STORYMIRROR

Surekha Nandardhane

Others

3  

Surekha Nandardhane

Others

खेळ सावल्याचा (भाग 2 )

खेळ सावल्याचा (भाग 2 )

2 mins
220


     सुयोग घरी पळत आला तो दारातून च आवाज देत होता . " वेदिका . वेदिका लवकर बाहेर ये .

   

    सुयोग ची हाक एकताच वेदिका बाहेर आली .


  अरे सुयोग काय झालं तुला ! तू ईतका का घाबरला .

बघ तुला किती घाम आला . असे बोलत वेदिका सुयोग जवळ गेली व त्याचा घाम पुसू लागली .


    सुयोग अरे बोल ना काहीतरी तू बोलत का नाही .


 सुयोग अजूनही घाबरलेला होता त्याच्या चेहऱ्यावर कसलीतरी भीती दिसत होती तो अजूनही जोरजोरात श्वास घेत होता .


     सुयोग घाबरलेला पाहून अनामीकाने एक ग्लास पाणी आणले सुयोग अगोदर पाणी घे म्हणत तिने ग्लास त्याच्या हातात दिला . त्याने अनामिका कडे एक नजर बघितले तसाच त्याच्या हात थरथर कापत होता व हातातून ग्लास ही खाली पडला .


    वेदिका कडे पाहून त्याने स्वतःला थोडे सावरले .

  आपण रात्री काय बघितले हे वेदीकाला सांगायचे असा विचार त्याच्या मनात आला त्याने तिच्याकडे बघितले .

  

  नको . आपण वेदिका काहीही सांगायचे नाही ती घाबरेल

तिला व बाळाला त्रास होईल असा  मनाशी ठरवत तिला काहीही कळू द्यायचे नाही असा निर्णय घेतला .


    सुयोग सांग ना रे काय झालं ? वेदिका ने परत प्रश्न केला .

  काही नाही ग . नजर चुकवत तो बोलला .

  

      अनामिका त्याच्याकडे एकटक बघत होती . त्याची नजर एक होताच ती त्याच्याकडे बघत मिश्किल पणे हसायची . तो मात्र नजर चुकवत होता .


  •    •   •    •   •   •   •   •   •   •


      त्या दिवशी सुयोग ला घरी यायला खुप उशीर झाला होता .


  " सुयोग किती र

े उशीर केला आज. मी केव्हाची वाट बघते आणि त्यात पावसाचे वातावरण झाले म्हणून थोडी जास्तच काळजी वाटत होती .


  हो ग . आज थोडं जास्त काम होतं ऑफिसमध्ये त्यामुळे वेळ झाला .

   

  बरं चल मी फ्रेश होतो तू जेवायला घे .


   दोघेही जेवायला बसले गप्पा करत दोघेही जेवत होते .


" ओ हो . या लाईटला पण आताच जायचे होते का .


   अग बाहेर पाऊस चालू झाला त्यामुळे कदाचित लाईट गेली असेल . थांब मी मेणबत्ती घेऊन येतो .


  सुयोग ने मेणबत्ती पेटवली व ते एक प्रकारच्या कँडल लाईट डिनर चा आस्वाद घेत होते .


   तितक्यात दारावरची बेल वाजली . रात्रीचे साडेदहा वाजले होते .  ईतक्या रात्री कोण बरं आलं असेल ?


      सुयोग हातात मेणबत्ती घेऊन दारात आला व दरवाजा उघडला .दारात एक स्त्री उभी होती . ती पावसात पूर्ण भिजली होती तिचे ते लांब ओले केस चेहऱ्यावर आलेली ती एक बट तिचे ते पाणीदार डोळे एकदम मोहित करणारे होते . पावसात भिजल्याने तीच सोंदर्य अजूनच उठून दिसत होते .तो तिला क्षणभर पाहतच राहिला .

 दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते .


 अरे सुयोग कोण आहे दारात म्हणत वेदिका मागून आली तसा सुयोग थोडा दबकला .व लगबगीने विचारले 


  कोण आहे तुम्ही . कुठून आल्यास काय हवंय तुम्हाला?

  

   मी रस्ता चुकले व बाहेर खूप पाऊस आहे त्यामुळे मला आजची रात्र इथे राहू द्या मी सकाळी निघून जाईल .


  बघ वेदिका . तुझी काही हरकत नसेल तर त्यांना आजची रात्र आपल्याकडे राहू दे .


  ठीक आहे म्हणत वेदिकाने तिला आत घेतले पण तिची ती कटाक्ष नजर अजूनही सुयोगच्या चेहऱ्यावर रोखून होती .


      *    *    *    *    *   *

(क्रमशः)


Rate this content
Log in