Akshay Varak

Romance Fantasy Thriller

4.0  

Akshay Varak

Romance Fantasy Thriller

प्रेमरंग (भाग १)

प्रेमरंग (भाग १)

10 mins
249


    दहावीचा प्रवेश सुरू झाला होता,हे अंतिम वर्ष असेल मित्रांसोबत याच विचाराने सुमित काही सुख तर काही दुःख मनात ठेवून होता,शाळेचा तो पहिला दिवस आणि दोन महिन्यानंतर पुन्हा सर्वे मित्र एकत्र जमले होते.मस्त मेहफिल रंगली होती आणि शशांक ने सुमितला विचारले की,'सुमित मग ट्युशन कुठे लावणार आहेस',सुमित ला काहीच सुचेना सुमित शांत बसला आणि म्हणाला की , हे आपलं शेवट वर्ष आहे त्यानंतर कोण कुठे असेल कुणास ठाऊक! त्यामुळे, मौज मजा करायची,मग आपण सर्वे मित्र एकाच ठिकाणी ट्युशन लावूयात असा सुमितने निर्णय घेतला. 

     सर्व मित्रांना सुमितचा निर्णय पटला,आणि तेवढ्यात वर्ग ही भरले,सुमित आणि त्याची मित्र मंडळी वर्गात गेलीत,वर्गात जाताच सुमित ला त्याचे वर्गशिक्षक म्हंटले की,सुमित काय मग ह्यावर्षी सुद्धा दंगा मस्ती करायची आहे का? थोडाफार अभ्यास ही,सुमित शांत पणे मान खाली घालून बाकावर जाऊन बसला. 

     सुमित आणि त्याची मित्र मंडळी म्हणजे सर्वात खोडकर,भविष्याची चिंता नाही ना कसली फिकीर त्यांचं एकच वाक्य असायचं की, "हम अपनी मोज मे दुनिया हमारी खोज मे",पण पुढे जाऊन याच उलटंच होणार होत हे त्यांना माहीत नव्हतं.ह्यांची मजा म्हणजे जरा जगा वेगळीच होती,जे वर्गातील मुलं करतील त्या विरुद्ध ही मित्रमंडळी करायची. 

       शाळेची वेळ १२.३० ते ५.३० असायची.पण ही मंडळी वेळेच्या तासभर आधीच शाळेत हजर राहत .खो-खो च्या मैदानात जमत आणि एक चेंडू काडून खो- खो च्या खांबाला हिट करत. असे खेळ खेळत असायची नाहीतर मग २ रुपायचा बारीक प्लास्टिक चेंडू आणि अभ्यासाचे पॅड घेऊन क्रिकेट खेळणे असे यांचे खेळ असत आणि रोज यांना क्रीडाविभागाचे सर स्टेज वर घेऊन छड्या मारत आणि ही निर्लज्य मंडळीसुद्धा हसत हसत त्या छड्या हातावर घेत. 

      'जगण्यासाठी फक्त पैसा नाहीतर मित्र सुद्धा हवेत' हे यांना माहीत होतं म्हणूनच यांची मैत्री जरा जास्तच घट्ट होती.वर्गातला तो मागचा बेंच आणि त्यावर ब्लेड ने कोरीव काम करणे ही त्यांची सवय. तास चालू असताना माकडाचे आवाज काढणे तर कधी पुढच्या बेंच वरच्या मुलांना चिंच खाऊन चिचुके मारणे अशी यांची मज्जा असायची. 

     सुमितच्या मित्रांपैकी २ मित्र एका ट्युशन मध्ये होते,संकेत आणि आकाश हे दोघे म्हंटले; की मग आमच्याच ट्युशन मध्ये या सर्वे. पण, ट्युशन चे सर खूप शिस्तबद्ध होते त्यांना टवाळ पणा सहन होत नसायचा आणि जर कोणी ट्युशन मध्ये प्रेम लफडं केलं तर त्या मुलास खूप भयानक शिक्षा द्यायचे,हे या मित्र मंडळीला माहीत होते. 

     सुमितची मित्रमंडळी म्हंटली की,आपण हीच ट्युशन लावूयात अन सर्वानी तिथे ऍडमिशन घेतलं फक्त सुमित ने त्यांच्या दोन दिवसानंतर तिथे ऍडमिशन घेतले.आणि हाच सुमित च्या आयुष्याचा "टर्निंग पॉईंट" झाला.ट्युशन चे पहिले २ दिवस फक्त अभ्यास आणि मित्र मंडळींन सोबत वेळ घालवला,आणि ही मंडळी ट्युशन मध्ये ही मागेच बसायची. 

     ट्युशन ची वेळ संध्याकाळी ७.०० ते १०.०० असायची.ट्युशन लावून दोन दिवस झाले होते.वार शुक्रवार होता सुमित नेहमीच्या वेळेप्रमाणे ७.०० वाजता ट्युशन मध्ये आला वातावरण ही नेहमी प्रमाणेच होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणेच नववी ची बॅच सुटली अन एका मुलीने मागे वळून एक स्मित हास्य केले अन तिची नजर सुमितच्या नजरेला भिडली १० सेकंद सुमित स्तब्ध झाला तो तिच्याकडे पाहतच राहिला,अन ती तिच्या मैत्रिणींसोबत निघून गेली आणि हा भान हरपून बसला.("प्रेम होण्यास एकच नजर काफी असते" आणि तसच इथेही झालं) सुमितला अस वाटलं की तिने त्याच्याकडे पाहून नजरेला नजर मिळवली अन हसली पण असं नव्हतं. 

      ती मुलगी म्हणजेच वैष्णवी .अन वैष्णवी आणि तिची मोठी बहीण दीक्षा ह्या दोघी सख्या बहिणी होत्या,वैष्णवी नववीला तर दीक्षा दहावीला होती.अन झालं असं होतं की दीक्षा सुमित च्या डाव्या बाजूस,त्याच्याच मागे बसली होती,अशी गंमत झाली...की वैष्णवी हसली दीक्षाकडे पाहून अन सुमित ला वाटले की त्याकडे पाहून हसली आणि हा कळत नकळत प्रेममार्गास लागला.वैष्णवी घरी गेल्यानंतर तो शशांक,संकेत व राहुलला सांगू लागला की,ती मुलगी मला पाहून हसली मला खूप आवडली,माज्या मनात भरली.त्याचे मित्र त्यावर हसू लागले अन बोलले की,अरे! सुमित तुला खरच आवडली ती अन इतकी आवडली की तुजी बोबडीच वळू लागली.तेवढ्यात संकेत बोलला की सुमित भावा तू लागला आता धक्क्याला। मग सुमित म्हंटला की काहीही फालतू चेष्टा करू नका मला खरच खूप आवडली ती,माज्या मनात नाहीतर ती माज्या हृदयात भरली,एका नजरेत मला मीच विसरलो यार ह्यालाच प्रेम म्हणतात का?असा तो त्याच्या मित्रांना बोलू लागला. 

     ट्युशन सुटली, अन सुमित व त्याचे मित्र आपापल्या घरी जाऊ लागले,जाता जाता सुद्धा सुमित त्याच विचारात होता की, ती का माज्याकडे बघून हसली ह्याच विचारात त्याची रात्र गेली.दुसरा दिवस उजाडला पण सुमितचा विचार काही थांबेना.रोजच्या सारख सुमित आवरू लागला व शाळेत जाण्याची तयारी करू लागला.शाळेत जातानाही सुमित अन त्याचे मित्र सोबत चालत जायचे,चालता चालता सुमित मित्रांना म्हणाला की, अरे...यार ती का बघत होती अन माज्या हृदयी एक वेगळीच भावना जागली आहे त्यामुलीविषयी यार मला काही आता सुधारत नाही,मला तीच नाव अन कुठे राहती याची माहिती हवी आहे,तेवढ्यात संकेत बोलला की भावा चिंता करू नको तुजा भाऊ अजून आहे जिवंत मी माहिती काढतो तू निश्चिंत रहा. शाळेत पोहचल्या नंतर सुद्धा सुमित त्याच विचारात होता मित्रांना सांगत होता सतत की ती मला हवी आहे यार..मला तिच्याशिवाय आता काही चैन पडत नाही,सुमितचे मित्र ही त्याला वैतागले अन म्हणाले की भावा संध्याकाळ होउदे भेटेल ती ,तू चिंता नको करुस आम्ही आहोत ना भावा तिची सर्वी माहिती काढू. नको चिंता करुस. 

      संध्याकाळ झाली शाळा सुटली आणि हा मित्रपरिवार घरी जाऊ लागला,जाता जाता सुमित म्हणाला,की आज लवकर ट्युशन ला जाऊयात मला तिला पहायची आहे.तेवढ्यात संकेत म्हंटला की, सुमित मी येतो तुज्यासोबत लवकर जाऊयात कारण नववीची बॅच ६.०० ते ९.०० होती. त्यामुळे संकेत आणि सुमित लवकर घरी गेले अन ट्युशन ची तयारी भराभर करू लागले. 

    सुमित आणि संकेत चे घर जवळ जवळ होते पण ट्युशन २ किलोमीटरच्या अंतरावर होती. आणि गंमत अशी होती की सुमित कडे या मॉडर्न युगात जुनी पुराणी ऍटलास सायकल होती.सुमित संकेतच्या घरी गेला अन म्हटला की "ये...भावा अरे चल लवकर",तेवढ्यात संकेत म्हंटला की आलोच भावा.संकेत बॅग घेऊन बाहेर आला अन म्हंटला की 'चल मेरे शेर आज तेरी बारी हे',एवढ्यात सुमित म्हंटला की काय भावा तीच अजून नाव नाय माहीत आणि तुज काय हे चाललंय.सुमित म्हंटला चल बस आता मागे, जाऊयात ट्युशनला आणि दोघे ट्युशन ला जाऊ लागले. सुमितच्या मनात खूप उत्सुकता होती. 

    ट्युशनपाशी आले अन सायकल लावली अन धावत ट्युशन मध्ये गेले, बाहेरूनच सरांना म्हंटले, सर येऊ का आत सर म्हंटले अरे संकेत सुमित आज एवढ्या लवकर आलात.संकेत म्हणाला सर आजपासून रोजच लवकर येणार आहोत आम्ही लवकर येऊन शाळेचा अभ्यास ही पुर्ण करू.सर म्हंटले ठीक आहे या लवकर.दोघे जाऊन आपापल्या जागेवर बसले अन सुमित तिच्या शोधात नजर फिरवू लागला.संकेत बोलला की भावा वहिनी... बघ तीकडे बसली आहे सुमित लगेच तिच्याकडे एकटक लावून बघू लागला अन विचार करू लागला कि,हीच ती मुलगी जिने माज्या आयुष्यात एन्ट्री केली अन माजे आयुष्य क्षणभरात बदलून टाकले.ही मला हवीच आहे असा हट्ट त्याने मनात धरला. 

      आठवीच्या मुलांना शिकवून झाले होते, सरांनी नववीच्या विद्यार्थ्याना पुढे बोलावले.सुमित तिच्याकडेच टक लावून पाहत होता आणि तेवढ्यात चुकून तिची नजर ही सुमित कडे वळली हे पाहताच संकेत म्हंटला,भावा बघते ती पण तुज्याकडे...,सुमित म्हणाला होयरे; भावा हिने तर माज्या काळजाचीच चोरी केली. काय करू अन काय नाही काही सुचत नाही.संकेत म्हणाला की भावा मी तिची माहिती काढून येतो.सुमित म्हणाला की कशी काढशील पण? संकेत म्हणला भावा आठवीच्या मुलांना विचारतो. सुमित म्हंटला हो भावा पण कोणाला काहीही कळता नये. 

       संकेत गेला व आठवी च्या एका मुलाला तिचे नाव व कुठे राहते विचारले आणि तिच्याबद्दल सर्वी माहिती काढून घेतली.आणि सुमित ला सांगितली,सुमित खूप खुश झाला व बोलला की भावा तूच माजा खरा भाऊ आहे,यात संकेत म्हंटला की भावा "तुज्यासाठी काहीपण आणि कुठेपन". सुमित संकेत ला म्हणाला की भावा वैष्णवी पटेल ना मला,संकेत बोलला की भावा ती फक्त तुजीच आहे आणि कोणी मध्ये आला तर आम्ही आहेच की तू चिंताच नको करुस. .

      वैष्णवी कडे पाहता पाहता,सुमितच्या तोंडून अचानक उद्गार निघाले की,"नजरो का खेल सारा,ये प्यार हमे कहा ले आया"तेवढ्यात संकेत बोलला की ,भावा तू पार डुबलास ह्या प्रेमाच्या समुद्रात.सुम्या वेड्या काय झालं तुला इतकं प्रेम! की तू आता शायरी करायला लागलास.तेवढ्यात सुमित म्हंटला की,"इश्क मे तो हर कोई शायर बन जाता हे,रेहता हे वही जो इश्क की बाजी जित जाता हे". संकेत यार काय सांगू तुला एवढ्या मुली पाहिल्या पण हिच्यासारखी कोणीच नाही. 

     सात वाजले आणि बाकीचे मित्र पण आले आणि सुमितच्या बाजूला बसले.शशांक म्हंटला अरे!सुम्या अभ्यास करायचा नाही का तुला हे काय प्रेम वगैरे काही नसतं भावा हा फक्त मनाचा खेळ आहे. असे शशांक सुमितला म्हंटला. पण छे! सुमित कुठला ऐकतोय,सुमित त्याला पलटून शायरी मध्ये उत्तर देतो की, 

   "तुम क्या जाणो, प्यार क्या होता हे। 

    होता हे वही, जो तकदिर मे लिखा होता हे"।। 

असे बोलून त्याने शशांकला उत्तर दिले.तेवढ्यात शशांक त्याला बोलला की भावा खरच यार तुला प्रेम झालय वैष्णवीवर पण जरा संभाळून कर पुढे काय करायचं आहे ते! सुमित म्हंटला की भावा काळजी करू नकोस अस काही करणार नाही की त्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम होईल.निश्चिंत रहा!      

       बघता बघता नववीच्या विद्यार्थ्याना शिकवून झालं होतं.सरांनी आवाज दिला की ,दहावीच्या मुलांनी पुढे येऊन बसा तेवढ्यात हे पाच मित्र उठले आणि आपल्या मागच्या जागेवर जाऊन बसले आणि तेवढ्यात वैष्णवी ला सरांनी आवाज दिला की,ये....वैष्णवी दहावीच्या मुलांच्या मागे बस ,सर जरा रागीट स्वभावाचेच होते आणि जे मुलंमुली गप्पा मारत बसायचे त्यांना वेगवेगळ बसवत.वैष्णवी आली नि सुमितच्या पाठीमागे बसली सुमितचे मित्र हसू लागले आणि सुमितही लाजला. 

      वैष्णवीला माहीत नव्हते की सुमित तिच्यावर प्रेम करतो ते! ती सहज बसली होती तिथे पण सुमितचे मित्र काही शांत बसत नव्हते . क्षणाक्षणाला सुमितला आवाज द्यायचे भावा मागे झलक मार आणि सुमित ही पहायचा. हेच सरांनी पाहिलं पण सरांना शशांक बोलताना दिसला आणि शशांकला पुढे बोलावलं आन सर्वे घाबरले; कारण अस की सर जेव्हा कोणाला अस अचानक बोलवायचे त्याला खूप मार द्यायचे,सर्वी मुलंमुली सरांकडे पहायला लागलीत.शशांक पुढे गेला व स्तब्ध उभा राहिला सर म्हणाले; की , काय जोक मारला होता का एवढं हसत बोलत होतास तो, सरांनी शशांकला जाड गोलदंडाकर छडीने पाठीत ५ फटके मारले.त्याने त्याचे अश्रू जागीच आवरले. शशांक आला आणि म्हंटला की भावा चिंता नका करू चालत एवढं.सुमित म्हणाला की शशांक आता जरा मस्ती वगैरे कमी करूयात आणि थोडं फार अभ्यास करुयात. 

     नऊ वाजले आणि नववीची बॅचची सुट्टी झाली,ती जाते पाहून सुमितचा जीव 'कावरा बावरा ' झाला तो विचार करू लागला की, वैष्णवी ला डोळे भरून पहायचं होत यार आतां ही चालली घरी.वैष्णवी घरी गेली पण सुमित मात्र तिच्याच विचारात गुंगत राहिला.बघता बघता , दहा वाजले ट्युशन सुटली तसेच ही मंडळी आपापल्या घरी गेली.सुमित घरी पोहचला आणि त्याने जेवण केलं तसच तो बेडवर आडवा पडला मात्र विचार त्याच्या मनात तिचाच.की, ही रात्र लवकर जाऊदे उद्या तरी तिला डोळे भरून पाहीन.हाच विचार तो सारखा करू लागला. 

      दिवसांमागे दिवस सरू लागले पण सुमितची गाडी काही पुढे गेली नाही,रोज तिला पाहत राहायचा आणि तिचे स्वप्न रंगवून खुश व्हायचा, बस्स! एवढंच बघता बघता एक महिना उलटला पण वैष्णवीच्या मैत्रिणींना खबर लागली की सुमित वैष्णवी च्या मागे लागलाय म्हणून. वैष्णवी च्या मैत्रिणी सुमितच्या शाळेत होत्या अन वैष्णवी दुसऱ्या शाळेत होती.म्हणून वैष्णवीच्या मैत्रिणी सुमितला चांगलंच ओळखायच्या पण वैष्णवीला तिळमात्र खबर नव्हती की सुमित तिच्या पाठी लागलाय तो. शाळेत जर सुमित दिसला की वैष्णवीच्या मैत्रिणी सुमितला वैष्णवी म्हणून आवाज द्यायच्या.सुमित बिचारा लाजून पळ काढायचा. 

     ह्याच विचाराने सुमित जरा घाबरलाच होता.कारण जर हेच वैष्णवीला किंवा ट्युशन सरांना कळाले तर चांगलीच आपली फजिती होईल या गोष्टीचीच त्याला चिंता भासू लागली होती.त्याने ही बातमी त्याच्या मित्रांना सांगितली,तेव्हा त्याचे मित्र त्याला म्हणाले की भावा तू चिंता नको करुस अन जरी वैष्णवी ला कळले तरी ते योग्यच आहे. अजून किती दिवस तू पण तुज मन मारून जगणार कळूदे तिला पण की तू प्रेम करतो ते.हे ऐकताच सुमित म्हणाला की भावा तुज पण बरोबर आहे पण सरांना ही बातमी कळली तर माहीत आहे ना तुला की, ते काय करतील ते....पण तरीही वैष्णवीच्या मैत्रिणींना जाब घालावाच लागेल.तेवढ्यात संकेत आणि शशांक म्हणाले आम्ही बगतो ते ,तू निश्चिंत रहा. 

    संकेत आणि शशांकने वैष्णवीच्या मैत्रिणींना शाळेत विचारले की, का तुम्ही सुमितला वैष्णवी च्या नावाने चिडवतात ते चिडवन बंद करा.नाहीतर उगाच सरांना कळेल आणि मग जे होईल पुढे ते तर तुम्हाला माहीतच आहे.तुम्ही सुमितला आता चिडवन बंद करा यातच तुमची आणि त्याची पण भलाई आहे.तेव्हा वैष्णवीच्या मैत्रिणी म्हणाल्या की,होय आम्ही नाही चिडवणार पण वैष्णवी काय त्याला होकार तर देणारच नाही आणि सुमितला सुद्धा सांग की वैष्णवी काय भेटणार नाही तिचा नाद सोडून दे.शशांक म्हणाला की तिचा नाद सोडायचा की नाय तो त्याचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांच्यात लुडबुड करू नका आणि वैष्णवी सुमितला होकार देईल की नाही हे सुमितचे असलेले वैष्णवी वरचे प्रेमच सिद्ध करेन.बस! एवढं सांगून सुमितचे मित्र तिथून निघून गेले. 

       शशांक आणि संकेतनी घडलेली घटना सुमितला सांगितली त्यावर सुमित म्हंटला की,आता तर तिचा होकार घेऊनच राहील आता माघार नाही,आता जिंकायचचं. तिला मी आता मिळवून राहणार तिच्या मैत्रिणी म्हंटल्या ना, नाही भेटणार त्यांनाही दाखवणार की वैष्णवी भेटते की नाही आता "सौ बात की एक बात",निशाणा अब तय हे,आता माघार नाही म्हणजे नाहीच.सुमितचे मित्र हसत हसत म्हणाले, सुमित महाराज की जय......,आणि ते वर्गात गेले.काही दिवस असेच गेले आणि आता वैष्णवीला सुद्धा ही बातमी कळली होती की ,सुमित तिला लाईक करतो ते,पण ती काही म्हणाली नाही किंवा ट्युशन सरांना ही तिने काही सांगितले नाही.अन ती सुद्धा सुमितिकडे चोरनजरेने पाहू लागली.ती पाहते आपल्याकडे या विचाराने सुमित खुप खुश झाला होता आणि त्याचे मित्र सुद्धा की आपली वहिनी पण आता आपल्या भावाकडे पाहते. 

      एकमेकांकडे पाहता पाहता सुमित प्रेमसागरात उत्तुंग बुडुन गेला,आणि सारखा म्हणत राहायचा की, 

    "मेरी नजरो मे ओ, यू बसी हे जैसे, 

     बिना सांसो की धडकन चल रही हे". 

दोघेही एकमेकांकडे पहायचे पण बोलायची ना सुमितच्यात हिम्मत होती अन वैष्णवीच्यात सुद्धा नाही,सुमितला एवढेच कळत होते की ती फक्त पाहते. पण प्रेम करते की नाही हेच माहीत नव्हतं.पण जेव्हा दहावीची बॅच पुढे बसायची तेव्हा,वैष्णवी मात्र सुमितच्याच मागे बसायची.सुमित मात्र गोंधळून जायचा कारण त्याचे मित्र त्याची मज्जा घ्यायचे. 

    सुमित सारखाच मागे वळून पहायचा आणि ती पण लगेच नजरचुकवून सुमितकडे पहायची.नजरेचा खेळच जणू चालू होता.सर शिकवत असतानाही सुमित सारखाच मागे वळून पहायचा अन त्याचे मित्र ही लगेच म्हणायचे सुम्या....भावा....मार झलक , वहिनी पण बघते भावा....सुमित मात्र लाजून लगेच खाली मान घालायचा. 

   सुमित प्रेमसागरात अक्षरशः संपूर्ण बुडून गेला होता त्याला तिच्याशिवाय,काहीच दिसेना वैष्णवी आज बोलेल उद्या बोलेल याचीच तो वाट पाहू लागला.आणि त्याच्या मित्रांना सुद्धा आता काळजी वाटू लागली होती की,ह्याच आता काय होईल,कस होईल जर वैष्णवी नाही म्हंटली सुमितला तर तो काय करेन, याचा काही नेम नाही.त्याला आता सावरायला हव, पण तो पण ऐकणाऱ्यातला नाहीये.जर वैष्णवी ने नकार दिलाच तर हा काही स्वताच बर वाईट तर नाही ना करून घेणार.याचीच चिंता सुमितच्या मित्रांना सतावू लागली. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance