व्यक्त होण्यास
व्यक्त होण्यास


काय कसे कुठे कोणा ...
कोणा सोबत होऊ मी व्यक्त...
सापडला कोणी एखादा..
होण्यास व्यक्त...
तरी शब्द सोबत करी ना..
हो शब्द सोबत करी ना...
शब्दांची गुंफण घालता...
हवे तसे होत नसे शब्दरिंगण तयार..
घोंघवत रहातात मनातच...
हो मनातच चक्रीवादळा सारखे...
प्रत्येक चक्रीवादळाला नाव ठरवते..
पण तयार नसते ते मनातुन ...
ओठावर येण्यास..
मी ते कसे ऊतरवु कागदावर?...
व्यक्त मग होतच नाही शब्दांच्यासोबत...
देहबोली ठरते मग थोडी उजवी व्यक्त होण्यास
माझ्या 'मी' ला समजावण्यास!!