SWATI WAKTE

Horror Tragedy

2  

SWATI WAKTE

Horror Tragedy

कोरोना काळातील रात्र

कोरोना काळातील रात्र

3 mins
202


(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे...)


मनोज आणि राधा त्यांच्या दोन मुलांसोबत पुण्यात राहतात. मनोज एका कंपनीत जॉब करतो तर राधा फ्री लान्सिंग. वेगवेगळ्या ठिकाणी रोबोटिक्सचे workshops घेते. एक मुलगा अनिकेत आठवीत तर समीर बारावीत शिकतो. कोरोना आणि Lockdown मुळे मनोजचे ऑफिस वर्क फ्रॉम होमच असते. आणि मुलांचे पण क्लास ऑनलाईनच असतात. त्यामुळे सर्व सहा महिन्यापासून घरीच असतात. आणि राधाचे काम पूर्णपणे बंद असते. ती सहा महिन्यात फक्त घरातील सर्व काम मेड नसल्यामुळे स्वतः करते व सर्व घरीच असल्यामुळे कामाचा ताण तिचा वाढतो, दिवसाची रात्र कशी होते तिला कळतही नाही. बाहेर फक्त ती घरात काही आणायचे असले तर मनोजसोबतच जाते. किराणा, भाजीपाला, औषधी असे जीवनाश्यक वस्तूंसाठी सर्व काळजी घेऊन मास्क लावून, वेळोवेळी sanitizer वापरून योग्य ती काळजी घेऊन कोरोनापासून वाचण्याची काळजी घेतात. घरी आल्यावर सर्व सामान धुवून, सुकवून, santize करून अंघोळ करतात.


कोरोनानी कहर खुपच घातलेला असतो. हळूहळू कोरोनाचा प्रवेश त्यांच्या सोसायटीमध्येही होतो. त्यांची सोसायटी मोठी म्हणजे पन्नास बिल्डिंगची असते आणि जवळपास सोळाशे लोक त्या सोसायटीमध्ये राहतात.. सोळाशेपैकी सहाशे सोसायटीमधल्या लोकांनाच कोरोना होतो व त्यातील साठ लोक मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे सोसायटीमधले लोक खुपच घाबरलेले असतात. काही घरात तर एकाच घरातील दोन तीन लोक मृत्यूमुखी पडतात. या सर्वांची सर्वच लोक खूप धास्ती घेतात पण घरात वेळ कसा जातो हे कुणालाच कळत नाही.


राधा, मनोज आणि त्यांची मुले नेहमीप्रमाणे कामाने दमून गाढ झोपी जातात. एके दिवशी रात्रीचे दोन वाजतात तेव्हा राधाला खूप रस्त्यावरून आवाज ऐकायला येतो. म्हणून ती खिडकीतुन बघते. राधाला रस्त्यावर कसली तरी पालखी घेऊन हजारो लोक हसत खेळत जाताना दिसतात. त्यात तिला तिच्या सोसायटीतल्या मैत्रिणी पण दिसतात. त्या तिला पण बोलावतात, राधा ये खाली मजा येते. राधाही मैत्रिणीचा आवाज ऐकून कसलाही विचार न करता रात्री दोन वाजता खाली उतरते. आणि त्या मैत्रिणीबरोबर पुढे गप्पा मारत खुशीत त्या पालखीबरोबर पुढे जाते. तेव्हा अचानक चालता चालता लक्षात येते की कोरोनाची साथ चालू आहे आणि आपण मास्क न लावताच बाहेर पडलो. आणि या गर्दीत एकाही व्यक्तीनी मास्क लावलेला नाही. मनोजला हे कळले तर तो ओरडेल आणि त्याच्या ओरडण्यापेक्षाही माझ्यामुळे अनिकेत, समीर, मनोजला ही धोका होऊ शकतो, म्हणून ती गडबडीत घराच्या दिशेने जायला निघते.


तेव्हा तिची मैत्रीण तिला विचारते, "कुठे निघालीस राधा?"


राधा म्हणते, "अगं, मी घाई गडबडीत मास्कच विसरले, तो जरा घेऊन येते. मनोजला कळले तर तो मला खूप रागवेल गं असे कधी माझ्याकडून होत नाही आज कसे झाले माहित नाही आणि माझे जाऊ दे पण तुम्ही सर्वांनी मास्क का नाही लावला गं?"


त्यावर तिची मैत्रीण हसून म्हणते, "अगं एवढी चिंता करू नकोस मजा कर काही होत नाही." तिची मैत्रीण तिच्या मुलीला दाखवून म्हणते, "बघ हिनेही नाही लावला मास्क."


राधा म्हणते, "हो गं पण..." तरी राधाला करमत नाही सहा महिन्यापासून मास्क घालून घराबाहेर निघणे अंगवळणी पडलेले असते. तिनी येताना एक ओढणी आणलेली असते तीच राधा नाका तोंडाला बांधते. तेव्हा तिची मैत्रीण तिला जोरात ओरडते, "त्याची काही गरज नाही म्हणून सांगितले न तुला कळत नाही का?"


राधाला आश्चर्य वाटते ही एवढ्या वर्षांपासून कधीच आपल्यावर ओरडत नाही आज कशी काय ओरडत आहे. मग राधा भानावर येते आणि तिला समजते की ही मैत्रीण आणि तिची मुलगी मागच्या आठवड्यातच कोरोनामुळे मृत्यमुखी पडली. ती खूप घाबरते मागे, पुढे बघते तर तिच्या सोसायटीमधले सर्व साठ लॊक जे मृत्युमुखी पडले ते खूप आनंदात या पालखीसोबत सामील झाले आहेत. तिचे त्यांच्या पायाकडे लक्ष जाते तर सर्वांचे पाय उलटे असतात. ती खूप घाबरते. घामाघूम होते आणि पळत घराच्या दिशेने निघते. सर्व जण तिच्याकडे बघून जोरजोरात विदारकपणे हसतात. ती घाबरत, पळत घरी पोहचते. घराची चावी तिने आणलेली असते आणि दार उघडून सरळ कुणाशी काहीही न बोलता बेडवर पडते. घरातल्या कुणालाच काहीही माहिती नसते ही बाहेर पडली कधी आणि झोपली कधी. ते सर्व गाढ झोपेत असतात. सकाळी सर्व उठतात. साडे आठ वाजले तरी राधा उठत नाही म्हणून राधाला उठवायला जातात तर राधाचे शरीर गार पडलेले असते राधाचा झोपेतच मृत्यू होतो. मनोज तिला उचलून दवाखान्यात नेतो, डॉक्टर तिला मृत घोषित करतात. तिला कुठलाही आजार नव्हता तरी कशाने मृत्यू झाला म्हणून पोस्ट martem करण्यात येते. आणि तिचा कोरोनामुळे ऑक्सिजन लेवल खूप कमी झोपेतच झाल्याचे कळते. तिला कुठलेही symptoms नसल्यामुळे asymptomatic कोरोना असल्याचे डॉक्टर सांगतात. आणि तिच्या घरच्या सर्वांची टेस्ट करायला सांगतात. तर सर्वांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह येते.


नंतर आठ दिवसांनी राधा त्या पालखीसोबत मेल्यानंतर रात्री खूप खुशीत नवीन लोकांना सोबत घेण्यासाठी फिरते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror