हँग ओव्हर (भाग 9)
हँग ओव्हर (भाग 9)


अरे मोहित कोन कशाला आपले फ़ोटो काढेल? वेट म्हणत मोहित आजु बाजूला पहात राहिला. त्याने आपल्या बॉडीगार्ड ला कॉल लावला पन तो लागतच नव्हता. सोनल ने मोहितला आवाज दिला सो तो परत आपल्या टेबल पाशी आला. अरे तुला भास झाला असेल मोहित जेव तू . दोघांचे जेवन झाले. सोनल म्हणाली,मोहित कॉफी घेवूया का ? ओके मोहित म्हणाला. कॉफी आली . रात्रीचे दहा वाजले होते . मोहित म्हणाला सोनल आता मला निघायला हवे आणि तो हॉटेल मधून बाहेर जावू लागला तसे त्याला डोळ्यावर गूंगी आल्या सारखे झाले. त्याला समोरचे अंधुक दिसू लागले इतक्यात सोनल आली तिने त्याला सावरले आणि. सव्हता सोबत त्याला घेेवून गेली.तिने त्याच्या गळ्यात एक हात टाकला होता दूसरा हात त्याच्या कमरे वर होता अशा रीतीं ने सोनल मोहित ला हॉटेल च्यां एका रूम कड़े घेवून निघाली आणि या अवस्थेतिल त्यांचे फ़ोटो उमेश ने काढले अशा पद्धतीने मोहित आणि सोनल चे फ़ोटो काढले की पहाणाऱ्याला वाटले पाहिजे की ते दोघ एकत्र आहेत. मोहितच्या विरोधकांनी त्यांचे काम चोख पार पाडले. साधारण दोन तासांनी मोहितला जाग आली. त्याने पाहिले की तो हॉटेल च्या रूम मध्ये बेडवर आहे त्याच्या अंगात शर्ट नाही फ़क्त बनियन आहे. आणि बाजूला सोनल .
सोनल तू काय करतेस इथे आणि मी कसा आलो इथे. मोहित चील तूच मला रूम मध्ये घेवून आलास. यू आर सो ऑसम मोहित म्हणत तिने त्याच्या गाला वरुन बोट फिरवले. त्याने तिला बाजूला हटकले वेड लागले आहे का तुला मलाच आठवत नाही मि इथे कसा आलो आणि आप दोघे एकत्र ईट्स नॉट पॉसिबल. ऐवरी थिंग इज पॉसिबल मोहित बिकॉज आय लव यू . कॉलेज मध्ये मला झिड़कारलेस ना पन आता सव्हता हुन मला जवळ घेतलेस. हे शक्य नाही सोनल असे कधी होणारच नाही. म्हणत तो उठून कपड़े घालु लागला. मोहित तू जगाला किती ही ओऱडून सांग कोणी विश्वास नाही ठेवनार तुझ्यावर. मला माहित आहे आपण एकत्र होतो . माझा सव्हता वर विश्वास आहे सोनल मी झोपेत सुद्धा गैर वर्तन नाही करू शकणार . अच्छा पण आता झाले ते झाल. मोहित ने तिचा डाव ओळखला तिला दंडाला धरून तो म्हणाला,चल आता लगेच डॉक्टर कड़े जावू आणि वी विल चेक इफ आय डन सेक्स विथ यू चल उठ. मोहित अरे त्याला आता 2 तास होऊन गेले आता रिझल्ट नेगेटिवच येणार. तरी पन चल म्हणून तो तिला ओढून घेऊन चालला. तसे तिने आरडा ओरडा केला 12 वाजत आले होते हॉटेल अजुन चालू होते तिच्या आवाजा ने सगळे लोक त्यांच्या कड़े पाहू लागले. तिथे काही प्रेस वाले ही होते त्यांनी लगेच मोहित ला घेरले साहेब हा काय प्रकार आहे या मैडम ना का तुम्ही घेऊन चालला आहात . स्टॉप इट हा माझा पर्सनल इश्यू आहे आय डोन्ट अनसर टू यू . मग प्रेस वाले सोनल ला म्हणाले,मैडम काय झाले साहेबांनी काही त्रास दिला का तुम्हाला? ते तुम्हाला कुठे घेवून जात आहेत. काही नाही मोहित आणि मि एकत्रच आहोत ओके . मोहित तिला बाहेर घेवून आला आणि एका हाताने तिला घट्ट पकड़ले होते आणि दुसऱ्या हाताने त्याने आपल्या ड्राइवर ला फोन लावला कारण कार पार्किंग जरा लांब होते. तो कॉल वर बोलतो आहे इतक्यात एक कार त्याच्या जवळ आली आणि कार मधील व्यक्ति ने सोनल ला हिसका देवुन आपल्या गाडीत घेतले. हे इतके अचानक झाले की मोहित ला काही समजेलच नाही सोनल ला घेवून ती कार निघुन पन गेली. तोपर्यंत मोहितचा ड्राइवर कार घेऊन आला पन आता लेट झाला होता सोनल तर पळून गेली पन नक्की हे प्रिप्लान होते हे आवाज मोहित ला समजले त्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव होता हे नक्की. मोहितने त्याच्या बॉडीगार्ड ला परत कॉल केला पन तो लागतच नव्हता . तो ही कुठे तिथे नव्हता. मोहितने अजयला कॉल करून जे घडले ते सगळे सांगितले. पन मोहितला हे आठवत होते की त्याने आणि सोनल ने कॉफ़ी घेतली त्यानन्तर त्याला गूंगी येवू लागली मग पुढे काय झाले हे त्याला माहित नहवते पन सोनल सोबत तो गैर वर्तन इवन कूठल्याच मुलाशी तो असे वागनार नाही हे नक्की .तो 2 तास शुद्धितच नसनार सोनल ने हा नुसता खोटा बनाव केला होता याची त्याला खात्री पटली कारण जेव्हा सोनल ला त्याने डॉक्टर कड़े जावूयात बोलला तेव्हा तिने विषय बदलला जर मी खरच गैर वर्तन केले असते तर ती गप्प बसली नसती प्रेस वाल्याना तसे बोलली असती. खुप कांगवा केला असता पन आपला डाव आपल्यावरच उलटू नये म्हणून तर ती गप्प बसली आणि तिच्या मानसांनी तिला बरोबर उचलले. असा विचार मोहितने केला. आता खुप लेट झाला होता म्हणून अजय म्हणाला उदया सकाळी घरीच येतो मी.
मोहित घरी आला. सकाळी ही बातमी सगळ्या न्यूज पेपरला आणि टी व्ही वर येणार हे नक्की म्हणूनच त्या आधी घरी या बाबत बोलावे असे त्याने ठरवले. आई बाबा जागेच होते तो घरी येई पर्यंत ते झोपत नसत आता तर जास्त काळजी त्यांना वाटत होती कारण निवडणुका जवळ आल्या होत्या .पन बॉडीगार्ड आहे म्हणून थोड़े ते निश्चित असत.आई बाबा बाहेर या जरा बोलायचे आहे मोहित ने त्यांना आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून अजिंक्य पन आला. काय झाले मोहित बाबा नी विचारले. मोहित ने हॉटेल मध्ये जे घडले ते सांगितले. बाबा म्हणाले हे नक्की विरोधकांचे काम आहे तुला बदनाम करण्याचा कट आहे हा.तू निवडुन येऊ नयेस म्हणून सगळं मुद्दाम घडवून आणले हे. पण हे खोटे आहे हे कसे सिद्ध होणार ? आई ने विचारले. आई आता त्या घटने विरुद्ध लवकरात लवकर पुरावे शोधावे लागतील. मोहित अजय ला कल्पना दिली काय याची ?हो बाबा सांगितले. बर काळजी नको करू जे सत्य आहे ते जगा समोर येईलच. पण त्या सोनल ला तू ओळखतो मोहित? हो बाबा कॉलेज मध्ये होती पण ती आता असे काही वागेल याचा जरा पण अंदाज नाही आला मला. याचा अर्थ ती माझ्या दुश्मनाना जाऊन मिळाली आहे म्हणूनच हा डाव सक्सेस झाला पण मी तिच्या अंगाला हात लावला नाही हे ही खरे कारण मी शुद्धीतच नव्हतो. उद्या अजय आला की विचार करू आपण आता झोप जा तू. आणि आई बाबा सुद्धा झोपायला गेले. हे अज्जू तू कसला इतका विचार करतोस? माझं कोणी ही काही वाकड नाही करू शकणार तू टेन्शन नको घेऊ जा झोप. हो दादा पण मी हा विचार करतो आहे की वहिनी ला हे सगळे पटेल का की तू दोषी नाही आहेस? अज्जू मीतूला मी चांगले ओळखतो शी ट्रस्ट मी लॉट ती कायम माझ्या सोबत असेल . असे असेल तर मग ठीक आहे. ओके जा झोप आता. मोहित ही रूम मध्ये आला. तो विचार करू लागला ,की कॉफी घेतल्या नंतर त्याला गुंगी येऊ लागली म्हणजे कॉफी मध्ये गुंगी चे औषध टाकले होते याचा अर्थ माझ्या मागा वर कोणी तरी होते.आणि कॅमेरा फ्लॅश झाला तेव्हा सोनल म्हणाली तुला भास झाला असेल..
क्रमश .... All rights rests with the writer. Any kind of copying will result in legal consequences.