Sagar Bhalekar

Horror

3.7  

Sagar Bhalekar

Horror

जळलेला वाडा

जळलेला वाडा

6 mins
1.3K


“राहुल, अरे तुझे कोणते कपडे घेऊन जायचेत ते सांग लवकर नाहीतर तुझी बॅग तूच भर.” राहुलची आई वैतागली होती. “उद्या जायचंय गावाला आणि काय चाललंय तुम्हा दोघांचं? पहिला तो मोबाइल ठेव आणि इकडे ये.” राहुल नाराजीनेच उठला आणि आईला मदत करू लागला.राहुल जोशी, एक हुशार मुलगा. नुकतीच बी. कॉम लास्ट इयरची परीक्षा दिलेली. सुट्टी मस्त एन्जॉय करत होता. पण अलीकडेच एक व्हाट्सअप् ग्रुपला जॉईन झाल्यापासून तो थोडा हरवल्यासारखा वागू लागला होता.त्या ग्रुपवर परामानस शास्त्र, गूढ विद्या अशा रोजच्या व्यवहारापेक्षा जरा वेगळ्या विषयावर चर्चा चालायची. वास्तविक तरुण पोरं या विषयाकडे जास्त वळत नाहीत पण राहुल याला अपवाद होता. भूतांचे अनुभव, कालप्रवास, वेगवेगळ्या dimensions, astral traveling या विषयात त्याला प्रचंड कुतूहल होतं. आता कुठे त्याचं समाधान होऊ शकेल असं वाटत असताना ते सगळं सोडून गावी जायला त्याच्या जीवावर आलं होतं. तसं त्याला गावी जायला आवडायचं, पण आता या नवीन गोष्टींशी जोडलं गेल्यामुळे त्याचा घरून पाय निघत नव्हता. पण जाणंही महत्वाचं होत. आजोबांनी घराची दुरुस्ती केल्यावर हवन आणि पूजा ठेवली होती जिला घरचे सगळे हजर असलेच पाहिजेत असा मोठ्या काकांचा आग्रह होता . नाही म्हणायला कोणतंही कारण नसल्यामुळे तो थोडं मनाविरुद्धच जायला तयार झाला होता.पण कुठे माहित होतं की हे गावी जाणं त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरणार होत ते …..


राहुलचे गाव खेड तालुक्यातील सोमवणे. डोंगराच्या वळणदार कुशीत असलेले पाच-पन्नास घरांचे गाव. लाल रंगाच्या कलांनी नटलेली जवळ जवळ असणारी घरे. ही घरे बघून ग. दि. माडगूळकरांच्या " खेड्यामधले घर कौलारू" या ओळींची आठवण येते.प्रत्येकांची भात शेती, नारळी पोफळीच्या बागा, आमराई.गावात एकच मारुतीचे मंदिर होते. येथे हनुमान जयंतीचा उत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होत असे.गावातील बहुतेक घराचा त्यात पुढाकार असे. उत्सवाच्या वेळी आलेल्या नारळांचा प्रसाद करून गावातील प्रत्येक घरी वाटला जात असे.गावामध्ये ग्रामपंचायत होती. तेथे दर आठवड्याला शनिवारी सरपंचाकडे सभा भरते असे. त्यात गावाकडच्या तक्रारी ऐकून त्याचे निरीक्षण केले जाते असे. नवीन सुधारणा करायच्या असतील, तर त्याच्यावर चर्चा होते असे आणि सर्वांच्या संमतीने निर्णय घेतले जात असे. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त म्हणून घराला कौलारू छपरे असे. सुरुवातीला सर्वच घरे मातीची होती. पण हळूहळू चुनाच्या वापर करून पक्की घरे बांधली गेली.घरासमोर ऐसपैस अंगण होत. अंगणात अगदी दारासमोर तुळशी वृदांवन,घराभोवती माती आणि दगडाची कुंपण असलेली गडगा ही घराची वेंशिष्ट्ये. ह्या अंगणात आमची दिवाळी आणि उन्हाळयामध्ये मैफिल जमत असे.गावाच्या मध्यभागी 'आई नवलाईचे' प्राचीन मंदिर होते. ही गावातील ग्रामदेवता होती. मंदिराला मोठे प्रवेशद्वार होते. गावामध्ये एक जळका वाडा सुद्धा होता. पण कोणास जाणे ह्या वाडयांबद्दल लोक काहीच बोलत नसे.गावातल्या जोशींच्या वाड्यावर गेल्या दोन तीन दिवसांपासून लगबग होती.


वामनराव जोशी हे गावातलं बडं प्रस्थ. अलीकडेच त्यांच्या वाड्याचं renovation झाल्यामुळे त्यांच्याकडे पूजा होती. गावकऱ्यांच्या सुखशांतीसाठी मोठा यज्ञ या निमित्ताने त्यांनी ठेवला होता. त्यामुळे सगळं गाव त्यांच्या मदतीला आलं होतं.तो दिवस उजाडला. वामनरावांची तिन्ही मुलं सचिन, निखिल आणि प्रणव आपल्या गावी आले. दुसऱ्या दिवशी हवन आणि पूजा निर्विघ्नपणे पार पडली. दोन्ही वेळच्या जेवणासाठी सगळं गाव हजर होतं. कार्य यथासांग पार पडल्यामुळे वामनराव आनंदात होते. गप्पा मारता मारता राहुलने आजोबांकडे त्या पडक्या वाडयाबद्दल विचारले. सुरुवातीला आजोबांनी वाड्याबद्दल सांगण्यास नकार दिला, पण नंतर राहुलच्या हट्टापायी त्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. आजोबा म्हणाले पन्नास वर्षापुर्वी त्या वाड्यात एक देशमुख नावाचं सुखी जोडपं राहत असे. खूप वर्ष झाली त्याना कोणी मुलबाळ नव्हतं. मिस्टर देशमुख चांगले सरकारी सेवेत होते. मोठा बंगला, गाडी, नोकर-चाकर सर्व होत त्यांच्याकडे. नेहमी घरात कोणाही आलं तरी त्यांच स्वागत खूप थाटामाटात होत असे. पण मिसेस देशमुख नेहमी नैराश्यात असे. बाहेर जाताना कोणाच्या हातात मूल दिसलं की हे माझं मुलं आहे म्हणून त्या बाईच्या हातून हिसकावूंन घेत असे. हा सगळा प्रकार बघून मिसेस देशमुखांना गावातील लोकांनी पागल म्हणून घोषित केलं होत. हा सर्व प्रकार सहन न झाल्यामुळे मिसेस. देशमुखांनी स्टोव्ह पेटवून आत्महत्या केली. त्यामुळे हा वाडा अर्धा जळालेला अवस्थेत होता. त्यानंतर काही काळाने मिस्टर देशमुखांनी हा सरकारी बंगला सोडला. आता असं म्हणतात की, मिसेस देशमुख यांची आत्मा त्या जळक्या वाडयात आहे. त्या वाडयातून आजही विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात,

 

भारतात खूप वर्षांपासून जादूटोणा, भूत प्रेत  इत्यादी गोष्टी नेहमी होत असतात. येथे तंत्र विद्येला फार महत्त्व दिले जाते, अशिक्षित वर्ग जास्त करून या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतात. बर्‍याच लोकांचे मानणे आहे की त्यांच्या जीवनावर काला जादूमुळे फारच नकारात्मक प्रभाव पडला आहे. आजही काला जादू एक कोडे आहे. बर्‍याच धर्मांमध्ये जादू, काला जादू आणि टोना-टोटक्याला मानले जाते.काला जादू करणार्‍या व्यक्तीला तांत्रिक म्हणतात.वाईट कृत्य करून कोणावर जादू करून त्याचा नाश करू शकतो.तांत्रिक ज्या प्रकारे पूजा करतात, ते आज ही एक रहस्य आहे. प्रत्यक्षात तांत्रिक वाईट आत्म्याला बोलवतात आणि नंतर त्यांना चांगल्या आत्म्याला किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यास सांगतात. ज्या व्यक्तीला त्यांना त्रास द्यायचा आहे त्याचा एखादा कपडा, केस किंवा कुठलीही एखादी ओळख हवी असते. जर एकदा ही वाईट आत्म्याने त्रास देणे सुरू केले तर चांगला व्यक्ती देखील बरबाद होऊन जातो.


वेळ निघून जात होती. कोणीही त्या बंगल्यामध्ये राहण्यास तयार होत नव्हत. कारण मिसेस देशमुख त्या वाड्यामध्ये फिरत असे असं काही लोकांचं म्हणणं असे. भुताची गोष्ट सांगून गावातील लोक तिकडे ट्रान्सफर होणाऱ्या सरकारी ऑफिसरना तिथून पळवून लावत असे. राहुलला आजोबाची ती गोष्ट आवडली आणि त्याने त्या वाडयात एकटं जायचं ठरवलं.आणि त्याने कॅमेराही बरोबर घेण्याचे ठरवलं. अमावस्येची रात्र होती,भयानक शांतता, कुत्र्यांचं ते विव्हळणं, त्या आवाजाने काळीज जातो फाटून. मनाचा थरकाप उडून जातो. त्याने गणपतीची मूर्ती, पाण्याची बाटली, टॉर्च इ. सर्व गोष्टी आपल्याबरोबर घेतल्या. रात्रीचे ११ वाजले होते, सर्वाना गाढ झोप लागली होती. राहुल त्या वाडयाजवळ आला तर तिथे दरवाज्यला लिंबू, मिरच्या, आणि काळी बाहुली लावलेली होती. आजूबाजूला कुट्ट काळोख होता, थंडी पण खूप असल्याकारणाने राहुल थोडा घाबरला पण त्याने निश्चय केलेला कि, ह्या वाड्याचं सत्य गावासमोर आणूनच दाखवणार. अमावस्येची रात्र होती, भयानक शांतता, कुत्र्यांचं ते विव्हळणं, त्या आवाजाने काळीज जातो फाटून. मनाचा थरकाप उडून जातो. त्या वाड्याच्या भोवताली ती विहीर, त्याची ती सावली, खूप भयाण वाटत होती. मध्येच पक्ष्यांचं तो विचित्र येणारा आवाज, कुत्र्यांचं भुंकणं सगळं काही मनाचा थरकाप उडवणारं होतं. मग तो रडण्याचा आवाज अन् ती भयाण शांतता. नेहमीच असं घडायचं, प्रत्येक महिन्याच्या, प्रत्येक अमावस्येला हे असं घडायचं.


थोड्या वेळाने दरवाज्याची कडी काढून राहुल हळूच आत शिरला. आत शिरताच मांजरीचा आवाज त्याला ऐकू आला. सगळीकडे अंधार पसरला होता. धीर करत राहुल आत जात होता. जेवढा तो आत जाई तेवढाच तो पाठीमागे येत असे. गणपतीची मूर्ती काढून त्याने २ मिनटे जप चालू केला. जप करत असताना त्याला दुसऱ्या खोलीत काहीतरी उपसायचा आवाज आला. तसा लगेच तो त्या ठिकाणी धावला. तर आवाज अचानक बंद झाला आणि त्याला त्या खोलीत सगळीकडं लहान बाळाचे कपडे, खेळणी दिसायला लागल्या. समोरच लाल साडी नेसून अर्धी जळालेली बाई त्याला दिसली. कदाचित त्याला भास झाला आहे असं वाटले.पण आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी त्याला आठवू लागल्या. मिसेस. देशमुख लहान मुलांना पकडून आपल्या वाड्यावर आणत असे आणि त्याच्यावर जादूटोणा करायची. ती त्या मुलाना आपल्या वशमध्ये करायची आणि अशाप्रकारे दिवसेंदिवस गावातील लहान मुलं गायब होऊ लागली. एक दिवस अशाचप्रकारे खेडेकरांचा नातवाला तिनेच गायब करून वाड्यात आणलं होत. वेळीच गावातील लोक पोहचल्यामुळे त्या निष्पाप मुलांचा जीव वाचला. पण अजूनही दोन मुलं बेपत्ताच आहेत. ती कधीच दिसली नाहीत आणि मिळाली नाहीत. त्या वेळी मिसेस देशमुख जादूटोणा करून त्या निष्पाप मुलाला आपल्या वश मध्ये करत होती.त्या वेळी मिसेस. देशमुखांना लोकांनी पागल ठरवलं. गावातील लोकांचा विश्वास नव्हता, पण मिस्टर देशमुखांना ती वारंवार सांगायची मी हे आपल्याला मुलं व्हावी ह्यासाठी करत आहे. नेहमी ती दुसऱ्याचं मूल ती आपलं समजायचं.


पण अचानक असं काय झालं की, ती तांत्रिक बाबाचा सल्ला घेऊ लागली. त्या तांत्रिकला पण गावातल्या लोकांनी पकडून पोलिसांकडे दिले. मिस्टर देशमुखांनी पण तिला ती पागल आहे असं समजलं आणि तिच्याशी संबध संपवून टाकले, हे ती सहन करू शकली नाही आणि तिने स्वतःला सगळ्यांसमोर स्टोव्हने पेटवून आत्महत्या केली आणि ती लाल बाई म्हणजे मिसेस देशमुखच होत्या. त्यांची आत्मा अजूनही भटकत होती तिकडे. तिचा तो चेहरा बघून, राहुलच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि तो तिथंच बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी राहुल घरी आला. तेव्हा तो ह्याच गोष्टीचा विचार करत होता, तो घरी कसा आला, कोणी आणलं त्याला इथे. तो स्वप्न तर पाहत नव्हता ना, पण त्याला बाहेरून आरडाओरड आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य होतं. अजूनही तो चेहरा आठवला की, त्याच्या संपूर्ण अंगाला घाम फुटत होता. त्याची वाचाच बंद होवून जात होती. आजही मिसेस देशमुखांच्या आत्म्याला शांती मिळालेली नव्हती. आजही मिसेस देशमुखांचा आत्मा त्या वाडयाभवती भटकत होता.


 दुसऱ्या दिवशी मात्र राहुल आपल्या घरी मुंबईला जायला निघाला. तो मृत्यूच्या दारातून वाचला कसा, हेच सगळ्यांना आश्चर्य वाटले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror