खेळ सावल्यांचा ( भाग ११)
खेळ सावल्यांचा ( भाग ११)
खेळ सावल्यांचा (भाग ११ )
मागील भागात आपण बघितले . गाडीचा टायर पंक्चर झाला व जवळपास कुठेही दुकान नव्हते . त्यामुळे त्यांना विकासच्या मावशीकडे थांबावे लागले. शेजारच्या जोशी काकांच्या घरातून चहाचा सुगंध व कसला तरी आवाज येत आहे. त्यांच्या घरात कोण आहे म्हणून विकास व त्याचे मित्र मागच्या खिडकीतून डोकावत आहे .
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * ? * * * * *
विकास ने मागच्या खिडकीतून डोकावून बघितले तर दाराला भले मोठे कुलूप होते व त्या दारावर जाळे व खुप धुळ साचली होती .
अरे विकास दाराकडे बघून असे वाटते की खुप दिवसापासून कोणी दारच नाही उघडले मग घराच्या आत कोणी कसं गेलं असेल.
सर्वांची नजर जोशी काकांच्या दाराकडे होती .बघुया कोण येत आतून त्यांना जास्त वाट पहावी लागली नाही . अवघ्या पंधरा मिनिटात एक मुलगी बाहेर आली व सरळ जायला लागली .
" केतकी " सर्वांच्या तोंडुन एकच शब्द बाहेर आला व तिच्याकडे ते बघतच होते .केतकी मात्र सरळ चालत होती .
केतकी , ये थांब जर सुयोग ने तिला आवाज दिला पण ती मागे वळून न बघता निघून गेली .
ये आपण तिला किती शोधले पण ती आपल्याला कुठेच भेटली नाही आणि आज दहा वर्षानंतर अचानक आपल्या समोर आली.
हो ना ती आता कुठे असते काय माहित. आणि तिने माझा आवाज ही ऐकला नाही .
- - - - - - - - - - -- -- --- - - -- -- - -- - - - ---- - - - -
हे पाचही मित्र जेव्हा रायगला गेले होते तेव्हा तिथे त्यांची भेट केतकी सोबत झाली .काही दिवस हे सर्व केतकी कडे थांबले होते त्यामुळे त्यांच्यात छान मैत्री जमली होती ।हे तिच्या घरी असताना केतकी ने त्यांना खुप मदत केली होती .
रामगड हे छोटे गाव होते . तिथे सातवी पर्यंत शाळा होती .त्यामुळे पुढचे शिक्षण घेण्यासाठी केतकी गावापासून लांब शहरात गेली होती . ती सुट्टी मध्ये गावी यायची .
केतकी ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती .घरची परिस्थिती थोडी नाजूक होती . तरीही तिचे वडील कष्ट करून मिळालेला पैसा केतकी च्या शिक्षणाला लावत . केतकी ला ही तिच्या वडिलांच्या परिस्थितीची जाणीव होती. तिचे कॉलेज सकाळचे होते . आपल्या वडिलांना मदत होईल म्हणून ती पार्ट टाईम जॉब करायची . व अभ्यास ही खुप चिकाटीने करायची .
केतकी कॉलेजमध्ये असताना तिचे शिवम नावाच्या मुलासोबत प्रेम झाले .शिवम हा चांगल्या घरचा मुलगा होता घरची परिस्थिती ही चांगली होती . त्याला एक बहीण भाऊ होते . शिवम हा त्यांच्या घरातला मोठा मुलगा होता. तो केतकी पेक्षा दोन वर्षाने सिनियर होता . त्याचं एकमेकांवर खुप प्रेम होतं . शिवम चं कॉलेज संपल्यानंतर तो वडिलांना बिझनेस मध्ये मदत करायचा .
केतकी ला रविवारी सुट्टी असायची . सुट्टीच्या दिवशी भेटायचे असे त्यांचे दोघांचे ठरलेले होते .त्या दिवसाची ते दोघेही वाट बघत असे .
ऐका रविवारी ठरल्याप्रमाणे ते दोघेही भेटले . त्त्यांच्या गप्पा चालू होत्या . बोलता बोलता केतकीने शिवमला प्रश्न केला .
शिवम तू तुझ्या घरी आपल्या रिलेशनशिप बद्दल सांगितले का ?
नाही ग . जमलेच नाही पण वेळ आली की नक्कीच सांगील .
शिवम माझं हे लास्ट ईअर आहे . आणि शिक्षण झाल्यावर माझे वडील माझे लग्न करून देणार म्हणून त्याआधी तू हे तुझ्या घरी कळव .
हो ग थांब जरा . मी का पळून जाणार आहे का! मला थोडं सेटल होऊ दे .
अरे तू तर आता सेटलच आहे ना . तू तुझ्या पप्पाचा बिझनेस सांभाळतो . आणि तसेही आपल्या रिलेशनला चार वर्षे झाली . किती दिवस थांबणार . आता आपण लवकर लग्न करूया .
ये माझ्यावर विश्वास ठेव .आपण लवकरच लग्न करूया असे म्हणत शिवमने केतकीच हात हातात धरून थोडा रोमँटिक नजरेने तिच्याकडे बघत होता .
ते दोघेही एकमेकांच्या नजरेत बघत प्रेमसगरात हरवून गेले .
तितक्यात शिवमच्या फोनची रिंग वाजली व दोघेही प्रेमपंछी प्रेमसगरातुन बाहेर आले ……क्रमशः
शिवम केतकी सोबत लग्न करेल का? सुयोग व विकास ची केतकी सोबत भेट होईल का बघुया पुढील भागात.
