Rahul Mohite

Horror Thriller

4.0  

Rahul Mohite

Horror Thriller

जंगली जयगड व्हाया प्रचितगड

जंगली जयगड व्हाया प्रचितगड

24 mins
666


लहानपणीचा मंगेश आणि ट्रेककिंगची नाळ नंतर याचं मंगेश च्या जीवनातील काही चित्तथरारक, अविस्मरणीय अनुभव मांडत आहे. जंगली जयगड व्हाया प्रचितगड हा प्रवास एकूण तीन टप्यात मांडला जाईल.


मंगेश हा तसा जहांगीर हॉस्पिटलमध्ये नोकरी साठी होता जसे जमेल तसे शनिवार, रविवारी आपल्या काही मित्रांना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक साठी जात असत. कालांतराने त्याचे मित्र कामाच्या ओघात वेळ नसल्याने किंवा आणखी काही कारणास्तव ट्रेक ला येण्यास बंद झाले. प्रत्येक वेळी मंगेश आपल्या काही ज्युनिअर/युवक मित्रांना ट्रेक साठी प्रोत्साहन देऊन तयार करत असे. साधारण २००८-२००९ जून महिन्यात मंगेश आणि त्याचे काही यंग मित्र मंडळी यांनी पुढचा ट्रेक करण्यासाठी काही नियोजन करण्यास सुरुवात केली. नियोजित करता करता त्यांच्या डोक्या मध्ये खूप गड किल्ले येत होते पण त्यांनी विचार करून जंगली जयगड सर करण्याचे ठरविले. जाण्या आधी मंगेश आणि त्याच्या मित्रांनी नेट वरून त्या जंगली जयगड ची पूर्ण माहिती मिळवली कारण अश्या दुर्मिळ भागात जायचे तर त्याची पूर्ण माहिती असणे खूप महत्त्वाचे असते आणि विशेष म्हणजे तेथे घनदाट जंगल होते पायवाटा शोधणे ही मुस्किल अशी त्यांनी नेट वरून माहिती मिळवली. मिळवलेल्या माहिती नुसार जंगली जयगड हा एक बुरुज प्रकारचा म्हणजे तुंग सारखा किल्ला आहे. जंगली जयगड हे ठिकाण हे नेमके प्रसिद्ध कोयनानगर डॅम आणि पोफळी यांच्या मध्ये घनदाट जंगलात आहे. मंगेश ला तसा ट्रेकिंगचे खूप अनुभव आहे त्या प्रमाणे त्यानेही माहिती गोळा केलीच कराड मधील मित्रांना सांगितले रविवारी आपण पहाटे पहाटे निघू त्याप्रमाणे हा शनिवारी रात्री पुणे वरून कराड ला पोहचला. त्याच्या सोबत विनायक नांगरे, अजित जंगम,कुणाल आणि मेऱ्या हे चार मित्र ठरल्या नियोजन प्रमाणे शनिवारी तयार झाले. तसा मंगेश या टीम मध्ये सर्वांत मोठा बाकी सगळे कॉलेज चे विद्यार्थी. नियोजनाच्या शेवटी कुणाल यांनी काही कारणावरून येण्यास नकार दर्शविला. यांचे ठरल्या प्रमाणे दोन ते तीन दुचाकी घेऊन निघणार होते. कुणाल नसल्याने दोनच दुचाकी घेऊन मंगेश, अजित, मेऱ्या आणि विनायक निघण्याचे ठरले. नियोजना प्रमाणे सकाळी लवकर कराड वरून निघून १२च्या आसपास जंगली जयगड च्या पायथ्याशी पोहचायचे दुपारी ३ पर्यंत ट्रेक संपवून संध्याकाळी ७ वा पर्यंत घरी परतायचे असे पूर्ण नियोजन झाले होते.

ठरल्या प्रमाणे विनायक आणि मंगेश एका दुचाकीवरून पहाटे मसूर सोडले. मेऱ्या आणि अजित एक दुचाकी वरून कराड मधून निघाले आणि साधारणपणे मल्हारपेठ गावा जवळ यांची भेट झाली. कराड आणि पाटण रोडवर मोरोशी चा घाट उतरला की जंगशन आहे तेथे साधारण सकाळी ५-५.१५ वा गाठीभेटी झाल्या. जेव्हा सकाळी यांची भेट झाली तेव्हा विनायक, मेऱ्या आणि अजित यांनी अचानक मंगेश ला सांगितले जी आपण जंगली जयगड ला ना जात प्रचितगड कडे जाऊ असा तगादा लावला. आत्ता याचे नियोजन तर काहीच केले न्हवते मंगेश तसा प्रचितगड बद्दल थोडा फार ऐकून होता तोही या आधी कधीच प्रचितगड चढला न्हवता. मंगेश च्या माहिती नुसार प्रचितगड हा कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बरोबर सिमेवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला. तसाच या किल्ला म्हणजे पूर्ण जंगलात वसलेला, जवळपास खूप सारे जंगली प्राणी, जाण्यासाठी पायवाट तीही शोधत जावी लागणारी. मंगेश ने त्यांना विचारले की अरे अचानक कसे काय बदल करताय तर त्यांचा लगेच रिप्लाय आला की आम्ही खूप दिवसा पासून याचे नियोजन करत आहोत पण प्लॅन पूर्ण होत नाही तर आत्ता योग जुळून आला आहे तर जाऊ. मंगेश ने विचार केला इतका यांचा प्लॅन असेल तर या बद्दल नक्कीच यांनी पूर्ण माहिती घेतली असावी असा विचार करून लगेच होकार दिला. तसा या सर्वां मध्ये मंगेश हाच वयाने थोडा मोठा आणि अनुभवी होता.

प्रचितगडला जाण्यासाठी तसे तीन मार्ग-

*पहिला कराड-मलकापूर मार्गावर शेडगेवाडी गावातून चांदोली अभयारण्यात जाण्या साठीचा रास्ता हा प्रचितगड साठी जातो.

*दुसरा रास्त हा चिपळूण संगमेश्वर मार्गावरून प्रचितगड ला जाता येतो. या मार्गे खूप पर्यावरण प्रेमी प्रचितगड वर जात असतात.

*तिसरा मार्ग म्हणजे पाटण वरून जातो हा मार्ग म्हणजे खूपच खडतर आणि असे म्हणता येईल की बंद झालेला मार्ग. कारण हा भाग म्हणजे सह्याद्री रांगेतील कोअर झोन म्हणून ओळखला जातो. येथील बरीचशी गावे सांगली जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ या भागात स्थलांतरीत केली आहेत. हा मार्ग म्हणजे पाटण-मोरगिरी-हुंबरने-पंढरपानी हा जवळचा मार्ग. मोरगिरी म्हणजे वाल्या चा वाल्मिकी यांचे जंगल किंवा अभयारण्य म्हणून याला ओळखले जाते यावरून आपण ठरवू शकतो की हे किती घनदाट जंगल असेल. अत्ता या मार्गावरून जायचे म्हटले तर वाहने ही हुंबरने या गावा पर्यंत जातात.


सकाळी ६-६.३० वा हे सर्वजण या हुंबरने या गावात पोहचले. हे गाव म्हणजे साधारण २०-२५ कुटुंबाचे आदिवासी भागातील एक गाव. या गावांमध्ये यांनी आपल्या दुचाकी ठेवल्या आणि सुरुवात केली पुढच्या प्रवासाला. पुढचा टप्पा म्हणजे पांढरपाणी या गावी पोहचण्याचा साधारण २.५० ते ३ किमी चा प्रवास हा चालत करावा लागत असे. हा प्रवास म्हणजे पूर्ण जंगल आजूबाजुनी खूप प्रचंड अशी अंजनीची विस्तीर्ण, बलाढय जुनी झाडे. जात असताना हे सर्व जण निसर्गाचा येथेच्छ आनंद घेत होते कोणी सूर्याची किरणे बघत होते तर कोणी गावात, झाडे झुडपे यांचा आनंद घेत होते. तसेच हे झाडेझुडपे बाजूला करत करत पायवाटे वरून चालत होते. ही पायवाट याच गावातील लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील दळणवळण व्यवहारा करीत आखून ठेवली होती. म्हणजे ही पायवाट हुंबरने ते पांढरपाणी या गावातील दुवा मानला जाई. सकाळचा वेळ असल्याने एकदम फ्रेश वातावरणात २०-३०मिनिटां मध्ये यांनी हे ३किमी चे अंतर पायी पूर्ण करून पांढरपाणी या गावात पोहचले. पांढरपाणी गाव म्हंटले तर साधारण १०-१२ कुटुंबाचे गाव, गावात एकाच खोली मध्ये इ पहीली ते चौथी चा वर्ग चालत असलेली जिल्हा परिषदेची शाळा, गाव मध्ये लाइट ची सोय नाही पूर्ण गावा मध्ये एक-दोन सौरदिवे. घरांची रचना पहिली तर ती पूर्ण पणे आदिवासी लोकांची घरे जशी की बांबूने बांधून त्यावर माती किंवा शेणाने सारविले असे, छत म्हणून पालापाचोळा टाकून वाऱ्याने उडुनये म्हणून त्याला कश्यनी तरी बांधून किंवा मग दगडाचे ओझे ठेवले होते. असा हा जणू अधिवाशी पाडा होता. त्यांच्या घरला खिडकी आणि दार हा प्रकारचं न्हवता. गावातील सर्व घरे ही तशीच उघडी होती. गावातील स्त्रिया ह्या कमरेला साडी बांधून पदर छातीवर घेणे बाकी काहीच परिधान करत नसत. गळ्या मध्ये दागिने परिधान केले होते ते दागिने म्हणचे दोऱ्यात ओवलेले वेग वेगळ्या प्राण्याचे नखे, दात किंवा हाडे त्यावर हाताने कोरीवकाम करून वेगळ्या पद्धतीने नक्षीकाम केलेले दागिने त्याच्या गळ्यात दिसत होते. वाघाची, अस्वलाची नखे किंवा दात यामध्ये समावेश होता. त्यांचा कलर पहिला तर साधारण कृष्णवर्णीय होते साधारण आपल्या पेक्ष्या ही खूप काळे. त्यांची भाषा पहिली तर ती मराठीच पण कोणता ही शब्द सूर लावून ओढून बोलत असत " काय रे तु अ अ अ अ कुठं चाला अ अ अ" अश्या पद्धतीने त्यांची भाषा.


 मंगेश आणि टीम यांचा असे लोक पाहण्याचा हा पहिलाच योग. त्यांनी दोन तीन घरा मध्ये विचारले की प्रचितगड ला जाण्यासाठी मार्ग कोणता तर तेथून त्यांना काही उत्तर भेटले नाही. एका घरात त्यांना उत्तर भेटले की तुम्ही इथून पुढे ६-७ किमी सरळ जा पुढे नदी भेटेल ती पार केली की तुम्हला पुढेच प्रचितगड दिसेल इतके सांगून निघून गेले. यांनी त्याला विचारले की आम्ही तुम्हला पैसे देतो तुम्ही आमचे सल्लागार म्हणून रास्ता आणि किल्ला दाखवण्यासाठी सोबत चला पण कोणीच तयार झाले नाही एका घरातून बाई बाहेर येऊन हात वारे करून रास्ता दाखवून परत घरा मध्ये जाऊन बसली. तरी मंगेश ने त्याच्या सहकार्यांनी विचारले की तुम्हला याच्या पुढे काही मार्ग माहीत आहे का तर त्यांनी सांगितले इथं पर्यंत माहीत होते पण पुढचा आम्ही नकाशा पहिला आहे त्या पद्धतीने जाऊ. इतक्या बोलण्यावर विश्वास ठेवून हे सर्व जण प्रचितगड कडे पुढे जायला निघाले ही सकाळची ७.३० ते ७.४५ ची वेळ होती. त्याना जशी तेथील लोकांनी सांगितले त्या दिशेने हे लोक मळलेली पाऊल वाट पकडून पुढे निघाले होते.


मंगेशला तसा अनुभव होता त्याच्याप्रमाणे त्याने कपड्याच्या चिंध्या सोबत घेतल्या होत्या त्या तो बांधत पुढे चालत होते. ट्रेकिंग करताना मार्ग चुकला तरी या चिंध्याचा शोध घेऊन आपण योग्य तो परतीचा मार्ग पकडू शकतो हे मनात ठेवून वेगळ्या वेगळ्या झाडांना मंगेश चिंध्या बंधू लागला. जंगल तसे पुर्ण घनदाट आणि विस्तीर्ण होतेच. या जंगलात फार प्रचंड मोठी झाडे होतीच सोबत त्यांनी काही अशी ही झाडे पहिली ती ४-५ फूट उंच आणि तिथून पुढे ती आडवी वाढली होती काही काही झाडे तर जमिनीला समांतर वाढली होती तर काही झाडे तर पूर्ण पने जमिनीवर झोपुन त्यांची वाढ झाली होती. जाताना खूप वेगळ्या वेगळ्या जंगली किड्यांचे पक्ष्यांचे आवाज ही ऐकायला येत होते ते ऐकून या सर्वांना खुपच मजा येत होती आणि पुढच्या प्रवासाला प्रोत्साहन मिळत होते. 


त्यांचा हा प्रवास १.३०-२ तास पुढे सुरच राहिला आणि या घनदाट जंगलातून ते पुढे एका टेकडीवर साधारण सकाळी ९.१५ ते ९.३० वा येऊन पोहोचले. आजू बाजूला पाहिले तर यांना फक्त झाडी, आणि उंच डोंगर दिवस होते. त्यांच्या दोन्ही वाजला खूप मोठी दरी दिसत होती पुढे यांना प्रश्न पडला की आपल्याला तर नदी पार करून जायला संगीतले आहे तर या दरीतून खाली नदी पात्राच्या दिशेने गेले पाहिजे. त्यांनी एक अंदाज बांधला की पाण्याच्या ओंजळी चा मार्ग पकडला तर आपण नदीपर्यंत पोहचू. तेवढ्यात मंगेशचे लक्ष गेले ते म्हणजे गवताचे नुकसान केले होते, मोठे मोठे खड्डे पडले होते याचा तर्क मंगेशनी लावला तो म्हणजे असे काम हे रानडुकरे करतात. कारण त्यांना झाडांची किंवा गवताची मुळे खायला खूप अवढतात सोबतच त्यांना दगडाच्या घई मध्ये राहण्यास आवडते. ती डुकरे नेहमी दिवसाचं त्या घई मध्ये वास्तव्यास असतात आणि रात्री बाहेर पडतात असा विचार आला. कारण या सर्वना याच घई च्या मार्गाने खाली उतरायचे होते. यांची थोडी चिंता वाढत होती कारण डुकरांच्या पाऊल खुणा ही त्यांना दिसत होत्या. तेवढ्यात मंगेश ने त्याच्या दोन सहकार्यना सांगितले की कोणी वाटसरू आदिवासी दिसतो का बघा जेणे करून त्याला पुढचा मार्ग विचारता येईल. तेवढ्यात मंगेश बघतो तर हे दोघे सहकारी माणूस बघायला जाऊन त्या घई मध्ये दुसऱ्या बाजूने ते खाली उतरले आणि यांना आवाज देत होते की मंगु भाई मंगु भाई आम्ही इकडे आहेत. पहिला तर यांना काही समजायला तयार नाही की आवाज कुठून येतो तेवढ्यात मंगेश ने त्यांना विचारले तुम्ही खाली कश्या साठी गेलात त्यांनी सांगितले आम्ही माणूस शोधत शोधत कसे खाली आलो काहीच समजले नाही तुम्ही ही खाली या अशी विनंती करत होते. कसे बसे हे दोघे ही त्याच्या जवळ पोहचले आणि सर्व जण त्याच घई मधून पुढे निघाले. साधारण १-१.३०

तास हे सगळे या घई मधून चालत होते जात असताना यांना ठीक ठिकणी पाण्या ची डबकी, भले मोठे मोठे दगड कमीत कमी ७-८ फुटचे दगड. काही वेळा यांना या मोठ्या दगडा वरून उडी मारून खाली उतरावे लागले. खाली आले की परत असे मोठे दगड ते पार करून पुढे जावे लागले. अशी भली मोठी दगडे यांना कुठेच बघायला भेटली नाहीत.


जवळचे पिण्याचे पाणी संपल्यावर यांनी एकाद्या डबक्यातील पाणी रुमालाने गळून बाटली मध्ये भरून घेतले आणि नदीच्या दिशेने पुढे सरकत राहिले. पुढे चालता चालता सकाळी ११-११.३० वाजता हे सर्व एका नदी पात्रात पोहचले. त्यांना ही माहीत न्हवते की ही नेमकी कोणती नदी आहे या नदीचे पात्र खूप प्रंचड मोठे म्हणजे अंदाजे १००-२०० मीटर रुंद असेल. नदीच्या दोन्ही बाजूच्या कडा ह्या ४५° कोना मध्ये कापल्या होत्या म्हणजेच या नदीचे पाणी खूप वेगाने वाहत असावे. नदीच्या काठानी भले मोठे जंगल हे होतेच. मंगेश ला तसा ट्रेकिंग चा अनुभव असल्याने त्याने आपल्या सहकार्यांना थोडे सावध केले करण जंगली प्राणी हे पाणी पिण्या साठी नदी काठी येत असतात तर आपण नदीच्या थोड्या मधून चालायला सुरुवात करू जेणेकरून एकदा प्राणी आला तरी सावध होता येईल आणि प्रती हल्ला करून वाचता येईल.


या नदी पत्रातून चालत असताना त्यांना बऱ्याच ठिकाणी खूप पाण्याची डबकी, वाळू दिसली विशेष म्हणजे फुलपाखराचे अतिशय मोठेच्या मोठे थवे पाहायला मिळाले. एका थव्या मध्ये कमीत कमी १०००-२००० वेगवेगळया रंगाची, जातीची फुलपाखरे बघायला भेटली. अश्या प्रकारची फुलपाखरे यांनी याच्या आधी कधीच पहिली न्हवती जणू हे सर्व स्वप्नात दिसत आहे असे याना भास होत होता. हे जसे जवळ जात तसे ती फुलपाखरे उडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसत असत तेव्हा वाटायचे की कोणी तर आकाशा मध्ये रंग उडवीत आहे. याआधी असा अनुभव हा फक्त टीव्ही वर पहिला होत तोच अत्ता खरोखरच यांना अनुभवायला येत होता त्यामुळे त्यांच्या डोळ्यानी तो नजारा पाहून मन मोहून जात होते. पुढे जात असताना त्यांना कधी माकडे ओरडताना तर काही वेगळवेगळे पक्षी ओरडताना ऐकायला येत होते यातील बरेचशे आवाज ते सर्वजन पहील्यांदाच ऐकत होते. या सर्व गोष्टींचा आणि निसर्गाचा अनंद घेत पुढे पुढे चालत राहिले. साधारण दुपारचे १२ वाजले होते आणि सर्वांना चालून चालून भूक लागली होती त्यांनी मंगेश ला विनंती केली की आपण अत्ता जेऊन घेऊ. पण मंगेशचा ट्रेकिंग चा अनुभव असता की एकदा जेवल्यानंतर सुस्ती येते आणि आपण ठरविलेला टप्पा त्या वेळेत पूर्ण करता येत नाही मग परतीचा प्रवास वेळेत होईल की नाही याचे नियोजन चुकते म्हणून त्याने जेवणास नकार दिला. जेवणाला नकार देण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती जागा त्याला सुरक्षित वाटली नाही आणि त्यांना हेही माहीत न्हवते की हा प्रचितगड नेमका कोणत्या बाजीला आणि कोठे आहे. त्यांनी सर्वाना आपले मत परखड पने सांगितले जेव्हा आपण प्रचितगड चढू किंवा समजेल की आपण आत्ता प्रचितगड एकदम जवळ आलो आहोत तेव्हा आपण जेवण करू शकतो. जर असेच आपण भटकत राहिलो तर खूप मुश्किल होईल आणि जेवणा मुळे सुस्ती येऊन परत जाणेही कठीण होईल. तेवढ्यात मेऱ्या आणि विनायक हे सगळे तसे एकदम सळसळत्या रक्ताचे यंग होते यांनी लगेच मंगेश ला बोलले आपण छत्रपती शिवराय यांचे मावळे आहोत घाबरून चालणार नाही तेवढ्यात मंगेश ची त्यांना उत्तरले की तुमचा जोश खूप चांगला आहे त्यात काही शंका नाही पण सध्याच्या परिस्थितीत जोश पेक्ष्या होश मध्ये निर्णय घेणे खूप गरजेचे आहे. मंगेश आणि त्यांचे सहकारी या निर्णयावर सहमत झाले आणि पुढे निघाले.

पुढे जाताच त्यांना लांबून एका नदीचा संगम दिसला. तो त्यांच्या पासून साधारण २५० ते ३०० मीटर लांब होता. ते जेतून चालत होते तर त्यांच्या डाव्या बाजूने एक घई येऊन नदीला मिळाली होती आणि त्यातून पाण्याचा थोडा फार निचरा येत होता. पाण्याचा प्रवाह कमी असल्याने तिथे दलदल तयार झाली होती. त्याच डाव्या बाजूने याना चिखल, पाणी आणि दलदल पार करून एकदा सुळक्यावर जायचे होते. येथून जात असताना याना दीड फुटाची एक वाट भेटली म्हणजे यांच्या उजव्या बाजूला पाणी आणि डाव्या बाजूला पाणी, चिखल आणि दलदलीचा भाग. अशी ही दीड फुटाची वाट याना ३०फूट पार करायची होती तर त्यांना कुठे तर त्या समोरील कड्या वर पोहचता येत होते. पण पुढे बघतात तर काय हा ३० फूट पायवाट संपली आणि पुढे दलदल त्यांध्ये ५-६ मोठे मोठे दगड तेही ३-४ फूट अंतरावर. अत्ता याना त्या दगडा वरून उड्या मारून मारून ती दलदल पार करायची होती आणि त्यापुढे त्याना काळ खडक दिसत होता. मंगेश अनुभवी असल्याने तो पहिला पुढे गेला आणि मग मागून हे सर्वजन उड्या मारत ते दगड पार केले. पार केल्या नंतर काळ्या खडका वरून जेमतेम १०० फूट पुढे गेल्या नंतर मंगेश ला काही गोष्टींचा शक येऊ लागला. त्यांना पुढे कोणत्या तरी प्राण्याच्या पायाचे ठसे दिसले त्यावर तर्क लावण्यास सुरुवात केली मंगेश ला क्षणभर वाटले की वाघाचा भास होत आहे किंवा आपला काही तर अंदाज चुकत आहे.

थोडी दलदल असल्यासमुळे याच्या ही पायाचे ठसे त्या चिखलात उमटत होते. तसेच ते २००-३०० फूट पुढे चालत राहिले. त्या ठिकाणी संगम असल्याने काही प्रमाणात पाणी हे या नदी मध्ये रिटर्न (याला आपण बॅक वॉटर म्हणतो) ते आले होते. याच नदीजवळ जसे पाण्याचे पात्रसंपते तिथे ४५° मध्ये कापलेली जवळपास ४०-५० फूट कोरडी तिरकी जमीन होती. म्हणजे यांच्या उजव्या बाजूला खूप खोल अशी नदी तर डाव्या बाजूला पाहिले तर घनदाट जंगल आणि या कोरड्या तिरक्या जमिनीवर असेच पुढे २००-३०० फूट चालत राहिले. पुढे आल्या नंतर मंगेश ने विचारले की आत्ता आपल्याला ही मोठी नदी पार करून जावी लागणार आहे पण नक्की तुम्ही याचा अभ्यास केला होता तो बरोबर आहे का? तुम्हला नक्की माहीत आहे का की याच नदीच्या पलीकडे आपल्याला प्रचितगड लागेल. कोणीच काही उत्तर द्यायला तयार न्हवते करण त्यांना ही काहीच माहीत न्हवते. सर्वांची पंचायत झाली आत्ता एकतर ही २००-३०० मीटर नदी पार करून पुढे जायचे नाही तर जसे आले आहे त्या वाट शोधून परतीचा प्रवास सुरू करायचा. वातावरण सगळ्यांचे टाइट झाले होते तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की आपण सगळे इथंच बसून पाण्याकडे बघत बघत जेऊन घेऊ. तेवढ्यात मंगेश च्या मनात शंका आली की ही जागा आपल्या साठी सुरक्षित नाही. तेवढ्यात त्यांना पक्षी खुप जोरात ओरडताना आवाज येऊ लागला. अत्ता मंगेश च्या अनुभवा नुसार इतके पक्षी, प्राणी जोरात ओरडत आहेत म्हणजे जंगल मध्ये कोणता ना कोणता मोठा प्राणी आला असेल. तेवढ्यात मंगेश थोडा पाण्यात उतरणार होता पाण्याचा अंदाज घेण्या साठी आणि पाण्यात काही प्राणी नसतील याची शहानिशा करण्यासाठी दगड टाकून पहिला. तर काही अंदाज आला नाही म्हनुन त्याने थोडे लांबवर चार पाच दगड मारून पाहिले असता त्यांना दोन टोके म्हणजे जणू काट्या जश्या पाण्यावर तरंगत असताना त्याची टोके कशी वर दिसतात त्या प्रमाणे त्यांना दोन टोके दिसली. थोडावेळ हे तिथेच उभे होते त्याच्या कडे एक मोठी काठी त्यांनी हाता मध्ये घेऊन फिरत होते आणि विनायक हा अजय देवगण च्या चित्रपटातील डायलॉग सारखा बोलत होता " ये जंगल कालिया का हे". ते जसे पाण्या मध्ये उतरण तेवढयात त्यांना ती मगर दिसली आणि सर्व सावध झाले सगळ्यांची झोप उडाली. त्यांनी तेव्हा ठरविले की अत्ता आपण ही नदी काही पार करायची नाही. त्यांना तिथून पळून जाणे ही शक्य न्हवते कारण मोठी मोठी दगडे तर दुसऱ्या बाजूला दलदल आणि जंगल सोबतच एका प्राण्याच्या पायाचे ठसे दिसले होते. अत्ता तर सगळ्यांची फाटली होती काय सुचत न्हवते तेवढ्यात मंगेश च्या लक्ष्यात आले की मागरीची ताकत जादा ही फक्त पाण्यात असते आणि ती बाहेर आली तर तिला वेगाने पळता येत नाही. जर मागरीने हल्ला केलाच तर जोरात सर्व मिळून एकच दिशेने पाळायचे ठरविले. मगर तशी हळूहळू जवळ येत होती यांचा निर्णय झाला की पाण्यात उतरायचे नाही आणि हे त्या संकटातून मुक्त झाले थोड्यावेळात ती मगर ही निघून गेली. ती मोठी काठी सोडली तर यांच्या कडे कोणतेच हत्यार न्हवते.


हे सगळे विचार करत काही वेळ तिथेच थांबले आणि थोड्याच वेळात एक संकट गेलेकी नाही तोपर्यंत जोरात आवाज त्यांच्या कानावर आला आणि तो आवाज म्हणजे वाघाची डरकाळी होती. आवाजाची ताकत इतकी होती की तो वाघ यांच्या जवळपासच कुठे तर असावा. हे ऐकताच सर्वांच्या तोंडाचे पाणी पळाले. आत्ताच कुठे तर मागरीची संकट गेले आणि दुसरे समोर उभे राहिले. जणू हा आवाज त्यांच्या अंदाज नुसार १००-१५० फुटावरून आला असावा. हा आवाज येण्या आधी जंगलातील पक्षी हे खूप मोठ्या प्रमाणावर सैरावैरा होऊन ओरडत होते याच यांना इतका अंदाज आला नाही. अशी ही रीबॉण्ड स्ट्रोक वाली डरकाळी यांनी पहिल्यांदाच अनुभवली होती. अत्ता हे सर्व हतबल झाले होते दुपारची १-१.३० ची वेळ

उन्हामुळे डीहायड्रेशन झाले होते बॉटल मधील पाणी ही जवळपास संपले होते पोटात जेवणचा तुकडाही पडला न्हवता. ना ते पाणी नदीतील घेऊ शकत होते ना बॅग मधील जेवण जेऊ शकत होते ते पूर्णपणे हतबल होऊन घाबरले होते. त्या नदीकाठच्या ४५° कातरलेल्या जमिनीवरून नीट चालणे ही मुश्किल होते. अत्ता यांच्या मना मध्ये १०० प्रश्न उभे होते जवळपास वाघ पाण्यात मगर करायचे काय? समोरच्या आस्मानी संकटावर मात करण्यासाठी त्यांनी निश्चय केला आणि ठरविले की एकीचे बळ दाखवून या संकटातून बाहेर पडू. त्यांनी ठरविले की जर वाघ चौघण पैकी कोना एकवार हल्ला केला की बाकीच्या तिघांनी मिळून पूर्ण पणे त्या वाघावर हमला करायचा मग ते काहीही हो. इथं पर्यंत त्यांनी प्लॅन केला की जर एखाद्याला त्याने पडकले तर तो जोरात पळू शकणार नाही तर बाकीच्या लोकांनी त्याच्या नाकावर, डोळ्यावर बुक्क्या जोरत मारायच्या आणि जितक्या जोराने त्याच्यावर प्रति हल्ला करता येईल तितक्या जोराने करायचा. हे प्लॅन मंगेश ने आपल्या सहकार्यांना अगदी अर्ध्या मिनिटात सांगितले आणि खिश्यात जमेल तितके दगड भरून घ्याल सुरुवात केली आणि काठी ही सोबत होतीच. दोघा दोघांचा ग्रुप करू करून पुढे सरकायचा प्लॅन झाला.


पहिला दोघे ५०-६० फूट पुढे जायचे आणि बाकी दोघांनी जंगला कडे लक्ष्य द्याचे ते जसे पुढे पोहचतील तेव्हा मग बाकी दोघे पाण्याकडे बघत पुढे याचे असा प्लॅन झाला. असा करत करत हे चौधे जवळपास १००-१२५ फूट माघारी आले. तिथे मंगेश चे एका झुडपात लक्ष्य गेले आणि तिथे त्याला दिसला तो भला मोठा पट्टेरी वाघ. त्या झुडपात त्याला त्यांचे मोठे च्या मोठे तोंड पहिला दिसले ते जणू १-१.२५ फुटचे होते आणि त्याचे सुळे दात बाहेर आले होते. त्याच क्षणी वाघाने परत एकदा जोराची डरकाळी फोडली आणि सगळ्यांचे धाबे दणाणले. एकतर तो वाघ यांच्या वर तुटून पडणार आणि ते त्या वाघावर किंवा हे त्या वाघाला पालवण्या साठी दगडांचा हमला करणार हे दोनच पर्याय उपलब्ध होते आणि त्यांच्या मनात हेच विचार सुरू होते. तेवढ्यात त्यांनी एकाच शर्ट काढला आणि त्या उंच काठीला बांधला. याचे कारण असे होते की वाघ हा जादा तर उंच प्राण्यावर हल्ला करत नाही अजून एक नियम मंगेश च्या लक्ष्यात आला की वाघाच्या डोळ्यात डोळे घालून बघायचे नाही करण त्याला खुन्नस दिल्या सारखे होते आणि तो खूप चिडतो. तसेच ते शांतपाने हळूहळू पुढे चालायला लागले. ते परत त्या ४-५ फुटाच्या दगडा जवळ येऊन पोहचले होते पुढचे संकट म्हणजे या दगड जवळ वाघ कधीही कोणत्या ही क्षणी खुपच कमी वेळात उडी मारून येऊ शकत होता. आत्ता एकच लक्ष होते ते म्हणजे एक एक करून या दगडा वरून उड्या मारत दलदल पार करणे आणि ही वाट म्हणजे फक्त दीड फुटाची. हे पार करत असताना चुकून पाय घसरलाकी डायरेक्ट त्या दलदली मध्ये फसणार आणि तिथे फसलो की नक्कीच वाघांची शिकार होणार कारण या दलदलीतून बाहेर पडायचे जरी ठरवले तरी त्याला कमीतकमी १५-२०मिनिटे लागली असती. प्लॅन असा केला की एका वेळी एकटाच दगडावरून उडी मारून जायचे आणि बाकी लोकांनी वाघाकडे लक्ष्य ठेवायचे. जेव्हा तिघेपार करून गेले आणि मंगेश हा सगळ्यात शेवटी होता जर वाघांनी हमला केला तर समोरच्या तिघांनी मिळुन जोरदार दगडाचा मारा मारायचा जेणे करून मंगेश ती दलदल पार करून येईल. असे सगळे एक एक करून ती दलदल पार करून पुढे गेले आणि मोकळा स्वास त्यांनी सोडला. आणि पुन्हा त्या परतीच्या प्रवसा साठी निघाले. परतीच्या प्रवासामध्ये ही त्यांना खूप चांगला अनुभव आला अजून जंगली प्राणी, पक्षी यांचा मुकाबला करावा लागला.


दुपारचे २-२.३० झाले होते पोटामध्ये सकाळपासून अन्नचा कण ही गेला न्हवता जवळचे पाणी ही संपले होते. सर्वांना खूप भूक लागली होती इतके चालून चालून सर्वांच्या अंगातील कसर गेली होती, घसा कोरडा पडला होता, चालण्यासाठी अंगात ताकत न्हवती. सर्वांनी विचार केला आणि जेवणा साठी इथे थांबू असे मंगेश कडे विनंती केली पण मंगेश ने पूर्ण नकार दिला याचे कारण म्हणजे त्या वाघा पासून अजून यांची सुटका झाली न्हवती त्याला सगळ्या छुप्या वाटा माहीत होत्या आणि तिकडून येऊन ही तो हमला चढवू शकतो तसे हे सगळे त्या ठिकाणी नवीन त्यांना तर काहीच माहीत न्हवते. मंगेश च्या या मतांवर सगळे सहमत झाले आणि आलेल्या नदीच्या पात्रातुन तसेच पुढे चालले होते. अजूनही त्याना वाघाची भीती ही होतीच कारण हे त्या वाघाच्या राज्यात गेले होते. पुढे जाता जाता त्यांच्या जुन्या पाऊल खुणा दिसल्या आणि बघतात तर काय जिथे त्यांच्या पाऊल खुणा होत्या त्यावर वाघाच्या ही पाऊल खुणा उमटलेल्या दिसत होत्या. म्हणजेच तो वाघ यांच्या पाऊल खुणा पाहून आणि त्याचा अंदाज घेऊनच यांच्या पाळत करत होता. हे सगळे पाहतच त्यांना अजून घाम फुटला आणि परत सगळे घाबरले आणि मना मध्ये एकच ठरविले लवकरात लवकर या ठिकाणाहून बाहेर पडायचे. ते ज्या घई मधून या नदी पत्रात उतरले त्या घईच्या दिशेने पुढे चालत राहिले. या सगळ्या गडबडीत ज्या घई मधून आले त्या घई सोडून दुर्दैवाने दुसऱ्या घई मध्ये घुसले आणि तसेच पुढे चालत राहिले. हे सर्व इतके थकले होते की याची यांना काहीच भान न्हवती आत्ता त्यांना फक्त त्या वाघाच्या आवारातून बाहेर पडायचे होते.


हे असेच त्या घई तुन चालत चालत संध्याकाळी ५.३०- ६ च्या आसपास एका पठारावर येऊन पोहचले आणि त्यावेळी त्यांनी ठरविले की आत्ता आपण वाघा पासून जवळपास खूप दूर पर्यंत आलो आहोत काही तरी पोटाला अधार द्याला हरकत नाही. ते चक्क सकाळी ६-६.३० वाजल्यापासून संध्याकाळी५.३०-६ वाजेपर्यंत तसेच उपाशी होते फक्त त्यांना पाण्याचा असारा घ्यावा लागला होता. एकतर वेळ खूप झाला होता अजून किती अंतर कापायचे याचा काहीच अंदाज अजून यांना न्हवता म्हणून त्यांनी जेवण जे चालत चालत करायचे ठरविले. त्यांच्या बॅग मध्ये जॅम आणि चपाती होत्या मंगेश ने सांगितल्या प्रमाणे चपतीला जॅम लावून चालत चालत खात परतीचा प्रवास सुरूच होता. कारण यांना वेळ हा खूप मौल्यवान होता आणि उजेडात जितजे अंतर कापत येईन तेवढे सगळ्या साठी चांगले होते. पुढे चालत असताना यांना वाटेमध्ये खूप सारे जंगली प्राणी दिसले. असेच पुढे चालत असताना दोन तीन वेळा जंगली (रान) डुकरांचा कळप त्यांच्या बाजूने पळत गेला काही वेळा साठी ते घाबरले पण त्या रान डुकरांनि याना काहीच केले नाही ते त्यांच्या मार्गाने निघून गेले. थोडे अंतर काटल्या नंतर त्यातील एकाला म्हैस दिसली आणि त्याला वाटले की आपण कोणत्या तरी गावा जवळ आहोत आणि सुटकेचा थोडा निःस्वास घेत त्याने आपल्या सहकार्यांना सांगितले. मंगेशनी पाहताच सांगितले ती म्हैस नसून गवारेडा म्हणजे जंगली रेडा आहे. गवारेडा ही तसा खूप विचित्र प्राणी त्याची छेडछाडी केली तर तो काही करू शकतो आणि काही न करताही तो यांच्या वर हमला करू शकत होता. मंगेशनी सांगितले की आपण याला काहीच न करता म्हणजे त्याच्या कडे लक्ष न देता जसे आहोत तसे पुढे चालत राहू ते आपल्याला काही करणार नाहीत. हा प्रवास करताना अजून एका गोष्टीनी त्यांना परेशान केले होते ते म्हणजे माशी. त्या माश्या म्हणजे आपल्या परिसरात आढळतात त्या तर खूप नॉर्मल असतात पण ही तर जंगली माशी होती जणू ती मोठ्या मधमाश्या कश्या असतात त्याप्रमाणे आणि या माश्या वारंवार यांच्या कधी तोंडावर तर कधी हातावर येऊन परेशान करत होते. म्हणजे ती माशी जशी अंगावर बसली की डंक मारून याना त्रास देत होती.


या प्रवासाआधी यांना ना त्या वाघाची जाणीव होती ना त्या मागरीची जाणीव होती ना त्या गाव्या रेड्याची हे आपले असाच विचार करून ट्रेक ला निघाले होते. तसे पुढे पठारावरून ते संध्याकाळी ७.३०-७.४५ पर्यन्त चालत होते. अंधार तर पडत होता यांच्या कडे बॅटरी ही न्हवती या चौघांपैकी फक्त मंगेश कडे मोबाईल होता आणि त्याची ही बॅटरी खूप कमी शिल्लक होती. फोटो काढण्यासाठी कॅमेरा होता पण त्याची ही बॅटरी संपल्यामुळे बॅग मध्ये कधीच ठेवला होता. इथून पुढे यांना फक्त मंगेश च्या मोबाइल बॅटरी चा आधार घेऊन पुढे जायचे होते.

१२ तास उलटून गेले तरी त्यांना काहीच सापडत न्हवते त्यांची ईच्या होती की एकादे घर गाव दिसले तर तिथे थोडा आसरा घेता येईल पण तेही त्यांना कुठे दिसत न्हवते. याच बरोबर त्यांना आणखी कोणते जंगली प्राणी इथे आहेत का याचाही अंदाज न्हवता. ते घनदाट जंगल जणू यांना अत्ता खाणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रात्रीच्या वेळी कधी कुठून अस्वल येईल की वाघ येईल हे त्यांना काही समजत नव्हते. तर या प्रवसा दरम्यान त्यांना तीन चार वेळा काजव्यांचे थवे च्या थवे दिसले त्यांना जणू पाहताच स्वर्गाचा अनुभव आला लक्ख प्रकाश तो अनुभव त्यांच्या मनामध्ये तसाच साठून राहील असा. तेवढ्यात यांना एका लांब टेकडीवर सैरदिव्याचा उजेड दिसला तेव्हा त्यांनी ठरविले की अत्ता त्या दिशेने वाटचाल करायची. त्यांच्या मनात एकच होते ते म्हणजे कुठे ना कुठे आसरा घ्यायचा. त्यांना याचे ही भान न्हवते की ते झाडाझुडुपामधून चालले आहेत की अजून कश्यातून चालले आहेत काहीच समजत न्हवते. डोक्यात एकच लक्ष्य की या दिव्या जवळ आपल्याला कोणीतरी भेटेल. तसे ते चालत राहिले आणि रात्री १०-१०.१५ च्या आसपास ते त्या सैरदिव्या जवळ पोहचले. जेव्हा ते तिथे पोहचले तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला होता कारण तो सैरदिवा हा पांढरपाणी गावातील शाळे जवळील होता. सकाळ पासून यांच्या पोटात फक्त चपाती जॅम आणि पाणी या शिवाय दुसरे काहीच न्हवते पूर्ण पणे थकून गेले होते. पूर्ण शरीर पिळून काढल्या सारखे झाले होते.

तिथे हे घर शोधत होते तेवढ्यात तेथील काही आदिवासी लोक येऊन यांना पकडून एका ठिकाणी बसवले. त्यांची विचारपूस करू लागले आणि त्यांच्या अंग तपासू लागले की कुठे काही लागले आहे का किंवा कोणत्या प्राण्याने हल्ला केला आहे का. थोड्याच वेळात त्या गावातील १५-२० लोक जमा झाले आणि त्यांची विचारपूस करू लागले की तुम्हला काही लागले आहे का किंवा काही झाले आहे का साप वैगेरे काही चावला आहे का पण या सर्वांच्या मनात एकच होते ते म्हणजे कधी एकदा आपल्या घरी पोहचतो हे सर्व त्यांना विचारत होते इथून पुढे आम्हला कसे जात येईल.


त्या आदिवासी लोकांनी यांना पाणी पाजविले जेव्हा हे पाणी पीत होते तेव्हा यांच्या गळ्या मध्ये काटे टोचल्या प्रमाणे दुकत होते कारण घश्याला एकदम कोरड पडली होती. यांच्या मनात एकच प्रश्न तुम्ही आम्हला मदत करा आणि योग्य तो घरी जाण्यासाठी मार्ग दाखवला. गावकऱ्यांनी या सर्वांना पांढरपाणी गावाच्या एका टोकाला आणून सोडले आणि पुढची पाऊल वाट दाखवून सांगितले की ही पाऊल वाट कुठेच सोडायची नाही जोपर्यंत हुंबरने गाव येईल. तेवढ्यात एका गावकऱ्यांने याना माचीस बॉक्स दिला आणि सांगितले काही मदत लागली तर ही पेटून याच्या उजेडात तुम्ही पुढे चालत राहा. एकवेळ मंगेश च्या मनामध्ये आले की आपण अत्ता या पांढरपाणी या गावी मुक्काम करावा आणि सकाळी उठून घरी जावे पण त्यांच्या सोबत जे सहकारी होते ते खूपच घाबरले होते त्यांच्या मनात एकच काहीही करू पण पहिला घरी पोहचू. रात्रीचे १०.४५-११ झाले होते मंगेश च्या मोबाईलची बॅटरी पूर्ण संपली होती. रात्रीची वेळ आणि चंद्रप्रकाशचा आनंद घेत घेत हे सर्व जण पुढे जात होते. पुढे जात असताना त्यांना सकाळची ती मोठी अंजनाची झाडे दिसताच त्यांच्या मनाला धीर मिळत होता. तास हा त्यांचा शेवटचा टप्पा होता आणि मानवी वस्ती मुळे जंगल हे इतके धनदात न्हवते. यांचा हा प्रवास हुंबरने कडे सुरूच होता एक वळण गेले की दुसरे वळण पार करत एका छोट्या उतारा जवळ येऊन पोहचले. तेवढ्या यांची नजर पुढे पोहचली आणि पाया खालची जमीन जणू सरकली बघतात तर काय इतक्या रात्री त्यांच्या समोर दोन काळ्या कुट्ट आदिवासी स्रिया दिसल्या यांना जणू चेटकीण आहेत की काय याचा भास झाला कारण रात्रीचे ११ वाजून गेले होते आणि विशेष म्हणजे या वयस्कर स्त्रीया जंगलात काय करतात. जश्या त्या पुढे आल्या तेव्हा त्यांनी या सर्वांची विचारपूस केली तुम्ही सगळे ठीक आहत ना कोणाला काही झाले तर नाही ना असे बोलताच या सर्वांचा जीवात जीव आला. त्या स्रिया यांना शोधण्यासाठी पांढरपाणी वरून हुंबरने या गावी गेले होते कारण सकाळी येथून चार लोक जंगलात गेले आहेत आणि ते अजून परतले की नाही त्यांना कोणत्या प्राण्यांनी तर पकडले नसेल या काळजी खातिर त्या पुढच्या गावी शोध घेत होत्या. सकाळी जाताना हेच सर्व लोक गावठी दारु चा आस्वाद घेत बसले होते जेव्हा दारूची नश्या कमी झाली तेव्हा पांढरपाणी गावातील ५-६ लोक हुंबरने मध्ये यांना शोधण्यासाठी पोहचले त्यातील या दोन महिला होत्या. या सर्वांनी त्यांना घाबरून एकच प्रश्न केला की मावशी या मार्गावर वाघ वैगेरे काही नाही ना, तसे त्यांचे उत्तर आले की इथे काहीच नशी तुम्ही आरामात जाऊ शकता या सर्वांना धीर आला आणि रात्री ११.३० च्या सुमारास हुंबरने या गावी पोहचले.


बघतात तर काय सकाळी जिथे यांनी दुचाकी ठेवल्या होत्या तिथे खूप सारे गावकरी एकत्र येऊन यांची वाट बघत उभे होते. जसे हे इथे पोहचले तेव्हा सगळे गावकरी एकदम खुष झाले त्यांनी चहा वैगेरे साठी पाहुणचार विचारला पण यांची हालत खूपच बेकार होती साधे पाणी पिताना घश्यामधून उतरत न्हवते. त्यांना मान देऊन यांनी पाणी घेतले थोडा वेळ विश्रांती केली आणि त्यांना सांगितले की आम्ही निघणार आहोत आमच्या गावी जाण्यासाठी.


पुढील मार्गाचा अंदाज ही त्यांनी या गावकऱ्यांन कडून घेतला पुढे वाघ वैगेरे काही नाही ना तर त्यांनी सांगितले वाघ वैगेरे पुढील मार्गात नाहीत पण अस्वल असण्याची दाट शक्यता आहे म्हणजे अजून यांच्या जिवा वरील खतरा काही गेला न्हवता. त्यांनी सल्ला दिला की मोरगिरी मध्ये अस्वल आहेत तुम्ही गाडीचा हॉर्न सारखे वाजवतजा कारण अस्वल हा तसा थोडा घाबरट प्राणी आहे या गाववाल्यांचे मनापासून आम्ही सर्वांनी आभार मानले आणि त्यांचा मोलाचा सल्ला ऐकत ते हॉर्न वाजवत आपल्या घरचा मार्ग धरला होता. पुढे हे मल्हारपेठ या ठिकाणी येऊन थांबले त्यांना खूप तहान आणि भूक लागली होती. रोडवर एक माणूस दिसला त्याला आम्ही खाण्या पिण्या बद्दल विचारपूस केली तर त्यांनी सांगितले या वेळी तुम्हला काही खायचे असेल तर पुढे एक दारूचे दुकान आहे ते खुप वेळ पर्यन्त सुरू असते तिथे काही ना काही खायला भेटेल. ते दुकान शोधत शोधत तिथे पोहचले त्या दारूच्या दुकाना शेजारी एक किराणा दुकान होते तिथे त्यांना ६-७ लस्सी पॅकेट भेटले त्यावर ताव मारून थोडी फार तहान भागविली. दोन्ही गाड्या पुढे चालत राहिल्या आणि एका ठिकाणावरून कराड आणि उंब्रज रोड वेगळे होतात तिथे दोन्ही गाड्या आपपल्या दिशेने पुढे गेल्या. अत्ता मंगेश हा उंब्रज मार्गे मसूर ला जात होता कृष्णा नदी पास करून गेला आणि पुढे जाताच त्याची गाडी पंक्चर झाली. रात्रीची वेळ रोड वाहने कमी काळोख पहिलाच चालून चालून जीव गेला होता त्यामध्ये अत्ता पुढे कसे जायचे कसेबसे ते दोघे गाडी ढकलत ढकलत रोड वरून बंद पडलेल्या क्रशर जवळ गाडी लावली आणि ठरविले की विनायक ला जे काही वाहन मिळेल त्यातून ती गावी जाईल आणि मंगेश ला घेण्यासाठी दुसरी गाडी घेऊन येईल.


थोड्या वेळातच ठरल्या प्रमाणे विनायकला एक दुचाकी भेटली त्याने मसूर मध्ये त्याला सोडले. मंगेश चा पाय दुखत होता त्यामुळे त्याने विनायक ला संगीतले होते की जर मला काही वाहन भेटले तर मी तसा पुढे येईलच. मंगेश तसाच पुढे चालत राहिला आणि थोड्या अंतरावर त्याला एक ट्रक दिसला त्याने त्याला मसूर ला सिडण्याची विनंती केली तर तो म्हणाला हो बस मी तुला सोडतो तसा मंगेश ट्रक मध्ये जाऊन बसला. रात्री चे २ वाजुन गेले होते १५-२० मी झाली हा ट्रक ड्रायव्हर पुढे जायला काही तयार नाही तो तिथे मस्त पैकी गांजा ओढत बसला होता तेवढ्यात मंगेश ला समोरून दुचाकी येताना दिसली तो पटकन खाली आला आणि आवाज दिला असता ती दुचाकी विनायक घेऊन आला होता. कसे बसे दोघे घरी पोहचले आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यानं जाग आली तेव्हा त्यांना काहीच खाता पिता येत न्हवते त्यांनी पहिला दवाखाना गाठला डॉ. नी इंजेक्शन आणि औषधे देऊन दोन दिवसाची विश्रांती करण्यास सल्ला दिला. मंगेश दोन दिवस कामावर सुट्टी टाकून तसाच घरी बसला आणि त्याची सगळी कामे त्याचे सहकारी संतोष चोपडे यांनी पूर्ण केली.


अश्या या पूर्ण दौऱ्यामध्ये यांनी ना जंगली जयगड पहिला ना प्रचितगड. पण हा एक चित्तथरारक असा विचित्र अनुभव यांना या ट्रेकमध्ये आला. येथून पुढे मंगेशने प्रत्येक ट्रेक हे पूर्ण अभ्यास करूनच सर केला. असा हा आमचा ट्रेकिंगप्रेमी मित्र मंगेश.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror