Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Charumati Ramdas

Drama


3  

Charumati Ramdas

Drama


इण्डियन फ़िल्म्स 2.11

इण्डियन फ़िल्म्स 2.11

4 mins 542 4 mins 542

लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव

भाषांतर : आ. चारुमति रामदास


पुन्हा पणजी आजी नताशा आणि फायनल...


तेच 1986 आहे, माझ्या जीवनातील तीच महत्वपूर्ण फुटबॉल मॅच – वर्ल्ड चॅम्पियनशिप-मॅच, जेव्हा मरादोनाने हातानी ‘गोल’ बनवला होता आणि सगळ्या रेफरीज़ने त्याला हे स्वीकार करत माफ़ केलं होतं की हा देवाचा हात आहे; ही तीच चॅम्पियनशिप होती, ज्यांत प्लेटिनीने सेमिफायनलमध्ये निर्णायक पेनल्टी ठोकून दिली होती, - तोच, तोच!...स्पष्टच आहे की मी लागोपाठ सगळ्याच मॅचेस बघतो, संपूर्ण महिनाभर टी.व्ही.पासून दूर नाही हलत. खोलीतल्या माझ्या मॅचेसला पण पुढे सरकावून टाकतो, आणि जेव्हा फ़ायनल होईल, तेव्हा मी अगदी हिरवा स्क्रीन होऊन जाईन आणि स्टेडियममध्ये असलेल्या फॅन्सबरोबर ओरडेन!


आणि, आजी, ही आहे, खरोखरची सेन्ट जॉर्ज डेची फ़ीस्ट!

टी.व्ही. चालू करतो, अगदी शानमध्ये, बिल्कुल आजोबासारखा, खुर्चीत बसतो, तिला टी.व्ही.जवळ सरकवतो, अशा प्रकारे की खुर्ची आणि चमचम करणारा हिरवा स्क्रीन, ज्याच्यावर छोटे-छोटे लोक धावत आहे, एकमेकांपासून फक्त दीड मीटर दूर असेल. आणि काय?


कॉमेन्टेटर बोलायला सुरुवात करतो, आणि खोलीत चुपचाप माझी पणजी आजी नताशा घुसते.

आज तिचा मूड बरोबर नाहीये – हे मला असं कळलं, की तिचा नेहमीचा व्यवस्थित बांधलेला डोक्यावरचा रुमाल आज सरकलेला आहे आणि ओठ एक डेंजरस त्रिकोण बनवतांहेत. वरून ती काही तरी सुडसुडसुद्धा करतेय; म्हणजेच – संकटाची वाट बघा.


“अरे...” नताशा म्हणते, “चल, टी.व्ही.ला थोडा आराम करूं दे!”

मला चांगलंच कळतंय की या...” टी.व्ही.ला थोडा आराम करू देचा अर्थ माझ्यासाठी काय असतो! मी महिन्याभरापासून या फायनलची वाट बघत होतो, आणि सकाळ झालीये, झोपू शकत नाही आणि अशा प्रसंगावर तर मी रात्रीसुद्धा नाही झोपत, - आणि हे अचानक “चल...” सांगा आता!


“पण हा तर,” मला इतका राग आला की माझ्या सगळ्या नसा तडतडू लागल्या, “फायनल मॅच आहे! मरादोना खेळणारे, तिगाना, प्लेटिनी, रोझ्तो...”


जेवढ्यांना मी ओळखत होतो, त्या सगळ्यांची नावं मी सांगितली, पण नताशानी ठामपणे टी.व्ही.बंद करून टाकला, आणि मग पुढे असं झालं:


ती – स्टॅण्डच्या जवळ उभी राहून त्या दुर्दैवी बॉक्सला वाचवतेय आणि मी तिला ढकलतो आणि टी.व्ही. पुन्हा चालू करतो. असं बरेचदा झालं: मी चालू करतो, ती बंद करते – आणि मग स्टॅण्डजवळ आमची दंगल सुरू झाली. वरुन, नताशाला तर जणू मजाच वाटत होती आणि मी मात्र रागाने पेटत होतो. फक्त अशासाठी नाही की फ़ायनल मॅच होती, तर अशासाठी की मला टी.व्ही. न पाहू देणं इतकं सोपं आहे. नताशा जितकी आक्रामक होत होती, तेवढाच मी सुद्धा वैतागत होतो, आणि माझ्या एका जोरदार धक्क्याने पणजी आजी हळू हळू सोफ्यावर पडू लागली, तिचे डोळे हळू-हळू गोल-गोल फिरू लागले, आणि ती चित झाली, तिचा उजवा हात निर्जीवपणे एकीकडे लटकला.


बस, सत्यानाश... फायनलबद्दल मी, खरंच, विसरूनच गेलो, नताशाला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न करतो, जसं मला व्लादिकने शिकवलं होतं, पण काहीच उपयोग होत नाहीये...

पोलिसांत फोन करू का, की मी पणजीआजीला मारून टाकलंय?

शरीरात – हृदयाच्या जवळ “गार” वाटूं लागलं, आणि या “गारठ्यामुळे” माझे दातसुद्धा किटकिट करू लागतात आणि तेवढ्यात दाराच्या मागून पॅकेट्सची सर् सर् ऐकू येते – ही तोन्या आजी आलीये, डिपार्टमेन्टल स्टोअरमधून, तिला मी काय सांगणारेय?


पण मी काही म्हणायच्या आधीच तोनेच्का आनंदाने आत येते आणि सांगते, की तिने कण्डेन्स्ड मिल्कचे तब्बल तीन डबे आणले आहेत आणि ती त्यांना आटवून पेढे बनवणारेय, जे मला बासुंदीपेक्षा जास्त आवडतात.

“फक्त एवढं कळत नाहीये, की सगळे डबे एकदमच आटवू की आधी दोन आटवून मग तिसरा आटवू?”


मी आपराधिक भावनेने हे सांगण्यासाठी तोंड उघडलंच होतं, की दुधासाठी थॅन्क्यू, पण मी चुकून नताशेन्काला मारून टाकलं आहे; नताशेन्का आपली पोज़ न बदलता, जोरात, पूर्ण फॉर्ममध्ये, थांबून-थांबून म्हणते:

“दोनच उकळ – आटव, तीन डब्यांनी जास्त चिक्कट होतील!”


जिवंत आहे! “गारठा” वितळू लागतो, दातांची किटकिट थांबली; फायनलची आठवण येते आणि पेढ्यांच्या कल्पनेने तर मला आनंदाच्या उकळ्याच फुटू लागतात. नताशा बडबडत उठली की ती प्योत्र इवानोविचकडे चालली आहे (ती टॉयलेटला प्योत्र इवानोविच म्हणते) आणि खोलीतून निघून गेली, जणू काही झालंच नव्हतं...(एवढं फक्त मला घाबरवण्यासाठीच सहन केलं होतं!)


मी ठरवलं की नताशाची गोष्ट कुणालाच नाही सांगणार, मी आणि तोन्या आजी फायनलचा शेवट बघतो, आजी पेनाल्टीला “पेनाल्चिक” म्हणते आणि मी कितीही समजावलं, की असा कोणताच शब्द नाहीये, फक्त “पेनाल्टी” आहे, तरी ती समजतंच नाही, “पेनाल्चिक कशाला...”

संध्याकाळी चहा पिताना, इतर गोष्टींबरोबरच, मी नताशाशी झालेल्या भांडणाबद्दल सांगतो.


आजोबा क्वैक-क्वैक करत म्हणतात की, “एक म्हातारी कशी पोट्ट्याला वेडं करू शकते” आणि मग ते ‘न्यूज़’ येईपर्यंत (म्हणजे, प्रोग्राम ‘व्रेम्या’ सुरू होई पर्यंत) ‘फोर्श्माक (खीमा – अनु.) (एक पक्वान्न, जे आजोबाला बनवता येतं, आणि जे बनवणं त्यांना आवडतं), तयार करून ठेवतील, म्हणजे आम्हाला किचनमधून बाहेर निघायला पाहिजे.


पण मी नाही जात, उलट आजोबांना म्हणतो की न्यूज़च्या नंतर आपण पत्ते खेळू आणि जर त्यांना वाटलं, तर ते मला ‘प्रेफरन्स’ खेळणं शिकवू शकतात. हे मस्तच होईल! नाही तर जेव्हा आमचे सगळे आजोबा (माझे आणि व्लादिकचे) खेळायला सुरुवात करतात आणि त्यांच्यासोबत व्लादिक आणि त्याचे पप्पा पण खेळतात, तेव्हां मला कळतच नाही की काय करावं. पण आता, कदाचित्, जेव्हा मी शिकून घेईन, तेव्हा मी पण सहजपणे खेळू शकेन.                                


Rate this content
Log in

More marathi story from Charumati Ramdas

Similar marathi story from Drama