हे अभिशाप की वरदान?
हे अभिशाप की वरदान?


निःशब्द कधी, अस्वस्थ मी
कधी संमिश्र होई बघ भावना
खरं खरं सांग गडे
जसं माझं, तुझंही तसंच ना ?
मरूस्थल कधी, हिरवं रान
पाला- पाचोळा कधी अंकुरणारं पान
रखरखतं ऊन कधी सोनेरी पहाट
शिशिराची पानगळ कधी वसंतबहार
नवोन्मेषशालिनी प्रज्ञा, की दैवी आज्ञा
तहानलेली धरती की सागराला भरती
चंदनापरी झिजणारं मन की, नवनीतासाठीचं अमृतमंथन?
सुपीक मेंदूची न मोडणारी खोड की प्रतिभेची उत्तुंग भरारी?
नित्य श्राव्य असतं काव्य
-हदयीचा घाव तुलाही ठाव
कळेचना मलाही अनं तुलाही
हे अभिशाप की वरदान?