इण्डियन फ़िल्म्स - 1.1
इण्डियन फ़िल्म्स - 1.1


(बाल साहित्यकाराची आत्मकथा)
लेखक : सिर्गेइ पिरिल्याएव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
तीन पासून अनन्तापर्यन्त
जेव्हा आम्ही हिंडायचो...
गॅस स्टेशनवर...
जेव्हा मी.....
जेव्हा मी तीन वर्षाचा होतो, तेव्हा मम्मी-पप्पाने माझ्यासाठी एक सायकल – ‘फुलपाखरू’ – घेतली. तिच्यावर जायला मला खूप भीती वाटायची, कारण मला सायकल चालवायला येत नव्हते, मग पप्पांनी मागच्या चाकाच्या दोन्ही बाजूंना आणखी दोन छोटी-छोटी चाकं बसवून दिली. ती अशासाठी की मी मजेत सायकल चालवायला शिकावं. पण या दोन चाकांमुळे सायकल अशी काही राक्षसासारखी झाली, की चालवत रहा, चालवतच रहा, पण कुठेच जाऊ नका. आणि या फिट केलेल्या चाकांमुळे मला सायकल चालवायला लाज वाटायची, कारण सगळ्यांना कळून यायचं की त्यांच्याशिवाय माझं काम चालणार नाही. मला हे सहनच व्हायचं नाही आणि मी मम्मी-पप्पांना सांगून टाकलं की मी या एक्स्ट्रा चाकांशिवायच सायकल चालवणार.
आणि खरंच, सायकल चालवणं जरादेखील अवघड नाही झालं. मी, जणु काही सायकलवर नव्हतो जात, पण ‘फुलपाखरा’वर बसून कम्पाऊण्डमधे उडत होतो. पण मग, असं झालं की मी टेकडीवरून खाली येत होतो आणि अचानक माझ्या रस्त्यांत स्टॉलर घेतलेली एक बाई प्रकट झाली. मी तिला कित्तीदा ओरडून-ओरडून एका बाजूला व्हायला सांगितलं, पण, साहजिकच आहे, तिला असं वाटलं की टेकडीच्या उंचीकडे बघता ‘फुलपाखरा’वर सवार माझ्याकडून तिला काही धोका नाहीये. म्हणून मला पटकन टर्न घ्यावा लागला. मी सर्रकन उजवीकडे वळलो, हॅण्डलवरून उडत सायकलवरून पडलो आणि माझी उजवी करंगळी मुरगळली.
इमर्जेन्सी रूममधे एका सुंदर नर्सने माझी करंगळी ठीक करून दिली. मला दुःख वाटू नये म्हणून ती सतत मंद-मंद हसत होती, जसं सिनेमात असतं:
“डोळे बंद कर आणि सहन कर, तू तर माझं शांत बाळ आहे.”
आता थोड़ं बरंसुद्धा वाटत होतं.
चार वर्षांचा असताना मी घरात एक मांजर आणलं. मला ते मांजर आपल्या घरात पाळायचं होतं. पण त्याला घरात ठेवायची परवानगी मला कोणीच दिली नाही, उलट, मांजरीला दूध पाजून हाकलायला लागले. कमीत कमी दूध तरी नसतं पाजलं, तसंच हाकलून द्यायचं, पण इथे तर दूधसुद्धां पाजलं – आणि गेट आऊट! मला इतकं अपमानास्पद वाटलं की मांजरीसोबत मीसुद्धा घरातून निघून जाण्याचा निश्चय केला, आणि, बस, फुलस्टॉप.
मी बाहेर निघून आलो.
नऊ नंबरच्या बसमध्ये बसलो आणि चाललो, मांजरीला सतत हातामध्ये पकडून. सगळे लोक माझ्याकडे येऊ लागले : कित्ती छान मांजर आहे, कित्ती छान मांजर आहे!
मांजर मला सारखं बोचकारत होतं, बसने आपला राऊंड पूर्ण केला आणि परत त्याच जागेवर आली. मला खूप वैताग आला आणि मी ठरवलं की आता पाईच घरातून निघून जाईन. मी गॅस स्टेशन (पेट्रोल पम्प)ची चक्कर मारली आणि गवताच्या मैदानातून चालत गेलो. मांजरीला नेणं कठिण झालं होतं, कारण ती मला नुसतं बोचकारतच नव्हती, बैलासारख्या आवाजात म्याऊँ-म्याऊँ सुद्धा करत होती. हिच्यात एवढी हिम्मत कुठून आली?
मी सुस्तावण्यासाठी बसलो, म्हणजे थोडा वेळ तरी मांजराला हातात पकडावं लागू नये, - मी विचार केला की ती पण थोडं हिंडून येईल. पण मी तिला सोडताच, ती तीरासारखी पळून गेली. निश्चितच माझं वागणं - तिच्यासाठी घरातून निघून जाणं - तिला आवडलं नसावं.
आणि हे कोणच्यातरी गावाच्या रस्त्यावर झालं होतं. माझं डोकं अगदीच फिरलं होतं. मी रस्त्याच्या कडेला बसलो. पाय दुखतायत, संपूर्ण अंगावर ओरखडे आहेत, मांजर पळून गेलेली आहे – रडावंसं वाटतंय. अचानक बघतो काय – एक कार इकडेच येत आहे. आणि केबिनमधे आहे अंकल वलोद्या – हे माझ्या पप्पांचे गॅरेजचे मित्र आहे. त्यांनी मला बघून हात हलवला :
“ऐ! तू इकडे कसा आलास? चल, घरापर्यंत घेऊन चलतो!”
आणि, घेऊन आले. पण, तरीसुद्धा मी घरातून निघूनच जाणरेय. जर ते एका मांजराला सुद्धा ठेऊ शकत नाही, तर पुढे पण कसली अपेक्षा करायची?
मी पाच वर्षाचा असताना मला दहा रूबल्सची एक नोट सापडली. हे, म्हणजे खूप सारे पैसे होते, म्हणजे समजा, आजचे दहा हजार, फक्त, तेव्हा नोट वेगळ्या प्रकारचे होते. तर, म्हणजे, मला दहा रूबल्स सापडल्याबरोबर मोठी मुलं पट्कन धावत धावत माझ्याकडे आली. त्यातील एक म्हणाला :
“ऐक, माझे दहा रूबल्स हरवलेत!”
दुसरा मुलगा त्याला धक्का देत बोलला :
“नाही, माझे हरवलेत! सकाळी, मी कुत्र्याबरोबर हिंडत असताना!”
मी त्या कुत्रेवाल्या मुलाला दहा रूबल्स देणारच होतो, पण तेवढ्यात बिल्डिंग नम्बर तीनची माझी शेजारीण, वेरोनिका आमच्याजवळ आली आणि म्हणाली :
“खोटं बोलतोय, तुझ्याकडे तर कुत्राच नाहीये! हे याचे दहा रूबल्स आहे, कारण त्याला ते रस्त्यावर पडलेले सापडलेत!”
सगळे लोक माझी ईर्ष्या करू लागले, फक्त मला दहा रूबल्स सापडले म्हणून नाही, तर यासाठी की वेरोनिकाने माझा पक्ष घेतला होता. कारण की वेरोनिका खूप सुंदर होती आणि ती माझ्याकडून बोलली होती, त्यांच्याकडून नाही. त्यानंतर मी आणि वेरोनिकाने पेट्रोल पम्पला एक चक्कर मारली आणि तिच्या घरी टी.वी. पण बघितला.
त्यानंतर माझ्या कम्पाऊण्डचे सगळे लोक मला चिडवायलासुद्धा लागले, की मी प्रेमात पडलोय, पण मलातर माहीत होतं न की ते ईर्ष्येपोटी असं करताहेत, म्हणून मी वाईट वाटून घेतलं नाही आणि, समजा, मी प्रेमात जरी पडलो असलो, तर काय? कदाचित, माझं वेरोनिकाशी लग्न सुद्धा झालं असतं, जर एक गोष्ट नसती झाली तर.
मी आमच्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून सूर्यफुलाच्या बिया चघळत होतो.
तेवढ्यांत साफ़-सफ़ाई करणारी दाशा आण्टी तेथे आली. मी पट्कन बिया लपवल्या, पण दाशा आण्टीने विचारलंच :
“बाळा, तुला माहीत आहे कां कि या बिया इथे कोण कुरतडंत होतं?”
मी पण तिला सांगून टाकलं :
“दाशा आण्टी, खरं सांगू का? तो मीच होतो.”
आता तर ती माझ्यावर अशी ओरडायला लागली, जसं तिला वेडच लागलंय! म्हणते काय, की मी बिल्डिंगच्या प्रवेशद्वारात पायसुद्धा ठेवायचा नाही.
म्हणजे, वेरोनिकाच्या बिल्डिंगमध्ये.
दाशा आण्टी पहिल्या मजल्यावर राहते, आणि तिची खिडकी प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूलाच आहे. म्हणजे, गोष्ट हाताबाहेर गेलीय. ओ गॉड, जर कुणी दाशा आण्टीला कुठलं दुसरं क्वार्टरच दिलं असतं? कदाचित तिच्या मनात थोडा तरी दया भाव उत्पन्न झाला असता!
जेव्हा मी सहा वर्षाचा होतो, तेव्हा पप्पांनी मला एक फुटबॉल प्रेज़ेन्ट दिला. पण हा काही साधासुधा बॉल नव्हता, पण तोच बॉल होता ज्याने खरोखरच्या ‘स्पार्ताक’ टीमचे खेळाडू प्रॅक्टिस करायचे.
तुम्ही म्हणाल, असं कसं झालं? सांगतो : माझ्या पप्पांचे एक मित्र मॉस्कोमधे राहतात आणि त्यांची बेस्कोवशी दोस्ती आहे. आणि बेस्कोव – ‘स्पार्ताक’ टीमचा ट्रेनर आहे. मोठी मुलं लगेच आपल्या खेळात मला घेऊ लागली, तेच, जे माझे दहा रूबल्स हिसकावू पहात होते. ते मला बोलवायला माझ्या घरीसुद्धा यायचे, जणु काही मी सहा वर्षाचा नसून त्यांच्यासारखा बारा वर्षाचा आहे. मी खूश होतो, कारण आमच्या कम्पाऊण्डचा सर्वांत चांगला मुलगा, ल्योशा रास्पोपोवपण माझ्याशी हात मिळवून हॅलो म्हणू लागला आणि त्याने मला लेमोनेडदेखील पाजलं.
पण मग, स्पार्ताकवाला बॉल उडून एका नोकदार वस्तूला जाऊन भिडला, फाटला, आणि ल्योशाने लगेच मला लेमोनेड पाजणं बंद केलं, त्याने हात मिळवून ‘हॅलो’ म्हणणंसुद्धा थांबवलं. सुरुवातीला मी खूप उदास झालो, पण मग माझ्या मम्माने दाशा आण्टीला वाशिंग पावडरचा एक डबा दिला, आणि मी पुन्हा वेरोनिकाच्या बिल्डिंगमधे जाऊं लागलो.
ल्योशा रास्पोपोव आता मोठ्या मुलांबरोबर बेंचवर बसतो, आणि मी आणि वेरोनिका लाकडी रोलर-कोस्टरजवळ बसून गोष्टी करतो. मोठी मुलं पुन्हा माझा हेवा करू लागतात, कारण की वेरोनिका नुसती सुंदरंच नाहीये, तिचा चेहराच जणु सांगतो की मी तिला आवडतो. बस, ल्योशा रास्पोपोवला हेच शांतपणे बघवत नाही. मत्सरी कुठला आणि म्हणतात की तो कम्पाऊण्डमधे सर्वांत चांगला मुलगा आहे!