STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Action

3  

AnjalI Butley

Abstract Action

काळजी घे

काळजी घे

3 mins
428

सण जवळ आला की आनंदाला उधान येत, हे करू की ते करू असे होत! 

आपले सण आजकाल जाहिराती, खोट्या प्रतिष्ठेत कधी गुरफटून गेले ते कळलेच नाही! 

घरी केलेल्या फराळाच्या वस्तू, आकाश कंदिल, किल्ले, दारा समोर काढलेल्या मोठ्या रांगोळ्या, घराला रंग रंगोटी, फुलांचे हार, तोरण.. फटाके वाजवणे,  कसे सगळे छोट्या जागेत पण मनापासून आनंद घेत साजरे केले जायचे! 

गावाला जाणे, नातेवाईकांसोबत सण साजरे करणे, मज्जा होती!

घरातली मोठी माणसे, काळजी घ्या हे आशीर्वादा सोबत आवर्जून सांगत असे.

आता कामाच्या गडबडीत सगळे विस्मरणात गेले असले तरी मायेने सांगितलेला सल्ला 'काळजी घ्या' मनाच्या कोपऱ्यात जागृत आहे.

आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, तो सांभाळणे खूप महत्वाचे, चालता चालता मोबाईल हिसकावून चोरी करणारे खूप! काळजीपूर्वक आपला मोबाईल सांभाळा हे सर्वांसाठीच लागु होणारा नियम!

साखळी चोर, आजीबाईंना लक्ष्य करतात कारण त्यांच्या सोन्याच्या पाटल्या, साखळी, मंगळसूत्र किंमती असते व सहज चोरता ऐते, जास्त महिनत न घेता!

विज, लाईटिंगचा झगमगाट टाळता आला तर बरा असेच आता म्हावसे वाटते मला.   या अतिरिक्त वीज वापरामुळे वारंवार घरातली वीज जाते शॉर्टसर्किटमुळे अपघात होतात! एखादा असा अपघात झाल्यास घाबरून चुकीचे पाऊल उचलणे एखाद्यास महागात पडत. म्हणून. प्रथमोपचाराचे धडे मधून मधून आपण घेत रहाणे महत्वाचे!  कोणी वेळेवर मदतीला धावून येतीलच असे नाही.  

मी पहिले, मी पहिले करत रस्त्यावर चारचाकी गाडी चालवु नका असाही सल्ला मी द्यायला मागे पुढे पहात नाही,  शेवटी आपणच 'अपघात टाळा' हे सांगतो तर सुरवात आपल्यापासून करणे महत्वाचे, हो की नाही!  महागड्या अति सुविधा असलेल्या चारचाकी गाड्या हातात पडल्यामुळे रस्ता गाड्यांधारकांसाठीच आहे असे वाटत पण पायी चालणारे पण टॅक्स भरतात,  त्यांना मान देणे महत्वाचे असते,  दिवाळीची खरेदी केलेल्या पिशव्या त्यांच्या ही हातात आहेत.  तर सांभाळून चारचाकी चालणारे,  असे मी मनात सर्वांना सांगत सुटते! 

देखावा, दिखाऊ करणारे पाहिले की परत मी माझ्घयाच मनाला समजून सांगत असते,  घरी दिवाळी, सण साजरे करा, बाहेर गावी बाहेरच्या देशात जावून साजरी करण्यापेक्षा! आपले घर, मन एका छोट्याश्या पणतीने उजळू द्या! वर्षभर त्याची उर्जा मनाला कशी प्रसन्नता देते ते अनुभवा व दुसऱ्यांना अनुभवण्यासाठी प्रेरित करणे,  मम तसे आनंद वाटणे नं !

असे मोलाचे सल्ले देणारे बाबा आता नाही, पण त्यांच्या आठवणी नेहमीच सोबत असतात!

हिरमिसून मग दिवाळीत काय करायचे करत एकदा गावा बाहेरच्या आजी आजोबाच्या वृद्धाश्रम महाल मध्ये गेले. जवळपास ३० आजी व २० आजोबा आपल्या मुल नातवांची वाट पहात होते, येतील दिवाळीला सोबत घरी घेऊन जातील ह्या आशेने पण नेहमी प्रमाणे कोणी आलेच नाही, मी जाताच दबक्या आवाजात एक आजी समोर आली व विचारपुस केली कोणाला भेटायला आला म्हणून, कोणत्या सरकारी ऑफिस कडून आलास आहे का वैगरे, मी नाही म्हणताच मग कशाला आला.

मी सहज आलो, तुम्हाला भेटायला, नक्की काय करायचे हे कळले नाही म्हणून भेट वस्तू, कपडे, दिवाळीचा फराळ वगैरे काही आणले नाही, पण तुम्ही मला इथे एक-दोन दिवस सोबत राहायला दिले तर आपण आनंदात राहु! सोबत हा महाल सजवु, दिवे लावु, अंगणातील फुल झाडांचा वापर करत तोरण बनवु, आजी तुमच्या बरोबर रांगोळी दारापुढे काढू!


आजी पहिले थोड्या रागवल्या, मग म्हटल्या आमच्या जवळ, फराळाचे करायला, रांगोळी काढायला सामान नाही,

मी म्हटले सामान आणू की. 

लांबून आमचे बोलणे एकणारे दोन- तीन आजी आजोबा समोर आले. त्यांना ही कल्पना आवडली, दुःखी राहण्या पेक्षा करू की सण साजरा, ते माझ्या सोबत खरेदी करायला जवळच्या बाजारात यायला तयार झाले.

पाचच मिनिटात आनंदी वातावरण तयार झाले,

तीन आजी, दोन आजोबा व मी असे सहा जण बाजारात जाऊन लागेल ते सामान आणले, यादी तयार न करताच!

मग काही राहले आणायचे तर त्यावर दुसरा काय उपाय असेल ह्यावर चर्चा रंगली, एक आजी खूप दिवसांनी बोलल्या म्हणून सगळे टाळ्या वाजवत होते!

तेवढ्यात घरातली विज गेली, काय मेल्याला आताच जायच होते, परत हशा! 

स्वयंपाक घरात काम करणार्या आजींनी पटापट नविन आणलेल्या पणत्या लावल्या व घरात एक छान मंद प्रकाश तयार झाला! 

एका आजोबांनी लागलीच एक कविता सर्वांना एकवली!

जेवण तयार झाले होते व  गरम गरम जेवण करण्यासाठी छान पंगत बसली. एकमेकांना वाढत छान गोलाकार बसत, हसत खेळत खूप दिवसांनी सर्वजण एकत्रित बसून जेवण करत होते! 

जेवण झाल्यावर गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळत जागरणच केले सर्वांनी,  उशिर होतो झोपायला,  मी झोपतो वैगरे विसरू सगळे! 

माझी परतण्याची वेळ झाली, मी निरोप घेत परत आपल्या घरी निघालो, सोबत आनंद घेऊन! आनंद देणारे आजी आजोबा गहिवरले होते! अधुन मधून येत रहा, आम्हीपण तुझ्याकडे येत राहु! काळजी घे रे स्वःताची, एकासुरात त्या आजी आजोबांनी म्हटले!

खूशीतच मी घरी परतलो! व 'काळजी घे' हे शब्द मनात परत साठवले! 'काळजी घे' स्वतःची व आपल्या ओळखीच्या व नओळखींच्याची पण हे मनात पक्के कोरले गेले माझ्या मनात! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract