खेळ सावल्यांचा ( भाग ५ )
खेळ सावल्यांचा ( भाग ५ )
कामावर सुयोगच अजिबात लक्ष लागत नव्हते .त्याला वेदीकाची काळजी वाटत होती म्हणून त्याने ऑफिस मधून सुट्टी घेऊन लवकर घरी गेला .
- - - - - - - -
सुयोग दार वाजविणार तितक्यात दार उघडले . अनामीकला दार उघडताना बघताच सुयोग बोलला .अरे वा मी दार वाजवायच्या अगोदर तुम्हाला कसे कळले . ती त्याच्याकडे बघत हसली .
वेदिका ला आवाज देत तो घरात गेला .
आज तू लवकर घरी आला .
हो ग आज थोडं अस्वस्थ वाटत होते म्हणून सुट्टी घेऊन घरी आलो .
ये तूला बरं वाटत नाही का ?
हो ग मी ठीक आहे सुयोग बोलत रूममध्ये गेला .
वेदिका ने चहा बनविला . एक कप अनामिका ला देऊन सुयोग व तिच्यासाठी चहा घेऊन रूममध्ये गेली .
दोघेही चहा घेत बोलू लागले . सुयोग ने वेदिका ला विचारले अनामिका अजून गेली नाही का !
अरे तिला ताप होता म्हणून मीच बोलले बरं वाटल्या शिवाय जाऊ नको .
तिला बरं नाही ती कुठे भटकेल म्हणून मीच थांबऊन घेतले .
अच्छा बरं केलं तिला थांबवून .माझी बबडी खुप समजदार आहे सुयोग तिचे गाल धरत रोमँटिक मुड मध्ये बोलत होता .
ये आज छान गरमागरम भजी बनविते का . बाहेर थोडा गारवा आहे म्हणून खावीशी वाटली .
हो बनविते ना .
त्या दोघांचे बोलणे अनामिका ऐकत होती .ताई तुम्ही बसा गप्पा करत भजी मी बनविते .
आग तुला बरं नाही भजी मीच बनविते .
नाही हो ताई तुम्ही बसा आज माझ्या हातची भजी खाऊन बघा असे बोलत ती किचनमध्ये गेली .
इकडे सुयोग आणि वेदीकाच्या छान गप्पा रंगल्या होत्या . त्यासोबत अनामिका ने बनविलेले भजी होते सोबतीला .
तितक्यात मोहित चा फोन आला .
हॅलो . हा बोल ना मोहित कशी काय आठवण केली .
अरे एक ना आपल्याला इगतपुरी ला निघायचे आहे .
का रे काय झालं!
निखिल ची तब्येत जास्त शिरेस आहे . ज्या वहिनी एकट्याच आहे व त्या खूप घाबरल्या आहे .त्या आता कुठे दुःखातून सावरू लागल्या होत्या आणि आता निखिल ची तब्येत बघून त्यांनी धिरच सोडला .
तू विकास व अक्षय ला फोन कर मी आवरुन येतोच तिकडे .
असे बोलत सुयोग ने फोन बंद केला व आवरायला लागला .
आवरत असताना तो वेदीकाशी बोलत होता .निखिल च्या तब्येतीबद्दल तो तिला सांगू लागला .
हे बघ आम्ही सर्व निखिल कडे निघालो आहे परत यायला निदान दोन दिवस लागेल . पण तू स्वतःची काळजी घे जास्त कामे करू नको आणि हो अनामिकाला थांबून घे तुला सोबत होईल त्यामुळे मला जास्त काळजी वाटणार नाही .
तू निश्चित जा माझी काळजी करू नको आणि हो कितीही घाईत असला तरी मला कॉल करायला विसरू नको .
हो मी तसा प्रयत्न करेलच .
अनामिका तिथे जवळच उभी होती . सुयोग अनामिकाला ही वेदिकाची काळजी घ्यायलासांगत होता .
तुम्ही नका काळजी करू मी घेईल वेदीकाची काळजी .
वेदिकाला बाय करत सुयोग निघाला . वेदीकाच्या मागे अनामिका ही उभी होती तिने ही हात हलवत त्याला बाय केले .
सुयोग . विकास . मोहित .अक्षय व निखिल हे शाळेपासून खूप जीग्री मित्र होते . खुप घट्ट मैत्री होती त्यांच्यात .
शाळेपासून ते कॉलेज पर्यंत त्यांनी सोबत शिक्षण घेतले
सुयोग आणि विकास एकाच ऑफिस मध्ये कामाला होते .
बाकी वेगवेगळ्या फिल्ड मध्ये कामाला होते निखिल मात्र सर्वांपासून लांब होता . पण त्यांच्यातली मैत्री प्रेमअजूनही कमी झाली नव्हते .
ते चौघे ही निखिल कडे निघाले ड्रायव्हिंग मोहित करत होता . मोहित ड्रायव्हिंग करण्यात तरबेज होता कुठल्याही लांबच्या प्रवासात तोच गाडी चालवत असे .
त्यांचे चौघांचे बोलणे चालू होते . काही महिन्यांपूर्वी कार अपघात मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा गमावला होता .
निखिल च्या म्हणण्यानुसार त्या अपघाताला कारणीभूत ती महिलाच होती .
निखिल व त्याची पत्नी जया आपल्या मुलाला घेऊन देवीच्या दर्शनासाठी चालले होते . गावाच्या बाहेर निघाल्यावर त्यांना हायवे लागला .
रात्रीची वेळ व पाऊस चालू असल्यामुळे रस्त्यावर एखादी गाडी धावायची .
रात्रीच्या काळोखात निखिल ही गाडी वेगाने चालवत होता . त्याने अचानक गाडीचा ब्रेक लावला ……
(क्रमशः)
