Akshay Varak

Action Others

3.5  

Akshay Varak

Action Others

कर्म कहाणी (भाग २)

कर्म कहाणी (भाग २)

2 mins
69


    "अज्ञान तिमिराध्स ज्ञानांजय शलाकया,।

    चंक्षरुन्मिलन येन तस्मै श्री गुरवे नम:"।।


 श्री सदगुरु शंकर महाराज यांचे सानिध्य मज लाभले, अन यातूनच अज्ञान अशा माज्या बुद्धीला ज्ञान लाभले. 

   

         आपण मागच्या भागात संचित अन प्रारब्ध शब्दांचा उल्लेख केला,आता जाणून घेऊयात संचित अन प्रारब्ध काय आहे. 

१) संचित- संचित कर्म म्हणजेच पाप पुंण्याचा साठा.ज्यात फक्त बेरीज होते,आपल्या दैनंदिनी आयुष्यात जे काही कर्म करतो ते यात भरत जातात,आणि याचेच नंतर प्रारब्ध होतात. 

२) प्रारब्ध - प्रारब्ध कर्म म्हणजेच की जे संचित कर्मामधून जे बाकी आहे.आणि प्रारब्ध हे कोणालाही चुकत नाही.देहरूपी संत महात्मे जाहले यांना सुद्धा प्रारब्ध हे चुकले नाही.प्रारब्ध हे भोगावेच लागतात ,पण प्रारब्ध दूर सारायचे असतील तर, सद्गुरूपी नावाडी आपल्याला लाभला तर प्रारब्धाची झळ मात्र कमी बसेल. पण सद्गुरू सुद्धा त्या ताकदीचा असावा.

      संचित आणि प्रारब्ध तर आपण पाहिले.पण आता या पुढे काय..? असा प्रश्न आपल्याला पडतो ,आपल्याला ह्या पासून मुक्तता कशी म्हणजेच मोक्ष. 

     अघोर अशा या कलयुगात मानव फक्त स्व:विचार,अन स्व:भ्रांती कशी नीटनेटकी ठेवावी याचा विचार करतो,दान देत नाही अन ज्ञान घेत नाही अशी विपरीत बुद्धी त्याची होऊन जाते,म्हणूनच संत अन महात्मे भूतलावर येऊन मानव जातिचा उद्धार करतात.कर्माची फळे भोगावी तर लागणारच पण जो भक्ती मार्गावर जाईल अन जो सद्गुरूंचे स्मरण करेन,जो दान करेन त्यास या कर्मापासून सुटका निश्चित आहे हेच संत अन देव अवतार आवर्जून सांगतात.

       प्रारब्ध हे संत तुकारामांना ही चुकलं नाही,पण त्यांनी प्रारब्धा पासून पळ काढला नाही,म्हणूनच ते परमात्म्यास विलीन जाहले. कारण प्रारब्ध अन संचित कर्म फेडूनच मोक्षास आपला जीवात्मा जातो,आणि जर संचित कर्म संपली तरीही त्या जिवात्म्यास पुन्हा जीवन पुन्हा जन्म आहेच कारण त्यास प्रारब्ध हे फेडावे लागणारच ते चुकणार नाही.

     कलयुगी मानव हा पाप जास्त करतो तर पुण्य कमी याचेच रूपांतर संचित कर्मात होतात,मग आपणच जाणावे की आपण काय करत आहोत.आपल्याला संचित वाढवायचे आहेत की कमी करायचे आहेत आणि हेही करण्यास आपल्याला आणखी दहा पंधरा जन्म घ्यावे लागतील.एवढी आपली कर्म दुषितच.

      जेव्हा कोणी भक्तीरूपात अचानक प्रवेश करतो ज्यास अचानक सदगुरु लाभतात तेव्हा त्या मानवाचे त्या जिवातम्यांचे संचित कर्म ही कमी जाहलेली असतात,ही केवळ प्रमेश्वराचीच ईच्छा.कारण हेच आपल्या जिवात्म्यास लाभलेले परमेश्वराचे वरदानच होय.पण त्या जिवात्म्यास देह सोडल्यानंतर त्यास पुन्हा त्याची प्रारब्ध भोगण्यास जन्म हा घ्यावाच लागतो.   

           !! जय शंकर !!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action