हँग ओव्हर ( भाग 8)
हँग ओव्हर ( भाग 8)
आजची रात्र तू मैथिलीकडेच थांब. तसे ही आता तू बाहेर पडून रिस्क घेणे ठीक नाही. जर ते लोक तुझ्या मागावर असतील तर?
ओके अजय तू म्हणतो तसे करतो. तो फोन ठेवतो.
काय झाले मोहित?
मीतु आजची रात्र मला तुझ्याकड़े राहावे लागेल चालेल ना तुला?
हे काय विचारणे झाले. आय एम सो मच हैप्पी मह्यु... खूपच खुशीत मीतु असेल तेव्हा त्याला मह्यु म्हणत असे. मोहितने घरी आईला कॉल करून सांगितले की तो अजयसोबत पार्टीला गेला आहे आणि अजयकडेच थांबणार आहे. फक्त त्याच्या बाबांना माहित होते की खरे कारण काय. आईला आता काही नका सांगू असे मोहितने सांगितले होते.
तो मीतुला म्हणाला, तू बेडरूममध्ये झोप, मी इथे हॉलमध्ये सोफ्यावर झोपेन.
नाही, काय तू इथे असताना मी एकटी आत नाही झोपणर. मीही हॉलमध्ये आतली गादी घेवून झोपेन.
मोहितने तिला आपल्या जवळ ओढले म्हणाला, काय पत्रकार मॅडम काय विचार काय आहे डोक्यात तुमच्या.
आय वान रेप यू हा हा हा हा हा, मीतु म्हणाली.
अच्छा उद्याच्या पेपरला ही ठळक बातमी काय मग...
हो, म्हणत मीतु आत गेली. तिनेही आपला बिछाना टाकला.
मोहित म्हणाला, बघ मीतु इथे झोपण्यात रिस्क आहे माझ्याजवळ.
असु दे म्हणत मीतु त्याच्या मिठीत शिरली. दोघे एकमेकांच्या कुशीत झोपले. सकाळी मीतुला न्यायला प्रेसची कार येत असे. तेव्हा मीतुला सोडून त्याच कारने मोहित घरी आला. सकाळीच टीव्ही वर मोहितची बातमी दाखवली. तेव्हा आईला समजले होते. मोहित घरी आला.
मोहित तू ठीक आहेस ना, तुला काही झाले नाही ना आणि कोण होती ती लोकं?
आई मला काहीही झाले नाही फक्त कारचे नुकसान केले त्यांनी... कोण लोक ते अजय शोधेल. तू काळजी करू नकोस.
अरे पण आज गाड़ी फोड़ली उद्या तुला काही केले तर... आईने आपली काळजी बोलून दाखवली.
आई आजपासून एक बॉडीगार्ड कायम माझ्यासोबत असेल काळजी नको करू आणि तुला काय नवीन आहे का हे सगळं आई.
पण तुझ्या बाबांच्या काळात इतके काळजीचे कारण नव्हते रे.
हो आई आता लोकांना बघवत नाही त्यातल्या त्यात पुन्हा आमदारकीसाठी देशमुख घरातला माणूस मग काय कुठेतरी खुन्नस काढायची. मी काळजी घेईन आई.
बरं आवरून ये तू नाष्टा करायला. अजयने तपास जोरात सुरु केला होता. पण म्हणावे तसे यश त्याला येत नव्हते. फक्त कॉल कुठल्या भागातून येतो हे समजत होते पण त्या माणसापर्यंत पोहोचता येत नव्हते. कारचा पंचनामा झाला त्यात काही हाती लागले नाही. पण जो कोणी होता तो मोहितचा कट्टर दुश्मन होता हे नक्की होतं.
<
br>
मीतुला ऑफिसमध्ये सगळे कालच्या घटनेबद्दल विचारत होते. सर्वांना त्यांची एंगेजमेंट झाली आहे हे माहित होतं. पण राजकारण म्हटले की या गोष्टी होणारच हे गृहीत धरून चालायचे. मीतुने विक्रांतला याबद्दल कळवले होते. तिला तो कायम धीर देत असे.
विक्रांत म्हणाला, ज्या भागातून मोहितला कॉल येतो तो एसटीडी बूथ कोणाचा, नेमका कोणत्या भागात आहे हे नंबर डिटेल्सवरुन समजते. सायबर क्राइममध्ये या गोष्टी बघितल्या जातात. वेळ आली तर मी नक्की मदत करेन.
मोहित त्याच्या कामात पूर्ण बिझी होता मीतुशी फक्त फोनवर बोलणे होत असे. निवडणुका आता महिन्यावर येऊन ठेपल्या होत्या. मोहितचे पारडे सगळ्या बाजूनी भारी होते. त्याचे काम, लोकांप्रति असणारी जबाबदारी, त्याची धावपळ, मदत करण्याची वृत्ती, सगळं लोकांच्या नजरेत होतं. यात काहीही बनावटपणा किंवा खोटेपणा नव्हता. अगदी प्रामाणिकपने मोहित काम करत होता. त्यामुळे आता विजय त्याचाच हे नक्की होते.
आज सर्व नेत्यांची आजी-माजी आमदारांची, पक्ष प्रमुखांची मीटिंग एका मोठ्या हॉटेलमध्ये होती. संध्याकाळी मीटिंग सुरु झाली. मीटिंगनंतर जेवणही तिथे होते. मीटिंग झाली. मोहित आणि त्याचे सहकारी जेवणाच्या तिथे आले. तिथे ड्रिंकची सोय पण होती पण मोहित ड्रिंक घेत नव्हता.
हॅलो मोहित.
त्याने मागे पाहिले, अरे सोनल तू इथे कशी काय?
मी आणि माझे फ्रेंड पार्टीला आलो आहोत इथे, पण तू काय करतो इथे?
माझी मीटिंग होती आताच्या इलेक्शनला मी उभा आहे सो, मोहित म्हणाला. सोनल त्याची कॉलेजमेट आणि त्याच्यावर जीव लावून बसली होती. पण मोहितने तिला कधी भाव नाही दिला. कारण ती श्रीमंत घरातील लाडावलेली मुलगी होती. तिला आपल्या श्रीमंतीचा गर्वही होता. मोहित कॉलेजमध्ये कोणत्याच मुलीला भाव देत नव्हता कारण त्याला कोणत्याच मुलीमध्ये अडकून राहायचे नव्हते. त्याचा सगळा फोकस करियरवर होता. सोनलने खूप वेळा मोहितसाठी ट्राय केला पण तो नाही हाती लागला. हा सोनलला अपमान वाटत होता, तिचा ईगो हर्ट झाला होता.
मोहित इफ यू डोन्ट माइंड कैन वी टेक डिनर टूगेदर? सोनलने त्याला विचारले. मोहितने थोड़ा विचार केला मग ओके म्हणाला. दोघं एकत्र जेवत होते. सोनलने ड्रिंक घेतली. तिने मोहितला ऑफर केली.
नो सोनल आय डोन्ट ड्रिंक. ओके मग तिनेही ड्रिंक बाजूला ठेवली. दोघं गप्पा मारत जेवत होते. अचानक मोहितच्यां चेहऱ्यावर कॅमेराचा फ्लॅश पडला. त्याने आजुबाजूला पाहिले पण हॉटेलमध्ये खूप लोकं होती. त्यामुळे काही समजेना. मोहित पुन्हा जेवणाकडे लक्ष देऊ लागला, परत फ्लॅश झाला.
तसा मोहित उठला. काय झाले मोहित?
सोनल, आय थिंक कोणी तरी आपले फोटो काढत आहे.
अरे मोहित कोण कशाला आपले फोटो काढेल?
वेट म्हणत मोहित आजु-बाजूला पाहात राहिला. त्याने आपल्या बॉडीगार्डला कॉल लावला पण तो लागतच नव्हता.
क्रमशः