Vilas Yadavrao kaklij

Action Others

3  

Vilas Yadavrao kaklij

Action Others

जनी - भाग ५

जनी - भाग ५

5 mins
192


( तिसऱ्या दिवशी जनी हॉस्पिटल मधून घरी पोचली तिला घडलेली राजेश कडून कळाली मात्र ती खोट्या पद्धतीने ! 

तीला कल्पना होती हॉस्पिटल मधून मोनाला बघून आल्यानंतर कॉलेजमध्ये रोज ठरल्याप्रमाणे राजेश वाट बघत होता . एक दिवसही राजेश शिवाय एकमेकांना करमत नव्हते . राजस शेवटच्या वर्षाला असल्याने पुढील वर्षी शिक्षण संपणार होते त्याला स्वतःसाठी नोकरी करणे आवश्यक होते त्या पद्धतीने त्याचा अभ्यास चालू होता .जनी ची बारावी सुरू होती प्रथम सत्र परीक्षा संपवून नुकताच निकाल जाहीर झाला होता . ही सर्व क्षेत्रांमध्ये हुशार असल्यामुळे तिने तेथे स्वतःची इमेज अभ्यासामध्ये ही ठेवली होती त्यामुळे कॉलेजमध्ये सर्वांची लीडर म्हणून म्हणून प्रसिद्ध होत . बारावी शिक्षण संपल्यानंतर तिलाही होस्टेल सोडाव लागणार होत त्यामुळे तिच्याकडे सहा महिने होती . त्यानंतर संसार थाटून देणेसाठी संस्थेचे प्रयत्न सुरू झाले होते .जनी चा उद्देश एखाद्या ऑफिसमध्ये बॉस म्हणून नोकरी करावी ! त्या पद्धतीने अभ्यास करत होती . मात्र मनामध्ये सहा महिन्यानंतर बारावी संपली की पुढील मुक्काम कोठे करावा ? व शिक्षण कसे घ्यावे ? या विषयी तिची आणि राजेशची माहिती एकमेकांना सांगून विचार करत होते . राजेश लाही नोकरीनिमित्त गावी जाणार होता त्यामुळे दोघे . पण एकमेकांना स्पष्टपने विचारू शकत नव्हते . मात्र दोघांचे एकमेकांवर अतोनात प्रेम होते व मनोमनी दोघांनी एकमेकांची जीवनाचे साथीदार व्हावे असे ठरवले होते . मात्र कोणीही एकमेकांना स्पष्टपणे बोलण्याची हिम्मत करत नव्हते कारण त्यांच्या मनामध्ये एकमेकांशी खरं प्रेम होतं ! व जनी 'ला प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतेही दडपण किंवा भीती नसल्यामुळे ती स्पष्टपणे बोलू शकत होती एक दिवस गार्डनमध्ये तिने सांगितले की बारावीची परीक्षा झाल्यानंतर मला होस्टेल सोडावे लागणार ! मला स्वतःच्या शिक्षणाविषयी खर्चासाठी काहीतरी पर्याय शोधावा लागेल ? संस्थेच्या नियमाप्रमाणे ते लग्न लावून पूर्ण संसार करून देण्याची जबाबदारी घेतात . मात्र हा पर्याय सोडला तर ? दुसऱ्या पर्यायाला ते कोणत्याही प्रकारची मदत करीत नाही . स्वतःपायावर उभ राहून शिक्षण घेणे व पुढील जीवन स्वतः उपभोगणे अशा पद्धतीने संस्थेचा नियम होता . राजेश हा चांगल्या घरातील मुलगा असून त्याच्या घरामध्ये दोन बहिणी असा चौकोनी कुटुंब वडील चांगल्या उद्योग असल्यामुळे पैशाचे वा कोणत्या प्रकारची अडचण नव्हती मात्र राजेश ला घरच्यांशी स्पष्टपणे बोलता येत नव्हते . हॉटेल मधली मुलगी ?तीचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता नव्हता . कोणत्या जातीत ? कोणत्या धर्मातली ?काही माहिती नव्हते . ती फक्त एक नावारूपाला आलेली मुलगी जमी एवढि च माहिती होती . घरचे या लग्नाला परवानगी देतील किंवा नाही याविषयी राजेशला शंका होती . राजेशच्या दोन बहिणींनी पैकी एका बहिणीचे लग्न झाले होते . वडिलांचे दुसरीसाठी संशोधन चालू होते ते विचार करत मुलगा खानदानी ! सुसंस्कृत ! असावा चांगले घराने असावे त्यांचा अट्टाहास होता तेच मुलाच्या बाबतीत असेल ! त्यांच्या स्वप्नाला तडा जाऊ नये याची मात्र राजेश काळजी घेत होता. तिकडे जनी ची मैत्रीण ' मोना ' घायाळ झालेली वाघीण . स्वतःचा डाव स्वतःवर उलटला त्यामुळे जास्त चौताळली होती . व आता तिने निर्धार केला होता जनी 'ला संपल्याशिवाय रहाणार नाही तिच्या महिला आश्रम मध्ये जास्तीत जास्त दोन वर्ष राहता येत होते तिथेही शेवटचं वर्ष असल्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहणे किंवा एखाद्या होतकरू मुलाशी लग्न करून देणे . हा माहिला आश्रम चा नियम होता . तो न पाळला तर आश्रम सोडावा लागत होता त्यानंतर ते कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नव्हते .त्यामुळे वेगवेगळ्या विवाह मंडळांमार्फत या महिला आश्रम मध्ये दररोज एक दोन मुलींची लग्नही कराराप्रमाणे ठरत होती कारण या आश्रमामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या महिला ह्या कोणत्या ना कोणत्या घटनेला बळी पडलेल्या , पुनर्विवाही; काहींची मुले. असलेल्या काही बलात्कारी !घटना त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या , अशा सगळ्या प्रकारच्या होत्या ! त्यांच्यासाठी येणारी स्थळे ही त्याच पद्धतीने येत . या रविवारी मोना साठी तीन ते चार प्रकारचे तरूण येणार होते व त्यां मुलांनी मोनाच्या बायोडाटा व फोटो कसा आहे त्यावरून ती ची निवड केली होती . एके एकाणे मोनाची मुलाखत घेतली . यापैकी याच गावामध्ये एक छोटा सामान्य नोकरी करणारा मोना ने त्याला पसंत केले कारण तो याच शहरामध्ये राहणार असल्याने स्वतःचा हेतु साध्य होणे साठी मनामध्ये असणार आहे ज्याने विषयीचा येतो आज सुट्टी आहे म्हणून की व तो एका चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करीत होता स्वतःची गाडी. घर होते .व त्याची पहिली पत्नी वारल्यामुळे त्याला एक लहान मुलगी तिचा सांभाळ करण्याच्या अटीवर मोनाचा त्यांनी स्वीकार केला होता . व मोनाने फक्त जनी 'चा काटा काढण्यासाठी योग्य म्हणून निवडले होते . या गोष्टीला दोन महिने होत नाही तोपर्यंत मोनाच्या शरीरांमध्ये विशिष्ट प्रकारचे बदल घडून आले होते कारण गुंडांनी केलेला बलात्कार त्यामुळे ती प्रेग्नट झाली होती याची कल्पना तीला त्रास व्हायला लागला तेंव्हा झाली . आता मात्र तिला याविषयी चिंता वाटू लागली ! हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिला की तुझ्या जीवाला , बाळाला , धोका पोहचू शकतो त्यामुळे तिला अगोदरच अबोर्शन न करण्याचा सल्ला दिला . आणि केले तर गर्भाशय काढावे लागेल ! परत तुला अपत्य होऊ शकणार नाही . त्यामुळे तुला या अपत्त्याला जन्म घ्यावा लागेल . म्हणून तिने परत करण शी कॉन्टॅक्ट केला व त्याला सांगितल तर मान्य होईल किंवा नाही याविषयी तिच्या मनामध्ये शंका निर्माण झाली ! घडलेली हकीकत सांगितली तर तिला नकार दिला जाणार ! अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाली .तेव्हा ती ने करण यास एका हॉटेलमध्ये बोलवले गप्पांमध्ये मोना .ने त्याची पूर्ण माहिती काढली स्वतः विषयी माहिती सांगितली . सांगत असतांना तिने माझी एक मैत्रीण कविता तीच्या जीवनात अशी एक घटना घडली आहे त्याच्यामध्ये ती प्रेग्नट आहे .व लग्न ठरवले आहे इकडे वैद्यकीय सल्ल्यानुसार जर तिने अबोशन केले तर ती परत आई होऊ शकणार नाही . व केले तर लग्न होणाऱ्या मुलाला आश्रमात पहिले पापाची कल्पना दिल्या नंतर तो तीला स्वीकारणार नाही . तेव्हा तो ने या अवस्थेमध्ये काय करावे ? करण म्हणाला तिच्यावर जर चुकी नसताना अशी एखादी दुर्घटना झाली असेल तर तीचा स्वीकारणे हा पर्याय उत्तम असू शकतो . व त्या मुलाच्या आयुष्याचा ही प्रश्न व निर्माण होतो त्यामुळे एखाद्या वाईट घटनेतून जर एखादी चांगली घटना घडत असेल तर !एखादा संसार होत असेल तर ! त्यांनी दोघांनी स्वीकारले पाहिजे . तेव्हा मात्र मनामध्ये विचार आला की त्याचे मन परिवर्तन होण्यासाठी योग्य वेळ आहे तेव्हा मोना म्हटली समजा दुर्दैवाने आपल्या जीवनामध्ये अशी घटना घडली तर ! तेव्हा मात्र बोलण्याच्या नादामध्ये करण मात्र सहज बोलून गेला . की मी मागे सांगितलं त्याप्रमाणे दोघांनी झालेल्या गतकाळातील चुका स्वीकारण्यात शिवाय पर्याय नाही . त्याच वाक्याचा आधार घेऊन त्याच्याकडून तिने वचन घेतले असच माझ्या जीवनात वागशील ? त्याने वचन दिले ! . त्यालाही त्याच्या मुलीसाठी व स्वतःसाठी एक जीवन साथीची गरज होती ठरल्याप्रमाणे पुढच्या महिन्यांमध्ये त्यांनी संस्थेच्या नियमा प्रमाणे लग्न करण्यासाठी विशिष्ट करार पद्धतीने करार बनवण्यासाठी संस्थेमध्ये त्यांनी अर्ज दाखल केले...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action