Gauri Kulkarni

Drama Inspirational

4.0  

Gauri Kulkarni

Drama Inspirational

प्रतिबिंब खरे की खोटे?

प्रतिबिंब खरे की खोटे?

3 mins
275


सारीकाच्या लग्नाला 5 वर्षं झाली होती. त्या निमित्ताने घरातच पूजा आणि छोटंसं गेट टुगेदर करावं असं तिने आणि तिच्या नवऱ्याने सचिनने ठरवलं. त्यानुसार एक छान सोयीचा मुहूर्त निवडत तयारी सुरू झाली. हवापालट म्हणून गावी गेलेल्या माई आणि आबांना आणण्यासाठी गाडीही दुसऱ्या दिवशी जाणार असल्याचे ठरले. माई आबा म्हणजे सचिनचे आईवडील. गावी सचिनचा भाऊ सुरेश त्याची पत्नी सुनीता आणि मुलगा राहत होते. गावी राहणं हा त्या दोघांचा निर्णय होता कारण तिथे राहून काहीतरी करावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती. त्यात सुनीतालाही तिथलं वातावरण आवडल्याने तिने तिथंच राहू अस ठरवलं. त्या हेतूने गावाकडच्या घरातही सगळ्या सोयीसुविधा करून घेतल्या गेल्या. सचिन आणि सुरेशला एक बहीण ही होती सपना तिचं लग्न जवळच्या गावातच झालं होतं पण ते नवराबायको नोकरीनिमित्त वेगळ्या शहरात होते आणि सासुसासरे गावी असायचे. असा आपापल्या विश्वात रमलेल्या तरीही जिवलगांचा हा गोतावळा सुखी होता. 


गेट टूगेदरच्या निमित्ताने सगळेच सचिन-सारीकाकडे जमले होते. ह्या सगळ्यात अजून एक व्यक्ती ही आपल्या कुटुंबासह सहभागी झाली होती. ती म्हणजे सपनाची जाऊ रेश्मा. ती तिच्या मुलांसह आणि नवऱ्यासह आदल्या दिवशीच आली होती. सपना आपल्या माहेरच्या शिकवणुकीमुळे आणि आपल्या दोन्ही भाऊ वहिनीच्या तालमीत नाती जोडायला शिकली होती. ह्या सगळ्यामुळे ती लांब रहात असूनही सासुसासरे तिचं कौतुक करत असत. रेश्माही लांबच होती पण गावातच आणि भांडून वेगळी झालेली त्यामुळे थोडासा मनाने दुरावा होताच. सपनाच्या कौतुकाने रेश्माला खूप त्रास होऊ लागला आपण तसे वागू शकत नाही हे तिला चांगलं माहीत होतं. मग आता काय सतत संधी मिळाली की सपनाला टोचुन बोलणं, अपमान करणं सुरू झाले. सुरुवातीला सपनाने दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्रास देण्याचं प्रमाण वाढलं तसं कुणाशीच बोलत नसल्याने सपना आतूनच खंगु लागली. त्याचा तिच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ लागला. 


आज समोर आलेल्या सपनाला बघताच सारीका आणि सुनीता दोघींनाही काहीतरी गडबड आहे हे कळलं. पूजा वगैरे आटोपल्यावर सगळे निघाले तसे त्या दोघींनी आग्रह करून आराम करण्यासाठी म्हणून सपनाला ठेवून घेतले. वेळ मिळताच दोघीही सपनाशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागल्या. आणि हळूहळू काय होतंय हे ही काढून घेतले. मुद्दा लक्षात येताच त्यांनी आधी सपनाला रडून मोकळे होऊ दिले. मग कुठल्याही परिस्थितीत माहेरचे सगळे तुझ्या बाजूने असतील हे सांगितलं. सपना थोडी स्थिर झाली. मग सारिका तिला म्हणाली की हे बघ सपना आपली चूक नसताना तू हे सगळं सहन केलं हे तुझं चुकलंच. मान्य आहे ती मोठी आहे पण तुझा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तू वेळीच गोष्टी सासुसासर्यांना , नवऱ्याला नाही तर आम्हाला तरी सांगायच्या होत्या. असो आता जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही पण इथून पुढे जशास तसे उत्तर न घाबरता दे. आणि सगळ्यात आधी तिच्या आरशात स्वतःला बघणं बंद कर. ती जे करते वागते ते तिचं प्रतिबिंब आहे तुझं नाही. तू जशी आहेस तशीच सगळ्यांना आवडतेस अगदी तुला स्वतःलाही. नवीन नाती जोडून ठेवताना स्वतःलाही जपायला शिक. आयुष्यात अशी खूप लोकं भेटतील जी तू कशी आहेस हे तुलाच सांगायचा प्रयत्न करतील. पण तुला स्वतःला माहीत आहे न तू कशी आहेस मग बास त्यावर विश्वास ठेव. आणि इतरांच्या वाईट वागण्याचा परिणाम तुझ्या आरोग्यावर नको करून घेऊ. नाहीतर येणाऱ्या बाळाचं काय होईल हळूच हसत सुनीता म्हणाली. सपनाने चमकून दोघींकडे बघितलं तशा त्या म्हणे लाडकी आहेस तू आमची आम्हाला तुला बघतानाच जाणवलं होतं म्हणून तर तुला ठेवून घेतलं. आता 7, 8 दिवस मस्त लाड करून घे मग जा तुझ्या काळजीवाहू नवऱ्याकडे. तिघीही समाधानाने हसू लागल्या. 


आपल्याबद्दल जेव्हा कुणी काही बोलतं तेव्हा बऱ्याचदा आपण स्वतःला दोष देऊ लागतो. स्वतःवर बोट ठेवतो. पण अस करण्याआधी हा विचार करत नाही की अरे माझ्यासोबत माझ्याशिवाय जास्त वेळ कुणीही घालवलेला नाहीये. म्हणजे हे म्हणतात तशी मी नक्कीच नाहीये. लोकं नकळतच आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आपण स्वतः कसे आहोत हे दाखवत असतात. त्याचं योग्य निरीक्षण करायचं आणि आपण कसे होऊ नये हे ठरवायचं😜 


After all, The way people treat you is a statement about who they are as a human being. It is not a statement about you. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama