STORYMIRROR

अक्षय वरक

Abstract Tragedy Thriller

4  

अक्षय वरक

Abstract Tragedy Thriller

सामर्थ्य अन साम्राज्य(०१)

सामर्थ्य अन साम्राज्य(०१)

5 mins
239

ही कथामालिका पूर्णपणे काल्पनिक असून, ह्या कथेत वर्णन केलेले प्रसंग,स्थळ,व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहेत.मनोरंजन करणे एवढेच ह्या कथामालिकेचे उद्दिष्ट आहे. ह्या कथामालिकेचा वास्तविक जीवनाशी कुठलाच संबंध नाही.      

     दारिद्र्यातून बलाढ्य सामर्थ्य अन साम्राज्य उभं करनाऱ्या हंशाची कथा प्रस्तुत करीत आहे. ज्याच्या जीवनात उत्तर कमी अन प्रश्न जास्त आहेत. त्याच्या नियतीने असंख्य वार केले तरीही तो सर्व वार झेलून पुन्हा उभा राहिला. दारिद्री अन लाचारीतुन एक नवं साम्राज्य ही उभं राहू शकत . अशीच आपल्या समोर ही प्रेरणादायी कथा सादर करीत आहे. वाचकांनी वाचून त्यांचे मत मांडावे हीच ईच्छा.     

             

                                        

            मी आणि बालपण     

        

       मी कोण आहे? मी का आहे?. याचा शोध मला घ्यायचा होता. माजा जन्म का झाला? आणि मी का जीवन जगत आहे? सारेच प्रश्नचिन्ह माज्या मनात घर करून बसले होते. यात माजे कुठे काय चुकले मी तर फक्त माज्या मनात काय चालले आहे, याचाच तर विचार करत होतो. पदरी आलेल्या गरिबीतून कशे बसे दिवस आम्ही काढत होतो. पण आमच जगणं हे आमच्या नियतीलाच कदाचित मान्य नसेल.        

         

     माजा जन्म हा आदिवासी पाड्यातील सामान्य घरातच झाला. जन्मतःच पदरी गरिबी पडली आणि बारा वर्षांचा झालो तेव्हा आईवडिलांना स्वर्गवास झाला.        

        

       नियतीने आपला डाव खेळला. आम्ही चार भाऊ . मोठा चैत्यादादा त्याच्या मागचा भद्रक आणि त्याच्यानंतरचा गर्ग. आणि सर्वात लहान मी . आमचं जगणं आता जरा कठीणच झालं होतं. आईवडीलांच्या मृत्यूनंतर आम्हास आपलं अस कोणी नातेवाईक नव्हतं. आमच्या मोठ्या भावाने म्हणजे चैत्यादादाने आमच्या पालनपोषणाची जिम्मेदारी घेतली. आदिवासी जमातीतील असल्याने शिकार करण्याची कला ही तर जन्मतःच आमच्या अंगी होती. पोट भरण्यास रानात आम्हाला जी काही शिकार भेटलं. तेव्हा आमचं पोट भरायचं. हरीण असो किंवा ससा आम्ही त्याची शिकार करायचो आणि खायचो. जर देवाने जन्म दिलाय तर त्याने माणसाला जगण्यासाठी काहीतरी सोय केलीच असेल या निर्धाराने जगायचो. अन याच कारणाने आम्हाला कोणी जवळ करत नव्हतं.        

        

"अरे! हा बघ आदिवासी पाड्यातला आला,ह्याच्या जवळ कोणी जाऊ नका नाहीतर आपला उपद्रव होईल", अशा तुच्छेतेणे आम्हा चारही भावांना हिणवल जात होतं.        

        

        आमचा मोठा भाऊ आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज पहाट होण्याआधीच जंगलात शिकार करण्यास जायचा आणि दुपारपर्यंत परतायचा. आम्ही तीनही भाऊ त्याची आतुरतेने वाट पाहत उकिरड्यात बसायचो. त्याने काही शिकार आणली की आम्ही ती चवीने शिजवून खायचो.        

   असेच रोज आमचे दिवस जाऊ लागले. घराच्या बाहेर येऊन जरा खेळायचं म्हंटल की , लोक आमचा तिरस्कार करायचे.        

  " हा बग आदिवासी पाड्यातला आला".        

   "ह्याच्यापासून लांब रहा नाहीतर अनर्थ होईल".        

    "मेला डुक्कर कुठचा".        

  आमचंच गाव भेटलं वाटत ह्यांना. "मेले रानटी कुठले".      

    ह्या आशा बोलण्याने त्यांचे बोल आम्हा भावांच्या  काळजात खोलवर रुतायचे .        

      आमचा चैत्या दादा आम्हाला म्हणायचा की, ह्यांच्या बोलण्याचा राग कधी मनावर नका घेऊ. देवाने तोंड दिलंय तर तोंडाला येईल ते आपल्याला बोलतात. म्हणून एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाणे सोडून द्यायचं. म्हणजे ते काय म्हणाले हे आपल्या लक्षात राहणार नाही        

        

        चैत्यादादा कधी हरीण तर कधी ससा आणायचा. मी आणि गर्ग लाकडं गोळा करून आणायचो. चैत्यादादा आणि भद्रकदादा शिकार करून आणलेल्या जनावरांची कातडी सोलून त्याला स्वछ धुवत. त्याचे बारीक तुकडे करून शिजवत. जास्तीची हाव नाही आणि कसला माज नाही असं आमचं आयुष्य होत. आईवडिल गेल्यानंतर आईची आणि बापाची माया ही चैत्यादादानेच आम्हा भावंडांस दिली.        

         

      श्रीमंत लोकांच्या मुलांकडे सुंदर सुंदर कपडे असायची. आणि आमची फाटकी लंगोट आणि ढिगळ पडलेल मळलेल कापड . तेच रोज धुवायच आणि घालायचं. मनात खूप प्रश्न यायचीत देवाने आम्हाला अस का केलं. सर्वाना समान हक्काने जगण्यास न्याय का दिला नाही? असो! तरीही आहे त्या परिस्थितीत जगणे आम्ही शिकलो.       

        जर जास्त ईच्छा असेल तर त्रास सुद्धा तेवढाच होईल . आणि जर ईच्छा आकांशा कमी ठेवल्या तर त्रास कमी होईल चैत्यादादा आम्हाला सांगायचा.       

              

        खेळ खेळायचं म्हंटल की , आम्ही आदिवासी पाड्यातील मूल कधी झाडावर चड तर कधी दाट जाळीमध्ये लपंडाव खेळत. श्रीमंतांच्या मुलांनी जर आम्हाला पाहिले तर ती पोर आम्हाला दगड किंवा गायी म्हशींचे शेण फेकून मारत. माज्या मनात खूप राग यायचा. वाटायचं की जाऊन दोन मुस्काडीत मारू. पण तिथेही आमचा नाईलाज होता.       

   एकेदिवशी पहाटे आमचा मोठा भाऊ नियमितप्रमाणे शिकारीस जाण्यासाठी पहाटे लवकर उठला. अन शिकारीसाठी जाण्यास त्याने शिकारीसाठी लागणारे शस्त्र घेण्यासाठी कंदील लावला . कुटी बारकी असल्याने संपूर्ण कुटीत उजेड झाला. कंदिलाची किरणे भसकन डोळ्यावर पडली आणि भद्रकदादाला जाग आली.  तो उठला आणि चैत्यादादाला शिकारिस जाण्याचा आग्रह करू लागला.       

"चैत्यादादा आज मी पण येऊ का सोबत शिकारीला".        

 'भद्रक डोळे चोळत म्हणाला'.        

 " नाही नको . उगाच पायात काटा वगैरे टुपला तर वैद्याकडे जाण्यास ही पैसे नाहीत आपल्याकडे".        

  "नाही होणार काही. मी काळजी घेईन" 'भद्रक म्हणाला'.        

   भद्रक हट्ट करू लागला.ह्या दोघांच्या आवाजात गर्ग आणि मला जाग आली.        

 " काय झालं दादा ? ". 'मी आणि गर्गने चैत्यादादाला प्रश्न केला'.        

 "नाही काही नाही तुम्ही झोपा". भद्रक शिकारीसाठी येण्यास हट्ट करयोय. म्हणून त्याला मी सोबत घेऊन जातोय. तुम्ही झोपा आणि उठल्यानंतर लाकडं गोळा करून ठेवा. 'चैत्यादादा आम्हास उत्तरला'.        

 भद्रकदादाला खूप आनंद झाला होता. त्यामुळे तो ताडकन उठला आणि कुटीबाहेर उभारला.        

 "अरे दादा चल जायचय ना". लवकरच उजेड होईल.        

 'भद्रकदादा आनंदून चैत्यादादाला म्हणाला'.        

 दोघेही जंगलात जाण्यासाठी निघाले. मी आणि गर्ग दार लावून पुन्हा झोपलो . झोपलोच होतो त्याच्या काही तासात मिश्रवा आला . मिश्रवा हा आमच्या आदिवासी पाड्यातला.        

  " हंशा ये हंशाssss गर्गाsss बाहेर या"        

 जोरजोरात तो ओरडू लागला.        

आम्ही दोघे भाऊ ताडकन उठलो आणि कुटी बाहेर धावत आलो.        

 "कायर काय झालं. अस ओरडायला".'गर्ग ने प्रश्न केला'.        

 " अरं झोपताय काय. तिथं तुमच्या दोनी भावांच्या छातीत आरपार बाण गेलाय". "मिश्रवा धापा टाकत म्हंटला".        

    हे ऐकताच आमच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. मनात असंख्य प्रश्न एकाच क्षणात निर्माण झाले. होत्याच नव्हतं झालं. वयान त्यात खूपच लहान होतो. आता काय करायचं काय नाही काहीच सुचेना. गर्गला अचानक तुंद्री आली आणि तो खाली पडला. मिश्रवाने आणि मी त्याला कुटीत नेलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडल. माझी तर दातखिळीच बसली. आधी आई- वडील आणि आता दोन्ही भाऊ गेले.        

     हे बघा आधी स्वताला सावरा. मग जाऊयात जंगलात दोघांच्या प्रेता शेजारी कोणीच नाहीये. जर लवकर गेलो नाही तर जंगली प्राणी त्यांच्या देहाची विल्हेवाट लावतील. "मिश्रवा काळजीपूर्व बोलू लागला".        

    चल मिश्रवा कु.. कु... कुठे आहेत ते दाखव. त्यां...ना घरी घेऊन येऊयात. चल बिगिबिगी. "गर्गदादा मिश्रवाला अडखळत म्हंटला".        

    "होय चला. राज्याच्या प्रधानाच्या जमिनीच्या मागच्या जंगलात सवतीचे ओढे आहे. त्याच्या मागच्या बाजूला दोघेही मृत्युमुखी पडले आहेत.        

                                  


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract