खेळ सावल्यांचा ( भाग ९ )
खेळ सावल्यांचा ( भाग ९ )
मागच्या भागात की निखिल कार्यक्रमातून रात्री घरी येताना त्याला समजले की त्याच्या गाडीवर एक स्त्री बसलेली आहे त्यामुळे तो खुप घाबरला .
सुयोग आणि मोहित निखिल ला समजवत होते.
ये तुला भास झाला असेल एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा .
अरे तुम्ही माझ्यावर विश्वास का करत नाही.
माझ्या सोबत एकदा नाही तर वारंवार असे घडते . ती मला लग्न करण्यास दबाव आणत आहे.तुम्हाला कसं सांगू माझी मनस्थिती .माझा जीव गुदमरतो रे .
विकास ही पुढे येऊन निखिल ला समजवत होता .जे आपल्या सोबत घडलं त्याची भीती अजूनही तुझ्या मनात बसली आहे . विसरण्यासारखे तर नाही आहे ते सर्व आठवले की आजही अंगावर काटा येतो .
पण हे आपल्याला विसरायलाच हवं . निखिल तुही ती भीती मनातून काढून टाक . तो एक भूतकाळ आहे .
तितक्यात सुयोग चा फोन वाजला .
हॅलो : हा वेदिका बोल ना
वेदिका : तुम्ही निघाले का ? निखिल भाऊची तब्येत कशी आहे .
सुयोग : तो ठीक आहे आता आम्ही पण थोड्या वेळाने निघणार आहो . आणि तुम्ही दोघी कश्या आहे .
वेदिका : हो मी पण ठीक आहे. अनामिका घेते माझी काळजी .
बरं या सावकाश म्हणत वेदिका फोन ठेवते .
"अरे सुयोग . ही अनामिका कोण ! कोणी पाहुनी आहे की कामवाली बाई ठेवली आहे .
सुयोग अनामिका बद्दल थोडक्यात माहिती सांगतो आणि तिच्या सोंदर्याची पण स्तुती करतो .
तिच्या सोंदर्यावर तू मोहित होऊ नको म्हणजे झालं असं हसत विश्वास ने सुयोग मस्करीत टोमणा मारला .
आणि सर्व जण त्यावर हसले .
निखिल व जया चा निरोप घेत ते सर्व निघाले .
इकडे वेदिका ही सुयोग ची येण्याची वाट बघत होती . तिला भीती वाटत होते राहून राहून तिच्या मनात यायचे खरंच आपल्या घरात कोणीतरी वावरते की मला भास होतो .
अग अनामिका मला घरात कोणीतरी वावरत आहे असे वाटते कोणी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे असे वाटते .
मला तर तसं काही वाटत नाही तुला भास झाला असेल .
मला ही असेच वाटते कदाचित मला भास झाला .
बरं ते जाऊ दे आपल्याला छान मसाला भेंडी बनव मग आपण जेवण करू .
हो म्हणत अनामिका किचन मध्ये गेली . व वेदिका अंगणात बाहेर चक्कर मारत होती .
अनामिका ने स्वयंपाक बनविला व दोघीने जेवण केले थोडा वेळ टीव्ही बघितला व झोपायला गेले.
सुयोग बाहेरगावी गेल्यामुळे वेदिका अनामीकला तिच्या रूममध्ये झोपायला बोलवत होती . वेदिका ला औषधे घेतल्यामुळे लवकर झोप लागत होती .वेदिका झोपली व थोड्यावेळाने अनामिका पण झोपली .
गाढ झोपेत असताना आपल्या पोटावरुन कोणी हात फिरवत आहे आपल्या बाळाला कोणी स्पर्श करू पाहत आहे असे वेदीकाला जाणवले .तशी ती घाबरून ताडकन उठून बसली .
ती खुप घाबरली होती तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता तिने इकडे तिकडे बघितले तर तिथे जवळ कोणीच नव्हते . अनामिका की गाढ झोपली होती .
भीतीमुळे तिच्या घशाला कोरड पडली होती .तिने घड्याळाकडे बघितले तर रात्रीचा एक वाजला होता.
आपल्याला कदाचित भास झाला असेल किंवा स्वप्न पडले असेल असे तिला वाटले .ती उठून किचनमध्ये गेली .फ्रिजमधून बॉटल काढून पाणी पिली व रूममध्ये जाऊन झोपली .
तिला झोपच लागत नव्हती परत तेच तेच ती आठवत होती . ती विचार करत होती आपल्या पोटावर कोणी हात फिरवला . आपल्या बाळाला कोण स्पर्श करत होते त्याला कोणी ईजा तर करणार नाही ना अशी भीती तिला वाटू लागली .
या अगोदर तर या घरात कधीच कोणतीच भीती वाटत नव्हती आणि आता हे सर्व का घडते .
अनामिका ला उठवावे असे तिला वाटले पण दुसऱ्या क्षणी विचार केला नको झोपू दे तिला मलाच भास झाला असेल असे म्हणत ती डोळे बंद करून पडली.
इकडे सर्व घरी यायला निघाले . रात्रीचे 10 वाजले होते सर्वाना भूक लागली होती . रस्त्यात एखादे हॉटेल दिसते का ते बघत होते .
ये मोहित ते बघ समोर मोठे हॉटेल दिसते तिथे गाडी थांबुया असे सुयोग बोलला .
हो चल यार मला ही खुप भूक लागली अक्षय म्हणाला .
मोहित ने गाडी थांबवली व ते सर्व हॉटेलमध्ये गेले .
ये चला आपण थोडी ड्रिंक घेऊ व मग जेवण करू असे विकास बोलताच सर्वांनी होकार दिला .
ये मोहित थोडीच घे आपल्याला लांब जायचे आहे आणि गाडी सुद्धा तुलाच चालवायची आहे .
हो रे बाबा ! थोडीच घेणार.
सर्वांनी थोडी ड्रिंक घेतली व जेवण केले .
थोड्या वेळाने ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले .
ये खरंच त्याला ती दिसली असेल का ?
विकास : ये तुम्ही पण विश्वास करता का त्या गोष्टींवर त्याला भास झाला असेल .
मोहित : हो ना कसं शक्य आहे ईतक्या वर्षानंतर त्याला ती दिसली .
अक्षयच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट दिसत होते .
अक्षय भित्रा आहे हे सर्वांना माहीत होते .त्याच्याकडे बघून विकास म्हणाला ." ये अक्षय जास्त विचार करू नको नाहीतर ती तुझ्या स्वप्नात येईल .
विकास च्या या बोलण्यावर सर्व हसले .
काही अंतरावर गेल्यावर गाडी अचानका खड्यात आदळली . तशी गाडीची स्पीड कमी होत गाडी थांबली .
ये काय झालं रे गाडी का थांबली !
थांब बघतो म्हणत मोहित गाडीधून खाली उतरला .
" ओ शीट "
बघुया पुढील भागात