खेळ सावल्यांचा ( भाग ८ )
खेळ सावल्यांचा ( भाग ८ )
आपण मागे बघितले होते सुयोग निखिल ला भेटायला मित्रांसोबत त्याच्या गावी गेला .घरी वेदिका जवळ त्याने अनामिकाला थांबवले होते .
अनामिका बहिणी सारखी वेदीकाची काळजी घेत होती .काय हवं काय नको ती बघत होती . तिला कोणतेही काम करू देत नसे .
अग अनामिका तू माझी किती काळजी घेते ग ऐका बहिणी सारखी . बरं झालं तू थांबली माझ्या सोबतीला नाहीतर मी एकटे खुप बोर झाले असते .
आता मी आहे ना नको काळजी करू .
अनामिका ही चांगलीच रुळली होती. वेदिका ने तिला परकेपणाची जाणीव होऊ दिली नाही .
अनामिका तू आता इथेच थांब . माझी डिलिव्हरी होईल मला पण मदतीची गरज आहे आणि तुला ही आसरा मिळेल .
मी राहील पण अगोदर सुयोग ला विचार . मी इथे राहिलेली कदाचित त्याला नाही आवडले तर !
तसं नाही ग तो मनाने खुप चांगला आहे .तो कधीच नाही म्हणणार नाही .
खुप नशीबवान आहे तुला सुयोग सारखा समजदार नवरा मिळाला .
हो मग "आय एँम लकी " म्हणत वेदिका तिचे प्रेम व्यक्त करत बोलली .
तशी सुयोग ची मावशी येणार आहे . तुला पण त्यांची कामात मदत होईल .
बरं म्हणत अनामिका किचनमध्ये निघून गेली .
वेदिका ला कधी कधी घरात वेगवेगळे भास व्हायला लागले. कधी तिच्या सोबत घरात वावरताना तर कधी आपल्यावर कोणी नजर ठेवत आहे असे तिला सारखे वाटायचे .
या अगोदर तर कधीच असे जाणवले नाही . आणि आता असे भास का होतात .
सुयोग ला फोनवर न सांगितलेले बरे नाही तर तो उगाच काळजी करत बसेल . आणि तो दोनच दिवसासाठी गेला आहे आल्यावर सांगेल तशी अनामिका आहेच सोबतीला .
इकडे निखिल सोबत काय झाले हे जाणून घ्यायची सर्वाना उत्सुकता लागली .
सर्वांचे लक्ष निखिलच्या बोलण्याकडे होते तो सांगत होता
मी त्यादिवशी वेगाने गाडी चालवत होतो तितक्यात पाठीमागून एक गाडी आली त्यावर दोन तरुण बसले होते .त्यांनी जवळ गाडी आणत त्यातला एक जण " so beautiful " म्हणत ते निघून गेले मी त्यांच्याकडे बघितले व त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गाडी चालवीत होतो.
थोडया वेळाने परत दुसरी गाडी आली . तो जवळून जाताना "so Sweet " बोलला व समोर जात असताना मागे वळून बघत होता . मला त्या गोष्टींचा राग आला मी त्यावर ओरडलो पण तो निघून गेला .
मी घरी जायच्या घाईत त्यात हे असले नमुने भेटले जे माझ्याकडे बघत असले कमेन्ट करत होते .
मला हे असे का बोलत आहे म्हणून मी गाडीच्या आरशात माझा चेहरा बघितला . तो ठीकठाक च होता मग हे असे का बोलले असावे असा विचार करत होतो तितक्यात मागून एक गाडी आली त्यावर माझ्याच वयाचा एक व्यक्ती होता . तो मला काहीतरी बोलला पन मला ते ऐकलं नाही व स्पीड वाढवत समोर निघून गेलो .
त्याने ही गाडीची स्पीड वाढवत तो माझ्या गाडीच्या समोर येऊन थांबला .
" अहो तुमच्या मिसेस ला साडीचा पदर वर घ्यायला सांगा तो चाकात जाईल . " असे बोलून तो निघाला .
हे ऐकून मी त्याच्याकडे बघतच राहिलो 'माझी मिसेस ' म्हणून मी मागे वळून बघितले तर गाडीवर कोणीच नव्हते .
त्याच्या बोलण्याने मनात नाही त्या कल्पना यायला लागल्या . या अगोदर दोघे असेच काही बोलून गेले . त्यांनी आपल्या गाडीवर कोणी तरी बघितले असेल . माझ्या मनात जास्तच भीती भरली मी गाडी जोरात घेऊन त्याला ओव्हरटेक करात होतो .
त्याच्या गाडीवर एक स्त्री बसलेली होती आताच तर त्याच्या गादीवर कोणीच नव्हते मग ही कुठून आली . आणि ईतक्या रात्री पायी चालणारे दूरदूर पर्यंत कोणीच दिसत नव्हते .
मी तिच्याकडे बघितले ती खुप सुंदर दिसत होती तिचे ते लांब केस मनात भीती असूनही मी तिच्याकडे बघतच होतो .तिनेही माझ्याकडे बघितले व खुप गोड स्माईल देत हात हलवत बाय करत होती . मी तिच्याकडे निरखून बघत होतो तर ती सुंदर स्त्री ' तीच ' होती .
मी ईतका घाबरलो की गाडी ओव्हरटेक करत पुढे निघून गेलो .
निखिलच्या या बोलण्यावर त्याचे मित्र विश्वास करेल का बघूया पुढील भागात ………
