सन्मान
सन्मान


तुम्ही भारतातुन आला, हुशार असतात तुम्ही लोक, संगणक ज्ञान तुमचे अधाग आहे! पण.. पण तुम्हाला ..तुम्हाला करत गॅबी अडखळली! एक मुलगी, वर्कींग वुमन म्हणून जो पाहिजे तो सन्मान तुम्हाला कामाच्या ठीकाणी तुमच्या सहकार्यांकडून का मिळत नाही?
वैशालीला पण हे माहित होत पण, आपणच विशेष कष्ट, प्रयत्न केले नाहीतर आपल्याला कोणी विचारणार नाही, एक बाहुली म्हणून फक्त, पहिले आप पहिले आप करत राहावे लागणार.
गॅबीच्या बोलण्यामुळे वैशाली चिंतन करत होती.
गॅबी, जर्मनीची तीला तीच्या देशाचा अभिमान होता, बायकांना तीथे खूप मान होता. भारतीय बायकांच्या बद्दल चे तीचे मत संस्कृती जपणार्या, घरची चूल व मूल सांभाळणार्या, पती मरण पावलेल्यावर सती जाणार्या हेच चित्र तीच्या मनात बिंबवल्या गेले होते!
वैशाली जर्मनीच्या अॉफिसमध्ये, एक कुशल संगणक तज्ञ म्हणून गेली होती. ती तीचे काम उत्कृष्टपणे करत होती, पण तीचे स्वतःचे पुरूष सहकारी तीला पाहिजे तसा सपोर्टं करत नव्हते, मिटिंग मध्ये मुद्दाम तीला चिडवायच्या सुरात पहात होते!
गॅबी, वैशालीच्या बाजूने असायची, ती बाई आहे म्हणून नाही तर तीचे मुद्दे बरोबर आहे म्हणून.
एकदा गॅबी व वैशाली कामा निमित्त बोलत होत्या व बोलता बोलता आपल्या दोन देशातील विविधता व पारंपारीकतेच्या गप्पा मारत होत्या..
वैशाली अभिमानाने आपल्य
ा देशात कसे विविधतेत एकता आहे वैगरे सांगत होती, ती एकता कशी दिसते आम्ही साजरे करणार्या उत्सवातून! आम्ही बायका कसे ते जपतो, पुढच्या पिढीला कसे चांगलेच पोहचेल, संस्कार करतो!
चूल व मूल सांभाळण, कस सोप नसते! ती एक कला आहे! गॅबीला हे माहित नव्हते असा पॉजिटिव्ह विचार संस्कॄती जपण्यात आहे म्हणून.
गॅबी मग अधिकच वैशालीला सपोर्टं करत होती!
वैशाली परत भारतात यायला निघाली तेंव्हा तीने वैशालीचा सन्मान करण्यासाठी एक छोटी पार्टी आपल्या घरी ठेवली!
पार्टीत तीने वैशालीचा सन्मान केला व भारतीय महिलेंबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा बदलला हे सांगितले, तीच्या त्या छोट्या भाषणात तीने भारतीय पुरूष मंडळींना प्रश्न विचारला तुम्ही कधी आपल्याच महिला सहकार्यांचा सन्मान करणार?
सगळे विचार करायला लागले, विचारांची दिशा बदलली.. व तेपण आता वैशालीचा सन्मान तीच्यातील गुणांचा सन्मान करायला लागले!
विचारांची दिशा बदलली की तु पूरूष, तु महिला ह्या भिंती गळून पडतात व आपण एक देशवासीय आहोत, ह्याचा अभिमान जागृत होतो!
आपल्या मातृभूमीत हे बीज आपणच रूजवायला पाहिजे! शिकून, पैसे कमवून नाही तर आपल्या वर्तनातून एकमेकांना माणूसकीच्या नात्याने जपले पाहिजे, हिच आपली विश्व शिकवण, विश्वशांती जपली पाहिजे!
चला सन्माने, जगा जगु द्या!!!