हे सारं काही 'Lockdown' मुळे..
हे सारं काही 'Lockdown' मुळे..


हे सारं काही 'Lockdown' मुळे...
(भाग तिसरा)
मेघा ला जाग आली तशी ती बाहेर येऊन पाहते तर सुयोग डोक्यावर हात लावून सोफ्यावर बसला होता. समोर टीव्ही वर असलेले हेड लाईन वाचून ती सगळ समजून गेली. आता तिलाही काळजी वाटू लागली.
सुयोग आता चिडलेला असल्याने मेघा ने काही बोलण्याच टाळलं. तिने बाहेर जाऊन येते म्हणून आवरून निघून गेली. सुयोग ला त्याच्या आई वडिलांचे, नातेवाईकांचे काळजी घेण्याचे, बाहेर न पडण्याचे कॉल्स येऊ लागले. त्याने आपण मुंबईत आलो असल्याचे कळवल तसे सगळे निश्चिंत झाले. आम्ही आलो असतो पण नियमा प्रमाणे कुठे जाऊ शकत नाही. पण स्वतःची आणि मेघा, सुयश ची काळजी घे म्हणून आईने ने सांगून फोन ठेवून दिला.
आठ वाजत आले होते तरी मेघा अजुन घरी आली नव्हती. सुयश एकटा असल्याने घरात सोडून कुठे जाऊही शकत नव्हता. शिवाय आताच्या वातावरणात सुयश ला बाहेर घेऊन जाताही आले नसते. म्हणून तो मेघा यायची वाट पाहू लागला. सुयश ला भूक लागली होती म्हणून सुयोग ने दोघांसाठी मॅगी बनवून खाल्ली. सुयोग टीव्ही वर लागलेल्या बातम्या च बघत होता की त्याच लक्ष घड्याळ्यावर जात. पावणे दहा होत आले होते परंतु अजूनही मेघा घरी आली नव्हती. आता त्याला तिची काळजी वाटू लागली. किती वेळ वाट पाहत बसणार म्हणून तो सुयश ला घेऊन बाहेर निघणारच होता तर दारात मेघा उभी होती.
ती घामाने भिजलेली हातात भरपूर जड सामानाच्या पिशव्या होत्या. सुयोग ने लगेच जाऊन त्या पिशव्या घेऊन किचन मध्ये ठेवून आला. मेघा खुप दमलेली होती. तिने घरात शिरताच सोफ्यावर आपलं अंग टाकून दिलं. सुयोग ने तिच्यासाठी थंड पाणी घेऊन तिला दिलं. एका दमात सगळं पिऊन टाकलं. त्यानंतर तिला थोड बरं वाटलं. इतक्या उशिरा येण्याचं कारण विचारताच तिने लॉक डाऊन मुळे ग्रोसरी स्टोअर्स मध्ये खुप गर्दी होती. तसचं तिकडे जास्त काही सामान ही घेता न आल्याने दुसरीकडून तिने घरचं सगळ लागणार सामान घेऊन आली आणि हयात उशीर झाला सांगितलं.
ती जेवण बनवायला किचन मध्ये गेली. तिने पाहिलं की सुयोग ने खिचडी बनवून ठेवली होती. तिने काही न बोलता जेवणाची ताट वाढायला घेतली. सुयश ला भूक लागली असल्याने मी त्याला मॅगी खाऊ घातली आणि आता झोपला आहे तो, सुयश ने सांगितलं. मेघा ने फक्त ओके बोलून मान हलवली. जेवताना कोणीच एकमेकांशी बोलत नव्हते.
क्रमशः