Gauri Kulkarni

Drama

4.6  

Gauri Kulkarni

Drama

घरोघरी मातीच्या चुली

घरोघरी मातीच्या चुली

3 mins
1.0K


मैथिली एका छोट्या सोसायटी मध्ये राहत होती. पंचकोनी कुटुंब सासुसासरे, मैथिली ,तिचा नवरा अमेय आणि मुलगी इरा. नणंद त्याच गावात पण तिच्या सासरी होती. ओव्हर ऑल बाहेरून बघताना एक छान हसतखेळत जगणार कुटुंब. ह्या जागी 2bhk फ्लॅट घेऊन नव्यानेच ते शिफ्ट झाले होते. हळूहळू तिथलं वातावरण , शेजार ह्यांच्याशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न सुरू होता. नवराबायको दोघेही काळाची गरज असल्याने नोकरी करणारे त्यामुळे ओघाने मुलीची थोडीशी जबाबदारी आजीआजोबांवर यायची.


घरोघरी मातीच्या चुली ह्या नियमाला हे घरही अपवाद नव्हतं पण अमेयच्या वडिलांची शिकवण होती जे काही वाद असतील ते घरातच मिटवायचे. बाहेरच्या कुणालाही त्याची पुसट कल्पना सुध्दा नको. त्यामुळे फारसे विकोपाला जाणारे वाद होत नसतं. आता हल्ली टीव्हीवर असणाऱ्या सासुसुनांची कृपा की लोकांना कुठेही आसपास हसून खेळून राहणारी जोडी दिसली की ते डोकावतात. हे सगळं इतकं छान कसं???असाच प्रकार ह्या कुटुंबाबाबतही होऊ लागला. शेजारच्या पाटील काकूंना जरा जास्तच कुतुहल होतं की सून घरी नसते तर सासू काहीच चिडचिड का करत नाही? मग आपल्या रिकाम्या डोक्याचा काय उपयोग असा विचार करत त्यांनी हळूहळू सासुशी मैत्री वाढवली. पण तरीही काही हाताला लागेना. कारण घरचा नियम सगळे मनापासून पाळत असत. मग पाटीलकाकूंनी दुसरं अस्त्र वापरले त्या आपल्या सुनेच्या कागळ्या करू लागल्या जेणेकरून तरी मैथिलीच्या सासूबाई काहीतरी बोलतील पण पुन्हा तेच. उलट त्या पाटील काकूंनाच थोडस जुळवून घेण्याचा सल्ला देऊ लागल्या. हेही फेल म्हटल्यावर आता पाटील काकू नेहमीच्या ग्रुपकडे वळल्या आणि मैथिलीच्या कुटुंबाबद्दल उलटसुलट बोलू लागल्या जे की सर्व मनानेच तयार केले होते. हे सगळे मैथिलीच्या घरच्यांना तेव्हा कळले जेंव्हा पाटील काकूंच्या मुलाने त्याला विचारलं की घरात इतके प्रॉब्लेम सुरू आहेत तर तू वेगळा का नाही राहत?? अचानक आलेल्या या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे अमेयला सुचेना पण त्याने अरे इतकं तर सगळ्याच घरात होतं वेळ दिला की सुटेल गुंता अस म्हणत वेळ मारून नेली. 


घरी आल्यावर मात्र त्याने जेवल्यानंतर सगळ्यांशी बोलायचं आहे असं सांगितलं. जेवण झाल्यावर इराला झोपवून सगळे हॉलमध्ये जमले. अमेयने आपला अनुभव सांगितला तसाच अनुभव आपल्याला आल्याचे त्याच्या बाबानी पण सांगितले. 

आई आणि मैथिलीच्या मात्र लक्षात हा प्रकार आला. आणि मग सगळं काही त्यांनी त्या दोघांना सांगितलं. लोकांना हल्लीच्या बिझी आयुष्यात दुसऱ्यांच्या घरात काय वाईट घडत आहे ह्यात इतका रस का आहे हे त्यांना कळेचना. ह्या वर उपाय एकच होता सगळ्यांशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवणे आणि आपल्या वागण्यातून घरात सगळं नीटच आहे हे लोकांना पटवणे. 

दुसऱ्याच दिवशी ठरवलेल्या पद्धतीने वागायला सर्वांनी सुरुवात केली. ऑफिसला जाताना मैथिलीला मुद्दाम थांबवत आई किंवा बाबा डबा आणून देत मग ती हसून त्यांचा निरोप घेई. अमेय आईबाबांसोबत जास्त वेळ घालवू लागला. ह्या कामात तिच्या नणंदेनेही मदत केली सुट्टीच्या दिवशी ती तिच्या नवरामुलांसह येई दिवसभर गप्पाटप्पा , खाणे ह्याने घर नुसते भरून जाई. सलग दोन महिने अशा काही छोट्या छोट्या गोष्टी इतरांच्या लक्षात येत आहेत अशा करत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला खरा, पण ह्यावेळी एक नवीनच प्रश्न समोरून आला इतकं सगळं चांगलं कसं?

ह्या प्रश्नांनी सगळ्यांची हसून हसून पुरेवाट लागली. पण एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं नातं अजूनच घट्ट झालं. ते सगळे कुटुंब म्हणून अजून जवळ आले. आणि सगळ्यांना हेही लक्षात आलं की लोक बोलणारच आपण मात्र आपलं आयुष्य जगत राहायचं आनंदाने. 


तात्पर्य हेच की आपण कसेही असु समाज मात्र त्याने लावलेल्या चष्म्यातूनच आपल्याकडे बघत असतो. आपलं वाईट होत असेल तर फुकटचे सल्ले देतो आणि चांगलं होत असेल तर बोटं मोडतो. ह्या सगळ्यांवर एकच उपाय असतो तो म्हणजे आपल्या छोट्याशा विश्वात एकमेकांना समजून घेणे, विश्वास ठेवणे आणि मुख्य म्हणजे आहे त्या क्षणांना भरभरून जगणे. आहे त्या परिस्थितीतही समोरचा आनंदी कसा काय हे लोकांना जास्त कोड्यात पाडते. कुणी आपलं घर तोडण्यासाठी, नात्यात दुरावा आणण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ते वेळीच ओळखून आपलं नातं घट्ट व्हावं म्हणून आपण प्रयत्न करावेत जे त्या व्यक्तीला जागेवर आणतील. आपण नेहमी रागाच्या भरात म्हणत असतो की हिने / ह्याने माझं वाईट केलं मी पण त्याच करणार पण हा Quote of the day काय सांगतो बघा तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील.

The best revenge is happiness, because nothing drive's people more crazy than seeing someone actually living a good life. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama