STORYMIRROR

Surekha Nandardhane

Others

3  

Surekha Nandardhane

Others

खेळ सावल्यांचा - भाग ७

खेळ सावल्यांचा - भाग ७

5 mins
141

     मागच्या भागात आपण बघितले . निखिल व जया मुलाला घेऊन दर्शनासाठी निघाले होते . त्या काळोख्या रात्री मुसळधार पावसात एका बाईची मदत करायला गेले व तिला गाडीत घेतले . काही वेळाने अचानक त्याची नजर समोरच्या आरशात गेली .तेव्हा ती बाई त्या आरशात दिसत नव्हती .या गोष्टीने निखिल घाबरला व गाडीचे ब्रेक लावताच अपघात झाला .

 _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ 


        दोन दिवसानी जेव्हा निखिल ला होश आला तेव्हा त्याने स्वतःला हॉस्पिटलमध्ये बेडवर बघितले .


   जवळ मित्र ही उभे होते त्यानी त्यांच्या जवळ जया व बाळाची चौकशी केली .


  मोहित त्याच्या जवळ गेला व धीर देत बोलत होता 

निखिल जया वहिनी ठीक आहे त्याची प्रकृती ही चांगली आहे तू काळजी करू नको .आम्ही सर्व आहोच .


  आणि माझा मुलगा !


   तो काही न बोलता शांतच राहिला .


   सर्व एकमेकांकडे बघत होते .


 "अरे मोहित .माझा मुलगा कुठे आहे तो ठीक तर आहे ना."


 सॉरी निखिल . तो आता या जगात नाही आहे .मध्येच विकास बोलला .


  त्याच्या दुःखाचा जसा बांधच फुटला तो जोरात ओरडून रडायला लागला .सर्व त्याला धीर देत होते .


     तिनेच मारले माझ्या मुलाला . त्याचा काय गुन्हा होता त्याला कसली शिक्षा दिली असे बोलत होता .


    जया ही त्याच्याकडे आली तीही रडत होती . जयाकडे बघून त्याने स्वतःला सावरले पण तो पूर्णपणे खचून गेला होता .


    "ती कोण ."? असे विकास ने त्याला विचारले पण तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता .


   दोन दिवसांपासून सर्व मित्र त्याच्या जवळ होते. निखिल बरं वाटत होते डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला . त्यांना घरी सोडवून दिले व एकमेकांची काळजी घ्या सांगत निरोप घेत आपापल्या घरी जायला निघाले .


       - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 


       अरे विकास मागच्या वेळेस निखिल आपल्याला काहीतरी सांगत होता पण जया वहिनी कडे बघून त्याने ते टाळले .


  बघू आता तो आपल्याला स्वतःहून काही सांगतो का . ये पण आपण त्याला त्याबद्दल काही विचारायचे नाही त्याला त्रास होईल .


     सकाळचे नऊ वाजले तेव्हा ते सर्व निखीलकडे पोहचले . जया त्यांचीच वाट बघत होती .निखिलच्या सर्व मित्रांना आलेले बघून जया ला ही हिम्मत आली .


    जया शी बोलत ते निखीलकडे गेले .

निखिल ला बघताच त्या सर्वांना वाईट वाटले . तो बराच कमजोर दिसत होता .


      ते जया ला निखिल बद्दल विचारत होते .

 

  गेले पंधरा दिवसापासून त्याला बरं वाटतं नाही . खूप ताप येतो . तो कशाला ही घाबरतो रात्रीला ही सोड मला असे काहितरी बदबडतो . तो मानसिक तनावखाली घुटमळतो काल त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .

 म्हणून घाबरून मी तुम्हाला बोलावून घेतले.


    हे ऐकून सर्वाना शॉकच बसला .


  तो खुप आशावादी आहे तरी असलं पाऊल उचलले म्हणजेच कोणते तरी दडपण नक्कीच आहे . असे मोहित 

बोलत होता .


     निखिल झोपलेला होता ते सर्व त्याच्या उठण्याची वाट बघत होते .

  

   थोड्या वेळाने त्याला जाग आली . सर्व सोबत बघून त्याला आनंद झाला .


 " गुड मॉर्निंग " काय रे कधी आलात तुम्ही ?


 आम्ही नऊ ला च आलो . तुझी झोपेतून उठायची वाट बघत होतो .


  काय रे काय झालं तुला असे मोहित ने त्याला विचारले .


  काही नाही म्हणत त्याने उत्तर टाळले .


  वहिनी तुम्ही घरी जाऊन थोडा आराम करा .आम्ही सर्व आहोतच निखिल जवळ .


   निखिल ने ही तिला घरी जायला सांगितले .

सर्वांच्या आग्रहावरून ती घरी गेली .


  इकडे पाचही मित्रांच्या गप्पा चालू झाल्या . एकमेकांची चौकशी झाली .विकास ने निखिल ला तब्येती बद्दल विचारले .


   निखिल खरं सांग . आमच्यापासून काहीही लपवू नको .अरे तुझी आणि जया वहिनीची आम्हाला काळजी वाटते रे . तू लांब असल्यामुळे भेट पण लवकर होत नाही .


    नाही मी तुमच्या पासून काहीही लपविणार नाही .


     अरे एक महिना अगोदर आम्ही दोघे बाहेर फिरायला गेलो . येताना हॉटेलमध्ये जेवायला गेलो . जेवताना माझी नजर शेजारच्या टेबलवर गेली तिथे ती कॉफी घेत होती .

मला वाटले मला भास झाला असेल म्हणून मी परत तिकडे बघितले तर तिने हात हलवत hii केले . मी थोडा घाबरलो व तिकडे दुर्लक्ष करत जया सोबत जेवत गप्पा करत होतो . पण अधून मधून माझं लक्ष तिकडे जायचं .


         जेवण करून आम्ही घरी आलो .पण माझ्या नजरेसमोर राहून राहून तिचा चेहरा यायचा .


  कसं शक्य आहे ? सुयोग मधेच बोलला .


    तुम्हाला हे सर्व खोटे वाटेल पण हे खरं आहे . त्यानंतर ती दोन तीन वेळा भेटली.ती लग्न करायला दबाव आणत आहे .काय करावं काही कळतच नाही .


      ये मला खुप भीती वाटते रे !


 ये तू याबद्दल जया वहीनी ला काही सांगितले का ?


    नाही रे .कसं सांगणार ती आत्ताच कुठे यश च्या दुःखातून सावरायला लागली . आणि परत हे !


     सर्वांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला ते एकमेकांकडे बघतच राहिले . त्यांना काय बोलावं सूचतच नव्हते .


    दहा दिवसा अगोदरचा तुम्हाला एक किस्सा सांगतो .असे निखिल म्हणाला .


   " ये बाबा मला तर जाम भीती वाटायला लागली ." मधेच अक्षय बोलला .


  तू पहिले पासून भित्राच आहे असे हसण्यावारी मोहित त्याला बोलला .


  सर्वांचे मन निखिलच्या बोलण्याने वेधून घेतले होते .


    निखिल सांगत होता. दहा दिवसांपूर्वी आमच्या साहेबांकडे नवीन बंगल्याची पूजा होती .त्यांनी सर्व स्टाफ मेंबरला आमंत्रित केले होते .


   ऑफिस सुटल्यावर त्यांच्याकडे जायचं असे आम्ही सर्वांनी ठविले .


     ऑफिस मधून सुट्टी झाल्यावर आम्ही सर्व त्यांच्या कडे जायला निघालो . त्यांनी त्यांच्या गावाला शेतीत बंगला बांधला होता . ते लांब असल्यामुळे आम्हाला जायला थोडा वेळच झाला .


    थोडा निवांत वेळ व सर्व एकत्र मिळाले यामुळे थोडा गप्पां रंगल्या . वेळ कधी निघून गेला कळलेच नाही . मग जेवण करून साहेबांचा निरोप घेत आम्ही घरी जायला निघालो .


    काहींचे घर जवळ होते तर कोणी जवळच्या मार्गाने गेले माझे घर लांब असल्यामुळे मी एकटाच मागे राहिलो .


      रात्रीचे साडेबारा वाजले होते जया वाट बघत असेल म्हणून मी थोडी वेगानेच गाडी चालवीत होतो .तितक्यात….


    - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 


Rate this content
Log in