हारजीत पर्व नवे - भाग 1
हारजीत पर्व नवे - भाग 1


सुमित खूप खुश होता शेवटी प्रीतीने त्याला होकार दिला होता. आज ते दोघे डीनर ला जाणार होते. प्रीती ला तो घरून पिकअप करणार होता. इकडे प्रीतीला राहून राहून मोहितची आठवण येत होती. त्याने त्याच्या बायकोला निवडणुकीतून माघार का घ्यायला लावली असेल? मला जिंकून देण्यासाठी त्याने असे केले असेल का? आज ही कुठेतरी मोहितबद्दल मला सॉफ्ट कॉर्नर का वाटतो? मान्य आहे त्याने माझ्याशी लग्न नाही केले पण त्याच्या डोळयात माझ्यासाठी फक्त प्रेमच दिसत, त्याच्या बोलण्यातून आपल्या बद्द्ल ची काळजीच जास्त दिसते. याचा अर्थ आज ही मोहित माझ्यावर प्रेम करतो का? असे विचार तिच्या मनात येऊ लागले. पण आता या गोष्टीला काही ही अर्थ नाही. मी सुमित ला होकार दिला आहे तो ही जीवापाड प्रेम करतो माज्यावर,स्वतःपेक्षा जास्त मला जपतो. हे सगळे विचार बाजूला करून ती सुमित सोबत डीनरला जाण्यासाठी तयार होऊ लागली. तसे तर ते दोघे रोजच भेटायचे कामा निम्मित पण आज ची भेट ही खरी त्यांची डेट होती. प्रीतीने ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनचा चुडीदार घातला. हातात मॅचिंग बांगड्या, कानात झुमके, पिंक लिपस्टिक आयलायनर अशी ती तयार झाली. रोज सिपंल ड्रेसिंग करून जाणारी प्रीती आज खास सुमित साठी तयार झाली होती. आरशात स्वतः ला पाहून खूश झाली एकदम मस्त सुंदर दिसत होती ती. पाचच मिनिटात सुमित चा कॉल आला. मी बाहेर आलो आहे तू ये पटकन. पण प्रीतीने त्याला घरी बोलवले. मग सुमित तिच्या घरी आला.
प्रीती चे आई बाबा त्याला ओळखत होते कायम यायचा तो प्रीती सोबत. तिच्या आई बाबांना सुमित पहिल्या पासूनच आवडत होता. पण या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिप बद्दल अजून घरी काही सांगितले नव्हते. इलेकशन होऊ दे मग सांगू असे ठरवले होते. सुमित प्रीती च्या आई बाबांना भेटला कॉफी घेऊन ते निघाले. सुमित ने मस्त रेड टिशर्ट आणि जीन्स घातली होती. त्याचे रुंद खांदे, स्ट्रीम बियर्ड ,जिमची कसदार शरीरयष्टी प्रीती त्याला पाहूनच आऊट झाली होती. दोघे कार मध्ये बसले तसा सुमित तिच्या कडे पहात राहिला एकटक. तिला त्याच्या अशा पाहण्याची लाज वाटत होती. सुमित असा काय बघतो मला लाज वाटते आहे. रोज तर आपण एकत्रच असतो ना? तसा सुमित तिच्याजवळ सरकला तिचा चेहरा हाताने उचलून म्हणाला,रोज पाहतो तुला पण आज तू खास माझ्या साठी तयार होऊन आलीस ना माझी प्रियतमा बनून त्यात तू इतकी सुंदर दिसतेस हे मला आजच कळले ना. तो तिची गंमत करू लागला. मग तिने त्याचा हात बाजूला करत म्हणाली,हो का आज सुंदर दिसते रोज दिसत नवहते. अजिबात नाही रोज यायची ऑफिसला ते सेनेची कार्यकर्ती, स्पीकर बनून ना मग काय कशी ही यायचीस.
आता ती चिडली, जा आता एकटा मी नाही येत डीनरला. ओहह तुला राग पण येतो का प्रितु? मला वाटले फक्त भाषणे देता येतात. सुमित जा आता मी बोलणार सुद्धा नाही. ती कारच्या बाहेर बघू लागली. त्याने तिला आवाज दिला प्रितु ऐक ना,बर सॉरी मी जरा गंमत करत होतो तुझी लगेच काय चिडतेस? बर राहू दे आपण नकोच जायला बाहेर ओके माझा पण मूड गेला आता. तशी प्रीती म्हणाली,नाही काय चल मला जायचे आहे डीनर ला. नक्की ना. हो ती म्हणाली. राग गेला ना तुझा ? मी पण खोटं खोटंच चिडले होते समजले. तरीच राजकारणात आली आहेस. म्हणजे तिने विचारले . म्हणजे वाघाचे पंजे राजकारणी लोक खोटंच वागतात ना...!!
(क्रमशः)