Charumati Ramdas

Drama

3  

Charumati Ramdas

Drama

इण्डियन फ़िल्म्स 3.2

इण्डियन फ़िल्म्स 3.2

4 mins
484


लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव

भाषांतर : आ. चारुमति रामदास


आन्या आण्टीकडे आपण पुन्हा जरूर येऊ, कारण ती आमची खूप जवळची शेजारीण आहे, असं म्हणू शकतो आणि शिवाय या गोष्टीची मुख्य हीरोइन आहे. पण आधी आणखी काही हीरोजला भेटू या.

तिसऱ्या मजल्याचा यारोस्लाव. ओ, हा आजकालच्या हाऊसिंग सोसाइटीजच्या तरुणांचा ज्वलंत प्रतिनिधी आहे. रोमा ज्वेरने कदाचित आपलं गीत “स्ट्रीट्स-अपार्टमेन्ट्स” कदाचित रशियन स्ट्रीट्स आणि अपार्टमेन्ट्सच्या अशाच लोकांसाठी लिहिलं आहे...


यारोस्लाव – ईडियट आहे. काम-धाम नसलेला तर, ढीग भर खतरनाक आणि मी तर म्हणेन, अत्यंत खतरनाक सवयी आहेत त्याला. सदा खूष असतो, भांडकुदळ आणि आपल्या कधी लहान, तर कधी लांब केसांना इंद्रधनुष्याच्या वेगवेगळ्या रंगांत रंगवतो. तो तसल्याच प्रकारच्या तरूण मुलं आणि मुलींच्या ग्रुपचा सदस्य आहे, त्यांच्यातील काही जणं आमच्या आणि काही शेजार-पाजारच्या बिल्डिंग्समधे राहतात, आणि हा ग्रुप नेहमी रात्री दहाच्या नंतर आमच्या मजल्यावरच्या गार्बेज-पाइपजवळ जमा होतो. असं वाटतं की यारोस्लाव आणि त्याच्या मित्रांचा काही विशिष्ट वर्तुळांत चांगलाच दबदबा आहे, कारण, मॉस्कोच्या विभिन्न भागांतले लोकं बरेचदा, सगगळ्यांसाठी साडेसाती म्हणून आमच्या बिल्डिंगमधे येऊन धडकायचे, फक्त वेळ चांगला घालवायला.


रात्री दोनपर्यंत बिल्डिंगमधे हल्ला-गुल्ला चाललेला असतो, हसण्याचे आणि ओरडण्याचे आवाज़ ऐकू येतात. तरूण मुलं आणि मुली जीवनाच्या प्रवाहांत वाहवत जातात. बिल्डिंगमधे राहणारे, ज्यात मी पण होतो, सुरुवातीला तर शांततेसाठी त्यांच्याशी भांडायचा प्रयत्न करायचे, पण नंतर थांबूनच गेले.


पहिली गोष्ट, म्हणजे – हे व्यर्थच होतं, आणि दुसरी, कारण की, यारोस्लाव आणि त्याचे मित्र फक्त ओरडणारे आणि खिडक्यांची काच फोडणारे डाकू-बदमाशच नव्हते. म्हणजे, खिडक्यांची काच ते फोडायचेच, आणि आमच्या मजल्यावरची काच कित्तीदा बेदम मार खाऊन तडकून फुटलेली आहे, पण आश्चर्याची गोष्ट ही आहे, की नंतर यारोस्लाव आणि त्याचा खास मित्र वाल्या च्योर्नी न विसरता नवीन काच फिट करून द्यायचे. शिवाय, आपल्या बैठकीनंतर यारोस्लाव सकाळी केरसुणी घेऊन गार्बेज-पाइपच्या जवळची जागा व्यवस्थित स्वच्छ करून टाकायचा. आणि काही दिवसांपूर्वी तर याच्या उलटंच घडलं:


रात्रभर धिंगाणा घातल्यावर, आनंदाने आणि उत्तेजनेने बेफाम झालेल्या या तरुणांना शांत करायला आलेल्या लोकांबरोबर बाचाबाची झाल्यावर, यारोस्लावने सकाळी-सकाळी बाहेर येऊन बिल्डिंगच्या प्रवेश द्वाराजवळच्या खिडकीवर बियरचा डबा, किंवा असली कोणतीही वस्तू न ठेवता कुंडीत लावलेलं एक खरोखरच फूल ठेवलं! हे खरोखरच “धूल का फूल” होतं!


फूल विचित्र तर होतंच, आणि यारोस्लावने त्याला कुठून शोधून आणलं – माहीत नाही. ते एक मद्दडसं, कदाचित मरगळलेलं फूल होतं, किंवा त्याला कोणी चावून टाकलं होतं, जुन्या कुंडीत लावलेलं होतं, पण अगदी ताज़ं होतं आणि उमललं होतं, कुठेही लक्ष न देता. उमललं होतं! जेव्हा मी एकदा बघितलं की यारोस्लाव फुलाच्या रोपट्याला पाणीसुद्धा घालतोय, तर मला बिल्कुल राग नाही आला. खरंय, सौंदर्याला पण कुठल्या कचराकुंडीत आपला विसावा सापडतो!


मी आणि यारोस्लाव एकमेकाला फक्त ‘हॅलो’च म्हणतो, याने आमच्यातील संवाद सीमित होऊन जातो. त्यावेळेस मी त्याला फुलाबद्दल म्हटलं होतं, की, फक्त तोच या बिल्डिंगला असं करून टाकतो, की आत घुसायलासुद्धा भीती वाटते, आणि मग तिथे फूल लावतो, पण यारोस्लाव हसत-हसत, ओरडत, खूप अर्थपूर्ण आवाजात म्हणाला:


“बिज़ पालेवा” – बस असं झालंय. (एका लोकप्रिय गीताचे शब्द, या शब्दांचा अर्थ आहे – गवगवा न करता). या शब्दांचा काय अर्थ आहे, मला कळलं नाही, पण, मी खरंच सांगतोय, की थोडा वेळ मी त्यांचा खरा अर्थ शोधत होतो...

कधी कधी असंही होतं, की बिल्डिंगमधे शांतता आहे, आणि शेपिलोवासुद्धा काही आणत नाहीये आणि काही सल्लाही देत नाहीये. तेव्हा, कदाचित, अचानकच फोन वाजू लागतो. आणि जसाच तुम्ही रिसीवर उचलता, त्यांतून एक उत्तेजित, दणकट, जणू कुठे कमीत कमी आग तरी लागलीये, एका बाईचा कर्कश स्वर बोलतो:


“तर! (विराम) तर! तर!”

ही प्रकट होतेय माझी आणखी एक हीरोइन, जिचं नाव तुम्हाला लवकरच कळेल.


“हॅलो,” तुम्ही म्हणता, “कोण बोलतंय?”

काहीच प्रतिक्रिया नाही, उलट – माझ्या प्रश्नालाच प्रश्नार्थक उत्तर मिळतं.

“मी कोणाशी बोलतेय? कोण आहात आपण? मी कोणाच्या नंबरवर आले?!”

“तुम्हाला कोण पाहिजे?” मी विचारतो.पुन्हा कोणतीच प्रतिक्रिया नाही. रिसीवर ठेवून द्यावासा वाटतो, पण त्यातून पुन्हा जोरदार, त्रस्त आवाजात विचारतात:

“हा, तान्याचा मुलगा आहे का?! सिर्गेई?!”

“हो, मीच आहे,” मी उत्तर देतो.

“एपल्स!!!” रिसीवर जोराने ओरडतो.

कळत नाही की काय म्हणावं, पण मग मी म्हणतो, की चांगलं आहे, की एपल्स आहेत.


“खूप सारे एपल्स आहेत!!!”

“फार छान,” मी म्हणतो.

“ही,” पूर्वीसारख्याच त्रस्त-उत्तेजनेनं रिसीवर माहिती देतो, “ल्येना विदूनोवा, तिसरा मजला, तुझ्यावरची शेजारीण! माझ्याांना कोणीतरी दोन बॅग्स भरून एपल्स दिलेत. त्यांना खाता येत नाही. तुटके-फुटके आहेत! मोरंब्यासाठी!!! अर्धे घेऊन घे!!!”

बोलत असं होती, की स्पष्ट कळत होतं:


जर नाही घेतले, तर एखादी भयंकर घटना होईल, क्रांतिसारखी. तिला खूप विचारावंसं वाटत होतं की इतकी घाबरली का आहे, पण विचारण्यात काही अर्थ नाही:


ल्येना विदूनोवा – काटकेली, ऊंच, मध्यम वयाची बाई आहे, आणि ती नेहमी घाबरलेलीच असते. कुठेही जात असो, कुणाशीही बोलत असो – प्रत्येक काम ती अशा स्टाइलमधे करते, जणू युद्ध चाललं आहे आणि आमच्या चारीकडे शत्रूचा घट्ट वेढा पडला आहे.मी, ऑफकोर्स, थॅंक्यू म्हणतो, पण त्याची आवश्यकता नाहीये.

“मस्त! आत्ता सिर्गेइ आणून देईल!”

आणि तिचा नवरा सिर्गेइ, माझंच नाव असलेला, तुटक्या एपल्सची पिशवी आणतो, आणि तीनशे रूबल्स सुद्धा देतो, जे ल्येनाने सात महिन्यांपूर्वी माझ्याकडून तीन दिवसासाठी उसने घेतले होते.


“थॅंक्यू!” मी म्हणतो आणि एपल्सची पिशवी किचनमधे घेऊन जातो.

आता मी आणि मम्मा ओवनमधे एपल्स शिजवतो आणि त्यात साखर घालून खातो. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama