AnjalI Butley

Abstract Thriller

4.3  

AnjalI Butley

Abstract Thriller

दूचाकी प्रवास

दूचाकी प्रवास

3 mins
170


गजबजल्या शहरात रहदारीत मार्ग काढत रमा काकू व माधव काका आपल्या दुचाकीने चालले होते. नेहमी प्रमाणे माधवकाका रहदारीचे सर्व नियम पाळत, हेल्मेट घालुन आपली दुचाकी हळू चालवत होते!

रमाकाकूपण देवदर्शनाला जायच म्हणून खूश व प्रसन्न होत्या..ह्याच दुचाकीवरन त्यांनी काकांच्यामागे बसून खूप प्रवास केला होता व करत होत्या.

चारचाकी पेक्षा शहरात कुठे जायचे म्हटले की दूचाकी बरी पडते! पार्कींग साठी लगेच सोय होते. गल्लीबोळातून पटकन काढता येते!


रमाकाकू मागच्या सिटवर बसून माधव काकांना आपल्या मनातील भावना सांगत होत्या... त्या तसे बर्याच वेळा ह्या रस्त्यावरून जातांना करत असे व त्या आठवणीने गलबलून जात.. 

बघान आपला हा शांत असलेला १०-१५ वर्षा पूर्वीचा घराजवळचा परिसर आता खूप गजबजला आहे नं, रस्त्याच्या दोन्ही बाजूला आधी कसे छान हिरवी झाडी, शेते होती, नदी संथपणे वाहत असे! 

पण आता...

सगळे सिमेंटचे जंगल.. एकमेकांशी स्पर्धाकरणारे मॉल, उंच इमारती..झाले आहे!

बांधकामामुळे रस्त्यावरच पडलेली दगडी, वाळू लोखंडी सळया, बांधकाम मजूर बसलेले.. त्यांची ती मोठी अवजारे, डंपर .. मोठी उंच  आभाळात फिरणारी क्रेन...

लोकांनी चालयचे कसे या रस्त्यावरून..


आधी कसे छान आरामात निसर्गाचा आनंद घेत आपण आपल्या दूचाकीने जायचो.. तेंव्हा नुकतच लग्न झाले होते व आपल्याला ह्या रस्त्यावरून जातांना छान वाटायचे! 


तसा हा नविन मोठा रस्ता नव्हता, ते ट्रफिक सिग्नल, पोलिस नव्हते..

काकापण गत आठवणीत रमले होते..

शहरा बाहेर घर यासाठीच तर घेतले होते आपण.. 

पण आता आपले घर दोन्ही बाजूने सिमेंटच्या जंगलात दडून गेले...

पायी रस्तापण ओलांडता येत नाही..

मागन येणारे भरवेगाने धावणारे वाहने कर्कश हॉर्न मारून काकाकाकूच्या पुढे चालली होती.. 

पण ते आपले वाहान सावकाश हळू चालवत पुढे चालत होते रस्त्याच्या कडेने!

तेवढ्यात एक बीएमडब्लू कार १५-१६ वर्षाचाच मुलगा कार चालवत होता व त्यात याची उनाड ४-५ मित्र मैत्रिणी होत्या, अचानक काकांच्या गाडी पुढे येत, ये म्हाता-या हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का, एवढ्या हळू चालवत आहे म्हातारीला घेऊन... आमचा रस्ता अडवत आहे, गाडी कशी आमच्या सारखी पळवायची ते शिक... हातवारे करत, मोठ्याने हसत पुढे गेले..

रमा काकूपण गोंधळल्या थोड्या ह्या उद्धट मुलांचे वर्तन बघून.. 

पण काकांनी हेल्मेट घातल्यामुळे मुलाचे बोलणे नीटसे त्यांना कळले नाही, फक्त ते उडानटप्पू मुले होते एवढेच ते काकूंना बोलले..

काकू एका चांगल्या शाळेत शिक्षिका असल्यामूळेे काका नेहमी काकूना म्हणत तूम्हीनं आजकाल शाळेत मुलांना चांगले वळण लावत नाही, संस्कारच करत नाही.. विषय शिक्षण व्यवस्थेकडे वळला..

रमा काकूंनी नेहमी प्रमाणे गप्प राहून ह्या विषयावर बोलणे टाळले! गाडी चालवतांना हा विषय नको..

काकांना काकूंचे गप्प राहणे समजले, जरा विषयाला बगल द्यायची म्हणून त्यांनी छान काकूंना आवडते ती शिळ घालत... सूहाना सफर हे हमारा गाण गुणगणत गाडी पुढे दामटवली!

पुढे लाल सिग्नल होता यामुळे ते थांबले, गाडी थांबताच लहान मुलगा प्लॅस्टीकच्या पिशव्या काही फुले विकायला आला, एक मुलगा पैसे मागायला... ट्रफिक पोलिस रस्त्याच्या बाजूला उभे राहून हेल्मेट घातले नाही त्यांना थांबवत त्याचा कोटा पूर्ण करण्यात गुंतले होते, लाल सिग्नल तोडून लोक आपल्या गाड्या पळवत होतेच ... काय करणार कोणी कोणाला शिस्त लावायची? 

तेव्हढ्यात सिग्नल हिरवा झाला, काकांनी गाडी पुढे नेली.. गाडीचा वेग कमीच होता.. तेव्हढ्यात काय झाले कळलेच नाही.. एक डंपर मागन आला .. 

काकांच्या गाडीला धडकला. गाडीवरून काका रस्त्यावर पडले व काकू रस्त्याचा कडेच्या बाजूला...

एकदम शांतता...

काकूंना काही लागले नाही पण काय झाले हे लक्षात येताच त्यांनी हंबरडाच फोडला, मग लोक जमली, मॉल जवळच होता, शनिवार असल्यामुळे गर्दी होती..

काकूंना धीर द्यायला लोक जमली...

रस्त्यावरचे दृष्य् भयानक होते, काकांच्या हेल्मेटचा चक्काचूर झाला होता.. डंपरचे चाक काकांच्या अंगावरून गेले..रस्त्यावर रक्त वाहत होते..

डंपर वाला पळून गेला.. 

काकांना हॉस्पिटलमध्ये नेणार पण त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.. काकूंची अवस्था खूप वाईट झाली..

गावातील नातेवाईकांना, मित्रमंडळींना अपघाताची माहिती मिळताच... सगळ्यांनाच धक्का बसला!

मग पेपरवाले बातमीसाठी पुढे सरसावले, महानगरपालिका, पोलिस दोषी...वैगरे चालू झाले नेहमी प्रमाणेच!


नियम पाळणार्यांनाच शिक्षा भोगावी लागते असे दिसतय.. दूचाकीवर प्रवासच करू नका हा एक सूर दिसला लोकांचा..

मूळ कारण सोडून दूचाकीवरचा प्रवास टाळा, ४०-५० वर्ष व जेष्ठांनी तर दूचाकीच चालऊ नका हा सूर जास्तच तग धरत होता...

खरंच दूचाकी जी गावात, छोट्याप्रवासाला योग्य आहे तीच चालवू नका हे बरोबर आहे का?

माधवकाकांचा बळी गेला या जागेवरनं जातांना नेहमी त्यांची आठवण येते, पण काय आपण करू शकु कि असे अपघात टाळण्यास प्रशासनाला मदत करू... 

प्रशासन नेहमी घटना घडल्यावर कारण शोधतात! ते घडू नये म्हणून आपण नागरिक म्हणून काय जबाबदारी घेणार?

प्रश्न अनुत्तरीतच राहतात!.. 

काही दिवस रमा काकूतर ह्या धक्क्यातून बाहेर पडल्याच नाही... काकांच्या आठवणीतच आता जगु...

रस्ता अपघात, ट्रफिक नियम पाळा, हेल्मेट घाला ह्यावर जनजागृती करणारे वसंत काका त्यांना भेटायला गेले... काकू म्हणाल्या आज पासून मीपण तूम्हच्या गटात सामिल होते, मी प्रशासनाने घालुन दिलेले जड वाहन त्यांच्या वेळा न पाळता रस्त्यावरन फिरतांना दिसल्या कि त्याचा नंबर पोलिसांना कळवणार, बूघुयातं माझ्या ह्या छोट्याश्या माहितीने काही मदत होईल का, अपघात कमी झाले तरच मी योग्यरीतीने माझ्या पतीला श्रद्धांजली वाहिली असे होईल.. 

रमा काकू फक्त बोलून थांबल्या नाही तर रोज त्या पायी जात रस्त्यावर उभ्या राहुन अश्या बेदरकार गाडी चालवणारे, अवजड वाहने आपल्या वेळा न पाळता दिसले की त्यांचे नंबर लिहुन ट्रफिक पोलिसांना सांगत.. त्यात कधी ही वाहने बड्या लोकांची असत... ते आपली ओळख सांगत ... मग पोलिस पण त्यांना सोडून देत.. तर कधी पैसे घेत व न पावती फाडताच सोडून देत...

हे सर्व  पाहतांना काकूंचा खूप संताप होत असे ... 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract