय आणला आहे?" हेझल ने उत्सुक्ते ने विचारलं.

"डोळे बंद करा" टीना असे म्हणताच दोघी पण डोळे बंद केले .

"हा आता ओपन करा” दोघींच्या हातात एक एक ड्रेस ठेवत नोरा म्हणते .

" वाह्ह्ह नवीन कपडे आमच्या साठी?" लिसा विचारते.

"हो तुमच्या साठी तुमच्या शाळेत जो कार्यक्रम आहे ना ? त्या साठी मी आणि टीना आंटी घेऊन आलो आहोत."नोरा म्हणाली.

"आवडले का ?" टीना ने विचारलं.

"हो खुप मस्त आहे थँक यु आंटी आणि मम्मी मला खुप आवडले आणि लिसा चा पण छान आहे. खुश होऊन हेझल म्हणाली.

    ड्रेस मुळे दोघी पण मगाशी जे झाले ते विसरल्या होत्या,रात्री त्या गॅरी टीना आणि मम्मी सोबत बाहेर जेवायला गेल्या. त्या मुळे दुपारी जे झाला त्याचा विसर आणि थकवा आल्या मुळे डोळ्यावरती झोप होती. मम्मी ला शुभ रात्री करून त्या स्वतःचा रूम मध्ये गेल्या. रूम मध्ये सर्व नॉर्मल होता. कपडे बदलून दोघी झोपी गेल्या.

 हेझलचा बेड खिडकी शेजारी असल्याने तिला साधारण १२;३० वाजता पाणी पिण्यासाठी जेव्हा उठली तेव्हा कोणी तरी खिडकीतून पाहत आहे असा भास होऊ लागला होता . ती दबक्या पावलांनी खिडकी जवळ गेली आणि तिने दिवा न लावता खिडकीचा पडदा बाजूला केला तर समोर एक विचित्र माणूस उभा होता . चंद्राच्या प्रकाशात त्याचे चमकणारे हिरवे डोळे, लांब काळे दात आणि सफेद चेहरा, मोठे कपाळ तो हेजल कडे पाहून हसत होता आणि तिला जवळ बोलवण्या साठी हाताने इशारा करतो. त्याचे ते हिडीस रूप पाहून हेझल जोरात किंचाळते. तिचा आवाज ऐकून लिसा उठून तिचा कडे जाते आणि नोरा धावत त्यांच्या बेडरूम कडे येते.

"काय झाला हेझल एवढा जोरात का ओरडलीस?" लिसा विचारते.

हेझल खिडकी कडे बोट दाखवते तेवढयात नोरा येते,

"काय झाला एवढा जोरात का ओरडलीस?" नोरा ने विचारलं . त्यावर लिसा ने बाजू सावरून घेत म्हणाली

"तिने वाईट स्वप्न पाहिलं आणि म्हणून ती किंचाळी." लिसा नोरा ला बेड वर घेऊन येते.

"काही झाला नाही वाईट स्वप्न होतं. झोप तू शांत लिसा आहे तुझा सोबत ठीक आहे. लिसा तिला बघ आणि काही लागला तर मला आवाज दे. का मी तुमचा सोबत रूम शेअर करू आजची रात्र?" नोरा हेझल चा डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"नाही नको मम्मी मी आहे ना मी सांभाळून घेईन सर्व.तू जा मी बघते हेझल कडे" असा म्हणून तिने नोरा ला रूम बाहेर काढला.

ठीक आहे काही लागला तर मला आवाज दे." नोरा जाताना म्हणाली.

   लिसाला समजले होते तिने काय पाहिले होते तिने जे पाहिले ते काही वेळा पूर्वी त्यांच्या चुकीने ह्या जगात आले होते. पूर्ण रात्र लिसा ला झोप लागली नाही आणि पूर्ण रात्र ती हाच विचार करत राहिली मम्मी ला समझल तर काय होईल आणि याचा काय परिणाम होईल तिचा डोकं चालत नव्हत.

 नोरा सकाळी त्याचा रूम मध्ये आली तर लिसा हेझल च्या पाय जवळ डोकं ठेऊन झोपली होती. नोरा ने लिसा ला आवाज दिला तसा लिसा खडबडून जागी झाली.

" बाळा मी आहे एवढी दचकली का? आणि तुझे डोळे लाल झाले आहे. रात्र भर झोपली नाही कि काय?" तिच्या प्रश्नावर लिसा ने फक्त मानेन होकार दिला.

" किती काळजी करतेस बहिणीची हे पाहून मला आज मला आनंद झाला कि तू तुझ्या बहिणीची एवढी काळजी करतेस. बाळा तू आता झोप मी आहे आता हेझल सोबत " नोरा चा वाक्य संपला नाही तो पर्यंत लिसा बेड वर झोपली होती. नोरा ने लिसाच्या केसावरुन हात फिरवला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.

 लिसा गाढ झोपते असताना तिला तिच्या समोर अंधार दिसत होता, त्या अंधारातून हेझल याचा आवाज येत होता. "लिसा वाचावं मला .... लिसा वाचावं हा मला घेऊन जात आहे लिसा वाचावं मला ...."

लिसा त्या अंधारात आवाजाच्या दिशेनं पुढे जात होती ती एक अंधारी गुफा होती ज्या मध्ये पाणी भरले होते आणि ते पाणी गुढग्याएवढे होते. त्या पाण्यातून रस्ता काढत हेझल च्या आवाजाच्या दिशेने लिसा पुढे सरकत होती. मध्ये कुठे तरी तिला भयानक हसण्याचा आवाज येत होता. लिसा मनातून घाबरली होती पण तिला हेझल ला वाचवायचं होत. तिला तिच्या भीतीवर मात करून तिला लिसा ला त्या डेव्हिल च्या तावडीतून सोडून आणायचे होते. एका ठिकाणी तिला प्रकाश दिसला जिकडे लिसा बसून रडत होती.

"हेझल .... हेझल .... बाळा तू घाबरू नको ... मी आले आहे तुला सोडवायला ... तू घाबरू नको" असे बोलून ती हेझलच्या दिशेने पळू लागली पाण्यामुळे तिचा पळण्याचा वेग कमी झाला होता पण जेव्हा ती हेझल जवळ पोहोचली तेव्हा हेझल डोके खाली गुढघ्यात घालून बसून रडत होती.

" हेझल .. मी आले आहे चल आपण जाऊ ..." असे बोलून लिसा ने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

हेझल चे शरीर बर्फासारखे थंड लागत होते.

" हेझल काय झाले आहे तुला? तू ठीक तर आहेस ना?" लिसा ने विचारले. तसे हेझल एक भयानक हास्य करू लागली.

हळू हळू तिने आपला चेहरा वर केला तर तिचे डोळे हिरवे झाले होते, चेहरा सफेद होता. काळे दात आणि लांब काली जीभ तिचा तसा अवतार पाहून लिसा घाबरून दोन पावले मागे सरकली.

" अरे काय झाले? हेझल हे रूप आवडले नाही का तुला?" जाड्या घोघाऱ्या वाजत हेझल म्हणाली आणि हसू लागली तिचा तो हसण्याचा आवाज तिकडे घुमू लागला.

" कोण आहेस तू आणि माझी हेझल कुठे आहे?" लिसा ने घाबरत विचारले.

" मी कोण?हम्म, मला पण माहित नाही मी कोण मला काही लोक भूत प्रेत पिशाच तर काही लोक डेव्हिल पण बोलावतात तुला कोणते नाव आवडेल माझे सांग ना? तुझी हेझल मेली... हो केव्हाच मेली ती.... मी तिचे छोटे छोटे तुकडे केले आणि मारून टाकले. आता फक्त मी उरलो आहे आणि मला ह्या जगात तू आणले आहे त्यामुळे मी तुला मारणार नाही पण तुला माझ्याजवळ ठेवणार माझी गुलाम बनवून." एवढे बोलून त्याने त्याचे मोठे हात लिसा भोवती आवळ्याला सुरुवात केली. लिसा स्वतःच्या स्वरक्षणासाठी त्याचा प्रतिकार करू पाहत होती पण ते तिला जमले नाही. एक जोराची किंकाळी लिसा ने फोडली आणि दचकून जागी झाली.

  जेव्हा जाग आली तेव्हा तिने आजूबाजूला पाहिले तर ती तिच्या रूम मध्ये होती पण तिकडे तिची आई हेझल शेजारी उभी होती आणि डॉक्टर हेझलच्या शेजारी बसून तिला तपासत होते.

"मम्मी काय झाला हेझल ला?चिंतेच्या स्वरात लिसा ने विचारले. 

"तिला ताप आला आहे, म्हणून डॉक्टर ला बोलावलं आहे." नोरा हेझल कडे पाहत म्हणाली .

 डॉक्टर ने हेझलला तपासले आणि जाताना नोरा ला गोळ्या दिल्या आणि त्या कश्या घायचा ते सांगितलं.लिसा ला आता भीती वाटायला लागली होती. राहिलेला संपूर्ण दिवस नोरा आणि लिसा हेझल जवळ होत्या. रात्री अचानक साधारण साडेबाराच्या सुमारास हेझल ला जाग आली आणि ती सावकाश आपल्या बेड वरून उठली कोणताही आवाज न करता खिडकी जवळ जायला लागली. नोरा आणि लिसा ला झोप लागली होती . हेझल ने खिडकीची उघडली आणि त्या आवाजाने लिसा ला जाग आली. सर्वात पहिले तिने हेझल च्या बेड कडे पाहिले पण तिकडे हेझल नव्हती म्हणून तिने दिवे लावले तर तिला समोर जे दिसले त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली होती.हेझल खिडकीतून बाहेर वाकून पाहताना पाहिले ती कोणाकडे तरी पाहून हसत होती आणि हाताने काही तरी इशारा करत होती जसे कि तिला कोणी तरी बोलवत आहे. हेझल आता खिडकी मधून बाहेर उडी मारणार तेवढ्यात लिसा ने हेझल ला जोरात आवाज दिला आणि पळत ती खिडकी जवळ गेली आणि हेजलला आतल्या बाजूला ओढल त्या गोन्धळात नोरा ला जाग आली. तिने हेझल ला आणून बेड वर झोपवलं तसा हेझल विचित्र पद्धतींनी हसायला लागली तिचा आवाज भेसूर झाला होता डोळे पांढरे झाले होते.

"मी हे शरीर नाही सोडणार सर्वाना घेऊन जाणार एकदम वेगळा पुरुषी आवाज होता हेझल चा नोरा आणि लिसा हे पाहून शॉक झाल्या होत्या. हेझल च भेसूर हसणं आणि दातावर दात आपटणे. लिसा ला समजला होतं हेझल ला काय झाला आहे पण जर सांगितलं तर आपला काही खरा नाही म्हणून तिने ती गोष्ट लपून ठेवली. हेजल च शरीर वाकड झाला होता ती एकदम विचित्र हावभाव करत होती. हसत होती पण तिचा हसन पण विचित्र होता. नोरा ला टेन्शन आलं होता. काय करावा काही समजत नव्हत. रात्रीचे दोन वाजले होते. हेझल घशातून विचित्र घुरघुर करत होती. शेवटी नोरा ने टीना ला फोन करून याला सांगितलं. टीना ने फोन ठेवताच ती आणि गॅरी दोघं पण पाच मिनिट मध्ये नोरा चा घरी पोचले होते. नोरा ने दरवाजा उघडला आणि रडत रडत ती टीना ला बिलगली.

"नोरा शांत हो काय झाला हेझल बरी आहे ना?" टीना ने विचारलेल्या ह्या प्रश्नावर रडत रडत नोरा ने मानेने नाही म्हणाली.

"ती कशी तरी करत आहे. शिव्या देते आहे कोणाला जिवन्त सोडणार नाही म्हणत आहे" नोरा रडत सांगत होती. "चला आपण बघू नक्की काय झाले आहे? गॅरी म्हणाला आणि ते तिघे पण नोराच्या मागे हेझलच्या रूमच्या दिशेने निघाले. ते तिघे दारात उभे होते तेव्हा त्यांनी एक विचित्र दृश्य पाहिले. हेझल ने लिसाचा गळा पकडला होता आणि तिचे शरीर हवेत अधांतरी झुलत होते. हेझल लिसा कडे पाहून हसत म्हणाली,

" पाहिले मला इकडे बोलवण्याने काय झाले हा? आता भोग तुझ्या कर्माची फळे" असे बोलून तिने लिसा ला जोरात जमिनीवर आपटले. नोरा ने हा प्रकार पाहिला आणि तिला चक्कर याची बाकी राहिली होती तिची छोटी मुलगी जी झुरळाला पण घाबरत होती ती असे विचित्र कसे वागू लागली असा विचार करून ती रडायला लागली. 

 " नोरा.... ह्यांना कशाला बोलावले इकडे आता तुमच्या सोबत ह्यांना पण मला मारावे लागणार" हेझल ने त्य्यांचा कडे न पाहता म्हणाली.  तिचा आवाज ऐकून गॅरी आणि टीना दोघं पण शॉक झाले होते . कारण तो आवाज हेझल चा नसून एका पुरुषचा आहे हे समजून जायला वेळ लागला नाही. तिचे शरीर हवेत अधांतरी होते. डोळे पूर्ण पांढरे झालेले होते. तोंडातून थुकी पडत होती.

"ये गॅरी ये आपला मित्र नाही म्हणून त्याचा बायको वर वाईट नजर आहे ना तुझी माहित आहे मला, तुझा ऑफिस मध्ये जुली नावाचा मुली सोबत चाळे करतोस तुला काय वाटलं कोणाला समजणार नाही. आणि तू टीना नवरा कामावर गेला कि तुझा मित्र येतो घरी बरोबर ना ?" एवढा बोलून हेझल हसायला लागते पण तिचा ते विक्षिप्त हास्य पाहून गॅरी ला राग येतो आणि तो रागाचा भरात म्हणतो

"तुला वेड लागला आहे का हेजल? काही पण काय बोलतेस." त्यावर आपले हसणे थांबवत हेझल विचारते,

"कोण हेझल? मी हेझल नाही..... मी डेव्हिल आहे डेव्हील .....तसे पण हे शरीर थोडा वेळाने माझाच होणार आहे. अजून थोडे दिवस वाट पहा म्हणजे मी हिच्या पूर्ण शरीरावर ताबा मिळवतो आणि मग इकडे माझे राज्य प्रस्थापित करतो.काय लिसा बरोबर बोलो ना मी हा ?" हेझल पुन्हा विचित्र पद्धतीने हसू लागते. ह्या सर्वात माझी मदत केली ती लिसा ने तिने ते केले नसते तर आज ह्या तुमच्या दुनिया मध्ये येऊ शकलो नसतो.” त्यांचा कडे पाहत हेझल हसत म्हणाली.

हेझल चे असे रूप पाहून तिघे पण घाबरले होते. तिघाना पण समझत नव्हते समोर जे चालले आहे ते नक्की काय आहे? हेझल स्वतःला डेव्हिल म्ह्णून घेते आहे, तिचे डोळे सफेद झाले आहेत तिचा आवाज घोघरा झाला होता.शिवाय ती हवेत तरंगत होती. 

" नोरा मला हे काही साधे वाटत नाही, हे काही तरी भयानक आहे.हे थांबवायला हवे पण कसे हे समजत नाही आहे." टीना हेझल कडे भीती ने पाहत म्हणाली.

" तुम्ही मला थांबवणार हि... हि... हि .. "हेझल विक्षिप्त पणे हसली आणि म्हणाली,

" मला थांबवणे देवाला जमले नाही तुम्ही तर तुच्छ मानव आहात." एवढे बोलून हेझल पुन्हा हसू लागली.

तिच्या बोलण्याने गॅरीला काही तरी सुचले आणि नोराला तिला बोलण्यात गुणवण्यास सांगून टीनाला बाजूला नेले.

"हे सर्व तू का करतोस काय मिळणार ह्या सर्वातून तुला... सोड माझ्या मुलीला का तिचा असा छळ चालवला आहेस"नोरा रडत रडत हेझल ला म्हणाली.

" मी छळ चालवला आहे..... नाही ... नाही ... अजून छळ सुरु कुठे केला आहे आणि ह्या छळाची सुरुवात आता होईल "असे बोलून तिने लिसच्या पोटात एक लाथ मारली.

लिसा ला तिची लाथ जोरात लागली आणि ती दरवाजाच्या दिशने फरफटत गेली. टिना ने तिला सावरले आणि उठवले. लिसा पोटात बसलेल्या लाथेने जोरात कळवळली. नोरा ने तिला कसे तरी उभे केले आणि तिला बिलगली.

" जोरात लागले का पोरी" पोट धरून उभ्या असलेल्या लिसा ला विचारले तिच्या डोळ्यातले अश्रू तिच्या वेदना सांगून जात होत्या.

" प्लीज.... प्लीज .... मी हात जोडते तुझा पुढे प्लीज माझ्या मुलीला सोड प्लीज ..." नोरा रडत रडत हेझल ला म्हणाली.

" हा... हा... हा .... तुम्हाला सोडू मुळीच नाही तुम्ही मला इकडे बोलावले आता ह्या जगावर मी माझे राज्य घेऊन येणार आणि तुझ्या ह्या मुलीला मी माझी दासी करणार...." हेझल हसत म्हणाली.

" हे बघ टीना हे दिसते तेवढे सरळ नाही आहे. हा जर खरंच डेव्हिल असेल तर आपण ह्याचा समोर बायबल वाचू म्हणजे ह्याला त्रास होईल आणि मग संधीचा फायदा घेऊन आपण लिसाला बाहेर घेऊन येऊ आणि मग बाहेरून तिच्या दरवजा लॉक करू म्हणजे आपल्याला विचार करण्यासाठी वेळ मिळेल." गॅरी थोडे आत डोकावत म्हणाला.

" पण गॅरी, तुला कसे माहित हे असे केले कि ती शांत होईल?" टीना ने विचारले.

" माझ्या एका मित्राने मला असे सांगितले होते कि कोणतीही वाईट शक्ती आली तर तिच्या समोर क्रॉस धरायचा आणि बायबल वाचायला सुरुवात करायची म्हणजे त्या वाईट शक्तीला त्रास होतो आणि कदाचित ती हेझल चे शरीर सोडून पण देईल. प्रयन्त करून पाहायला काय हरकत आहे." गॅरी म्हणाला आणि तो आणि टीना खाली आले. कपाटामध्ये ठेवलेलं बायबल आणि क्रॉस घेऊन दोघे पण वरती आले.

हेझल ने हसत त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना म्हणाली,

" तुम्हा दोघांना काय मी मूर्ख वाटतो ? तुम्ही कुठे गेला आणि काय घेऊन आला हे काय मला माहित नाही असे वाटले का तुम्हाला..... करून पहा हा पण प्रयन्त करून पहा काही होते का?" एवढे बोलून हेझल जोरजोरात हसू लागली.

टीना ने क्रॉस पकडला आणि गॅरी ने बायबल वाचायला सुरुवात केली. काही वेळ हेझल हसत त्यांचा कडे पाहत होती पण जस जसे ते पुढे वाचू लागले तसतसे हेझल ला त्रास होऊ लागला.

" बंद करा... तुम्ही जे बोलत आहेत ते बंद करा ...." हेझल चिडून म्हणाली.

तिला होणार त्रास पाहून गॅरी ने टीना ला खुणावले ...

हेझलला बायबल च्या वाचनाचा त्रास होऊ लागला होता. तिने त्याच्या दिशने रूम मधील लाकडी खुर्ची भिरकावून दिली. ती खुर्ची लागून गॅरी खाली पडला आणि त्याचा डोक्यला खोच पडली आणि हातातून बायबल पण निसटले. जसे त्याचे शब्द थांबले तसे हेझल ने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयन्त केला पण टीना ने तिच्या पुढे क्रॉस धरला तसे हेझल ओरडत मागे गेली. टीना ला आता समजले होते कि मगाशी जे काही हेझल बोली कि देवाला ती घाबरत नाही हे सर्व फक्त त्यांचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी होते. टीना ने दरवाजा बाहेरून बंद केला आणि त्याला क्रॉस लावून ठेवला. इकडे आत बंद झालेली हेझल ने दरवाजाला हात लावण्याचा प्रयन्त केला पण तिला एक जोरात झटका लागला आणि तिने हात मागे खेचला.

"नोरा आपल्याला चर्च मध्ये फादर ला भेटावं लागेल. हे दिसत तेवढे सोपे प्रकरण नाही आहे." गॅरी आपली जखम पाहत म्हणाला. वरच्या रूम मधून सामान फेकल्याचा आवाज स्पष्ट येत होता.

"आपल्या मुळे ह्या सर्वाला सुरुवात झाली आहे. त्या दिवशी ना मी बोर्ड घेतला असता ना आज हेझल ला काही झाले असते." मनात विचार करत असताना टीना ने तिला आवाज दिला

 "लिसा तुला माहित आहे का हे सर्व कसा झालं ?" टीना ने विचारल.

विचारांचा तंद्रीत असणारी लिसा ला अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे मुळे ती दचकली.

"आह्ह नाही मला काही माहित नाही. गोंधळून लिसा म्हणाली. रात्री झोपत ती खिडकी जवळ गेली आणि खाली उडी मारणार होती तेवढयात मला जाग आली आणि मी तिला आत ओढून घेतलं त्या नंतर रात्री ती छान झोपली पण आज रात्री काही तरी झाले आणि हेझल अशी वागू लागली." लिसा अडखत बोलत होती जणू काही तरी ती लपवत आहे . पण तिच्यावर कोणाचा संशय आला नाही कारण ती वेळच तशी होती कि कोणी कसला संशय घेऊ शकनार नाही.

"गॅरी मला वाटत आपण फादर जोसेफ ला बोलवायला हवे आता तेच करतील काय करायचा आहे ". टीना खिडकीत पाहत असलेल्या गॅरी ला म्हणाली.

"काही पण करा पण माझ्या हेझल ला या सर्वातून बाहेर काढा बिचारी किती सहन करत आहे, अरे सैतान तुला जरा पण दया येत नाही का ? ती लहान मुलगी आहे तिला सोड." चिडून नोरा ओरडून म्हणाली. 

धाडकन एक आवाज झाला आणि भयानक हास्य वातावरणात घुमल हेझल रूमचा दरवाजा तोडण्यात यशस्वी झाली होती. हेझल हवेत अधांतरी चालत खाली आली आणि सर्वांन कडे पाहून जोरात हसली.

" पाहिले तुमचा देव पण मला जास्त वेळ रोखू शकला नाही. बोलत ती खाली उतरली आणि स्वतःचा चेहरा नोरा च्या समोर घेऊन येत म्हणाली मला डेव्हिल म्हणतात आणि तो जोरजोरात हसू लागला.

" अरे निर्दयी तुला काही दया आहे कि नाही अरे लहान मुलगी आहे रे ती तिला तरी कमीत कमी त्रास देऊ नकोस " रडवेल्या स्वरात नोरा म्हणाली.

" दया ... हा... हा..... हा..... दया आली असती तर मी देव असतो सैतान नाही समजला आणि तू काळजी करू नको तुझा मुलीची यातून लवकरच सुटका करतो आणि नंतर तुला आणि तुझ्या ह्या दुसऱ्या मुली सोबत या दोघांना पण मुक्त करतो." स्वतःचे काळे दात आणि भयानक डोळे दाखवत डेव्हिल नोरा ला म्हणाला.

डेव्हिल ने लाल रंगाची उलटी नोरा च्या चेहरा वर केली आणि जोरात हसत म्हणाला

"हे रक्त आहे ... रक्त तुझ्या मुलीचे असेच रक्त ओकून तुझी मुलगी मारणार आणि पुन्हा डेव्हिल हसायला लागला .झालेला विचित्र आणि किळसवाणा प्रकार पाहून तिथे सर्व जण घाबरले होते.  

"गॅरी मला वाटत तू आता जाऊन फादर ला घेऊन यावं." नोरा म्हणाली .

" हा जा फादर ला घेऊन या ,जा लवकर बघा त्याला तरी जमत आहे का मला या शरीरातून बाहेर काढायला. जा पण गॅरी वाहन हळू चालावं नाही तर नोरा च्या नवरा मेला तसा तू पण गेला तर टीना च्या काय होईल." बोलून तो डेव्हिल पून्हा जोरात हसायला लागला . त्याचे ते वाक्य ऐकून झाल्या वर टीना गॅरी च्या शर्ट पकडला आणि त्याचा कडे भीती ने पहायला लागली. नोरा चा राग आता प्रचंड वाढला आणि तिने तिच्या गळयात असलेले क्रॉस काढून हेझल च्या डोक्यला लावले. क्रॉस लागताच हेझल चे शरीर थरथरू लागले आणि ती बेशुद्ध झाली.

"टीना मला काही होणार नाही, तू काळजी नको करू मी येईन पटकन." पण टीना शर्ट सोडायला तयार होत नव्हती.

"गॅरी एक काम कर मला सांग कोणता चर्च आहे मी फादर ला घेऊन येते." नोरा म्हणाली.

"तस नाही नोरा मला भीती वाटते आहे." टीना म्हणाली

" मी समजू शकते टीना आधीच मी तुम्हला खुप त्रास दिला आहे आणि आता माझा मूळे गॅरी ला काही झाला तर ? त्या पेक्षा मी जाऊन येते मला फक्त पत्ता आणि गाडीची चावी द्या आणि कृपा करून मी येई पर्यंत माझा दोन्ही मुलींची काळजी घ्या."

 नोरा ने रक्ताने माखलेला आपला चेहरा पुसला आणि गाडीची चावी घेऊन संत मरीया चर्च च्या दिशेने निघाली.

पहाटेचे साडेपाच झाले होते, रस्त्यावर वाहनांची तुरळक गर्दी दिसत होती. हे सर्व कसे झाले कदाचित मी जे काही करते त्यातून तर हे आले नाही ना? माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे तिला काही होता कामा नये. माझ्यामुळे मी माझ्या मुलीचा जीव धोक्यात घातला आहे. विचार करत करत ती चर्च समोर पोहोचते.

     नोरा ने आपली गाडी चर्च च्या बाहेर उभी केल आणि ती जवळ जवळ धावत चर्च मध्ये पोहोचली. समोरच फादर जोसेफ प्रार्थना करत होते.नोरा ला खरे तर घाई असते पण असे देवाची आराधना करताना कोणाला हटकू नये म्हून ती सुद्धा शेजारच्या बाकावर बसून प्रार्थना करू लागली. फादरह्यांची आराधना झाली आणि त्यांनी नोरा कडे पाहिले तिचा अवतार वेगळा वाटत होता. केश विस्कटलेले, डोळे सुजलेले, चेहऱ्यावर चिंता आणि कपड्यावर लाल असे काही तरी लागले होते. फादर तिच्या जवळ आले आणि तिला विचारले.

"काय झाले बाळा तू एवढा सकाळी आणि ते पण ह्या अवस्ते मध्ये?" एक शांत आणि मधुर आवाज नोराच्या कानावर पडला आणि तिने डोळे उघडले. 

नोराच्या समोर साधारण पन्नास वर्ष वय असलेला एक इसम उभा होता. काळे सफेद केस, डोळ्यांवर सोनेरी कांड्या चा चस्मा, अंगात सफेद कपडे, हातात एक चैन ज्यावर लॉर्ड येसू ह्यांचे लॉकेट होते. चेहरा प्रसन्न आणि हसत मुख होता.

"फादर मी मोठ्या संकट मध्ये आहे. तुम्ही कृपा करून माझ्या घरी चला नाही तर तिकडे अनर्थ होईल" नोरा रडत म्हणाली .

" हो शांत हो मुली आणि हे पाणी घे सविस्तर सांग काय झालं मग मी तुझा सोबत येतो."फादर पाण्याचा ग्लास देत म्हणाले. नोरा घडलेला सर्व प्रकार फादर च्या कानावर घातला.

" हमम ठीक आहे आपण जाऊ पण तू सांगतेस तसा ती शक्ती खुप शक्तीशाली आहे. बघू मला काय करता येत आहे का? शेवटी सर्वात मोठा तो परमेश्वर आहे. पाहतो मला काही करता येते का?" एवढे बोलून त्यांनी बायबल आणि होली क्रॉस आणि होलीवॉटर घेऊन नोरा सोबत बाहेर पडले.

आता चांगले उजाडले होते आणि रस्त्यावर गर्दी वाढू लागली होती. तरी सुद्धा जस जमेल तेवढ्या वेगाने नोरा ने गाडी पाऊण तासात तिच्या घराच्या बाहेर उंची केली. 

जेव्हा हेझल बेशुद्ध झाली तेव्हा गॅरी ने तिला तिच्या रूम मध्ये नेऊन झोपवले होते. जसे फादर गाडीमधून उतरले तसे हेझल च्या नाकपुड्या फुगल्या आणि तो जोर जोरात वास घेऊ लागली. हेझल अचानक असे काय करते आहे हे तिकडे उभे असलेल्या तिघांना पण समजे नाही. हेझलचे डोळे अजून बंद होते, अचानक ती बेडवर आपल्या दोन पायावर उठून बसली आणि पुन्हा तसाच वास घेऊ लागली.

एक विक्षिप्त हास्य करून हेझल म्हणाली, " तुम्ही माणसे किती भोळे असता, एवढे पाहिले तरी हि कोणत्या तरी फादर ला घेऊन आली आहे. पण हिला कुठे माहित आहे मी जाणार नाही ह्या पोरींचे शरीर सोडून, आता तुम्ही मज्जा बघा " एवढे बोलून हेझल पुन्हा हसू लागली. 

 नोरा आणि फादर यांनी घरात प्रवेश केला तसे हेझल बेड वरून हवेत तरंगू लागली . हवेच गोल गोल फिरायला लागली . वस्तू फेकायला लागली . खालून वर आणि वरून खाली स्वतःचा शरीर हेझल बेड वर आपटायला लागली. .तिने स्वतःचे डोके बेड च्या कोपऱ्यावर जोरात आपटले तसे एक रक्ताची चिळकांडी शेजारच्या भिंतीवर उडाली. हा सर्व प्रकार पाहून तिकडे उभे असलेले सर्व जण घाबरले होते नोरा तिचे रक्त आणि ती करून घेत असलेला त्रास पाहून रडू लागली होती. नोरा तिचे वाहणारे रक्त थांबवण्यासाठी पुढे झाली तसे फादर ने तिचा हात पकडून तिला मानेने नकार दिला.

" फादर मला जाऊ द्या माझ्या मुलीला त्रास होतो आहे तिचे रक्त वाहत आहे. हा देव अजून आमची किती परीक्षा घेणार आहे." नोरा रडत रडत म्हणाली.

" हे बघ नोरा तू एक आई आहेस आणि तुला तुझ्या मुलीला होणारा त्रास पाहवत नाही हे मी समजू शकतो पण आता जर तू तिकडे गेलीस तर हीच तुझी मुलगी तुला मारून टाकू शकते. ती हे सर्व ती मुद्दाम करत आहे तिला मी आलो ते आवडले नाही आणि म्ह्णून ती हे सर्व करत आहे" फादर हेझल कडे पाहत म्हणाले.

कपाळातून वाहणारे रक्त हेझल च्या पूर्ण चेहर्यावर पसरले होते आणि त्याने तिचा चेहरा अजून भयानक दिसत होता. हेझल चे असे वागणे पाहून गॅरी टीना आणि लिसा तिघा पण एका कोपऱ्यात घाबरून उभे होते.

 फादर रूम मध्ये प्रवेश करतात सर्व रूम अस्तावस्त केलेला होता .

"तू ....... तू कशाला आला आहेस इकडे , तुला माहित नसेल पण मी या मुलीचा जीव घेऊन बाकीच्याना पण मारून टाकणार आहे, तुला पण मारायचा आहे का? जा चर्च मध्ये जा आणि आपल्या देवाची पूजा कर जा नाही तर तुझा पण मुडदा पडेन ह्यांचा सोबत हेझल फादरला पाहून त्याच भयानक आवाजात म्हणाली .

हेझलचा चेहरा अजूनच भेसूर दिसत होता.चेहऱ्यावर रक्त पसरल होत केश पुढे आले होते आवाज अजून हि घोगरा होता.

"हेझल बाळा काय झाले आहे तुला तू अशी का वागतेस?" नोरा रडत रडत म्हणते आणि पुन्हा हेझल कडे जाणायचा प्रयन्त करते पण फादर तिला अडवतात आणि जिकडे गॅरी आणि लिसा उभे असतात तिकडे जाण्यास सांगतात .फादर काही न बोलता आपल्या एका हातात पवित्र क्रॉस धरतात आणि एका हातात बायबल घेऊन प्स्लम्स९१ उघडतात आणि वाचायला सुरुवात करतात.

"जो परमात्म्याच्या आश्रयामध्ये राहतो .सर्वशक्तिमान देवाच्या सावलीत विश्रांती घेईल.मी परमेश्वराबद्दल म्हणेन, 'देव माझा आश्रयस्थान आहे.माझ्या देवा, ज्यांचा माझा विश्वास आहे. तो तुम्हाला वाचवेल पक्षीच्या जाळ्यातून आणि प्राणघातक महामारी पासून." फादर बोलत असताना हेझल हसत असते. हळू हळू फादरचे बोलणे तिला असहाय होऊ लागते ती जोर जोरात ओरडू लागते .

"बंद कर नाही तर आताच आता ह्या मुलीचा जीव घेईन बंद कर...."

 ती किंचाळत फादर च्या अंगावर धावून जाते पण तिच्या डोक्यावर होली क्रॉस लावतात,आणि हेझल जोरात त्या वेगळ्या आवाजात ओरडते आणि बेशुद्ध पडते. तिचा चेहरा रक्ताने माखलेला होता. फादर तिचा चेहरा साफ करायला सांगून तिला बांधून ठेवायला सांगतात.नोरा तिचा चेहरा साफ करते आणि जिकडे जक्खम आहे तिकडे मलम लावते. हे सर्व करताना तिचा डोळ्यात पाणी असतं. गॅरी हेझल ला बेड ला बांधून ठेवतो.

"फादर आपण तिला बांधून का ठेवला आहे. ती मुक्त झाली आहे ना ?" गॅरी ने विचारला तेवढयात गरीच्या मागून मागून तोच भयानक आवाज आला

"मी ह्या मुलीच्या शऱूरातून अजून मी मुक्त नाही झाले आहे. तुम्हाला काय वाटलं हा पांढरे कपडे घातलेला काही तरी करून देवाची आराधना करेल आणि मला या शरीरातून मुक्त करेल गैरसमज आहे तुमचा मी हिला आणि तुम्हा सर्वाना घेऊनच जाणार समजल" हेझल पुन्हा त्या आवाजात हसू लागली.तिचा पुन्हा तो आवाज ऐकून गॅरी अजून घाबरला.

फादर सर्व शांतपणे उभे राहून पाहत होते. काही वेळ विचार करून त्यांनी सर्वाना बाहेर याला सांगितलं.

"हे पहा ... हे जे आहे ते या जगातला नाही, ही आत्मा एका सैतानाची आहे, नरकातून ती पृथ्वी वर आली आहे, ती आली नाही तर बोलवलं आहे.कोणी आणि कस ते माहित नाही पण प्लँचेट करतात त्यात ही शकता जास्त असू शकते.आपल्या आणि त्यांच्या दुनिया मध्ये एक दार असते ते दार प्लँचेट च्या द्वारे उघडले जाते आणि त्या दारातून कोणती आत्मा आपल्या दुनिया मध्ये प्रवेश करते हे कोणाला समजत नाही. हे प्लँचेट करणे लोकांनी बंद केले पाहिजे.जे मृत झाले त्यांना जर आपल्याला संपर्क करायचा असतो तर ते स्वतःहून आपल्याला तसे संकेत देत असतात." फादर ने सर्वाना सांगितले

 नोरा ने प्लँचेट च्या नाव एकल आणि तिला एकदम धक्का बसला कारण ती तेच करून लोकांना फसवत होती आणि आता ती स्वतः फसली होती. नोरा रडायला लागली होती.

" ह्या सर्वाला मी जबादार आहे.मी प्लँचेट करून लोकांना फसवून त्याचा कडून पैसे घेत होते. माझी कर्म माझ्या मुलीला भोगावी लागत आहे.मी पापी आहे" म्हणत ती स्वतःचा चेहरा वर मारून घेत असताना तिला टीना आणि लिसा थांबवतात. 

"मम्मी तू नाही ह्याला मी जबादार आहे." लिसा रडत म्हणाली.

" त्या दिवशी तू प्लँचेट करताना मी पहिले आणि तू बोली तुझे डॅड आपल्या सोबत आहे आणि आम्हाला वाटले कि तू त्यांना भेटयला म्हणून मी प्लँचेटचा वापर केला असशील माझा सोबत हेझल पण होती या सर्वांची माहिती साठी मी गॅरी काका ना पण भेटले होते त्यांनी मला माहिती दिली पण एका प्रॉमिस वर कि मी असा काही करणार नाही,पण मग डॅड साठी मी आणि हेझल ने तू बाहेर गेली होती टीना आंटी सोबत तेव्हा एक प्रयोग केला आणि त्यातून एक आत्मा मुक्त झाला आम्हाला वाटलं ते डॅड आहेत पण ते नव्हते तो डेव्हील होता आम्ही घाबरलो आणि तो बोर्ड पुन्हा जागेवर ठेवला आणि त्या नंतर हे सर्व सुरु झाला.मला माफ कर मॉम मला खरच माहित नव्हत एवढं होईल. माफ कर मला" लिसा रडत रडत हात जोडून नोरा कडे माफी मागत होती. नोरा ने लिसा ला जवळ घेतला आणि म्हणाली

"चुकी तुझी नाही बेटा माझी आहे मी असा खोट करून पैसे कमवयला नको होते , त्या मूळे सर्वाना त्रास झाला." नोरा रडत म्हणाली .

"नोरा मला पण माफ कर तुला न विचारता मी लिसा ला सांगितलं". गॅरी नोरा कडे पाहत म्हणाला.

" ठीक आहे तुला तरी कुठे माहित तिला माहिती कशा साठी हवी आहे. पण यातून सुटका कशी होणार." नोरा फादर कडे पाहत म्हणाली.

"आपल्यला माहित नव्हता कि तो कोणत्या मार्गाने आला आहे कारण तोच ज्या मार्गाने आला आहे तिकडूनच त्याला शक्ती मिळते या दुनिया मध्ये राहायला जर आपण तोच मार्ग नष्ट केला तर तोच कमजोर होईल आणि त्याला इकडून परत पाठवणं सोपा होईल." फादर विचार करत म्हणाले

"पण नक्की काय करायचं फादर?" टीना ने विचारला.

"मी पुन्हा वर जातो आणि प्स्लम्स९१ पठण करतो. तो पर्यंत तुम्ही तोच बोर्ड शोध आणि त्याच्यावर हे पवित्र जल शिंपडा जसा त्याचावर पवित्र जल शिंपडलं जाईल तसा त्या डेव्हिल ची तडफड सुरु होईल. मग मी त्याचा डोक्यला होली क्रॉस लावेन आणि त्याला पुन्हा नरकात जाण्याचा आदेश देईन. तुम्ही तोपर्यंत तोच बोर्ड अग्नी मध्ये टाका म्हणजे तोच पूर्ण जाळून जाईल आणि त्याला मिळणाऱ्या शक्तीचा रस्ता बंद होईल. पण एक लक्षात ठेवा जर तो बोर्ड पूर्ण नाही जाळला तर मात्र ह्या डेव्हील ला कोणी थांबू शकणार नाही कारण अजून त्याने त्याचा पूर्ण शक्तीचा वापर केला नाही आहे. जेव्हा त्याला त्याचा पूर्ण शक्ती मिळतील तेव्हा मात्र तो ह्या जगावर राज्य करेल आणि त्या त्याला लवकरच मिळणार आहेत आणि आपली आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला जेवढ्या लवकर हे काम करता येईल तेवढा लवकर करणे गरजेचे आहे." फादर सर्वांकडे पाहत म्हणाले.

    ठरल्या प्रमाणे सर्व प्रक्रिया सुरु होते. फादर यांनी पुन्हा रूम मध्ये प्रवेश केला आणि त्यांना पाहून हेझल पुन्हा विक्षिप्त पणे हसली. 

अरे मला वाटले तू घाबरून पळून गेलास पण तू तर पुन्हा आलास. मरायची हौस नसेल ना तुला तर निघून जा इकडून आणि करत राहा तुझ्या देवाची सेवा फक्त थोडा वेळ एकदा का आजची रात्र उगवली कि माझी सर्व शक्ती मला मिळून जाईल आणि मग .... मग मी ह्या जगावर राज्य करणार, इकडे अंधाराचे साम्राज पसरणार आणि तेव्हा तू माझा सेवक म्हणून काम पहा लोकांना माझी पूजा करायला सांग." एवढे बोलून हेझल हसू लागली होती. फादर ने तिच्या कडे एकदा पाहिले आणि हसून म्हणाले.

" तुझे राज्य प्रस्थापित करण्याचा तू अनेक वेळा प्रयन्त केला पण दर वेळी तू तोंडावर पडला आणि ह्या वेळी सुद्धा आम्ही जिकू देणार नाही कारण आम्हाला समजले आहे तू कुठून आला आणि तुला रोखायचे कसे." बोलून फादर हसू लागले.

 फादर ने पुन्हा बायबल उघडले आणि ते वाचू लागले हेझल च्या शरीर मधील डेव्हिल ची तडफड होण्यास सुरुवात झाली फादर शांत पणे वाचत होते.

"ये फादर हे काय करत आहेस? बंद करा नाही तर परिणाम वाईट होतील. बंद कर" डेव्हील ओरडत होता किंचाळत होता धमकी देत होता पण त्याचा फादर काहीच परिणाम होत नव्हता.

" समजत नाही का बंद कर सांगितलं ना ...." तडफड करत असताना हेझल ची रशी सुटते आणि ती फादर च्या अंगावर धावून जाते. फादर तिचा कपाळावर होली क्रॉस लावतात झटक्या ने ती मागे पडते . पुन्हा उठून ती लाकडी पलंगाचा पाय मोडते आणि फादरच्या दिशने भिरकावते. तो लाकडी पाय फादर च्या पोटात लागतो आणि ते बायबल सोबत खाली पडतात. हेझल ला समजले होते कि ते तोच बोर्ड नष्ट करणार म्हणून ती पळत खालच्या दिशने येऊ लागते.

इकडे नोरा आणि लिसा ने तो बोर्ड शोधून तो जळण्याची तयारी केलेली होती. त्यांनी तोच बोर्ड घरच्या मागच्या बाजूला घेऊन गेले होते आणि त्यावर रॉकेल चा पूर्ण कॅन उलटून त्याला आग लावणार तेवढयात...

एक भयाण किंकाळी तिकडे असलेल्या गॅरी,टीना, नोरा आणि लिसा च्या कानावर पडते तसे ते सर्व त्या दिशेनं पाहू लागतात. जमिनीवर हेझल बेशुद्ध पडली होती. नोरा तिला पाहून भावुक होते आणि तिला उचलण्यासाठी नोरा पळत तिच्या दिशने जाते. नोरा आपल्या हातातील बोर्ड हेझल च्या शेजारी ठेवते आणि तिचे डोके आपल्या माडीवर घेऊन रडत असते.

" हेझल .... हेझल बाळा तुला काही होणार नाही. ममा तुला काही होऊ देणार नाही. बेटा डोळे उघड एकदा बघ मम्मी इकडेच आहे. डोळे उघड ना बेटा... "नोरा रडत रडत हेझल ला पाहून बोलत होती.

तेवढयात हेझल डोळे उघडते आणि नोरा तिचे डोळे पाहून मागे सरकणार एवढयात ती नोरा चा गळा पकडते. हेझल चे डोळे हिरवे होते तिचा चेहरा पुन्हा बदलाला होता. ह्याचा अर्थ हे सर्व डेव्हील चे नाटक होते तो बोर्ड मिळवण्यासाठी केलेले. नोरा तो बोर्ड उचलून बाहेर आगी मध्ये टाकण्यासाठी देणार तेवढयात एक जोराचा फटका नोराच्या हातावर हेझल मारते ज्याने तो बोर्ड तिकडेच पडते.

" तुम्हला काय वाटले माझ्या पासून एवढ्या सहज मी तुमची सुटका करिन .... तुम्हा सर्वांचा मृत्यू माझ्या हातूनच होणार आहे." बोलून हेझल जोर जोरात हसू लागते.

हसता हसता अचानक हेझल जोर जोरात ओरडू लागते. जणू तिच्या अंगावर कोणी तरी जळलेले निखारे टाकत आहेत. ती ओरडत वरती पाहते तर वरून फादर खाली आले होते आणि तिच्या मागे उभे राहून तिच्या अंगावर पवित्र जल शिंपडत होते आणि त्या पवित्र पाण्याने हेझल च्या संपूर्ण शरीराची आग होत होती.

जशी नोरा वरील हेझल ची पकड सैल झाली तसे क्षणाचा विलंब न करता नोरा ने तो बोर्ड लिसच्या दिशने भिरकावला.

 "तुला मी बोलवलं ना ? आता मीच तुझा नाश करून माझा बहिणाला मुक्त करते "बोलून लिसा त्या बोर्ड ला आग लावते हेझल तो बोर्ड वाचवायचा शेवटचा प्रयन्त करते पण पवित्र पाण्याने तिला जास्त दूर जाता आले नाही.

 बोर्डने आग पकडली आणि तो जळू लागला त्या सोबतच हेझल जोर जोरात ओरडू लागली आणि तिच्या शरीरातून काळा धूर बाहेर पडू लागला होता. शेवटची किंकाळी देऊन हेझल बेशुद्ध पडते. फादर तिच्या वर पवित्र जल टाकतात पण त्याने हेझल ला काही होत नाही. नंतर ते तिला उचलून सोफ्यावर झोपवतात आणि फादर पूर्ण घरावर पवित्र जल शिंपडून पवित्र करतात

 पुन्हा असे काही धाडस करू नका असे सांगून चर्च च्या दिशने प्रस्थान करतात पण जाण्याआधी सर्वाना आशीर्वाद देतात.

ह्या घटने नंतर पॉल फॅमिली अजून त्याच घरात राहतात. गॅरी चा ओळखीवर नोरा ला जॉब लागला आणि लिसा शिक्षण पूर्ण करून नोकरी करत आहे.हेझल च्या डोक्याला अजूनही ती खोच आहे आणि ती शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला आहे.

   तर मित्रानो तुम्ही पण प्लँचेट केला तर जपून कारण सर्व डेव्हिल मरत नाहीत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama