Gauri Kulkarni

Drama Inspirational

3  

Gauri Kulkarni

Drama Inspirational

तुझे आहे तुजपाशी -गौरीहर्षल

तुझे आहे तुजपाशी -गौरीहर्षल

2 mins
326


प्रतिक्षा आणि तिच्या जिवलग मैत्रिणीचं दिक्षा च एकत्रच पण वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. प्रतिक्षाला नव्याने मार्केटमध्ये आलेल्या एका ठिकाणी नोकरी मिळाली तर दिक्षाच मात्र एका मोठ्या कम्पनीत सिलेक्शन झालं. पगार दोघींना जवळपास सारखाच होता पण प्रतीक्षा मात्र नाराज झाली. अर्थातच कारण योग्य होत तिच्या दृष्टीने. हळूहळू दोघीही कामाच्या ठिकाणी रुळू लागल्या. दीक्षा जिथे होती तिथे कामाचे स्वरूप आणि नियम ठराविक होते आणि ते तसेच असावे असासुध्दा नियम होता. त्याउलट प्रतिक्षाच्या कंपनीत मात्र नवनवीन प्रयोग , कल्पना मांडणे , चर्चा करणे व्हायचे. कामाची पद्धत प्रतिक्षाला सुरुवातीला कळतच नसे. कारण वर्षानुवर्षे आजूबाजूला सगळ्यांना एका साच्यातच काम करताना बघितलं होतं. पण जसजसा वेळ गेला तिलाही वेगळ्या पद्धतीने विचार करणं, तो ठामपणे मांडणं जमू लागलं. खरं तर सिलेक्शन च्या वेळी ग्रुप डिस्कशन मध्ये तिला हिरीरीने बोलताना बघूनच तिचं सिलेक्शन झालं होतं. इथे फक्त एकच केलं जातं होत की एखाद्या महिन्याचा वेळ प्रत्येक एम्प्लॉयीला न सांगता दिला जात असे. ह्या महिन्यात ती व्यक्ती काम कस करतेय, की फक्त सांगेल तेवढंच करतेय , आऊट ऑफ द बॉक्स आहे का हे निरीक्षण करून मगच लेटर हातात मिळे. अर्थात ही कल्पना आधी दिलेली असायची की आमच्या पद्धतीत, विचारसरणी मध्ये तुम्ही फिट असाल तर आम्ही तुम्हाला कंटीन्यु करू. 

प्रतीक्षा हळूहळू सगळं एन्जॉय करत काम करू लागली. एक दिवस तिची आणि दिक्षा ची भेट झाली. दिक्षा रुटीनला खूप वैतागली होती. तिचं सगळं ऐकून प्रतीक्षा घरी आली तेच विचारांच्या नादात. तिच्या बाबांनी तिला थांबवत विचारलं तेव्हा ती म्हणाली की तिलाही आधी वाटलं होतं आपल्याला तिथे जॉब का नाही मिळाला. पण आता अस वाटतय की जे आहे ते खूप छान आहे. मी बरच काही शिकते आहे स्वतःला डेव्हलप करतेय. हे त्या ठिकाणी कदाचित शक्य झालं नसतं. मग तिचे बाबा हसून तिला म्हणाले की मी तुला हेच समजावून सांगत होतो की आत्ता जिथे आहेस तिथून पुढे जायचं आहे हे नक्की. पण त्यासाठी आत्ता जे समोर आले आहे ते नको नाकारू. 

Appreciate where you are in your journey even if it's not where you want to be. Every season serves a purpose.

एक दिवस नक्की तू तुला हव्या असलेल्या ठिकाणी असशील पण त्यासाठी प्रवासातला प्रत्येक प्रसंग, ठिकाण काय शिकवत आहे त्याकडे लक्ष दे. त्या गोष्टींचा भविष्यात उपयोग नक्कीच होईल. 

आपण खऱ्या आयुष्यात पण असेच वागतो बऱ्याचदा आपल्याकडे जे असतं, आपण जिथे असतो त्या गोष्टीची किंमत नसते आपल्याला. उलट समोरच्या कडे असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे का नाही म्हणून आपण हळहळत बसतो. Every season serves a purpose , फक्त तो हेतू ओळखून स्वतःला ग्रुम करणं जमायला हवं. आपली लेटेस्ट फेज कोणती का असेना मग विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी. आताच्या परिस्थितीत जर बदल घडवून आणायचा असेल तर त्या परिस्थितीला स्वीकारून आवश्यक ते बदल करायला हवेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama