अलर्ट
अलर्ट


गुगल बाप्पा चा जयजयकार!
आज सगळी कडे काही माहिती पाहिजे असल्यास हातातील मोबाईलवर गुगल बाप्पाला माहिती काढून सांगयाचे फर्मान सोडले जाते! क्षणारधात ढिगभर माहिती मला मिळते!
मग त्या माहितीच काय करायचे... छे खूप मोठे हे काम! एक दोन टॉपवरच्या, हो गुगलबाप्पाने सर्वात वर या माहित्या दिल्या त्या दोन तीन मिनिटात वरच्यावर वाचल्या..
वाचता वाचता डोक सुपरफास्ट विचारात कधी गुंतले कळलेच नाही! काय बरं विचार करत होतो? काय माहित... आजकाल असच सतत चालू असते, मग एकही काम नीट होत नाही!
स्वतःलाच एक अलर्ट दिला एकदम रेडवाला, परत असे करायचे नाही, जे एक काम हाती घेतले तेच पूर्ण करायचे!..
पण नाही रेड अलर्टची ऐशी की तैशी...
काल खूप महागड्या गाडीचा रस्ते अपघात झाला त्यात प्रसिद्ध तरूण उद्योजकांचा मृत्यू झाला.. मग काय दिवसभर गुगल बाप्पाला माहिती विचारत वेळ गेला,
महिला गाडी चालवत होती, गाडी खूप फास्ट होती, गाडीचे एयर बॅगस् उघडल्या पण सीटबेल्ट न लावल्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या दोघांचा मृत्यू, दोघे समोर बसलेल्यांनी सीटबेल्ट लावला होता पण गंभीर जखमी, जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे..
मग काय दुसर्या दिवशीपरत गुगलुन बघतो तर काय गुगल बाप्पाने स्वतःच कालच्या माझ्या गुगल पॅटर्नवरन अपघाताची माहिती समोर ठेवली..
रस्ता कसा आहे, नविन चालक ह्या रस्त्यावर कसा फसतो वैगरे..
मग माझे डोके अधिक वेगाने धावले.. हे गुगल बाप्पा हे आधी का सांगत नाही, की रस्ता कसा आहे, काय काळजी घ
्यावी, गाडीचा स्पीड असावा...
सगळे अलर्ट आधीच दे!
थांबच, त्या काय नविन नविन गाड्या बाजारात आणल्या आहे, त्यात मी असे काही सॉफ्टवेअर तयार करून टाकतो की, नुसते अलर्ट नाही तर रेड अलर्टकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, गाडी बंदच होईल, योग्य निर्णय घ्यायलाच भाग पाडेल!
जसे प्रवासी वाहतूक करणार्या गाड्यांना ८०चे लिमिट आरटीओ पासिंगला असते तसेच बाकींच्या खाजगी गाड्यांना ही टाकूया!
स्वतःवरच्या ह्या विचाराने खूश झालो!
चला कामाला लागू व आपल्या नावावर हे पेटेंट घेऊ!
दोन तीन तासाने परत मी सवयीने गुगलबाप्पाला फर्मान सोडले तर काय मला माझ्याच विचार केलेल्या शोधाचे पेटंट दिसले..
फसवे.. गणपत्ती बाप्पाने एक टपली मारली डोक्यावर म्हणाला माझे कान धरुन अरे तुझ्या पोटात काही गुपित राहत नाही.. पहिला कॉमेंट मीच देणार करत आपले सर्व विचार टाकतो टंकवत!
आता तुला मी रेड अलर्ट देतो.. तो स्मार्ट फोन, गुगलबाप्पा बाजूला ठेव.. स्वतःची बुद्धी वापर, सामान्यज्ञान वापर, दुसर्यांवर एवढाही अवलंबून राहु नको की स्वतः पंगु बनशील!
गणपती बाप्पाला मनापासून नमस्कार केला, स्वतःचे कान धरले, मन एकवटून स्वतःला अलर्ट केले ...
आपल्याकडे असलेली दिव्य दृष्टी सतत तेवत ठेव!
गाडी चालवतांना दुसर्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेव, नियम पाळ सरकारने दिलेले व स्वतः काही तयार केलेले! मग बघ अपघात टाळता येईल की नाही ते!
गणपती बाप्पा परत धन्यवाद, उगाच नाही तुला बुद्धीची देवता म्हणतात!