ओळख
ओळख


मला ही आता सर्व ओळखतात, माझी स्वतंत्र ओळख आहे! मी पण कमवायला लागलो आहे! आता मला तुमची गरज नाही! तुमच एकायला आता मी कुकूल बाळ नाही! रमेश आता बरेच वेळा आई-बाबांशी भांडत असे! तो त्यांच ऐकत नसे!
रोज दारू पिऊन घरी यायचा, नोकरी करतो, मी पैसे कमवतो, त्या पैशांच मी काय करणार ते मी ठरवेल.. मित्रांनसोबत पैसे ऊडवेल कि अजून काही त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही...
रमेश हा आताच असा अचानक कमवायला लागल्यावर का बदलला हे रमेशच्या आई बाबांना कळत नव्हते. चांगला हुशार मुलगा नेहमी आपण सांगु तसे वागायचा, आई-बाबा मी मोठा झाल्यावर कमवायला लागलो की आपण असे करू तसे करू, खूप मज्जा करू, बाहेरच्या देशात फिरायला जाऊ वैगरे!
पण आताच का असे?
नविन असे काय घडले असा विचार करत होती आई...
तर तीच्या लक्षात आले, माझा भाऊ म्हणजे रमेशचा मामा घरी आलेला आहे. तो दारूडा आहे, घरी माझ्यासमोर दारू पित नाही, पण तो संध्याकाळी कुठे जातो ह्यावर लक्ष ठेवावे लागेल. मामाचे नाव विठ्ठल, विठ्ठल नाव आपल्या आई बाबांनी देवाचे नाव ओठी राहावे म्हणून ठेवले ह्याचे पण हा गाव उंडरणारा निघाला! असो मागच्या गोष्टी उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही.
आपण एक आई म्हणून रमेशवर चांगले संस्कार करण्यात कुठे कमी पडलो? काही समजत नाही, कोण कोणाचा मुलगा, दत्तक घेतला आणि वाढवला आहे. पण आपला स्वतःचा पोटचा म्हणूनच...
मनोरमाबाई रमेशची आई स्वतःला दोष देत होत्या. रमेशला दत्तक आहोत ह्याची काहीच माहिती नाही, पण हा विठ्ठल तर त्याला काही सांगणार तर नाही ना? मनोरमाबाईंना नविन घोर मनाला लागला!
मनात विचार आला व तो खराही ठरला..
रमेश पार भांबावून गेला होता. एक तर विठ्ठलमामाला तो पहिल्यांदाच भेटत होता. जास्त नातेवाईकांमध्ये ऊठबस नसायची! बाबांच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या राज्यात राहणे झाले! शाळापण सतत बदलत राहिल्या नविन गाव नविन शाळा मित्र! भरपूर मित्र परिवार, मी दत्तक मुलगा आहे हे फारच कमी लोकांना माहित होते!
तसे आई-बाबांनी कधीच आपल्याला काहीच कमी पडू दिले नाही, रमेश एका मुलीच्या प्रेमात पडला होता तेव्हा तीने ती दत्तक आहे म्हणून सांगितले होते, किती धक्का बसला होता आपल्याला. हो नाही म्हणायच्या आतच तीच्या वडिलांची बदली झाली व ती दुसर्या गावाला गेली व आपला संपर्क तुटला होता तीच्याशी..
मामा रमेशला अॉफिसच्या बाहेर भेटून त्याला थोडे बोलायचे करत बार मध्ये घेऊन बसायचे, त्याला मनोरमाबाई व रमेशचे
वडिल राजाराम बद्दल वाईटसाईट बोलून तू त्यांचा मुलगा नाही त्यांचा सर्व वारसाहक्क मला देणार, कारण मामाला ते हवे होते.. स्वकमाई करता येत नाही, आयत त्याला सर्व हवे होते!
मनोरमा बाईंना शंका आल्यावर पहिले त्यांनी विठ्ठल मामाला घरा बाहेर काढत गावाला पाठवले, मग.. मग लक्ष रमेशवर दिले!
मागच्या दोन-चार दिवसात काही घडलच नाही असे दाखवत रमेशकडूनच काढून घेतले, तो असा वेगळा का वागतोय, असे वागतांना त्यालाही त्रास होत होता, आईशी घट्ट मुलाचे नाते, प्रेम करणारे संबंध असल्यामुळे आईने त्याला जवळ घेत त्याला त्याच्याशी पहिल्यांदा पाहिले तेंव्हा पासून आजवरचा प्रवास उलगडून सांगितला, तु माझ्या कुशीतुन जन्मला नाही पण माझ्या दुधावर वाढला लहानाचा मोठा झाला, तुझे दुःखने खुपणे, लाड आम्ही म्हणजे मी व तुझ्या बाबांनी केले!काही तुला कमी पडू नये म्हणून खूप काळजी घेतली. तुला दत्तक़ घेतले हे सांगुन परके पणा नाही सहन होणार होता आम्हाला म्हणून नाही सांगितले... नकोरे आता आम्हाला दुर लोटू!
रमेशला त्याची चूक लक्षात आली, सांयकाळी अॉफिस मधुन येताना त्याने कॅडबरी आणली व घरी जेवतांना कुछ मिठा हो जाये करत हसत आई-बाबांना दिली! तीघांनी आनंदाने कॅडबरी खात, आनंदाश्रूंना वाट मोकळी करत, एकमेकांचे आभार मानले, रमेश आई-बाबांना म्हणाला, तुम्ही दत्तक घेतले नसते तर कदाचित मी जिवंतही नसतो, तुम्ही मला ओळख दिली मी तुमचाच आहे व राहणार, मामाचे व इतर कोणाचे काही एकणार नाही, तुम्ही वारसाहक्क दिला नाही तरी मी तुमचा मुलगा म्हणूनच जगणार, तुमची काळजी घेणार!
आई-बाबा काहीच बोलले नाही, त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले होते व बजावत राहणार होते! आता रमेशने कसे वागायचे हे त्याचे त्यानेच ठरवायचे होते!
काही दिवसांनी शेजारी नविन शहा फॅमिली राहायला आली होती, आई-बाबा त्यांना आधी ओळखत होतेच, त्यांची मुलगी सखी ही रमेशला ओळखते असे आईला कळले होते. म्हणून आई-बाबांनी त्यांना घरी एका शनिवारी जेवायला बोलवले होते.
रमेश व सखी एकमेकांना भेटल्यावर, एका वेगळ्याच आंनदी दुनियेत होते.
रमेशने सखीला लग्नाबद्दल विचारले व आपण ही दत्तक मुलगा आहोत हे सांगितले. दोघांच्याही आई-बाबांनी होकार दिला व रमेश सखीचे लग्न झाले!!
रमेश व सखीने ठरवले आपले स्वतःचे मुल झाले तरी एक मुलगी आपण दत्तक घेऊ व तिचा सांभाळ करू! दत्तक घेण्याचा वारसा पुढे चालू ठेऊन एक आदर्श आई-बाबा बनूयात व समाजात नवीन ओळख तयार करू!