गरीबी
गरीबी
नदीच्या कडेला एक काडक्याचीं झोपडी . कपडे फाटली होती .रत्या मध्ये सापडलेल्या गोण्या जुनी कपडे , सार्यांची ठिगळ्या मारून एक झोपडी बनवली होती . त्या झोपडी मध्ये तीन दगडाची चूल आणि आजूबाजूला पडलेल्या काटक्या पेटून कधीतरी भाकरी भाजत झोपडीतल चुल कधीतरी पेटत . रोज सकाळी उठलो की पोटासाठी गल्लोगल्ली फिरायचं !देवाच्या मंदिराजवळ पायऱ्यांवर बसायचं आणि येणार्या जाणार्या कडून भिक म्हणून भाकरी आणि शिळ मागायचं खूप शिळ भेटायचं तेंव्हा भेटलेला अण्णाच आम्हाला एखाद्या मेजवानी प्रमाण वाटायचं एखाद्या जुन्या कापडामध्ये अण्णा गुंडाळायचं आणि झोपडीत परत आलो कि आम्ही चार भावंडं खायचो आई घरला येईल तेंव्हा उरलंसुरलं ती खात होती .रोजचा दिवस उगला की आमचं भीक मागण्याचा काम सुरू व्हायच दिवस मावळतीला आला की आम्ही घराकडे करायचो घर म्हणजे आमची झोपडी !झोपडीच्या आजुबाजुला फिरायचं . झोपायचं , बस खेळायच काय असतं ?टाईमपास काय असतो ? हे आमच्या नशिबी कधी नव्हतंच .फक्त पोटाला अन्न मिळवायचं आणि सायंकाळी झोपडीच्या जवळ झोपायच . आज चार महिने झालं होतं आमचा बाप कुठे गेला ? आमच्या आईला पण माहित नव्हत . कधीकधी जवळच्या वाडीवर , गावावर जाऊन भीक मागायचा . कारण आमच्या बापाचा एक हात व एक पाय लुळा होता . त्याला काम करता येत नव्हतं . म्हणून पोटासाठी पर्याय नव्हता . वय वाढलं दिवसभर भीक मागायची आणि रात्री मंदिराच्या मोकळ्या जागेत झोपायचं . कधीकधी कोणी फेकलेली कपडे घेऊन अंगाला लपेटायची आणि उघड्या जागेवर जमिनीवर झोपायचं . पाऊस लागला की कुठेतरी आडोशाला जाऊन स्वतःचा जीव कुत्र्यावानी ! एखाद्या कोपर्यात . खड्ड्यात जाऊन झोपायचा कारण एखाद्या चांगल्या जागी ;बंगल्याच्या शेजारी , रस्त्यावर येणारी जाणारी लोकं थांबू देत नव्हती .कुत्र्या वाणी हाड हाड करून हाकलून द्यायची त्यामुळे देवाचं मंदिर त्याच्या बाजूला पटांगणावर रात्रीच कोणी येत नसायचं . तेव्हा आम्ही जमिनीवर पडायचं भल्या पहाटे मंदिरात येणारे पुजारी . दर्शन घेणारे आम्हाला हाकलून लावत त्यामुळे सकाळच्या आतत रस्त्याच्या कडेला बसायचं .भिक मागायची ?ना आम्हाला घर , ना दार काही नसल्यामुळे तहान लागली तर कुठेतरी नळावर , विहिरीवर जाऊन पाणी प्यायचं .लोकांनी फेकलेल्या बाटल्या जमा करून त्या पाण्याने भरून ठेवायच्या .कामाला नदीवर जायचं जिथे कोणी नसेल तिथं पाण्यामध्ये डूबायचो .आज दीड महिना झाला असेल डोक्याला खाज सुटली होती . कपडे कडक झाली होती . व कित्येक दिवसापासून जुनी कापड मिळाली नव्हती अंगावरच्या कापडाची लप्तर झाली होती .अशाच एके रात्री बाहेर पाऊस पडत होता . म्हणुन मंदीराच्या पाठीमाग भिंतीच्या कोपर्यात बसलो होतो . तिथंच एक माझ्याच वयाची बाई कुडकुडत बसलेली होती . अंगात ताप भरला होता . अंगावर कोणतेही पूरे शे कपडे नव्हते . कित्येक दिवसापासून पोटाला पोटभर खाल्लेलं दिसत नव्हत . माझ्याकडे असलेलं थोडस शिळ पाक तिला खायला दिल माझेजवळील एक बारदान सापडलं होतं ते मी तिला दिलं तिने अंगावर घेतलं आणि रात्र काढली . सकाळी माझ्याकडं ओशा शाळलेच्या नजरेने बघितलं .मला तिची कीव आली . सकाळी रस्त्याच्या कडेला एकाच ठिकाणी भीक मागायला बसलो . रोजच एकत्र येण. एकमेकाला मदत करण !कारण ती पण माझ्या वाणी एक डोळ्याने आंधळी व पायान पांगळी होती . त्यामुळे ती पण काठीच्या आधाराने चालत होती . मी आधार देत व रोजच्या रोज भीक मागण्यासाठी आम्ही जात होतो . एक महिना झाल असतील आमची ओळख होऊन जनु देवान आम्हाला एकमेकांसाठी आधार पाठवला असेल .त्यामुळे आम्ही रोज रात्रीला एकमेकाला मिळालेल .अण्ण व पैसे जमा करत व सकाळी उठलं भीक मिळाली की जवळ असलेल्या थोडीशी चिल्लर घ्यायची . आणि टपरी वर जाऊन वडापाव जे मिळेल ते खायचं . पोपटाला खायचं . पैसे मोजता येत नव्हते . खरं तर कुत्र्याच्या पिला वानी जगलो होतो . त्याला पण त्याचे मायबाप माहिती नव्हते ? व मला पण माहित माझे माय बाप माहिती नव्हत ? जेंव्हा मला कळायला लागलं तेंव्हापासून आम्ही फक्त फिरत होतो . फिरता या गावात जत्रा भरत होती . व जत्रेच्या ठिकाणी मंदिराजवळ खूप लोकांची गर्दी असायची .रोज पोटभर जेवण मिळायचं .व रातच्याला कुठेतरी पडायचं . मात्र यात्रेच्या वेळी मंदिराजवळ पोलीस हाकलून लावायचे .म्हणून आम्ही दूर अंतरावर नदीच्या काठी एका झाडाच्या आडोशाला बसायचो .रात्री थंडी वाजायची म्हणून दोन-चार झाडाच्या फांद्या जमा करून भाडोशाला म्हणून हळूहळू ती झोपडी म्हणजे आमचं घर ! आमची झोपडी जणू आमचा स्वर्ग ! देवाने आम्हाला या माणसांच्या जत्रेत फक्त शरीर दिलं होतं ते पण धडधाकट नसल्याने आम्हाला कष्ट करता येत नव्हते . आमच्या अवताराकडे पाहिल्यावर आमच्या कपड्यांचा वास येत असल्याने कुणी जवळ येऊ देत नव्हतं .म्हणून आमच्या झोपडी कडं कुणी यायचं नाही . झोपडीमध्ये जुने कपडे . जुनी सापडलेला भांडी , असा आमच गाठोडं , कपड्यांचं जुनं गाठोड सोडायचं आणि झोपायचं . माझ्याबरोबर आलेली झिपरी आणि मी .माझं नाव परश्या . माहिती नाही मात्र एक दोन भिकारी परश्या म्हणून आवाज द्यायचे . तिच्या झिपऱ्या एवढ्या मोठ्या होत्या कि ती च तोंड दिसत नव्हत . त्यामुळे मी तिला झिपरी म्हणायचो . नदीच्या काठी झोपडी असल्यामुळे सकाळी उठल्यावर आम्ही पाण्यामध्ये आमच्या झिपऱ्या व तोंड धुवायच . निदान एकमेकांची तोंड तरी चांगली दिसायची . खूप दिवस झालं आम्ही नवरा- बायको प्रमाणे एका झोपड्यात रहायचो कसले लग्न ,कसले नाते . याचा गंधही नसासायचा ना मागे ना पुढे कुणी फक्त एकत्र राहिल्यामुळे सारी आजूबाजूची भिकारीच !बरोबरच . म्हणत . जेंव्हा नर आणि मादी एकत्र आले की पुढची पैदास ठरलेली असायची . त्याप्रमाणे आमच्याकडे हळूहळू एक -दोन करता चार लेकरं जन्माला आली . त्यांच्यासाठी आम्हाला दररोज भिक मागण्या साठी भटकाव लागायचं . व आमची पोर दिवसभर कुत्रीच्या पिला सारखे खोपडा जवळ त्यांना सोडून आम्ही भीक मागण्यासाठी जायचं .हळू हळू ती मोठी झाली . झिपरीच्या दोन काखेमध्ये आणि दोन पाठीमागं !असं घेऊन भीक मागायला सुरुवात केली .मात्र दिवसभर मागितलेल्या भिके मुळे सगळ्यांची पोट भरत नव्हती . कधी कधी उपाशी झोपावे लागत .मग आमची ही पिलावळ गावाने फेकलेल्या कचऱ्याच्या गंजाकडे जायची व त्या कचऱ्याच्या ढिगात जे लोकांनी फेकलेलं ,उरलेलं . उचलुन आणून पोट भरत . कधी पाऊस निसर्गाने देवाने आम्हाला काय दिलं आणि काय नाही दिलं . त्याची तुलना आम्हाला करता येत नव्हती .कारण आम्ही फक्त जन्माला आलेली पोट भरून जगणारी अशी दोन पायाची जनावर होतो .माणसांच्या जगामध्ये कुत्र्या वाणी जीवन जगायचं . इतर माणसे आम्हाला जवळ आली की नाक दाबायचे . लांबून एक दोन बायका त्यांचं खाऊन उरल्यावर एक दोन पोळ्या उरल्या कि लांबून फेकायचे आम्हाला जनू स्वर्गातून देवाने प्रसाद दिला अस वाटायचं .आनंदानं बकाबका खायचं . कधीकधी दोन-दोन चार-चार महिने तेच कपडे . ना बदलायची .ना काढायची . कापड धुव्हायला फक्त लांब नदीवर गेलं तरंच आमचे कापडं धुवायला जागा मिळत . माणसांनी पाहिलं की आम्हाला तिथून हाकलून देत . त्यामुळे चोरून जायचे जणू देवाने आमच हक्क पण काढून घेतले .सदा पळायचो व तेच कापडं घामाच्या दुर्गंधीने एवढी खराब .. व्हायची ती कधी स्वच्छ निघायची नाही . त्या कापडांना एकच रंग माहीत होता . ती कोणत्या रंगाची असायची कोणत्या रंगाची होती .आम्हाला आठवायचं नाही . असं करत करत झिप्री माझ्याशी भांडायची ! बिचारी चार पिलावळ त्यांच्यासाठी निदान आनंद जीवन भिक मागता मागता एक दिवस मी दारूच्या गुद्दयाजवळ पोहचलो . खूप लोकं व त्यांनी फेकलेलं व त्यांनी फेकलेल्या बाटल्या मी जमा करायचो . चार बाटल्या जमा केल्या की भंगाराच्या दुकानदार 2 /4 रुपये द्यायचा . त्या बाटल्या मध्ये कधी बाटल्यांमध्ये थोडसं द्रव शिल्लक असल्याचं ते मी चाखून बघायचो . हळूहळू त्याची चव लागली आणि दररोज उरलेल्या बाटल्या कधी असणारी ती "दारू पिल्याशिवाय माझा दिवस जात नव्हता . म्हणून मी दोन-दोन 'चार-चार दिवस गुत्त्यावर पडून असायचं . तिकडे झिपरी मी आलो भाडांयची पोरांच्या पोटामध्ये नसायचं ! व मी जी चार पोर पैदा केली तशी त्यांची पोट भर ? पण ती भरत नव्हती फक्त त्यांना कमरेला चड्डी माहिती होती . त्यामूळे झिप्री भांडत व त्यामुळे मी शेजारच्या गावात दारूच्या गुड्ड्याच्या बाहेर लोकांनी फेकलेलं खायच व तेथेच पडायचं . कोणीतरी फेकलेल्या गुद्याच्या बाहेर खूप बाटल्या दिसल्या सगळ्या बाटल्या एका बाटलीमध्ये रिकाम्या केल्या व 'ती बाटली घेऊन व लोकांनी फेकलेलं अन्न घेऊन मी गुड्ड्याच्या बाहेर येवून सगळी बाटली रिकामी केली . मात्र त्या बाटली चा औषधाचा असर माझ्या शरीरावर काय झालं आणि खाल्लेले अन्न शरीरामध्ये विष झाल एका नाल्यात पडलो .चार दिवसांनी केंव्हा तरी कुत्री फिरायला लागली . तेव्हा गुद्याच्या मालकांनी पोलिसांना फोन केला व माझ 'मड ' उचललं मला ना ठावठिकाणा पत्ता . काही माहीत नव्हतं त्यामूळे एक बेवारस मुडद्दा म्हणून मशानभुमी मध्ये जाळून टाकलं ! तिकडे माझी झिपरी दररोज वाट पाहात . होती मात्र तो कायमचा गेला होता हे तीला माहिती नव्हतं . त्यामुळे तिला आपण पैदा केलेली पोरं पोसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता . दोन चार महिने झाले असतील त्या नदीकिनारी बांधकाम निघालं आणि आमचं झोपडं एका मशीन ने फेकून दिलं ! सापडेल ते गाठोडा घेऊन आम्ही दुसऱ्या गावाला निघालो .दोन पोरं थोडी मोठी झाली . होती मला ती भीक मागायला मदत करायची . पोर धडधाकट होती मला वाटायचं इतरांच्या पोरान प्रमाण काही काम धंदा करावा . शिकावं पण ? कामधंदा कोणी देत नव्हतं . कारण आमचा ठावठिकाणा नव्हता व भिकारीची पोरं ! मोठी दिसली हातामध्ये एखादी रस्त्यात सापडलेले वस्तू पाहिली तरी चोरून आणली असं वाटायचं . असं करत करत आम्ही शेजारच्या गावांमध्ये गेलो . तिथे एका टेकड्या वर दोन-चार झोपड्या दिसल्या झोपड्यांच्या आडोशाला आम्ही आमची झोपडी उभी केली .परश्या वाणी परशा त्याची पोरं तीच भीक मागायचा धंदा करू लागली कारण ? बाहेर कसं पडायचं . आणि बाहेर पडायला कोण मदत कर ल ? आजूबाजूला हॉटेलमध्ये पोरांनी काम मागितलं काम दिल नाही .एक दिवस एक म्हातारा आला . पोर धडधाकट आहे आमच्या शेतावर पाठव .येताना खायला देईल म्हणून मला खूप आनंद झाला . हे दोन्ही पोरांना पाठवलं दिवसभर बैलासारखं राबवून घेत होता .2 /4 रुपये व 2 /4 कडक भाकरी एका ताटलीत घालून पोर घरी यायची . रात्री पडलीत कि मुडद्या सारखी पडायची . आणि सकाळी त्या शेतकऱ्याच्या घरी जायचे . काम करता करता दोन चार महिने झाले असतील एक दिवस त्याच्या घरामध्ये पैशाची चोरी झाली . मात्र पोलिसांना सांगून माझे दोन पोरं त्याने ताब्यात दिली .त्यांनी खूप खूप मारलं .सांग का चोरी केली .मारता मारता डांबून ठेवलं काही केलं नव्हतं . मात्र चोर सोडून सन्याशाला शिक्षा . झाली . चार ,आठ दिवसांनी पोरांना सोडून दिलं .मात्र एवढा मारलं होतं ती पोरं चालू शकत नव्हती की झोपू शकत नव्हती . परत कामाला गेली नाही . पोर एक दिवस आईला म्हणाले या गरिबीन आम्हाला बाहेर पडू द्यायचं नाही असं ठरवलं दिसतय ! कारण परत जायचं ठरवल तरि जाता येत नाही . असे करत करत एक दिवस पून्हा कारण नसताना झोपल्यावर पोलीसांनयेऊन पकडलं .माझ एक पोरगं पळालं परशा वानी ते कुठे गेलं अजूनही त्याचा पत्ता नाही . पोलिसांनी कुठे नेलं त्याचा पत्ता नाही . आणि माझ्या शरिराला कोणता आजार जडला होता माहिती नव्हतं . गरिबी रडू लागली होती . जखमा होऊन त्याच्यातून वास येत होता दोन मूले माझ्या जवळ असायची कित्येक दिवस झालं .मला उठता येत नव्हतं . पिलावळ कुठून तरी शिळे पाका स्वयंपाक आणायचे मात्र माझा गरिबीने उद्धार करायचा ठरवला होता असं वाटतं .हळूहळू शरीर सडत होतं या गरिबीनं नाही . व मृत्युने माझा आत्मा मोकळा केला होता . मात्र पैदा केलेले दोन पोर कुठे असतील ? कवा गरिबीतून बाहेर पडतील ? या चिंतेनं मी गरिबीतून सुटले होते . मात्र गरिबीच्या मध्ये जगत होती . या माणसांच्या दुनियेमध्ये गरीबी हि ला काहीही माहिती नव्हतं . ना तिला घर असतं . ना तिला आधार असतो ना गरिबीला धाक असतो . गरिबीला ना लाज ना शरम नसते तरीही गरिबी जगत असते तरीही गरिबी वाढत असते . कारण गरिबी ही या धरतीवर देवानं तयार केलेली माणसांना स्वतःचा जीवन जगायचं कस ते शिकवण्यासाठी "गरीबी "असं वाटायचं कारण मी मेले गरिबीने 'मेले ते शरीर आणि मरून दोन चार महिने झाले असतील पण माझा आत्मा माझ्या पोरांकडे पोरांच्या जीवासाठी झोपडीच्या भोवती फिरत होता . मला देवाकडे जायची इच्छा नव्हती .व या माणसांच्या दुनियेमध्ये 'गरीबी ' राहू देत नव्हती . व मी केलेली आईची माया या गरिबी ला सोडत नव्हती . अशी ही गरिबी चटके खात खात या गरिबी ने मारलं तसं माझ्या पोरांना या गरिबीने करू नये ? याच आशेवर ती चा आत्मा झोपडीच्या भोवती फिरत होता व आजही माझा आत्मा भटकत आहे .व गरिबीची चटके माझ्या पोरांना कसे बसतात व गरीबी त्यांना कशी जगवेल ? आणि कशी संपेल हे बघण्यासाठी माझा आत्मा आजही त्या झोपडीभोवती फिरत आहे गरिबीला शोधत आहे भोगत आहे.
