गेले ते दिवस, राहिल्यात फक्त..
गेले ते दिवस, राहिल्यात फक्त..
म्हातारबा लिंबाच्या झाडाखाली खाटेवर बसलेले होते. नारबा लगबगीनं शेतीकडं जातं असताना बघून त्यांनी आवाज दिला, "आर ए नारबा, आर कूट निघाला? वाईच ये कि इकडं. कदीबी घाईतच असतुस." "काही नाही शेताकडे निघालो होतो." म्हातारबा जवळ बसत नारबा म्हणाला. "काय रे कसली गडबड." म्हातारबा उद्गारले. त्यावर नारबा , "अहो तात्या पोरीला बघायला पाव्हन आलं हुतं, आताच गेलं पाहून म्हणलं जित्राबं सकाळ धरून उपाशी आन बिन चारा पाण्याच हाय तवा निघालो हुतो शेताकडं." "असं व्हय? मंग काय पडली का पोर पसंत?" "व्हय, पसंत न पडायला काय झालं पण पुढचं काय खरं दिसत नाय बाबा." "का र! काय झालं नारबा?" तसा नारबा चिंतेच्या सुरात म्हणाला, "काय नाय तात्या दिसमान असं पडलं आवांदा पीकपाणी बी चागलं नाय. पोरगी उजीवनबी जरुरी हाय. बरं येतो तात्या." म्हणत नारबा शेताकडे निघून गेला .म्हातारबा कीतीतरी वेळ शून्य मनान दूर कुठेतरी हरवून गेले. खरंच गड्या ते दिवस लै चांगले हुते . पाऊसपाणी बख्खळ असायचा, गुरु - ढोर, वासरं, पोर सोर, शेरडं - कोंबड्या बकरं घरदार कसं भरल्यावानी वाटायचं. पैका नव्हतं तवा पण माणसात माणूस असायचं. काळ्या आईची समदी सेवा करायची. विहिरी, .नद्या नाले, ओढे पाण्यानं तुडुंब भरलेला असायचं. मातीशी माणूस इमान बाळगून होता. तवा सगळं काही ठीक होत. घरात तीन पिढ्या सुखं नांदायच्या. माणसाची मातीशी असलेली नाळ तुटत गेली तसं -तसा माणूस स्वार्थी, आत्मकेंद्रित झाला .वारेमाप वृक्षतोड झाली. गुरेढोरे गेली. दीडशे एकरवाला पाच दहा एकरावर, कुणी भूमिहीन झाला. कुणी गावात रोजगार मिळेना म्हणून नाईलाजाने शहराकडे गेला . निसर्गानेही मग आपला हात आखडता घेतला. विहिरी.नद्या नाले, ओढे आटली तशी खेड्यातील माणसातील परस्परातील जिव्हाळा, प्रेम कधी कमी झालं ते समजलंच नाही .
&nb
sp;म्हातारबा आपले पहिले दिवस आठवू लागले ... दिवस ते नाही म्हणलं तरी सुखाचे होते. रुसवे फुगवे असायचे, भांडण तंटेही व्हायचे पण नात्यामधली घट्ट वीण तसूभरही कमी व्हायची नाही. दिवस होते ते खरंच पण आता कशाचा कशाला ताळमेळ उरला नाही. मांस शिकली पण आणखीनच अडाण्यागत झाली. आत्राब जनावर नको, घरात म्हातारा - म्हातारी नको , शेजारी पाजारी नको, देव धर्म नको, काही काही नको फकस्त राजा राणी आम्ही दोहा आणि आमचे एक दोन पोर . कि झाला संसार. वारेमाप वृक्षतोड करीत सुटले. झाड लावणं नको, कष्ट कमी उत्पन्न भरपूर पाहिजे. बोलायला गेलं कि भसकन मारक्या म्हशीसारखं अंगावर धावून येतात. बाब तुम्हाला काय काळात नाही. तुम्ही गुपचूप बस कोपऱ्यात गप गुमान असं म्हणतात. दोन पोर एक गेलं शहरात पोटापाण्यासाठी. दुसरं शेतीत रमत नाही. काय पडलं शेतीत २ एकर शेत विकून टमटम घ्यायची म्हणत. आता काय सांगावं ह्या पोरास्नी .. आर आमच्या बापजाद्यांनी हाडाचा काड करून हि शेती सांभाळली . दुष्काळात बारबड्याचं पाला खाऊन दिस काढले पण जमीन विकली नाही अन हे माह्या काळजाचं तुडम विकायला निघाले लेकाचे ... आर म्हणा अजूनही दिस गेलं नव्ह. झाड लावा, झाड वाढावा. पाणी आडवा पाणी जिरवा. मन लावून शेती केली तर हि काली आई उपाशी मरुन देणार नाही. आर ह्यांना कुणी सांगावं मूठभर पेरावे अन मनभर देण्याची दांत फक्त मातीचीच असते. बघ तुला जमत का ते .. आर पोरांनो निसर्गाच्या कुशीत झोपून पाहावा. डोंगर दर्यात, पण फुलात झाड झुडपात, रानावनात हिंडा, पशु पक्षाची मैत्री करा, मंग बघ काय हा इथं ते पण दुसऱ्यांची रोजीरोटी देऊन पोसणाऱ्या ह्या पूर्वजांचे वारस इतके कसे षंढ , निर्लज्ज अन बिनकामाचे निघाले रे देवा! गेले ते दिवा राहिल्यात फक्त आठवणी . रखमे तुही गेली मला सोडून ... आता जगण्याची अशाच उरली नाही बघ. भगवंता अजून काय काय पाहायला लावशील? तूच बघ आता. आता उचल रे आता भगवंता .. नाही सहन होत आता हे सगळं . म्हातारबा असं काही बाही किती तरी वेळ ....बरळत राहिला ....