Gauri Kulkarni

Inspirational

3.5  

Gauri Kulkarni

Inspirational

वेगळेपण जपताना

वेगळेपण जपताना

3 mins
197


असं म्हणतात की खूप उन्हाळे-पावसाळे पाहून जे शहाणपण येत नाही ते काही अनुभव शिकवून जातात. आणि अनुभवातून जे आपण शिकतो ते आपल्या कायम लक्षात राहतं. लिझा, एक मेहनती आणि हसतमुख मुलगी. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपलं जन्मगाव सोडून महानगरात येऊन धडपड करत होती. शिक्षणाची बाजू बळकट असल्याने नोकरी मिळण्यात काहीच अडचण आली नाही. अन् हा मुख्य प्रश्न सुटल्याने खाणं, राहणं हेही प्रश्न सुटले होतेच. आता प्रश्न होता तो शहरातल्या वेगळ्या वातावरणाशी जुळवून घेत सोबतच स्वतःला हरवू न देण्याचा. पण इथेच माशी शिंकली, लिझा जरी नावावरून मॉडर्न वाटत असली तरी तिच्यावर तिच्या आजीचे संस्कार होते. त्यामुळे इतरांसारखं पटकन अनोळखी लोकांशी मैत्री करणं, त्यांच्यासोबत मोकळेपणाने वावरण तिला जरा अवघड वाटायचं. तिची स्वतःची अशी एक स्पेस होती आणि त्यात उगाचच कुणी घुसण्याचा प्रयत्न केला तर लिझा अजूनच अलिप्त होत असे. पण रियाने मात्र प्रेमाने, हळुवारपणे लिझाच्या ह्या स्पेसमध्ये शिरकाव केला होता. रिया लिझासारखीच छोट्या शहरातून दोन वर्षांपूर्वी इथे आली होती. सध्या लिझा ज्या फेजमधून जात होती त्यातून रियाही गेली होती आणि त्यामुळेच ती लिझासोबत पटकन मैत्री करू शकली. लिझाला ऑफिस पार्टीमध्ये ऑकवर्ड वाटतय, त्याचा ताण येतोय हे रियाने ओळखलं होतं. हळूहळू लिझा त्या वातावरणाशी जुळवून घेताना डिप्रेस होतेय हेही रियाच्या लक्षात आलं होतं.


सुदैवाने रिया ऑफिसमध्ये कामानिमित्त आणि घरी रुममेट असल्याने जास्तीत जास्त वेळ लिझाला समजून घेण्यासाठी देत होती. एक महिन्यानंतर मात्र रियाने लिझाला काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत अस ठरवलं. त्यानुसार ती आता लिझाच्या आवडीनिवडी लक्षात घेत पॉझिटिवली कमेंट करू लागली. रियाच्या पॉझिटिव्ह वावरण्या, बोलण्याचा अपेक्षित परिणाम लिझावर दिसू लागला. 


मग हळूच एके दिवशी रियाने तिची ओळख तिच्या ऑफिसव्यतिरिक्त असणाऱ्या ग्रुपशी करून दिली. हा ग्रुपच मुळात सगळ्या स्मॉल टाऊन लोकांचा होता. इथे नवीन येणाऱ्या सगळ्यांना आनंदाने सामावून घेतले जात असे. ग्रुप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असल्याने बऱ्याच ओळखीही वाढत असतं. ग्रुपचा उद्देश फक्त एकच होता, स्वतःला हरवू न देता, नवीन ठिकाणी रुळण्यासाठी एकमेकांना मदत करणे आणि अजून एक होतं हं इथे इतरांनाही एन्ट्री होती. अट फक्त एकच दुसऱ्याला मोटिव्हेट करायचं. आता हे करायचं म्हणजे सतत कौतुक करायचं का ?तर नाही सगळ्या गोष्टी मग त्या चांगल्या असो वा वाईट स्वच्छ आणि स्पष्ट पण समोरच्याला न दुखवता सांगायच्या. जर नसेल जमत तर इतरांची मदत घ्यायची पण शक्यतो दुखवायचं नाही. जे लोक लिझासारखे कमी बोलणारे आहेत त्यांना कोषातून बाहेर पडण्यासाठी मदत करायची. 


सध्या तरी ह्या गृपमध्ये 20च जण होते पण हळूहळू संख्या वाढत होती. आता ग्रुपमध्ये वेगवेगळ्या आवडीनुसार छोटे छोटे गट होते. प्रत्येक जण इतरांना हातभार लावत स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करत होता. आता कुणी म्हणेल इतका कुटाणा कशासाठी? सांगते, ते ही सांगते, लिझाच्या आधी रियाची एक रुममेट होती. तेव्हा रियाही नवीनच होती त्यामुळे त्या रुममेटचं नैराश्य तिच्या फारसं लक्षात आलं नाही. शेवटी त्या मुलीने न्यूनगंडातून आत्महत्येचा प्रयत्न केला. ती वाचली पण ह्या गोष्टीमुळे रिया मात्र चांगलीच हादरली होती. मग मात्र रियाने स्वतःसोबत अशा अनेक जणांना हेरत मैत्री करत हा ग्रुप तयार केला होता जेणेकरून पुन्हा कुणीही अस वागू नये. 


मित्रमैत्रिणींनो अशी परिस्थिती आयुष्यात सगळ्यांवर कधी न कधी आलेली असते. नवीन नोकरी, नवीन शहर इतकंच काय नवीन नाती जोडली जातानाही प्रत्येक जण थोड्याफार फरकाने स्वतःला कमी समजत असतो. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गरज असते ती थोड्याशा आधाराची आणि तू करू शकशील ह्या विश्वासाची. दरवेळी दुसरं कुणी ह्या गोष्टी करू शकेलच असही नसतं, मग अशा वेळी स्वतःच स्वतःची सपोर्ट सिस्टीम व्हायचं. आपण ह्या आधीही आयुष्यात अडचणींना सामोरे गेलेलो असतो. त्या वेळी आपण कसे वागलो, कसे त्यातून बाहेर पडलो हे आठवायचं. थोडासा जास्त वेळ लागतो कारण माणसाच्या मनाची एक वाईट खोड आहे ते इतरांवर फार पटकन विश्वास ठेवते. स्वतःवर विश्वास ठेवायला मात्र खूप प्रयत्न करावे लागतात. पण जर एकदा आपला स्वतःवर विश्वास बसला तर मिळणारे अनुभव हे फक्त शिकवतच नाहीत तर आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही मदत करतात. 


सो, Don't lose your real self in search for acceptance by others. Be unique. इतरांना आपण आवडो न आवडो हा त्यांचा प्रश्न😜

पण जर आपण स्वतःला आवडलो तर आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती, गोष्टी, संधीही आपल्या दिशेने स्वतःहून चालत येतात. आता आपणच ठरवायचं गर्दीचा एक छोटासा भाग व्हायचं की गर्दीच कारण? 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational