इंडियन फ़िल्म्स - 1.7
इंडियन फ़िल्म्स - 1.7


1.7
मी आणि वोवेत्स फोटो प्रिन्ट करतो...
लेखक: सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
सन् 1988मध्ये मी फोटोग्राफी शिकलो. ही, म्हणजे, फार कमालीची गोष्ट होती, पण यात काही अडचणी होत्या. मुख्य म्हणजे, त्या काळात असे फोटो स्टूडियोज़ नव्हते, जे फ्लॅशच्या मदतीने एका सेकंदांत फोटो प्रिन्ट करून देतील, दूर-दूरपर्यंत नव्हते. फोटोग्राफ़ बनविण्यासाठी गरज होती फोटो-एनलार्जरची, लाल लॅम्पची, रील मधली फिल्म बघण्यासाठी एका बेसिनची, फिक्सरची, डेवेलपरची, फोटोग्राफिक पेपर वगैरे वगैरेची... हे सगळं करण्यासाठी सर्वांत जास्त गरज होती – टाइमची. एनलार्जर सोडून माझ्याकडे बाकी सगळं होतं, पण एनलार्जरशिवाय कामच चालणार नव्हतं आणि तो खूप महागडासुद्धां होता. मम्मा-पापाने प्रॉमिस केलं होतं की मला एनलार्जर घेऊन देतील, पण न्यू-इयरला, आणि आत्तातर फक्त मे महिना चालू होता. वाट बघणं शक्य नव्हतं, आणि जर माझा मित्र वोवेत्स नसता तर काहीही होऊ शकलं नसतं.
“चल, माझ्या घरी फोटो प्रिन्ट करू का?” एकदा वोवेत्सने मला म्हटलं. “माझ्याकडे सगळं आहे आणि डेवेलपरसुद्धा आहे...”
सुरुवातीला माझा वोवेत्सच्या बोलण्यावर बिल्कुल विश्वास नाही बसला. चला, तुम्हाला सांगूनच टाकतो की माझा हा मित्र खूपच विचित्र आहे. म्हणजे असं, की काही दिवसांपूर्वी तो म्हणाला होता, की ‘भविष्यातून आलेले पाहुणे’ची एलिस – त्याची गर्ल फ्रेन्ड आहे. आणि हिवाळ्याच्या दिवसांत त्याने मला आपल्या नऊ मज़ली बिल्डिंगचे वेल्क्रो काढायला मनाई केली होती, कारण की वेल्क्रो नसेल तर त्याला हिवाळ्यात खूप थंडी वाजेल, कारण की तो पहिल्या मज़ल्यावर राहतो आणि वेल्क्रोचा बराचसा भाग त्याच्याच बाल्कनीखाली आहे. आणि असंही, की वोवेत्स आपले जोडे लेसेसच्या ऐवजी निळ्या ताराने बांधतो. वोवेत्सने कित्येकदा असं पण सांगितलं होतं की शहराच्या एका शाळेत कुंग-फू शिकवतो, तो कुंग-फूचा ‘पोचलेला मास्टर’ आहे, कारण अगदी लहानपणी तो चीनमध्ये शिकत होता, जेव्हा, म्हणजे, अगदी खूपच लहान होता. या गोष्टीने पण मनात शंका यायची, कारण, एकदा आमच्या कन्स्ट्रक्शन साइटवर मोठी, बदमाश मुलं एकदम आमच्या समोर आली, मी काही मास्टर-बिस्टर नसताना देखील त्यांच्याशी फाइट करणार होतो, पण वोवेत्स पळून गेला. परिस्थितीकडे बघून तो पट्कन तिथून पसार झाला, आपले तळपाय दाखवत, ज्याने त्याचे अवाढव्य शरीर थलथल हलत होतं.
म्हणजेच, विचित्रंच होता माझा मित्र, त्याच्याबद्दल काहीही सांगणं शक्य नाही... त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं आणि मी विचारलं:
“तू फेकत तर नाहीये ना? खरंच डेवेलपर आहे तुझ्याकडे?”
“आई शप्पथ. प्रॉमिस.”
“तर, फोटो केव्हा प्रिन्ट करायचे?”
“बघ, वाटलं तर उद्या सकाळी ये माझ्याकडे, नऊ वाजता, रील्स, फोटो-पेपर घेऊन ये, आणि बस, प्रिन्ट करून टाकू.”
“ओके, नक्की!” मला खूप आनंद झाला आणि सकाळी-सकाळी मी निघालो वोवेत्सकडे, रील्स आणि फोटो-पेपर घेऊन.
तो शेजारच्या नऊमजली बिल्डिंगच्या दोन नं.च्या विंगच्या पहिल्या मजल्यावर राहायचा, आणि मी हसत-नाचत त्याच्याकडे चाललो होतो – कारण की माझ्या साधारण कॅमेरा – ‘स्मेना’ने काढलेले सगळे फोटो आता खरोखरचे फोटोज़ होणार होते.
“ये,” वोवेत्सने दार उघडलं. “फक्त एवढं कर, की कोणच्याही गोष्टीवर हैराण नको होऊ आणि वेडे-वाकडे प्रश्न नको विचारू. प्रिन्टिंगचे काम बाथरूममध्ये करू. लाल लॅम्प आहे, तर तू जराही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल.”
पण कोणच्याही गोष्टीवर हैराण न होणं फार कठीण होतं. असं नव्हतं की वोवेत्सच्या क्वार्टरमध्ये सगळं अव्यवस्थित होतं, फक्त सगळ्या वस्तू इतक्या अस्ताव्यस्त होत्या की असं वाटंत होतं जणू काही प्रत्येक खोलीत, कॉरीडोरमध्ये आणि किचनमध्ये अनेक शहीद-मृतात्मा घुसल्या आहेत. पलंगांना आणि दिवाणांना पायच नव्हते. आणि प्रत्येक खोलीत (एकूण दोनंच खोल्या होत्या) या आनंदी वातावरणांत एक-एक काळं मांजर बसलं होतं.
“दोघांच्या अंगावर पिसू आहे,” वोवेत्सने आधीच सांगून टाकलं.
खूपच विचित्र वाटंत होतं. माझं मन मला सांगत होतं की या क्वार्टरमध्ये काहीही होऊ शकतं. आजुबाजूची प्रत्येक वस्तू जशी एका धोकादायक उत्तेजनेने काठोकाठ भरलेली वाटत होती. थोडा वेळ मी विसरूनच गेलो की मी इथे कशासाठी आलोय. “काही खायचंय?” वोवेत्सने विचारलं.
“नाही!” मी जवळ-जवळ किंचाळलोच. त्याच्या घरी कशा प्रकारचे जेवण असेल, ते फक्त देवालाच माहीत, आणि तसे पण एक सुद्धा माणूस या घरात काही खाण्या-पिण्याची रिस्क नाही घेणार. “नाही,” मी पुन्हा सांगितले, “चल, फोटोग्राफ्स प्रिन्ट करूया.”
“चल, चल,” माहीत नाही वोवेत्स कशाला हसला.
“तू इथल्या घाणीकडे लक्ष नको देऊ, माझ्याकडे नेहमीच असं असतं. लहान-सहान गोष्टींवर मी आपलं डोकं नाही पिकवंत.”
आता मला आठवलं : वोवेत्सने एकदा मला सांगितलं होतं की, जणू त्याच्याकडे बॅंकेत पंधरा हज़ार पडले आहेत, आणि मी विचारले:
“तुझ्याकडे तर बैंकेत पंधरा हज़ार पडलेत नं, पण सगळे पलंग तर बिन पायांचे आहेत?”
“असंच असलं पाहिजे,” वोवेत्सने गूढपणे उत्तर दिलं. “तू काय पलंग बघायला आला आहेस?”
मला वाटलं की तो बरोबर बोलतो आहे आणि खूप झालं आजूबाजूच्या वस्तूंवर लक्ष देणं, आता मला कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे.
पण हे काम झालं कसं – ही एक वेगळीच गोष्ट आहे!
जेव्हा आम्ही बाथरूममध्ये गेलो आणि काही बेसिन्स आणि केरसुण्यांच्यामधून, ज्या वोवेत्सला खूप प्रिय होत्या, लाल बल्ब लावून बाकीचे बल्ब्स बंद करून टाकले, तेव्हा माझा मित्र एकदम खूप खूष झाला. असं साधारणपणे होत नव्हतं आणि म्हणूनच, हे चांगलं लक्षण नव्हतं.
“कुंग-फू दाखवूं?” डोळे मिचकावत वोवेत्सने विचारलं.
“प्लीज़, पुढच्या वेळेस?” मी सतर्कतेने म्हटलं, तसं मला माहीत होतं की मी काहीही म्हटलं तरी कुंग-फू नक्कीच होईल. वोवेत्स स्टॅण्डवर उभा राहिला, टबजवळ पडलेल्या एका रिकाम्या बेसिनला उलटं ठेवून (वोवेत्सच्या क्वार्टरमध्ये कमोड आणि बाथ एकत्र आहेत).
“वोवेत्स, गरज नाहीये!” मी ओरडलो.
“मी-ई-ई!!!” वोवेत्सने एका बाजूला लाथ घुमवली, आणि फिक्सर्ससकट बेसिन बाथरूमच्या फरशीवर लोळूं “ईडियट!” मी गरजलो. “हे काय केलंस तू?!”
वोवेत्स गंभीर झाला.
“किंचाळू नकोस,” त्याने शांतपणे म्हटले आणि थोडं थांबून, जेव्हा त्याच्या चेहरा किंचित कसानुसा झाला, तो पुढे म्हणाला: “तू आयुष्यात कितीदा फोटो प्रिन्ट केले आहेत?”
“ही दुसरी वेळ आहे,” मी प्रामाणिकपणे स्वीकार केलं.
“म्हणूनच. आणि मी पाच हजार वेळा करून चुकलो आहे,” वोवेत्सने फुशारकी मारत म्हटले. “असं होतं कधी-कधी, कि बाय-चान्स फिक्सर पडतो. तो इतका ज़रूरी नाहीये. डेवेलपर तर आहे नं!”
तरी पण मला राग येतच होता, कारण मला आता वाईट वाटत होतं, की मी वोवेत्सच्या घरी कां आलो, पण मग लवकरच आम्ही सरळ कामाला लागलो.
सात मिनिटं तर सर्व काही व्यवस्थित चाललं. पाच फोटोज़ जवळ-जवळ तयार होते, फक्त त्यांना वाळवणं शिल्लक होतं, पण मग असं काही घडलं, जे मला सांगितलंच पाहिजे.
वोवेत्सने फरशीवरून धुळीने माखलेली एक वस्तू उचलली आणि किंचाळला: “जाऊ नाही देणार! तुला कसंही करून मारूनच टाकीन! एक पण रास्कल येथून जाऊ शकणार नाही!” तो कोणत्यातरी घाणीवरून धूळ हटवण्यासाठी बाथरूमच्या फरशीवर पाणी ओतू लागला.
“तू काय करतोयस?” मी अगदी रडवेला झालो.
“झुरळं, तुला दिसत नाहीये का?! झु-ऊ-र-अ-ळ!”
आणि तो धूळ झाडत राहिला.
मी तीरासारखा बाथरूममधून बाहेर पळालो, कारण मी अगदी पस्त झालो होतो. तिथे एक मिनिट आरडा-ओरडा चालू होता, मग वोवेत्स प्रकट झाला आणि जणू काही झालंच नाही, अशा थाटात म्हणाला:
“मास्क घालून फोटोग्राफ्स प्रिन्ट करू. हे लिक्विड धोकादायक आहे.”
मी, काय माहीत कसा, तयार झालो.
वोवेत्सने खोलीतूंन दोन हिरवे मास्क्स खेचत आणले आणि आम्ही पुन्हा बाथरूममध्ये घुसलो. मास्क्स घातल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता, पण अजूनही फोटो प्रिन्ट करायची इच्छा शिल्लक होती.
बोलणंसुद्धा अशक्य होतं. प्रचंड दमट होती. पण तरीही काही नवीन फोटोग्राफ़्स प्रिन्ट झाले होते...
मे चा महिना, बाहेर ऊन आणि ऊब होती. मुलं सायकल चालवतायेत. निकोलाएव स्ट्रीटवर जुन्या नऊमजली इमारतीच्या घाणेरड्या क्वार्टरमध्ये, पहिल्या मजल्यावर, बाथरूममध्ये, लाल लाइटच्या प्रकाशांत आणि डब्यांच्या, बेसिन्सच्या, केरसुण्यांच्या आणि मॉपर्सच्या गराड्यांत, दाटीने आणि खूपच त्रास सहन करत, मास्क घालून दोन मुलं बसली आहेत आणि फोटोग्राफ़्स प्रिन्ट करताहेत. मूर्खपणा आहे. असं तर चार्म्सच्या गोष्टीत सुद्धा नसतं...
“मास्क काढून टाक, मी गम्मत करत होतो,” कावेबाजपणाने आणि निर्ल्लजतेने वोवेत्स हसला, जेव्हा त्याला कळलं की माझा दम घुटतोय.
“गम्मत करत होतो याचा अर्थ काय?” मी मास्क काढून विचारलं.
“अरे, मी साधंच पाणी ओतलं होतं, फक्त बरेच दिवसांत कोणाची फिरकी घेतली नव्हती. रविवारी ये, छान प्रिन्ट्स काढू. मम्मा-पापा घरी असतील, त्यांच्यासमोर मी कुंग-फू, बिंग-फू नाही दाखवत आणि मास्क आणण्याची पण मला परवानगी नाहीये, त्यांची रजिस्टरमध्ये नोंद आहे.”
“डेविल!” मी किंचाळलो. “आणि तुझं नाव काय बाइ चान्स पागलांच्या डॉक्टरच्या रजिस्टरमध्य् नाही नोंदवलंय?!!”
“प्लीज़, गुण्डागर्दी नाही! तू पाहुणा आहेस म्हणून मी तुला उत्तर देऊ शकत नाही, पण जर एखादी गोष्ट आवडली नसेल तर पळ इथून.”
दात घट्ट मिटत आणि काहीही न बोलता, मी आपल्या रील्स उचलल्या आणि तीस सेकंदांत बाहेर निघून आलो.
खूप वैताग आला होता. थॅंक्स गॉड, संध्याकाळी पापा ऑफ़िसमधून परत आले, तेव्हा आम्ही जीन-पॉल बेल्मोन्दोची फिल्म ‘अलोन’ बघायला गेलो. जीन-पॉल बेल्मोन्दो आम्हांला खूप आवडतो. तेव्हा मी ठरवलं की आता फोटोग्राफ्ससुद्धा एकट्यानेच प्रिन्ट करायचे. आणि वोवेत्स – त्याला मी यापुढे कधीच भेटणार नाही...
एका आठवड्यानंतर मी पुन्हा वोवेत्सशी कम्पाऊण्डमध्ये बोलू लागलो आणि त्याने पुन्हा सिद्ध करून दाखवलं की तो कुंग-फू मास्टर आहे. असेल कदाचित. ‘कदाचित कुँग-फूचे सगळेच मास्टर्स मास्क घालूनच फोटोग्राफ्स प्रिन्ट करत असावेत आणि खोटं बोलत असतील की त्यांची फिल्म-स्टार्सशी दोस्ती आहे?’ माझ्या डोक्यांत विचार आला...
तर हे अशी होती ही गोष्ट. ही कॉमेडी होती की ट्रेजेडी? तुम्हांला काय वाटतंय?
खरं सांगायचं म्हणजे मलाही कळणार नाही!
लागला.