Charumati Ramdas

Drama

3  

Charumati Ramdas

Drama

इण्डियन फिल्म्स - 1.6

इण्डियन फिल्म्स - 1.6

3 mins
418


लेखक : सिर्गेइ पिरिल्याएव

भाषांतर : आ, चारुमति रामदास


1.6

ते सोनेरी दिवस...  


ही त्या जुन्या काळातली गोष्ट आहे, जेव्हा टी.वी. वर नुकतीच फ़ॅन्टसी फिल्म “भविष्य काळातून आलेले पाहुणे” दाखवण्यात आली होती आणि सगळी मुलं स्पेस-पाइरेट्स आणि रोबो वेर्तेरचा खेळ खेळायची. मुलांना फिल्मच्या हीरोइन एलिस सिलेज़्न्योवाशी प्रेमच झाले होते आणि मुलींना – फिल्मच्या मुख्य हीरो कोल्या गेरासीमोवशी... 


वोवेत्स मला नऊमज़ली बिल्डिंगची वेल्क्रो नाही काढू देत आणि त्याला वाटतं की ज़र मी वेल्क्रो काढून टाकीन तर त्याला हिवाळ्यात थंडी वाज़ेल. पण मी तर फार पूर्वीपासूनच वेल्क्रोला हातदेखील लावत नाही आणि वोवेत्स माझा मित्र आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही बेंचवर बसलो होतो आणि तो म्हणत होता:


“कळत नाहीये की मला मॉस्कोला जायला पाहिजे किंवा नाही.”


“तुला कशाला जायचं आहे मॉस्कोला?” मी विचारतो. वोवेत्स आपल्या पॅन्टच्या फाटक्या खिशांतून अनेक वेळा दुरुस्त केलेला बटवा काढतो, ज्यांत कधीच एकही पैसा नसतो आणि मला पॉलिथीनच्या मागे घुसवलेला एक छोटासा फोटो दाखवतो.


“हिच्याकडे,” तो म्हणतो.

मला एक ओळखीचा चेहरा दिसतो, पण लक्षात येत नाही की ही कोण आहे.


“कोण आहे ही?” मी विचारतो.

पण वोवेत्स माझ्याकडे अशा काही नजरेने बघतो, की मला लगेच आठवतं.



“-आ-आ! हिनेच तर ‘भविष्य काळांतून आलेले पाहुणे’ मध्ये एलिसचा रोल केला होता! तू, काय, तिला ओळखतोस? असं वाटतं, की चांगलीच आहे, वोवेत्स!”


“माझी गर्लफ्रेण्ड आहे,” वोवेत्स गंभीरतेनं सांगतो.


“ओह, नो, असं असूंच शकत नाही!”

आश्चर्यामुळे मी हळू-हळू गवतावर लॅण्ड करायला लागतो. एलिस – वोवेत्सची गर्ल फ्रेण्ड!


“तू तिला कसा काय भेटलास?” मी विचारतो.


“मी नाही, ती मला भेटली. मॉस्कोत, फेस्टिवलमध्ये. ती माझ्याजवळ आली आणि – बस, आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली.”

मला वोवेत्सचा इतका हेवा वाटायला लागला! पण मला सुद्धा एलिस खूपच आवडते!


 “आणि तू,” मी म्हणतो, “अजूनसुद्धा विचारच करतोय, की तुला जायला पाहिजे किंवा नाही?!”


“हो, माहित आहे.” वोवेत्सने बटवा परत खिशात ठेवला. “कदाचित्, ती स्वतःच येईल, बस, मला एवढंच नाही माहीत की केव्हा येईल... मला भेटायची खूप इच्छा आहे तिला.”


घरी आल्यावर मी आजीला सगळी माहिती देतो, की फिल्म ‘भविष्यांतून आलेले पाहुणे’ या फिल्मच्या एलिसचे नऊ मजली बिल्डिंगच्या वोवेत्सशी प्रेम झाले आहे आणि ती लवकरच त्याच्याकडे येणार आहे!


“त्या वोवेत्सशी,” आजीने विचारलं,


“ज्याचे ओठ जाडे-जाडे आहेत?”


“आता इथे जाड्या ओठांचं काय काम आहे!” मी विचारतो. “त्याने मला आत्ताच एलिसचा फोटो दाखवला आहे!”


पण आजी हसायलाच लागली:

“बस, एवढंच उरलं होतं! एलिस आमच्या जाड्या-जाड्या ओठांच्या वोवेत्सला मिठी मारेल! तिला दुसरं कोणी नाही भेटलं!”


‘हसूं दे, हसूं दे’, मी विचार करतो.


पण एलिस नक्कीच येईल वोवेत्सला भेटायला! तसं, म्हणजे, मला सुद्धा हेवा वाटत होता. वोवेत्सच्या जोड्यांना लेसेस देखील नसतात. ते कोणच्या तरी ताराने बांधलेले असतात. आणि एलिसला आठ भाषा येतात! ती प्लूटोवर सुद्धा जाऊन आलीयं. तिने स्पूत्निक लांच केलेलं आहे, जे सगळ्या आकाशगंगांमध्ये उडत आहे आणि पृथ्वीवर सिग्नल्स पाठवतंय. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama