STORYMIRROR

Surekha Nandardhane

Others

3  

Surekha Nandardhane

Others

खेळ सावल्याचा (भाग 3)

खेळ सावल्याचा (भाग 3)

3 mins
129

     मागच्या भागात बघितले सुयोग च्या दारात रात्रीला पावसात भिजलेली एक स्त्री उभी आहे व ती रात्र भर राहू द्या अशी विनवणी करत आहे .


          मी . मी अनामिका असे नाव सांगत ती आत आली . वेदिका तिला रूममध्ये घेऊन गेली व कपाटातील एक साडी काढून दिली . अनामिका तू खुप भिजलेली आहे कपडे बदलून घे .


      अनामिका ने वेदिका ची साडी घातली व केस पुसत ती बाहेर आली.


  वेदिका ने तिला जेवायला दिले .


   अनामिका वेदीकाची साडी घालून केस पुसत जेव्हा ती बाहेर आली तिला पाहून सुयोग चे तर होशच उडाले . तिचे ते लांब मोकळे केस तिचे सोंदर्य अजूनच खुलवत होते .

सुयोग तिच्या कडे बघून मोहित होत होता . तिचा चेहरा त्याच्या नजरेतच भरला होता .


    अधून मधून अनामीकाची ही नजर त्याच्या नजरेला भिडायची .


     ताई तुम्ही मला आसरा दिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे . नाही तर ईतक्या रात्री मी कुठे गेली असती .


  अग आपण माणूसच ना मग एकमेकांना मदत करायला च हवी . तू काळजी करू नको अगदी निसंकोचपणे आपलं घर निवांत राहा .


   वेदिका तिला तिच्याबद्दल माहिती विचारत होती .

  " काय ग कुठुन आलीस तू . ईतक्या रात्री एकटीच का तुझ्यासोबत घरचे कोणी आले नाही का ? "


   "ताई . मी गावोगाव फिरत काम करत पोट भरते . माझं या जगात कोणीच नाही . माझंही लग्न झाले होते माझा पण सुखी संसार होता .परिवार तसा मोठा होता पण त्यातील सर्व लोक खुप चांगली होती . पण म्हणतात ना नशिबात काय असते ते कोणालाच माहीत नसते ."


      एकदा माझे आई वडील बाहेर जात असताना त्यांचा अपघात झाला व त्याना आपला जीव गमवावा लागला . त्यानंतर काही दिवसांनी माझ्या घरातील लोक मला त्रास देऊ लागले . कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते भांडण करत . एक दिवस माझ्या पतीने घरातून काढून दिले . तेव्हापासून मी असेच इकडे तिकडे काम करून पोट भरते .


   बरं असू दे तू काळजी करू नको निवांत झोप असे म्हणत वेदिकाने तिला अंथरूण टाकून दिले व ते दोघे आपल्या रूममध्ये निघून गेली .


    बिचारी कसं आयुष्य काढणार ही ती जवान आहे त्यात तिला कुणाचाच आधार नाही . असे सुयोग आणि वेदिकाचे बोलणे चालू होते आणि अनामिका त्यांचे हे बोलणे आडोश्याला उभी राहून ऐकत होती .


    किती चांगले लोकं आहे हे दुसऱ्यासाठी किती चांगला विचार करतात .मी अनोळखी असून सुद्धा त्यांनी मला घरात घेतलं आधार दिला . जसं त्याचं घर मोठे आहे तसेच त्याचे मनही .


         वेदिका झोपली पण सुयोग ला झोप येत नव्हती . त्याच्या डोळ्यासमोर सारखी अनामिका दिसायची .पहिल्याच नजरेत बसलेल तिचं सौदर्याने तो दंग झाला होता .


   तो इकडून तिकडे सारखा कळ पलटत होता ईतक्या सुंदर स्त्रीला तिचा नवरा कसा सोडू शकतो . तिला देवाने भरभरून सौदर्य दिलं कुठेच काही कमी नाही .असा विचार सारखा त्याच्या मनात यायचा .


      त्या दोघीही झोपल्या पण त्याला झोप येत नव्हती त्याच्या नजरेसमोरून अनामिका जात नव्हती .


       मध्यरात्र उलटली व सुयोगला झोप लागली त्याला पण चांगलीच गाढ झोप लागली .


     त्याच्या पोटावर हात टाकला तसे त्याने झोपेतच तो हात बाजूला केला परत थोड्या वेळाने आपल्या केसात कोणी हात फिरवत आहे असे जाणवले भास होत आहे असे वाटले व त्याने कळ पालटला . थोडया वेळाने आपल्या चेहऱ्यावर कोणी हात फिरवत आहे असे जाणवताच त्याने डोळे उघडले व ताडकन उठून बसला.


    हात बाजूला करतच तो घाबरून बोलला "तू " .……

(क्रमशः)


Rate this content
Log in