Gauri Kulkarni

Abstract Drama Inspirational

4.0  

Gauri Kulkarni

Abstract Drama Inspirational

हवीहवीशी तुलना

हवीहवीशी तुलना

3 mins
339


शीर्षक जरा विचित्रच आहे न? गोष्टही अशीच आहे विचित्र पण सगळ्यांच्या ओळखीची. गोष्ट म्हणण्यापेक्षा किस्से म्हणूयात. किस्से आपले, आपल्या मनात लपलेले. आपण आपल्या दिसण्यापासून ते वागणं, बोलणं, खाणं पिणं सगळ्याच बाबतीत जास्त जागरूक असतो. कुठे एखादी आकर्षक व्यक्ती दिसली की नकळतपणे आपण स्वतःची तुलना तिच्याशी करू लागतो. कधी कधी ह्या तुलनेमुळे स्वतःला त्रासही होतोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काही लोक तर अस कुणी भेटलं तर त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी नको तेवढे बदल स्वतःमध्ये करायला सुरुवात करतात. ह्या सगळ्या धावपळीत आपण खरे कसे आहोत हेच विसरतात.

 

फेसबुकमुळे एक गोष्ट चांगली होते ती म्हणजे आपल्याच जुन्या आठवणी बघून आपण किती घडलो आहोत हे कळतं. तसे आपण बदलतच असतो अगदी दररोज. पण अट्टहासाने दुसऱ्यासारखं होण्यासाठी केलेले बदल कुठेतरी मनाला पटत नसतात. जी खूप जवळची आणि जेन्युईन लोकं असतात ती आडून आडून आपल्याला हे सुचवतात सुद्धा पण डोळ्यावर पट्टी असते न. आरशात बघताना नकळतच हे आपल्याला जाणवतं सुद्धा की आपण हे नाही आहोत पण मान्य कोण करणार? असो


तुलना करणं हा मानवी स्वभाव आहे. पण तुलना कुणाशी , कधी कुठे करावी ह्याचं भान बाळगणं प्रचंड गरजेचं असतं. Just because आपल्या आसपास कुणीतरी वेगळ्या लाइफस्टाइलने जगणारी व्यक्ती आली आहे.आणि मग तिला दाखविण्यासाठी मी पण तसच करणार , तसच वागणार हा अट्टहास का? ती व्यक्ती, तिच्या जगण्याच्या पद्धती, त्या मागची खरी खोटी कारण आपल्याला माहीत असतात का नाही ना?? मग आपण जसे आहोत तेही त्या व्यक्तीलाही माहिती नसतं. 


एक छोटीशी गोष्ट आठवली इथे रमा आणि रीमा एकमेकींच्या शेजारणी झाल्या होत्या नव्यानेच. रमा अगदी सालस, सोज्वळ वगैरे टाइप तर रीमा मॉडर्न. पहिल्या भेटीनंतर रमा विचार करू लागली की मी किती गावंढळ दिसते रोज अगदी घरच्या कपड्यात असते. माझं राहणीमान पण आकर्षक नाही. त्यावरून एक दोन वेळा ती नवऱ्याला बोलली सुद्धा की तुम्हाला मी अशी राहते म्हणून आवडत नाही का?? नवरा दोन मिनिटे शांत झाला मग बोलला मी तुझ्या साध्या सरळ स्वभावाला आणि राहण्याला बघूनच तुझ्या प्रेमात पडलो होतो. आणि कितीही वर्ष झाली तरी त्यात बदल होणार नाही. पण जर तुला स्वतःहून स्वतःसाठी काही करायचं असेल तर मी तुझ्यासोबत नेहमीच असेन. क्षणभरच रमाला बरं वाटलं पण लगेच मॉडर्न रीमा आणि तिच्याबद्दल सगळीकडे होणारी चर्चा आठवली. दुसरीकडे रीमा होती जिच्याबद्दल इतकी चर्चा सुरू असताना तिला मात्र तिच्या घर आणि नोकरी चक्रातून वेळच मिळत नसे. पण जेव्हा जेव्हा ती रमाला बघे तिला वाटायचं की किती छान आहे न ही, कधी काळी मीही अशीच होते. पण नोकरी करणं ही गरज झाल्याने स्वतःत बदल घडवले आणि स्वतःला हरवून बसले. 

अशा ह्या रमा आणि रीमाची एका कार्यक्रमात भेट होते. हळूहळू अवघडलेपण जात मस्त गप्पा मारतात दोघीही. एकमेकींबद्दल काय वाटतं हे जेव्हा त्या ऐकतात तेव्हा दोघींनाही पटत की आपल्याला जे हवंय ते आपल्याकडेच आहे. आपण जर स्वतःला स्वतःहून स्वीकारलं तरच आपण स्वतःला आवडू शकतो. मग एकमेकींच्या मदतीने स्वतःतल्या हरवलेल्या तिला शोधण्याचा प्रयत्न करायचा असं ठरवत त्या एकमेकींचा निरोप घेतात. हे लिहिण्याचं प्रयोजन इतकंच की स्वतःमध्ये बदल घडवताना स्वतःला काय आवडत पटतं, रुचतं आणि शोभतं हे लक्षात घेऊन बदल घडवले तर व्यक्तिमत्व खुलून येतं आणि ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. 


तुलनाही करावी पण ती फक्त स्वतःशीच. आपल्या जुन्या आणि नव्या व्हर्जनमध्ये. मग आपल्याच लक्षात येईल नेमकं काय बदलल तर आपल्याला आपण सापडू? स्वतःला स्वतःचा शोध लागणं गरजेचं आहे. नाहीतर सोशल मीडियाच्या चकचकीत रूपाने आपण कधी हरवू कळणारही नाही. मॉडर्न होण्यापेक्षा क्लासी होणं जास्त योग्य. हो पण आपल्याकडे मॉडर्न किंवा क्लासि फक्त कपड्यांनीच होता येतं असा गोड गैरसमज आहे. प्रत्यक्षात खऱ्या जगात मात्र आपले विचारच आपली परिपक्वता दाखवतात आणि कपडे कसेही असले तरी आपल खरं रूप समोर येतं.


So try to be unique not a copy of someone else. 


Compare yourself only to who you were yesterday. Be your own competition.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract