Sangieta Devkar

Drama Romance Crime

3  

Sangieta Devkar

Drama Romance Crime

हँग ओव्हर (भाग 10)

हँग ओव्हर (भाग 10)

5 mins
12K


कॅमेरा फ्लॅश झाला तेव्हा सोनल म्हणाली तुला भास झाला असेल म्हणजे सोनल सोबत अजून एक जण होता जो आमचे फोटो काढत होता . असा विचार करत करत तो झोपी गेला. सकाळी न्यूज पेपरमध्ये बातमी आलीच की स्वहताला चारित्र्यवान समजणारे,गरिबांचे हित चिंतक म्हणवून घेणारे माननीय मोहित देशमूख काल रात्री एका पार्टी मध्ये नशेत धुत आपल्या गर्लफ्रेंड सोबत मजा करत होते . अशा माणसाला जनता भावी आमदार म्हणून निवडून देईल का? अश्या आशयाच्या बातम्या सगळया पेपरला होत्या. टि व्ही वर न्यूज येत होत्या. मितु ला पण हे समजले होते तिने लगेच मोहित ला फोन लावला. तो म्हणाला,आज ऑफिस ला जाऊ नकोस तुझे आवरून झाले की घरी ये. सांगतो सगळं. ती येते म्हणाली. टि व्ही वर मोहित आणि सोनल चे फोटो सुद्धा दाखवत होते पण मैथिलीला मोहित वर पूर्ण विश्वास होता. तो कधीच गैर वागू शकणार नाही इतकी तिला खात्री होती आता आपण मोहित सोबत असायला हवे हे तिला माहीत होते जग किती ही नावे ठेवू दे पण माझा विश्वास कायम राहील त्याच्या वर असा मितु विचार करत होती. मीतु तिचे आवरून लगेचच मोहित कड़े आली. अजय ही आला . टी व्ही वर नुसता उत आला होता जिकडे तिकडे मोहितची बदनामी सुरु होती. सोनल ही मोहितची एक्स गर्लफ्रेंड असा गाजावाजा केला जात होता. अजय आल्यावर सर्वांनी चहा घेतला अजय म्हणाला, काल काय काय घडले ते सविस्तर सांग मला. मग मोहितने त्यांची मीटिंग मग सोनल चे अचानक भेटने,कोणीतरी त्यांचे फ़ोटो काढ़ने मग कॉफी घेतल्यानंतर त्याला आलेली गूंगी आणि मोहित शुद्धि वर आला तेव्हा सोनल ला कसे पळवले हे सगळ मोहितने सांगितले. अजय म्हणाला,एक नक्की आहे मोहित की हा तुला बदनाम करण्या साठी बनवलेला प्लैन होता त्यात तू सहज अडकलास .

सोनल तुझ्यावर प्रेम करत होती कॉलेजमध्ये असताना? हो अजय खुप मागे लागली होती पन मी तिला कायमच इग्नोर केले आहे कॉलजनन्तर आमची भेट कधीच नाही झाली. काल अचानक आली ती समोर. अजुन कोणी दुश्मन तुझा जुना एखादा ज्याच्याशी तुझ वैर असेल? नाही अजय असा कोणी ही नाही .अजय पन आता तसे मोहित चे खुप शत्रु असतील या इलेक्शन मुळे मीतु म्हणाली. हा असतील म्हणूनच सोनल ला शोधून त्यांनी हा डाव रचला पन यात अजुन कोनीतरी नक्की सामिल आहे त्याचा शोध घ्यावा लागेल. आणि तो फोन करनारा तो ही सापडायला हवा अजय बाबा म्हणाले. हो काका तुम्ही काळजी नका करू मि पाहतो सगळ. मि एक सूचवू का अजय जर तुम्हाला पटत असेल तर ? हा वाहिनी बोला ना माझा मित्र आहे विक्रांत पुण्याला सायबर सेल मध्ये आपण त्याची मदत घेवूया का म्हणजे ते फोन डिटेलस चे काम सोपे होईल . ओह्ह अरे वहीनी तुम्ही आधी का नाही बोललात गुड़ जॉब तुम्ही विक्रांत ला बोलून घ्या कदाचित त्याच्या प्रयत्ननाना यश येईल. ओके मी आताच त्याला कॉल करते. . मोहित तू आता पोलिस चौकीला चल तु तक्रार नोंद कर की तुला मुद्दाम बदनाम करण्या साठी हे सर्व चालले आहे . आब्रुनुकसानीचा दावा दाखल कर. अजय पन त्या बॉडीगार्ड चा काहिच पत्ता नाही त्यालाही त्या लोकांनी गायब केले बहुतेक! असु शकत मी आज दूसरा बॉडीगार्ड तुला देतो अजय म्हणाला. ते दोघ अजय च्यां कार कड़े आले. तेव्हा मीतु पन त्यांच्या जवळ आली. अजय ने ओळखले तिला काही बोलायचे असेल मोहित शी. अजय म्हणाला,मोहित थाम्ब मी आलोच काकी ना भेटून. मीतु तुझा माझ्या वर विश्वास आहे ना? मला खरच काही आठवत नाही ग काल रात्री चे आणि मी सोनल ला म्हनालो की आता च्या आता तू चल डॉकटर कड़े आपण चेकिंग करू तर ती तयार नाही झाली. बट आय नो आय डोन्ट डु ऐनी रॉनग थिंग . मीतु ने त्याचा हात हातात घेतला म्हणाली. मोहित आय डोन्ट वॉन्ट ऐनी एक्सपलनेशन आय ऑलवेजस ट्रस्ट यू डियर. मि आहे कायम तुझ्या सोबत काळजी नको करू.

तोपर्यत अजय आला विक्रांत ला कॉल कर म्हणाला. दोघे पोलीस चौकी कड़े गेले. मीतु आई बाबांना भेटून घरी जायला निघाली. आई तिला इथेच थांब म्हणत होत्या पन काम आहे सांगून मीतु निघाली. घरी आली तिने विक्रांत ला कॉल केला आणि जे घडले ते सगळ सांगितले ती फोन वरच रडू लागली. अरे मित्या तू तर डेरिंगबाज रिपोर्टर आहेस ना तूच अशी रडायला लागलीस तर कसे होणार ? मला काहीच समजेनासे झाले आहे वीक. हे बघ तू रडू नकोस मी आजच तिकडे यायला निघतो आपण शोधून काढू कोन आहे तो . ओके टेक केयर म्हणत त्याने फोन ठेवला. मोहित ला सतत लोकांचे फोन येत होते . ती घटनाच तशी होती त्यामुळे जो तो उत्सुक होता की खरं काय घडले. मोहित वैतागला होता. त्याची बदनामी मात्र गावभर केली जात होती. दुसऱ्याच दिवशी विक्रांत कोल्हापूर ला आला. आल्या आल्या मितु ला भेटायला आला. मितु तू मोहित कडून त्याला आलेले ते फोन कॉल चे नंबर घे आणी मला सेंड कर . ओके म्हणत मितु ने मोहित कडून ते नंबर्स घेतले . विक्रांत ने ते नंबर घेतले. मितुला म्हणाला मी नन्तर तुला भेटतो आता कामाला सुरवात करतो. विक्रांत तिथल्या सायबर क्राइम चौकी कड़े गेला तिथे एक जन त्याच्या ओळखीचा होता. त्याला विक्रांत ने मोहित बद्दल सगळ सांगितले. आणि ते नम्बर ही दाखवले. ते कॉल ज्या एस टी डी बूथ वरुन केले होते ते शिरोली ते कदमवाडी या दरम्यान चे होते याचा अर्थ फोन करणारा मानुस हा तिथल्या गावातलाच होता हे नक्की झाले. विक्रांत ने त्या बूथ चा एक्झयाट पत्ता मिळवला आणि त्या भागात गेला. एक बूथ त्याला सापडला जो छोट्याश्या टपरी वजा दुकानाला लागुन होता. त्याने त्या दुकान वाल्याला विचारले की दिवसभरात किती लोक इथे फोन करायला येतात? तसे काय नेमक सांगता यायच नाय लई लोक येतात.विक्रांत दिवसभर फिरत होता.त्याने मोहितला सांगून ठेवले होते की त्याला जर पुन्हा फोन आला तर लगेचच तो नंबर मला सेंड कर . ..

क्रमश ......all rights with the author don't copy any part of story...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama