चिमणीच्या दाताने
चिमणीच्या दाताने


चिमणीला दात असतात का? नाही पण..
लहान असतांना शाळेत रावळगावचे कडम् कडम् करत खाणारे एक चॉकलेट, शाळेच्या गणवेशाच्या स्कर्टच्या खालचा एक टोक पकडून त्यात ते एक चॉकलेट ठेवायचे व चिमणीच्या दाताने म्हणजेच आपल्या दाताने हळूच तोंडात त्याचे जे भाग होतील ते आपल्या मित्र मैत्रिणींना वाटत खाणे! वाटून खातांनाचे स्वर्ग सुख ह्याच चिमणीच्या दातात होती!
आता चिमण्या मोठ्या झाल्या, चिमणीचे दात कुठे गेले कोणास ठाऊक?