Akshay Varak

Romance Inspirational Thriller

4.5  

Akshay Varak

Romance Inspirational Thriller

प्रेमरंग (भाग ३)

प्रेमरंग (भाग ३)

9 mins
264


  'एकतर्फ़े प्रेमाचा जणू सुमितच्या मनात डोंब निर्माण झाला होता.' पण म्हणतात ना, प्रेमात अनेक रंग असतात.त्या रंगात रंगता आलं पाहिजे मग, ते प्रेम मिळो अथवा न मिळो. प्रेम हे केले पाहिजे. सुमितच्या आयुष्यात हाच एकतर्फे प्रेमाचा रंग आला होता. तो त्या रंगात रंगून प्रेमाच्या पावसात अक्षरशः ओला चिंब झाला होता. प्रेमाच्या पावसाची ढगफुटी होऊन त्याच्यावर जणू प्रेमाचा वर्षावच सुरू झाला होता. 

     मनात असंख्य दुःख, वेदना सुमित सहन करत होता. पण त्याला हेच कळाले नाही की, जर थोडं धाडस केले असते तर अशी ढगफुटी झाली नसती. काही दिवस सुमित एकटाच राहू लागला. त्या एकटेपणात तो खूप रडायचा. सिगारेट ओढन आता त्याच दैनंदिन झाल होत. 

     काही दिवस असेच गेले. एकेदिवशी त्याचे मित्र त्याला म्हणाले, "अरे ! काय हे सुमित". स्वतःला इतका त्रास नको करून घेऊस. प्रेम मिळेल नाही मिळेल हा तुज्या नशिबाचा भाग आहे. नशिबात असेल तर ते तुला नक्कीच मिळेल. पण त्याच्या वेदना होतात म्हणून व्यसन करून त्या वेदना दूर करणे हाच एक पर्याय तर नाहीये. तू तुज मन हलकं कर. आम्ही मित्र आहोत तुझे आणि आमच्याशी तू मनमोकळे पणाने बोल. किती दिवस अस एकटा राहणार..? आणि का..? तर, फक्त ती तुज्याकडे पाहत नाही म्हणुन..?, अरे! वेड्या तू तिच्याशी आता बोलण्याचा प्रयत्न तर कर ती नक्कीच बोलेल तुज्यासोबत.

       मित्रांचे बोल ऐकून, सुमित ला जरा धीर आला. सुमित म्हणाला, भावांनो! तुम्ही म्हणतात ते ही सत्यच आहे. पण माज्यात ते धाडस होत नाही पण तुम्ही जे बळ दिलंत मला. त्यामुळे आता मी नक्कीच धाडस करेन अन सिगारेटचे सेवन नाही करणार.

      हे ऐकून सुमितच्या मित्रांना ही खूप बरं वाटलं.ते म्हणाले, सुमित आता 'आर या पार' होऊन जाऊदे. सुमित म्हणाला, होय! आता नाही रडणार. त्यानंतर सुमित पुन्हा तिच्याकडे एकटक लावून बघू लागला. 

      एकेदिवशी, सुमितचा चुलत भाऊ गावाकडून आला होता. दोघांचे नाते फक्त भाऊच नाही तर मित्राचेच होते. सुमितने त्याला घडलेली सर्वी हकीकत सांगितली. सुमितचा भाऊ म्हणाला, अरे !मग तू प्रयत्न का नाही केलास. मुर्खा. वेडा आहेस का ? एकदा बोलायच तरी तिच्यासोबत. आता काळजी करू नकोस मी आलो आहे ना. उद्याच सकाळी आपण तिच्या शाळेत जाऊन तिला विचारू. सुमित म्हणाला, अरे ! दादा नको मला भीती वाटते. सुमितचा भाऊ म्हणाला, 'आता काहीही नाही हा.' उद्या बोलायचं म्हणजे बोलायचंच. सुमित म्हणाला बर ठीक आहे बोलूयात.

     दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित व त्याचा भाऊ लवकर उठले. अन आवरून तिच्या घराच्या दिशेने निघाले. सुमितने त्याच्या भावाला विचारले, अरे ! दादा तिला कस विचारायच? मला तर काही समजत नाहीये! मला भीती वाटत आहे. त्याचा भाऊ म्हणाला, अरे सुमित घाबरू नकोस ती तुज्याकडे बघते ना? मग नक्कीच ती तुला होकार देईन. सुमितला ही जरा धीर भेटला. 

      दोघेही तिच्या गल्लीच्या बाहेर उभे होते. तेवढ्यात ती शाळेत जाण्यासाठी निघाली. अन त्या दिवशी ती एकटीच होती. सुमित म्हणाला, दादा आली बघ ती. तेवढ्यात त्याचा भाऊ म्हणाला, हीच आहे का माजी वहिनी. होय. दादा हीच आहे तुजी वहिनी. ' सुमित लाजून म्हणाला'. वैष्णवीने सुमीतकडे बघितले अन विचार केला, हा अचानक आज सकाळी कसा आला आणि त्याच्यासोबत हा कोण...?  वैष्णवी शाळेच्या दिशेनं निघाली आणि हे दोघेही तिच्या मागे मागे जाऊ लागले. अरे!सुमित विचार तिला हीच वेळ आहे आणि कोणी सोबत सुद्धा नाहीये तिच्या. सुमितचा भाऊ घाईघाईत बोलू लागला. अरे ! दादा भीती वाटत आहे मला आता नको. "सुमित म्हणाला".

    वैष्णवीला अंदाज आलाच होता. आज सुमित विचारेन म्हणून अन ती पण हळूहळू चालत होती. सुमितने अस काही विचारलेच नाही. वैष्णवी शाळेत गेली. पण हे दोघेही शाळेच्या बाहेरच उभे राहिले. शाळेची मधली सुट्टी झाली अन वैष्णवी बाहेर आली अन तिने सुमितला पाहिले. अरे! हा अजून इथेच आहे.' वैष्णवी गुणगुनू लागली'.

      वैष्णवी तिच्या मैत्रिणींसोबत शाळेच्या बाहेर आली. सुमितचा भाऊ सुमितला म्हणाला, आता तू आवाज देतोस तिला...? की, मी आवाज देऊ सांग लवकर. सुमितच्या भावाने तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सुमितनेच आवाज दिला. अगं ! वैष्णवी ऐक ना. वैष्णवीने मागे वळून पाहिले. तेवढ्यात सुमितच्या भावाने आवाज दिला. अगं वैष्णवी, सुमितला तुज्याशी काही बोलायचं आहे. वैष्णवी अन तिच्या मैत्रिणी 'सुमित' जवळ आल्या. सुमीतच्यात अचानक कुठून हिम्मत आली हे तर 'देवच जाणे'. ती जवळ आली. सुमितचा भाऊ म्हणाला, तुम्ही दोघे बोला मी आहे बाजूला आणि तो तेथून निघून गेला.

 वैष्णवीच्या मैत्रिणींनी विचारले, काय काम आहे तुज वैष्णवीकडे.  


"सुमित म्हणाला, माज काम तिच्याकडे आहे. तुमच्याकडे नाही". 

तुम्ही जरा जाता का मला तिच्याशी एकांतात बोलायचे आहे. वैष्णवीच्या मैत्रिणींनी वैष्णविला विचारले. जाऊ का आम्ही..? का थांबू इथे..? वैष्णवी म्हणाली तुम्ही जावा मी येते नंतर. तिच्या मैत्रिणी तेथून निघून गेल्या. सुमित वैष्णवीच्या डोळ्यात पाहू लागला.

" तेवढ्यात वैष्णवीने दबक्या आवाजात विचारले, काय काम आहे...?".

" मी तुज्याकडे पाहतो,तू पण माज्याकडे पाहतेस", मला खूप आवडतेस तू. 'सुमित घाबरत म्हणाला'.

अन मला तुला गमवायच नाहीये. 'वैष्णवी लाजली'. अन म्हणाली मी तुला ह्याच उत्तर संध्याकाळी ट्युशन सुटल्यानंतर देईन. होय. पण नक्की देशील ना? मला नाही रहावत तुज्याशीवाय. सुमितने एका आशेनं विचारले. होय मी नक्की सांगेन तुला संध्याकाळी. वैष्णवी म्हणाली. आता तू जा, तुला शाळेत जायचं असेल असे सांगून वैष्णवी वर्गात निघून गेली. सुमितला त्याच्या भावाने विचारले, कायरे! काय म्हणाली ती?. सुमित म्हणाला, सांगितलं मी तिला. ती म्हणाली ट्युशन सुटल्यानंतर सांगेन. 

'बर झाल तू तुज्या मनातला तिला सर्व सांगितलं नाहीतर कोणी दुसरा घेऊन गेला असता तिला'. "सुमितचा भाऊ त्याची खिल्ली उडवत म्हणाला".

'गपरे! दादा काहीही काय..? चल आता आपण घरी जाऊयात शाळेत पण जायचं आहे'. "सुमित हलक्या स्वरात म्हणाला".  आणि दोघेही घरी गेले.

    मनात एक वेगळाच आनंद सुमितला झाला होता. घरी जाताना ही तो हाच विचार करू लागला की, ती आता काय बोलेल अन काय उत्तर देईल...? सुमित आणि त्याचा भाऊ घरी गेले. घरी जाताच सुमित शाळेत जाण्यासाठी आवराआवर करू लागला. मित्रांना ही खबर कधी सांगतोय ह्याच उत्साहात तो घाईघाईत आवरू लागला.

    शाळेत जाताच त्याचे मित्र खो-खोच्या मैदानात टेनिसच्या चेंडूने खांब उडवाउडव खेळत होते. सुमित धावत आला आणि म्हणाला, 'भावांनो आज मी तिला विचारलेच'. संकेत म्हणाला, अरे पण काय विचारले. सुमित ने जाहलेली हकीकत सांगितली. संकेत आणि शशांक म्हणू लागले भावा आम्ही बोललो होतो ना तुला. तू घाबरू नकोस अन तिला विचार म्हणून. बघ ती तुला नक्कीच होकार देईल. 

होय भावा. आता फक्त तिच्या होकाराची वाट पाहतोय. त्यादिवशी सुमित संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागला. 

     शाळा सुटली अन सुमित म्हणाला, अरे! संकेत चल लवकर. आज लवकर जाऊयात ट्युशन मध्ये. होय भावा चल जाऊयात मी लवकर आवरतो तू ये घरी माज्या.'संकेत उत्कंठाणे म्हणाला. 

    सुमित ने लवकर आवरले अन संकेत ला घेण्यास त्याच्या घरी गेला. दोघेही ट्युशन मध्ये गेले आणि आपल्या जाग्यावर जाऊन बसले. सुमितच्या हृदयात उत्सुकता वाढू लागली होती. तो वैष्णवीकडे एकटक लावून बघू लागला. वैष्णवीही सुमीतकडे पाहू लागली. अखेर तो क्षण आला. आज नियतीने ही, सुमितच्या बाजूने घट्ट पकड बसवली होती. नववीची ट्युशन सुटण्याची वेळ झाली होती. सरांनी नववीच्या विदयार्थ्यांना घरी सोडले. वैष्णवी जात असताना सुमितने थांबण्याचा तिला इशारा दिला. पण ती निघून गेली . यार आता कस तीच उत्तर ऐकणार मी. ती थांबेन का...? सुमित मनात विचार करू लागला.

    सुमितचा जीव मात्र कासावीस झाला होता. नववीच्या विदयार्थ्यांना घरी सोडल्यानंतर सर म्हणाले, आज मला जरा काम आहे मला बाहेर जायचं आहे म्हणून आज तुम्हा दहावीच्या विदयार्थ्यांना लवकर सोडतोय. 

'सुमितलाही भासू लागके की, आज दैव आपल्या बाजूने भक्कम पणे उभे आहे'.

नवविची ट्युशन सोडून पाच मिनिटांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना सरांनी घरी जाण्यास सांगितले. सर जा म्हणताच, सुमित उठला आणि घाईघाईत बाहेर गेला. त्यामागे संकेत पण धावत होता. सुमितने त्याची अटलास सायकल काढली. 

'अन संकेतला म्हंटला, भावा बस मागे लवकर आपल्याला घाई करावी लागेल'.  

'संकेत मागे बसला अन म्हणाला भावा ती अजून घरी नसेल गेली दत्त मंदिराजवळून चल म्हणजे तिच्याआधी आपण त्या जागेवर पोहचू'. "सुमितने होय म्हणून इशारा दिला". 

     सुमित आणि संकेत एका गल्लीत थांबले होते. ही खबर त्यांच्या बाकी मित्रांना समजली होती. वैष्णवी हो बोलेल की नाही याची उत्सुकता त्यांना होती. हेच पाहण्यासाठी तेही तिथे आले. सुमितला त्याचे बाकी मित्र म्हणाले, आम्हाला पण ऐकायचं आहे तीच उत्तर.. आणि कोणी मध्ये आलंच तुमच्या तर आम्ही आहोतच. त्यावर सुमित म्हणाला, होय बर ठीक आहे पण तुम्ही सर्वे तिच्यासमोर येऊ नका लपा कुठेतरी.

 'तेवढ्यात संकेतनी सुमितला आवाज दिला'. "भावा वहिनी आली रे". 

'तुम्ही सर्वेजन कुठेतरी लपा नाहीतर ती नाराज होईल'. सुमित म्हंटला.

   सर्वेजन लपण्यासाठी जागा शोधत होते पण गल्ली छोटी असल्याने तिथे लपून जरा मुश्किलच होत. पण लखन ने एक शक्कल लढवली अन मित्रांना म्हणाला, अरे !ऐका रे, इथे ड्रम आहेत ते पलटी करा पाण्याच पातेलं सुद्धा आणि लपा त्यात. असा हा फाजील पणा यांनी केला. सर्वांनी ते ड्रम पलटी केले आणि त्यात २-२ जण लपलीत. तर काही पातेलं डोक्यावर घेऊन तर काही जिन्यात लपलीत. सुमित गल्लीच्या बाहेर गेला अन वैष्णवीची वाट पाहू लागला. तेवढ्यात वैष्णवी आली तिने सुमितला पाहून नजर खाली केली. वैष्णवी जरा घाबरलीच होती. कारण, तिचे घर जवळ होते तिथून आणि त्या गल्लीतील लोक तिचे ओळखीचे होते म्हणून, तिने न थांबता सुमितला वळसा मारून ती जरा पुढे गेली. 

"अग! वैष्णवी थांबना".   

उत्तर सांगणार होतीस ना..? 'सुमितने तिला हाक मारली'. 

दैव हे सुमितच्या बाजूने होते. अन ही दैवी कृपाच होय. एक अनोळखी मुलगी मागच्या बाजूने येत होती . सुमितने वैष्णविला हाक दिल्याचं तिने ऐकलं. अन ऐकताच वैष्णविला म्हणाली. 'अग! तुला तो बोलावतोय'. वैष्णवीने होय म्हणून इशारा केला. अन ती अनोळखी मुलगी तेथून निघून गेली. 

    त्याच गल्लीत मागच्या बाजूला त्याचे मित्र लपून बसले होते आणि तिथेच वैष्णवीची मोठी बहीण दीक्षा आणि आकाश बोलत थांबले होते. त्यांचं बोलणं ऐकून ड्रम मध्ये लपून बसलेली मंडळी त्यांचं सर्व बोलणं ऐकून हळूच हसू लागली होती. 

   वैष्णवी सुमितच्या जवळ आली. सुमित म्हणाला काय झालं का निघून चालली होतीस..? 

'अरे! सुमित मला भीती वाटतेय'. कारण माज घर इथेच पुढे आहे. "वैष्णवी घाबरत म्हणाली". 

'अगं! मला तू खुप आवडतेस'. मी जाम प्रेम करतो तुज्यावर "मी नाही जगू शकत तुज्याशीवाय" अन हे तुला पण माहीत आहे वैष्णवी. मला उत्तर सांग तुज काय आहे ते. "सुमित एका श्वासात बोलला".

'वैष्णवी ने खाली नजर केली अन लाजत म्हणाली .होय. 

'काय होय..? मला उत्तर सांगना वैष्णवी'. होय. हे काय उत्तर आहे का..? सुमितने लगेच प्रतिउत्तर केले.

' अरे सुमित होय. म्हणजे माजा होकार आहे तुला'. पण मला कधी सोडणार नाहीस ना. "वैष्णवी लाजत म्हणाली".

त्यावर सुमित म्हणाला कित्येक वर्षे मी एकटा असल्याचं भासत होत मला पण आज नाही. मी तुला कधीच सोडणार नाही. मी खूप प्रेम करेन तुज्यावर. हे ऐकताच सुमितच्या मित्रांनी ताकदीने ड्रम उचलून फेकले तर काहींनी ज्या पातेल्यात लपली होती ती जोरात आदळली. जोरात म्हणू लागलीत भावाला वहिनी पटली रे नुसता हल्लाबोल झाला. त्याच गल्लीत आकाश अन दीक्षा बोलत थांबली होती त्यांनी मात्र तिथून पळ काढली त्यांना वाटलं की कोणी आपल्याला ओरडत आहे. एवढ्यात सुमित म्हणाला तू जा घरी ही पोर ओरडायला लागली आहेत.

"अरे! पण ही इथे काय करत आहेत". वैष्णवी सुमितला विचारू लागली.

'अग! तू होकार देतेस की नाही हेच ऐकायला आली होतील'. सुमित म्हणाला.

अरे! पण तू यांना का इथे बोलावलं. बघ किती गोंधळ करत आहेत. वैष्णवी घाबरत म्हणाली.

होय. मी बघतो त्यांच्याकडे तू घरी जा. गल्लीतील लोक घरातून बाहेर येतील त्याआधी इथून निघावं लागले. चल बाय. "आय लव्ह यू". सुमित प्रेमाने म्हणाला.

होय निघते मी. पण तू यांना घेऊन जा. नाहीतर गोंधळ घालतील. वैष्णवी हसत म्हणाली.

"आय लव्ह यू .२". सावकाश जा घरी. वैष्णवी लाजत म्हणाली.

     वैष्णवी घरी जाताच, सुमितने सर्वांना शांत राहायला सांगितले. त्या गल्लीतील लोकही बाहेर आलीत आणि म्हणालीत, ये.... कोण आहे रे. "बेशिस्त पणाचा कळस नुसता". आपापल्या घरी जाऊन दंगा करा इथे आमच्या दारात काय जेवण वाढलाय का....? हे ऐकताच तेथून सर्वेजन पळून गेलीत. पुढे जाऊन नाक्यावर सर्वेजन भेटलीत अन सुमितचे मित्र म्हणू लागले, भावा शेवटी वैष्णवी तुजीच झाली. आता कर लग्न लवकर. ह्यावर शशांक म्हंटला तुम्ही काय वेडे झालात का..? आधी त्यांचं वय तर होउदे लग्नाचं. सुमित मात्र लाजत होता अन मनातच हसत होता. 'अरे काय लाजतोय नव्या नवरी सारखा'. संकेत हसत म्हणाला.

    अरे तस नाही, मला खूप अस वेगळं वाटतय रे. म्हणजेच सर्व काही बदललं आहे. मी जणू काही स्वर्गात आहे असं मला भासत आहे.सुमित गडबडत म्हणाला.

 'भावा तू पार गेलास लका'. काही खर नाही आता तुज मग आता पार्टी कधी देतोयस. शशांक म्हणाला.

'देऊ नक्कीच'. सुमित छाती फुगवून म्हणाला. 

    चला आता घरी निघुयात खूप उशीर झाला आहे. भूक सुद्धा लागली आहे. उद्या लवकर उठून अभ्यास पण करायचा आहे. लखन घाईघाईत बोलू लागला.

    प्रेमरंगाचा रंग आता जणू सुमितच्या मनात खोलवर बिंबला होता. प्रेमाचा हा सर्वात महत्वाचा रंग त्याच्या आयुष्यात आला होता. पण अजूनही काही रंग यायचे होते, प्रेमरंग तेव्हाच संपूर्ण होतो जेव्हा त्यात आपुलकीचे रंग भरले जातात. सुमित त्याच विचारांत रमला होता की आता पुढे काय होईल.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance