Pradnya Tambe-Borhade

Comedy Others

4  

Pradnya Tambe-Borhade

Comedy Others

एका लग्नाची गोष्ट

एका लग्नाची गोष्ट

29 mins
331


स्वराज आणि अस्मिता नुकतेच लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. हे लग्न ठरण्या आधी ते लग्न होईपर्यंतच्या प्रवासातील गंमती-जमंती आपल्याला "लगीनघाई" या कथामालिके मध्ये पाहणार आहोत. 

तुम्हांला यात नक्कीच धम्माल येणार आहे. असा एक प्रांजळ प्रयत्न करणार आहे. 


    चला तर मग सुरु करुयात.........


आई : उठ लवकर,आवरुन घे. रोजरोज अस तुला उठावायला यायच का ग. सासरी तुला उठवायला मी येणार नाही.


अस्मिता : नको ग. तुझे रोजचेच संवाद. सासरी जाणं. मी इतक्यात लग्न नाही करणार. मला नोकरी करुन स्वत:च्या पायावर उभ राहायचं. नंतरच लग्नाचा विचार करणार आहे.


आई : स्थळ शोधायला सुरवात केली म्हणजे लगेच काही लग्न ठरत नाही. दामले काकूंच्या मुलासाठी गेले सात वर्ष स्थळ पाहतात. अजूनही त्याच कुठे लग्न जमलेल नाही. उगाच उशीर नको व्हायला आपल्याला पण. योग्य वयात लग्न होणं गरजेच असते.


अस्मिता : माझी मैत्रीणीच्या बहिणीला पाहायला आले आणि तीच लग्न ठरले. लगेच पुढच्याच महिन्यात लग्न झाले पण तीचे. प्रत्येकाच वेगळ असते ग आई. या दोन्ही शक्यता विचारात घ्यायला हवा.


आई : बर.... बर. चल, आवरुन घे आता. नाहीतर बसशील बोलत उगाच.


अस्मिता : विषयाला सुरवात करते तू. आणि मला बोलते विषयाला सुरवात करते. चल आवरते मी. 


आई : ये लवकर खाली, डबा भरुन ठेवते टेबलावर.

अस्मिता : नाश्ता छान झालाय आई. येते मी डबा घेतला आहे.


आई : जा ग. सावकाश. चला...., आता बाकीची काम आवरुन घ्यायला हवी.


   *इतक्यात फोनची रिंग वाजते.....*


 आई : कोण आहे आता फोन करते कामाच्या वेळी काय माहित. कामाला सुरवात आणि फोन आला म्हणजे तासभर तरी फोन हातातून सुटत नाही. कारण फोनवर बोलण झाल तरी नेट सुरु करुन कोणाचे मेसेज आले ते पाहत बसून रिप्लाय करायला अर्धा तास लागतो. इन्सटावरचे व्हिडिओ पाहत बसायचे ते वेगळचं.


*अग बाई लीला वन्सच फोन. हॅलो काय म्हणताय ताई*??? 


वन्स : राहूलच लग्न ठरलयं. लग्न अगदी पाच महिन्यांवर आहे. मला तुझी मदत हवी आहे. शिवाय लग्नाची खरेदी, कार्यक्रमाचे नियोजन करायला तू सोबत हवी आहे. दादाला सांगते फोन करुन. त्याला आधी यायला वेळ नाही झाला तरी तू लवकर ये नक्की.


आई : वन्स. छान आनंदाची बातमी दिली. आजच सकाळी माझा आणि अस्मितामध्ये तीच्या लग्नाचा विषय झाला. बोलते करिअर करायचे. मग करेल. आता आम्ही तिकडे आलो की तुम्हीच समजावा तीला.


वन्स : अग हो. लहान आहे ती अजून. पण तरी वेळेत गोष्टी झाल्या पाहिजे. करिअर..... का... काय ते..... लग्नझाल्यावर पण करता येत ना.


आई : हो.... तेच सांगत होते तीला मी. 


वन्स : वहिनी बाकीच्यांना पण अजून सांगायच आहे. बोलूया परत आपण फोनवर. 


आई : चालेल. मी पण आवरते कामे. 

( ब-याच वेळ झाला. ) फोनवर बोलून. आवरून घेवूयात.


*काॅलेज वरुन आल्यावर*


अस्मिता : भूक लागली. खायला देना काहीतरी.


आई : काहीतरी म्हणजे काय ग...?? हे कस बनवतात.


अस्मिता : सॅण्डविच, समोसा, वडापाव. अस काहीतरी चटकदार बनव ना. 


आई : छान.... छान. अस अवेळी खायचं मग जेवायच्या वेळी चपाती-भाजी समोर आली की नाक मुरडायच. हि भाजी नको.... ती नको. अस काही करुन दिल नाहीतर बरोबर भूकेच्या तढ्याक्यात नको ती भाजी पण घश्याखाली उतरते.


अस्मिता : (हसून) काय ग अशी करते. तूझ्या हातचा वडापाव म्हणजे अहा...... झकास एकदम. अगदी २० मिनिटात बनवते तू. उकडलेले बटाटे आहेत फ्रिजमध्ये सकाळीच पाहिले होते. कर ना.


आई : अस लाडीगोडी लावली की झालं. बर आज तूला माहिती आहे का. आपल्या राहूलच लग्न ठरल. आपल्याला जाव लागेल लवकर. खरेदीला. आजच फोन आला होता. वन्संचा. 


अस्मिता : माझ्या लग्नाच बोलणं त्या राहूल ला लागल की काय....??? आपण सकाळीच बोललो होतो.

आई : अहो.... वन्संचा फोन आला होता ना. 


बाबा : हो. भाच्याच लग्न ठरलं. मामाला मागे उभ राहायला नको का...?? मला तर कळवणारच ना...!! 


आई : काय हो हि थट्टा. जरा आपल्या मुलीच्या लग्नाच पण पाहायला हवं.


बाबा : राहूलच्या लग्नात भेटतीलच ना नातेवाईक त्यांना देवूया कल्पना या बाबत.


आई : हो. लक्षात आलच नव्हत माझ्या. देवानेच मार्ग दाखवला बघा. अस्मिता वडे होईपर्यंत पावाची लादी घेवून ये. 


अस्मिता : आणते आई. 


आई : आवडीच बनवल तर कस निघाली आणायला. तशी भाजी कधी पटकन घेवून यायची नाही. 


अस्मिता : आई, मी आले पण. झाले का तूझे वडे बनवून.


आई : हो राणी साहेबा. घ्या.


बाबा : मला पण दे ग. त्या जरा मिरच्या पण तळ. 


आई : तुम्हीच राहिले होते. तीच्या लाईनीत बसायचे. लाडावून ठेवले नुसते तीला. सुहासला ठेवले आहे हाॅस्टेलला. माझ लेकरु ते.


बाबा : अग आपल्या इथ चांगल काॅलेज तरी आहे का??? शहरात चांगल शिकून येईल की. आणि तसाही सुट्टीला येतो कि तो.


आई : आईची माया नाही कळणार तुम्हांला. आपल लेकरु सतत डोळ्यासमोर असावं अस वाटते हो. 


बाबा : झाल आता शेवटच वर्ष संपल. की तो येणारच आहे. आणि राहूलच लग्न आलच की जवळ. येईल तो सुट्टी घेवून.


आई : हो ना. अस्मिता अजून हवेत का.


अस्मिता : बास... नाहीतर बोलशील मलाच. जेवत नाही ते. 


आई : तुम्हांला देवू का ओ. 


बाबा : नको. अग सुहासचा फोन आहे.  


सुहास : कसे आहात सगळे. आजच आत्याचा फोन आला होता. राहूलच लग्न आहे.


बाबा : तेच चालू आहे घरात. सुट्टीच आधीच सांग काॅलेज वाल्यांना. आत्या कशी आहे माहितीये ना. ओरडेल तुला आला नाहीस तर.... 


सुहास : बोलतो मी बाबा. तसेही देतील सुट्टी मला. मी लवकरच यायचा प्रयत्न करेन. बर आईला सांगा करेल मी फोन नंतर आत्ता मित्र आलाय क्लासला जायचे आहे.


बाबा : ठिक आहे. सांगतो तीला.


आई : हे काय ठेवला पण फोन. माझा काय राग आला का त्याला. बोलला नाही तो. 


बाबा : अग तो क्लासला चालला होता. करेल नंतर तुला फोन.


आई : बर. अस्मिता कुकर लाव आणि भाजी चिरुन ठेव एवढी.मी आलेच भाजीला जावून.


अस्मिता : काय ग तू आल्या आल्या काम सांगते. 


आई : हो का.... मग वडापाव कोणी खाल्ला ग. आल्या आल्या. तेव्हा तर कुठ काम करत होतीस. आणि जरा काम करायची सवय ठेव. नंतर तुला जड नाही जाणार.


अस्मिता : आई..., जा तू भाजीला. परत सुरु नको होवूस.


आई : सांगितलेल करुन ठेव तेवढ. आधीच उशीर झाला आहे.


अस्मिता : हो.... आईसाहेब या तुम्ही. सगळ काही तयार असेल तुम्ही सांगितलेल.


आई : आले... एकदाची. अस्मिता पाणी आण ग थोड. आवरायला हव. भाजी, चपाती. 


अस्मिता : बस ग आई. आराम कर. करशील तू पटकन. तुझा स्पीड माहित आहे मला.


आई : नको ग. बाबांना लवकर जेवायला लागते. 


अस्मिता : ते जावू दे. ऐक ना तु कोणती साडी घेशील राहुलच्या लग्नात. बाबांना तसाच मॅचिंग कुर्ता घेवूया. दादा आणि मी मॅचिंग करतो. माझा लेहंगा आणि त्याला शेरवाणी घेवूया.


आई : वेळ आहे अजून. आधी राहूलची तर खरेदी करुया. मग आपली. बोलत काय बसली तू. जाते मी किचनमध्ये. ( आत गेल्यावर ) अच्छा भाजी पण बनवली आणि पीठ पण मळले. म्हणून गप्पा मारत बसली का. शहाण ते माझ कोकरु.


अस्मिता : आई हे एक तुझ बर आहे ग. मी काम केल तर चांगली. आणि नाही केल तर ओरडत असती नुसती.


आई : तू हे काही आश्चर्यजनक वागते ना. ते पाहून डोळे पाणावतात ग कधी कधी. 


अस्मिता : आता ते रडण नको. चल बाबा बोलावतात. तू चपात्या बनवं. मी बाहेर नेवून ठेवते सगळे. 


आई : हो.... हे काय गरम गरम घेते बनवायला. 


अस्मिता : आई-बाबा मी इथेच आंगणात चालते थोडी. आज वडापाव, जेवण खूप झालयं.


( आठ दिवसांनी वन्सचा पुन्हा फोन येतो आईला) 


वन्स : वहिनी चार दिवसांत बस्ता, देण्याघेण्याच्या साड्या घ्यायला जायचे आहे. तुम्ही आणि दादा उद्याच या इकडे. 


आई : हो, ताई चालेल ना.


अस्मिता :कोण आहे आई. आत्या का. मला दे ना फोन.


आई : हो. हे घे, बोल.


आत्या : अस्मि ये नक्की तू पण आई-बाबांबरोबर. कलव्हरी आहेस. तुझ्याशिवाय शोभा ती काय...!! 


अस्मिता : नक्की येणार आत्तू मी. 


आई : अस्मिता आवर ग. आपली काय स्वत:ची गाडी नाही. पाहिजे तेव्हा निघायला. बस स्टाॅपवर गेल्यावर जी गाडी मिळेल त्याने पहिले जायचे. नाहीतर अर्धा तास तिथेच थांबाव लागेल.


अस्मिता : माहिते आहे ग. मी रोज जाते काॅलेजला. वेळ माहित आहे मला. बरोबर निघू आपण. तू बाबांच आवरल का बघ बर. 


आई : तूला फक्त काॅलेजपर्यंत माहित असणार. तिथून अजून एक गाडी करावी लागणार आपल्याला आत्याकडे जाण्याकरता. मी पाहते बाबांच आवरल का ते. तू ये आवरून पटकन. 


अस्मिता : अरे.... हो की. हे विसरलेच होते मी. आलेच लवकर मी.


बाबा : चला आवरा निघायला हव आता.


अस्मिता : झाले तयार मी.


आई : अग आजच लग्न नाहीये त्याचे. किती हे आवरलयं. तो मेकअप. पूस जरा. ती लिपस्टिक किती फासली.


अस्मिता : तुझ काहीतरी वेगळच असते. असू दे. तिथ जाई पर्यंत होईल पुसट.


आई : देवा, तूच बघ आता काय करायचं हिच ते.


बाब : निघताना तरी वाद नकोत.


अस्मिता : आपल्या घरापासून इथ वेळेत आलो. पण दुसरी बस बघ ना अजून आलीच नाही. एक तास इथेच आहोत आपण. 


आई : हो ग. माझे पण आता डोक दुखायला लागले.


बाबा : चला पटकन. आली बघा बस. 


आई : तुमच काय ओ... थांबा जरा. आत्ताच आली बस. लगेच काय चालली नाही कुठ.


बाबा : अग तसं नाही. तुला खिडकीजवळ लागते ना जागा बसायला. म्हणून आपली धावपळ. नाही तर मला काय उभ राहून पण गेल तरी चालतं.


आई : हो...हो..... बरोबर आहे. साधासुधा प्रवास नाही ओ. लांबचा आहे. जागा तर मिळायला हवी. डायरेक्ट शेवटचा स्टाॅप आहे.


अस्मिता : किती गर्दी आहे आई. पण बर झाल बसायला जागा मिळाली. लग्नाला येवू तेव्हा आपण ट्रेन ने येवूया. ते सोईस्कर होईल.


आई : खरतर आजही ट्रेन ने यायला हव होत. पण जावू द्या.


बाबा : ट्रेनचे तिकिट बुक करुया आणि लग्न करता येवूया.


आई : बघा बस मध्ये कुठ बसलो नाहीतर बघा हि बसली हि कानात ते डबड अडकवून.


बाबा : जावू दे ग. ऐकू दे तीला गाणी. तू खिडकीतून निसर्ग बघ छान. नाहीतर झोप. लवकर उठली होतीस ना.


आई : हो झोपते थोड्यावेळाने.


अस्मिता : हे गाण ऐक ना... आई. भारी वाटेल तुला. 


आई : कोणत ग. निसर्गराजा ऐक सांग तो...... आणि हिरवगार दिसणारा निसर्ग अहाहा..... कानांना आणि मनाला छान वाटत होते.


अस्मिता : संपल गाण. दे आता मला इंग्लिश गाण ऐकायच.


आई : जरा वेळ मला दे ऐकायला नंतर तू ऐक. 


अस्मिता : काय ग आई तू. घे मग. नंतर दे मला. तोपर्यंत बाबा तुमचा फोन द्या मला.


बाबा : घे पण जरा माझा एक कंपनी काॅल आहे. तो झाला की घे.


अस्मिता : तुम्ही तर सुट्टीवर आहात ना.


बाबा : अग सुट्टी जरी असली, तरी काम कराव लागते. जरा साहेबांचा आहे काॅल. 


अस्मिता : राहू द्या तुमच्याकडे फोन. हे बघा. आई गाण ऐकता ऐकता झोपली पण.

बाबा : उठा ग दोघी पण. गाडी थांबली खाली जावून काहीतरी खाऊया.


आई : वडापाव आणा गाडीतच.


अस्मिता : बाबा, मी पण येते.


आई : काय आणलं एवढं. वेफर्स, कोल्डड्रिंक, वडापाव, चाॅकलेट. छान याकरताच गेली होतीस खाली मला शंका आलीच होती.


बाबा : प्रवासाच्या निमित्ताने खातो. करु दे हौस.


आई : यात कसली हौस. त्यादिवशीच तर वडापाव बनवले होते. घरी करतेच ना मी सगळ. 


अस्मिता : कधीतरी बाहेरची चव पण चाखावी.


आई : चला घ्या खावून. नाहीतर वडे गार पडतील.


बाबा : अजून दोन तास राहिले.


आई : कधी प्रवास संपतो असे झाले.


अस्मिता : हो ना. मला पण कंटाळा आला आहे आता. दादा असता तर बर झाल असतं.


बाबा : अस्मिताला उठव, चला उतरायचे आहे.


   आत्याच्या घरी गेल्यावर पाहतो तर काय...??? सुहास दादा आधीच हजर होता. आम्हांला काहीच कळवल नव्हत दादाने, काका-काकू, राहुलचे काका-काकू. एवढी माणसं पाहून थोडं दचकायलाच झालं. नक्की खरेदीला आलो की लग्न आहे तेच कळत नव्हत आम्हा तिघांना. प्रश्नार्थक पण दाखवताना हसत - हसतच प्रवेश केला.


आई : वन्स, एवढे जण खरेदीला जाणार आहोत का...?? 


वन्स : अग हो. राहूल बरोबर त्याचे काही मित्र, सुहास जातील. आपण देण्या-घेण्याच्या साड्या घेवूया. आणि तुम्हांला, मामी, मावश्या, मुलींना कपडे आणि साड्या पण घ्यायच्या म्हणून तर बोलवल आहे. परत राहून जाते. वहिनी. 


आई : बरोबर आहे. एक- एक काम हातावेगळ केलेलं बर असतं. एकदम करायला गेलो तर राहून जात काहीतरी.


वन्स : म्हणूनच वहिनी मी दोन दिवस आधीच बोलवून घेतलं. छोटी- मोठी खरेदी करुया आणि परवा जावूया साड्यांची खरेदीला.


राहुल : आम्ही उद्याच जातोय. सुहासला सुट्टी नाही. तो हवा आहे माझ्याबरोबर सुट निवडायला बरोबर. 


सुहास : उद्या जावू. मला निघाव लागेल परवा सकाळी.


आत्या : तुमची खरेदी पहिली. जा उद्याच. अहो.... मुलीकडच्यांच काय बस्ताचे ????? 


मामा : अग ते त्यांचा बांधणार आहेत. आणि आपण आपला बांधायचा आहे.


आई : ते बर पडते ओ.... नव-या मुलीला उगाच बुचकळ्यात पडायला होत अश्यावेळी. त्यांचा त्यांनी बांधला म्हणजे तीला तीच्या आवडीच्या साड्य घेता येतात. आपण बरोबर जाणारे उगाच हि छान आहे...., ती छान आहे साडी अस बोलत राहतो.


वन्स : दादाच्या लग्नात तसच झाल होत तुझं. त्यावेळी आईला पसंद पडलेली तुला आवडली नव्हती. तू मला हळूच सांगितले कि मला हि आवडली साडी. ती घ्या.


आई : वन्स अजून लक्षात आहे ते तुमच्या. 


वन्स : हो. छान होती साडी तू निवडलेली. लग्नात त्याच साडीतले फोटो छान आले होते सगळ्यात.


आई : आता बाहेर या यातून. आपल्या राहूलच लग्न आहे आता. 


वन्स : मी लिस्ट सांगते तसे लिहून घे तू. आपण आकडा काढूया किती साड्या लागतील, मानपानाच्या, टोपी, ब्लाऊज पीस, म्हणजे दुकानात गेलो कि तो आकडा सांगायचा आणि लगेच पुढच्या खरेदीला लागायचं.


आई : लिहते ताई मी. सांगा आकडा.


वन्स : आता झाले हे. आपण आधी लाडू, सारणाच्या पु-या, गोड शेव हे सकण्याच म्हणून थोड-थोड आपल्याला घरात खायला करुयात. त्याच्या सामानाची लिस्ट पण तयार करुयात. तीन महिन्यांनी पहिल्याच आठवड्यात लग्नाची तारिख आहे.


आई : तुम्ही नका काळजी करु. मला ते शेवतीच सगळ माहित आहे. एका दिवसात आपल करुन होईल. शिवाय माझी बहिण पण जवळ आहे. ती तर हे पदार्थ बनवण्यात तरबेज आहे.


वन्स : काळजीच मिटली. प्रत्येकाला काम वाटून द्यायला हव. म्हणजे ताण येत नाही. 


आई : तुम्ही खूप काळजी करता ताई. आम्ही आहोत बरोबर.


वन्स : तुम्हा सर्वांच्या मदतीने सुरु आहे सार. म्हणूनच बोलवून घेतलं. दादा कुठ आहे.


आई : बोलवते थांबा. अस्मिता बाबांना बोलव ग. 


अस्मिता : बाबा, आई बोलावते.


बाबा : काय ग. 


आई : मी नाही वन्स बोलवत आहेत.


बाबा : बोल ग काय म्हणते.


आत्या : दादा पत्रिकेचा नमुना कोणता सिलेक्ट करायचा. मायना कसा यायला हवा, ते सांग. पत्रिका छापायला द्यायच्या आहेत. जास्त नाही  छापणार मोजक्याच. बाकीच्यांना व्हाट्सएप वर पाठवता येईल पत्रिका.


बाबा : अश्याने लोक पण व्हाट्सएप वरच तांदूळ टाकतील.रफ कागद दे. इथे नाव मुलाचे आणि मुलीचे, मामा-मामी, चुलते-चुलती, आजी-आजोबा. किलबिल परिवार. जास्त नाव नका लिहू परत याच नाव नाही त्याच नाव राहिल अस होत. आता तुम्ही त्याप्रमाणे नाव लिहा यावर.


आत्या : पाहून ठेवा यात नाव कशी लिहायची ते. दादाला, दिरांना बरोबर घेवून लिहा यात नाव. परत गोंधळ नको.


अस्मिता : राहूल किती छान फोटो आहे सुटाचा, हि शेरवाणी मस्त दिसेल तुला. फिनिशिंगला करुन घरी आणलास कि फोटो काढून पाठव मला.


राहूल : सुहास मुळे पटापट निवडायला सोप गेलं. मी एक मोजडी आणि शूज घेतले. 


आई : छान खरेदी झाली नवरदेवाची. 


आत्या : मोठ काम हलक झालं. पण काय रे ते वेळेत घरी घेवून ये कपडे तुझी. आणि हि बॅग पण घेतली ते बर केल. हाॅलवर तुझी कपडे वेगळ्या बॅगेत असलेली बरी. 


राहुल : हा हळदीचा ड्रेस तेवढा मिळाला लगेच. 


आत्या : अग ते बाशिंग, मुंडावळ्या, टिकली नवरदेवाची कधी घ्यायला जायचं.


आई : वन्स तिकडे भेटते चांगल. मी आणि अस्मिता जावून घेतो सगळ बाकीचे. उद्या खरेदीला गेलो की हळकुंड घेवूया.


वन्स : किती लागतील, तुला माहितच असणार अंदाज.


आई : ह्या साडीच सुत छान आहे ताई. साड्या घेतल्या तर त्या नेसायला पण हव्यात प्रत्येकिने. नाहितरी पास होत राहतात. 


आत्या : चल या घेवूया मग. आता आपल्या पाहूयात.


आई : ताई, ह्या साडीचा रंग खुलून दिसेल तुम्हांला. वेगळाच आहे पॅटर्न पण. 


आत्या : हो ना. सुंदर आहे. जाऊबाई, बघा तुम्हांला कोणत्या आवडतात.


जाऊ : बाई, हि छान आहे. मला हि घ्या.


आई : वन्स मला हि आवडली.


आत्या : मावशी आणि मामींना यातलीच घेवू. छान आहेत.


आई : हो. हल्लिच आल्या वाटतं.


आत्या : अस्मि, तुला घे साडी. 


अस्मिता : आत्या मी काय साडी नाही घालणार हा..... मी घागरा घालणार आहे.


आत्या : चल तुला घागरा घेवू. पुढेच दुकान आहे.


आई : वन्स किती पटापट बस्ता बांधून झाला आपला. आणि आपलीही खरेदी झाली.


आत्या : अग त्या पॅटर्न च्या साड्या थोड्या कमी आहेत. दिली त्यांनी आॅर्डर. आले कि येईल घेवून. आपल्या साड्या फाॅलो, पिको, पदराला नेट लावून झाल्या कि आणेल.


आई : हो ताई. चला आता रिक्षा पाहुयात.


आत्या : आलो एकदाच घरी.


राहूल : काय ग हे एवढ. इतक्या साड्या.


आई : देण्या-घेण्याच्या आहेत साड्या. वरमाईची साडी अजून दुकानतच आहे. वन्स उद्या सकाळी निघतो आम्ही. कसे तीन दिवस झाले येवून कळलेच नाही.


आत्या : थांब ना वहिनी. दादाला जावू दे. अस्मिता करेल जेवण. ते दोघे जातील.


आई : येईल मी लवकर लग्नासाठी. १ तारखेलाच येते. अधून-मधून फोनवर बोलण होईलच आपले.


आत्या : ठिक आहे. पोहचल्यावर फोन करा आठवणीने.


अस्मिता : बाय आत्या. 


आत्या : लवकर ये कलव्हरी. 


अस्मिता : हो कळसतांब्या आणि ते राहिलेल सामान घ्यायला जायच तेव्हा तू दिलेल्या घाग-यावर मॅचिंग बांगड्या, कानातले आणखी काय-काय घ्यायचे आहे मला.


आत्या : हो.... नक्की घे तुला हव ते.


अस्मिता : मला पुढच्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार सलग सुट्या आहेत. आई आपण राहूल च्या लग्नाची खरेदी करायला जावूया.


आई : हो ग. सुहासला कुर्ता पण घेवूया. त्याची आणि बाबांची राहिली आहे खरेदी.


अस्मिता : दादाचा फोन आला होता मला. तो बोलला मी लग्नाकरता सुट्टी घेतली लवकर. घरी आल्यावर बाबा आणि मी जावू खरेदीला. आपण आपली करुया. ते नंतर करणार आहेत खरेदी.


आई : बर जावू मग आपण. 


अस्मिता : हा सेट एकदम मॅच आहे. घेवूया. घाग-यावर परफेक्ट आहे.


आई : हो घे. पण व्यवस्थित सांभाळ. 


अस्मिता : ह्या बांगड्या, नेलपेंट, क्लचर पण घेवूया. 


आई : आवर ग. आपली अजून कपड्यांची, साडी खरेदी करायची. परत त्यावर पण मॅचिंग घ्यायचं असणार ना तुला.


अस्मिता : मला बनारसी ओढणीचा ड्रेस हवाय. तो घेवूया. सकाळी तोच घालेल.


आई : चल पहिले तुझ उरकून घेवू.


अस्मिता : हा रंग छान आहे. सा घेवू. 


आई : मागच्या वाढदिवसाला ह्याच रंगाचा ड्रेस आणला होता. हा घे हा जरा वेगळा रंग आहे. तुझ्याकडे नाहीये असा.


अस्मिता : खरच की, हटके आहे एकदम. 


आई : काय भाषा बोलती. छान आहे तरी बोल साध तू.


अस्मिता : तेच ग. 


आई : आता साड्यांच्या दुकानत जावू.


अस्मिता : हि खण साडी घे तुला. ह्याची फॅशन आहे आता. तुला हा रंग खुलून दिसेल. 


आई : खरच आणि असा रंग तुझ्या काकाच्या लग्नातल्या साडीचा होता. परत काही हा रंग घेतलाच नव्हत. हा घेवूया.


अस्मिता : खावूया जरा. दमायला झालयं.


आई : घरी जावू मग. परत येवू खरेदीला. थकली आहेस ना तू.


अस्मिता : नको आई. आत्ताच घेवू सगळं. खावून झालं की मंडईला लागून दुकान आहेत तिथून बाशिंग, कळसतांब्या, मुंडावळ्या, घेवू. आणि नवरदेवाची टिकली. बिंदी स्पाॅट मधून घेवूया. चमकीची छान.


आई : आवरूया एक - एक काम. हि खरेदी तर झाली. आता परत ड्रेसवर सेट घ्यायचा का तुला. इथे बाजूलाच आहे गल्ली. घेवूया चल. 


अस्मिता : कानातले घेवूया फक्त मोठे. कारण ड्रेसच्या पुढे वर्क आहे.


आई : हे छान आहे बघ. 


अस्मिता : अय्या. खण साडीवर सिल्वर ज्वेलरी घेवू आई तुला. मस्त दिसशील तू.


आई : मला नको काही. मी खोट नाही घालणार काही. तेवढा तो सेट आणि हिरव्या बांगड्या तर असतातचं.


अस्मिता : तुला काही समजत नाही. थांब तू जरा. तुला नाही आवडला तर मी घालेल. मला म्हणून घेवू. मी घालेल राहूल च्या पूजेला.


आई : तोपर्यंत सुट्टी आहे का तुला. 


अस्मिता : मी घेणार आहे. 


आई : छान. राहूल च्या लग्नात एवढं. स्वत:च्या लग्नात किती फिरायला लावशील ग?? 


अस्मिता : तुला त्रास नाही देणार मी. मी करेल खरेदी सगळी. 


आई : हो करशील बर.... आता घरी जायच आहे की नाही. का इथच थांबायच आहे. तुझ्या लग्नाच्या खरेदी पर्यंत. 


अस्मिता : काय ग आई तू पण. थांब इथे रिक्षा घेवून येते मी.


आई : झाली एकदची खरेदी. आता काही काळजी नाही. 


अस्मिता : मी हे सगळ कपाटात ठेवून देते. 


आई : विसरलोच बघ आपण. साडीपीन, सेफ्टीपिन घ्यायची राहिली. आणि टिकल्या लग्न कार्यात लावायला डिझाईनच्या घ्यायच्या राहिल्या कि. तो केसांना लावायचा बन पण कसा काय विसरलो आपण. 


अस्मिता : तुला आता एक - एक आठवेन. काय राहिले याची यादी करुन मला दे. मला आहे अजून उद्याचा आणि परवाचा दिवस.


आई : लिहून ठेवते ऐनवेळी ध्यानातून जात बघ.


अस्मिता : येत ग मी घेवून राहिलेल्या गोष्टी. सोबत मैत्रिणी पण आहेत. दुपारी जेवायला नाही येणार. बाहेरच खावू काहीतरी.


आई : हो काम झाल की फोन कर. 


अस्मिता : हो. आवरल की करते फोन मी.


आई : किती उशीर अग. तीन तास लागले खरेदीला तुला. आपण तर दिड तासात खरेदी केली होती एवढी सगळी.


अस्मिता : मैत्रिणीला पण खरेदी करायची होती. तीला पसंद पडत नव्हते काही. सगळी दुकान फिरवत बसली.


आई : बर. पाहू काय -काय आणले ते.


अस्मिता : मी अग त्या घाग-यावर तो कमरपट्टा आणला आहे एक. अंगठी घेतली खड्याची. अजून एक मोठ आणि छोट कनातले घेतले. तू लिहून दिलेल सर्व सामान आहे यात.


आई : छान आहे खरेदी तुझी. आता दादा आणि बाबा राहिले.


   दोन महिन्यांत............. 


फोनची रिंग वाजते.


सुहास : मी येतो ग उद्या. दुपारपर्यंत पोहचतो.


आई : हो. बर झालं वेळेत येतोस. अजून खरेदी बाकी आहे. बाबा पण थांबले तुझ्या करता.


सुहास : आम्हांला नाही वेळ लागत. दुकान तर आपलं नेहमीचचं आहे. जावून घेवून यायचे आवडीचे. त्या अस्मि सारखं आख्ख दुकान थोडी खरेदी करणार आहोत. तीने सांगितलेल्या गोष्टींनीच माझी निम्मी बॅग भरली.


आई : आता काय संगितले तुला आणायला.


सुहास : सेंट, मॅक कंपनीचे मेकअप किट, फेशिअल बरच आहे अजून दाखवतो घरी आल्यावर.


आई : हि पोरगी या वस्तूंचा सेल लावणार की काय. किती वापरत राहते सारखे वेगवेगळे प्राॅडक्ट.


सुहास : लाडोबा आहे. असू दे. आपण नाही करणार तर कोण करणार तीचे लाड.


आई : तू आणि बाबा तीला डोक्यावर चढवा. लग्न झाल्यावर तीच कस होइल.


सुहास : त्याला वेळ आहे अजून.


आई : ये तू लवकर उद्या.


सुहास : बॅग झाली भरुन माझी.


आई : वेळ झाला खूप बाळा. दमला असशील. तू फ्रेश हो मी ताट करते जेवायला.


सुहास : आलोच. भूक लागली खूप मला.


आई : सावकाश जेव. आणि आराम कर आता. थकला असशील.


सुहास : आम्ही जातो उद्या कपडे आणायला. बाबांना फोन केला होता. ते बोलले येणार आहे उद्या. फारसे काम नाही बोलले.


आई : सांगितले होते मला पण. 


अस्मिता : दादूड्या. कधी आलास. मी सांगितलेल आणलय ना सगळ. 


आई : एवढ घेतल आपण तरी तू आणखी काय आणायला सांगितले.


अस्मिता : ज्वेलरी आणि कपडे घेतली. मेकअपचे सामान राहिले होते. ते दादाला सांगितले.


आई : धन्य आहे तूझी. स्वत:च्या लग्नात काय करशील ग. चिंता आहे मला तर. 


बाबा : सुहास कधी आलास. प्रवास कसा झाला तुझा. 


सुहास : दुपारी थोडा उशीर झाला घरी यायला. ट्रॅफिक लागले त्या नेहमीच्याच पुलावर. 


बाबा : आवरल का निघूया.


अस्मिता : मी पण येते.


आई आणि दादा : झाली ना तूझी खरेदी मग कशाला यायचं आहे तुला.


बाबा : येवू दे. ती मला मदत करणार आहे कपडे घ्यायला.


आई : काहीतरी घ्यायच असणार तीला अजून.


अस्मिता : नाही ग आई. बाबांना आणि दादाला कपडे घ्यायला बरोबर चालले.


सुहास : मला नको बाबांना कर मदत. माझ फिक्स आहे काय घ्यायचं ते.


आई : वाद नको इथं. या जावून. मी आवरुन घेते घरातले. आज काहीतरी स्पेशल पनीरची भाजी बनवते.


अस्मिता आणि सुहास : वाव आई. तू खूप छान आहे.


आई : चटपटीत हवं नुसतं. पोळी-भाजी नको बोलतात खायला.


बाबा : सुहास हे अस वाटतय. 


सुहास : बाबा मस्त दिसतेय.


अस्मिता : एकचं नंबर. आपण जरा इथल्या शेजारच्या पण दुकानात जावू. तो एक ड्रेस आवडला मला.


बाबा : हा ड्रेस किती मस्त आहे. छान दिसतो तुला. घेवूया.


सुहास : बाबा झालय आपल आवरुन निघूया. अजून काही राहिलय का? 


बाबा : शूज मला आणि तुला घेवू. या शेरवाणीवर तुला मोजडी राहिली घ्यायची.


सुहास : विसरलोच होतो मी. चला घेवूया. उशीर झाला आपल्याला आईचा फोन येवून गेला. 


बाबा : निघूया चला आता.


आई : अस्मि अग बास आता किती घेशील. मला वाटलचं होत काहीतरी घेवून येणार. आणि आलीस शेवटी. आपण घेतला होता ना ड्रेस. 


अस्मिता : अग यावर ज्वेलरी त्या आधीच्याच ड्रेसवरची मॅच आहे. ती नाही घेत बसले मी.


आई : धन्य हो तुझी आता.


बाबा : घेतलेल्या वस्तू, लग्नासाठी घेतलेली बॅग सामान भरुन ठेवा निट. ऐनवेळी गडबड नको.


आई : पोरांनो ते बरोबर आहे. नाहीतर तिथ जायचो. परत हे राहिले घरी अस नको व्हायला. अस्मिता तुझ्याकडे भरपूर गोष्टी घेतल्या आहेत. त्या नीट घे बरोबर. 


बाबा : चला आता परवा निघायचं आपल्याला. ट्रेनच बुकींग केल आहे सुहासने.


आई : माझ झालय आवरून. तुमचे कपडे ठेवले आहेत तेवढे घ्यायचे कि अजून घेवूया.


बाबा : बरोबर आहे. बास झाले.


सुहास : मी तर बॅग तिकडून येतानाच भरून आणली होती. आता फक्त नविन घेतलेली कपडे भरायची.


बाबा : भरपूर बॅगा झाल्या. आपण काय इतके दिवस चाललो का रहायला. काय ग अस्मि, तूझ्याच दोन मोठ्या बॅग. 


अस्मिता : ड्रेस, घागरा फुगीर आहे त्याला भरपूर जागा लागते. मेकअप चे सामान आणि आईची साडी पण आहे यात.


आई : एका साडीला जागा नाही का एवढी बॅग भर जागा लागते का??? 


बाबा : चला, सगळ घेतल ना बरोबर. काही राहिलय का चेक करा आत्ताच परत गोंधळ नको.


आई : चला मी लावते कुलूप. शेजारच्या काकूंना सांगते लक्ष राहू द्या म्हणून.


बाबा : आम्ही रिक्षा पाहतो तोपर्यंत. दोन लागतील. बॅग आहेत एवढ्या.


आई : पोहचलो,एकदाच रेल्वेस्टेशनवर. किती वेळ आहे अजून. घरातून उगाच एवढ्या घाईत निघालो.


बाबा : येईल एवढ्यात ट्रेन.


अस्मिता : चल आई. इथे तू आणि बाबा बसा मी आणि दाद इकडे आहोत. हे आहेत आपले सीट.


आई : हा प्रवास छान वाटतो बघा. मागे ते एस. टी करता किती वेळ थांबलो. हे सर्व वेळेत झाले.


अस्मिता : मी सांगत होते तुला ट्रेनने जावू म्हणून.


सुहास : मला भूक लागली. आपण इथले वडापाव घेवू. गरम आहेत छान.


आई : ट्रेन कितीवेळ थांबणार आहे. लकवर ये घेवून. नाहीतर राहशील इथेच. काळजी वाटते. प्रवास कधी करत नाही ना... ट्रेनने.


सुहास : बाजूलाच आहे तो वडेवाला. येतो लगेच. आणि मी काय लहान आहे का??? 


आई : माझ्यासाठी लहान आहेस.


सुहास : घ्या. अस्मि तुला चार आणले. खाऊगदाडी आहे तू. स्वत:च संपवते आणि आमच्याकडे बघत बसते आम्ही द्याव म्हणून.


अस्मिता : बाबा, बघा ना हा.... कसा बोलतोय. जसा काय स्वत: खातच नाही. माझ्या पेक्षा जास्त लागत तुला. तू तर पाच आणले तुला.


आई : हे काय घर आहे का भांडायला. शांत रहा जरा. घरीदारी तेच तुमचं. अहो, वन्सना फोन केला होता ना. 


बाबा : हो. तीला तर आपण येणार म्हणून टेन्शनच दूर झालं. वाट बघते बोलली. लवकर या.


आई : काल झाल होत बोलणे आमचे फोनवर. खूप काळजी करतात त्या. लग्न मुलीच असो वा मुलाच तेवढीच कामे असतात.


अस्मिता : क्लचर फक्त १० रुपये, कानातले २०,२५,३० आणि ब्रेसलेट किती गोड आहे बघ ना.


आई : आता काही घ्यायच नाही. आधीच खूप आहे तुझ्याकडे. आत्ताच घेतल ना.


अस्मिता : तरीपण हे छान आणि स्वतात आहे किती. परत आपण थोडी ट्रेन मधून प्रवास करतो सारखा. घेवूया ना.


आई : नाही बोलले ना. 


अस्मिता : खिडकी च्या बाहेर बघत रागात तशीच झोपी जाते. 


आई : कुठे चालला सुहास. झोप नाही येत का तुला.


सुहास : आलोच, थोड चालून येतो. पाय अवघडले आहे माझे.


आई : ये जावून.


सुहास : हे कसे आहेत कानातले. आणि झुमका, हे एक ब्रेसलेट द्या.


( जागेवर जावून बसतो. ) 


आई : अस्मि उठ आता. चहा घे धर. 


अस्मिता : नकोय मला. 


सुहास : तीचा राग कसा जातो बघ तू आता.


अस्मिता : मी काय रागावली नाही. मला अजून झोपायचं आहे. चहा घेतला तर झोप उडून जाईल.


बाबा : निसर्ग बघ किती छान दिसतो. काय झोपती अशी सारखी तू. एव्हाना झाली असणार तूझी झोप. गप्पा मारुया आपण. नाहीतर चल गाण्यांच्या भेंड्या खेळू मस्त.


अस्मिता : थोड्या वेळाने खेळूया. माझा मूड नाही अजिबात.


सुहास : हे बघ. आता पण नाही का मूड.


अस्मिता : ( क्षणभर डोळे चोळत). वाव आई, मला ओरडून घेतलच ना शेवटी तू. 


आई : मी नाही घेतलं. मी एकद नाही बोलले का नाही.


अस्मिता : दादा तू घेतले. तूच फक्त मला ओळखू शकतो. भारी आहेस दादूल्या तू. बाबा चला आपण गाण्यांच्या भेंड्या खेळूया.


बाबा : तूझा मूड नव्हता ना आत्ता.


सुहास : गिफ्ट पाहून तीचा मूड परत आला असणार.


अस्मिता : चला ना खेळूया. टिम बनवूया आधी. मी आणि बाबा. दादा तू आणि आई. 


सुहास : नेहमी बाबा आणि तूच असते. यावेळी तू आणि आई. 


अस्मिता : चालेल. जशी तुमची आज्ञा दादा सरकार.


सुहास : गिफ्ट घेतल म्हणून वाद नाही घातला. नाहीतर आत्तापर्यंत भांडणाला सुरवात झाली असती.


बाबा : हम साथ साथ है. घ्या तुमच्यावर आले हे अक्षर.


आई : मळ्याच्या मळ्या मधे पाटाचं पाणी जातं...... 


अस्मिता : आवाज काय गोड लागला या गाण्याल आई. अप्रतिम. तू सिंगर व्हायला हव. 


आई : हो का. तरी मला बोलायचे तू छान गाते. मी अग शाळेत असताना गायन स्पर्धेत भाग घ्यायचे.


बाबा : हो लग्नानंतर काही महिने तू क्लास लावून लेव्हल देखील पार केल्या होत्या गायनाच्या.


अस्मिता : वाव, आई. मला पण शिकायचं आहे गाणं.


सुहास : नको. घराजवळचे लोक पळून जातील. आजूबाजूला कोणीच राहणार नाही आपल्या. तू काॅलेजला जाते हेच खूप आहे. 


अस्मिता : काय रे दादा,अस बोलतो. मी पण शिकेल गाणं. मला आवडत गायला.


सुहास : बर... बर शिक हा तू. मोठी गायिका हो. आम्ही येतो तुझे शो पाहायला.


अस्मिता : पाहशीलच तू.


बाबा : मी झोपतो आता. तुमच चालू द्या.


आई : तुम्हांला तर झोप किती प्रिय आहे माहित आहे. आता झोपले की उतरण्याच्या ठिकाणीच जागे व्हाल.


बाबा : सुट्या घेवून मजा करायला तर आलोय ना. भारी वाटतय. झोपतो जरा वेळ.


अस्मिता : झोपा बाबा. आराम करा.


आई : बाबाची लाडकी. सुहास तूझ्या काॅलेजच्या गमती-जमती सांग मला. काय धम्माल करता तुम्ही.


सुहास : आम्ही महिन्यातून एकदा तरी पिक्चर, बाहेर फिरायला जातो. कधी हाॅटेलला जातो नाॅनव्हेजवर ताव मारतो मस्त. कपडे घ्यायला माॅल फिरतो. नाही आवडल तर काही दुस-या दुकानातून खरेदी करतो. अस आणि बरचं ग. तू दिलेला चिवडा सगळ्यांना आवडतो. बरेच जण अस काही घरून आणतात. संध्याकाळी चहा सोबत एक दिवशी एकाच अस ठरवून खात असतो. सकाळी सगळ्यांनी जीम जाॅईन केली. रात्री जेवण झाल्यावर चालायला जातो. 


आई : छान मजा करता तुम्ही.


अस्मिता : नाहीतर आपण आई. किती बोअर राहतो. दादा मलापण हाॅस्टेलला राहायचं. तुझ ऐकून मलाही मजा करायची मैत्रिणींबरोबर.


सुहास : तुला आईच्या हातचं जेवण्याच भाग्य लाभते. रोज-रोज अस नाही मिळत चांगल. कधीतरीच खातो अग. बाकी काही नाही पण आईचं जेवणाची खूप आठवण येतं.


आई : ह्याचच वाईट वाटते. आम्ही चांगलचुंगल करुन खातो. तू तिकड तसा असतो. जीव तुटतो माझा खूप.


अस्मिता : अग आता रडायला काय झालं. तो येतो तेव्हा त्याच्या आवडीच बनवं. मला नाही आवडले तरी खाईल मी.


आई : आज मोठ दादा प्रेम जागृत झाल का. लबाडा..... सुहास ते केक आणि सॅण्डविच घेवू खायला. आपल्याला घे तीन बाबा झोपले आहेत ना.


बाबा : छे.... ग. जागाच आहे मी. सॅण्डविच मला पण घ्या.


आई : मला माहित होतं. पोरगी आणि बाबा सेम टू सेम आहात. आला नाही तो अजून लांब आहे. येईलच. सॅण्डविच चे नाव काढल की लगेच जाग आली तुम्हांला.


बाबा : तू सवय लावली खायची. कधी बटाटा, भाज्या, काकडी, टोमॅटो. यामुळे वेगवेगळे प्रकार खायला मिळतात. तू बनवलेली पुदीना चटणी तर मस्त.


आई : पुरे झालं कौतुक आता. घ्या आला बघा तो.


बाबा : छान आहे. पण तुझ्या हातची चवीच भारी लागते.


अस्मिता : खर आहे आई. मस्त बनवते तू.


सुहास : आता पुढच्या स्टेशनवर उतरायचे आहे आपल्याला. बॅगा काढून ठेवतो. सावकाश उतरा. आधी गर्दी कमी होऊद्या. मग उतरु आपण. 


आई : हो. तू अस्मि सोबत रहा. आम्ही उतरतो बरोबर.


सुहास : चालेल आई. 


बाबा : तायडे, चांगलचं ट्रॅफिक लागल बघ यायला. कस तुम्ही रोज जावून येवून करता. आमच्याकड तर अवघ्या वीस - पंचवीस मिनिटांत प्रवास होतो.


आत्या : हो.... खूप गोंधळ असतो. ट्रॅफिक नुसता. कंटाळा पण येतो कुठं जाण्याचा. 


अस्मिता : आत्या, राहूल कुठे आहे. त्याच्या आणलेल्या गोष्टी दाखवायच्या मला. 


आत्या : अग आज गेला आहे कामावर उद्यापासून नाही जाणार. संध्याकाळी तो आला कि पाहुया मिळून सगळे.


राहूल : फोटो पाठवला तसे परफेक्ट ब्रोच आणला अस्मि. मुंडावळ्या पण नाजूक आहे छान. वा टिकली छान. पण... नाही लावली तर चालणार नाही का... मला थोड अवघडल्या सारखं वाटते.


सुहास : हौस करुन घे. नंतर तुला कोण विचारणार नाही. एकदा लग्न झाल की कळेल तुला.


राहूल : तुझ्यावर पण हि वेळ लवकरच येणार आहे. तुला काय कळत यातलं इतक. 


सुहास : माझे मित्र आहेत ना काही. एकदम बिझी झालेत बघ. त्यांना भेटायला यायला पण वेळ नाही

बघ. फॅमिलीचे कारण पुढ करतात.


राहूल : आता नाही कळत. लग्नानंतर पाहुया काय होतं ते.


अस्मिता : काय विषय चालला आहे. मी इथ एवढी खरेदी दाखवते आहे ते बघा. आत्या तुला आम्ही हि साडी आणि मामांना मॅचिंग कुर्ता आणि जॅकेट आणले. ते सकाळी घाला. राहूल तुला हे शर्ट आणि सेंट आणलाय. दादा ने आवडतो का बघ. 


राहूल : सुहासची निवड माहित आहे मला. छान आहे. आवडले मला. 


आत्या : छान आहे ग साडीचा असा कलर नव्हता माझ्याकडे. 


आई : वन्स त्या साड्या आणल्या ना. 


वन्स : काय सांगू तुला. तश्या नाही पण थोड्या वेगळ्या साड्या आहेत. माझी नणंद रुसली आहे. तीला आपल्या सारख्या अशीच साडी हवी. काय करायचं. 


आई : माझी दिली असती. पण ब्लाऊज शिवून झालाय अवो.


वन्स : अग दुसरी घेतली एक पाहूया आवडते की ती. बाकीच्यांना आवडल्या साड्या. 


आई : आपण अजून एखादी मिळाली तरी घेवूया. तसही हळकुंड आणायला जायच आहे ना. हळद फोडूया म्हणजे चौथ्या दिवशी ती लावता येईल.

वन्स : वहिनी ही साडी आपण घेतली तशी पण रंगसंगती थोडी वेगळी आहे. चालेल ना नणंद बाईंना. जरा टेन्शनच आहे थोड.


आई : नका एवढी काळजी करु तुम्ही. घेवूया आपण हि साडी. चला आता हळकुंड घेतले कि जावूया घरी.


वन्स : ऊन किती आहे बाहेर. या वर्षी गरम खूप होत आहे. लवकर जावू घरी. काही आणायच राहिल असेल तर, अस्मिता नाहीतर संध्याकाळी आपण येवू.


आई : वन्स लगेच बांगड्या भरण्याचा कार्यक्रम करुया. जात सजवते छान. अस्मिताला सजावटीची खूप हौस आहे.


अस्मिता : मी आणि दादा खाली जावून पाने आणि फुल घेवून येतो.


आई : हो. ताई, मला तुम्ही ब्लाऊजपीस द्या.


वन्स : हे घ्या. वहिनी कोणाची नाव आली आहेत हळद फोडायला. त्या पाच बायकांना बोलावून आणते. म्हणजे त्यांच झाल की आलेल्या पाहुण्यांना फोडायला. 


आई : बरोबर आहे. परत दळायची पण आहे. हळद फोडून झाली कि बांगड्या भरायला पाठवा त्या खोलीमध्ये. 


वन्स : आवरायला हव. पटकन. चला गया पटपट. हळद फोडली की समोरच्या खोलीत बांगड्या भरुन घ्या.

अस्मिता तू भर बांगड्या. तुझ्या ड्रेसला मॅचिंग.


अस्मिता : मी आणल्या बरोबर बांगड्या.


आई : झाल सगळं. वन्स आता वेळ आहे जरा. आराम करा. ३ वाजता उठूया. 


अस्मिता : आई आणि आत्तू आम्ही पिवळ्या रंगाची थीम ठेवली. सर्वांनी पिवळा रंग घालायचा आज. तुम्ही आज पिवळी साडी घाला. आपण फोटो काढूया छान. राहूलने पिवळा कुर्ता पण घातला. आवरा लवकर. 


वन्स : छान सजवलं अस्मिता जात. पान आणि फुलं छान दिसते. ब्लाऊजपीस मागण्यामागे अशी सजावट होती तर... खूप छान ग. आपल्या अस्मिला छान नवरा मिळायला हवा,तिच्यासारखाच.


आई : त्याच शोधात आहोत. तुम्हीपण पहा कुठं असेल तर. 


वन्स : राहूलच लग्न झाल की लागूया मोहिमेला.


आई : माईक द्या आजींकडे. किती छान गाणी म्हणतात हळदीची. लिहून घ्यायला हव खरतर. यांच्या नंतर आपण काय कॅसेट लावायची का. आपल्याला यायला हवं.


वन्स : खर आहे तुझं. घेवूया आता फोटो काढून.


आई : छान झाला हळदीचा कार्यक्रम. 


वन्स : वहिनी मेहंदी चा कार्यक्रम आहे उद्या. मेहंदीचे कोन आणूया.


आई : सुहास आणि अस्मिता आणतील. तुम्ही सांगा किती आणायचे ते. 


अस्मिता : आणतो आत्तू आम्ही. तू सांग किती आणू.


आई : जास्तीचे पण आणले का. बर. ठेवते फ्रिजमध्ये. जसे लागतील तसे घेवून जा इथून.


वन्स : चांगली हातभर मेहंदी काढा. कलवरी मॅडम.


अस्मिता : आत्तू तुझ्या हातावर पहिली मी काढणार मेहंदी. मग बाकीचे.


वन्स : छान लाड चालले माझे. मान मिळतोय लेकाच्या लग्नात, घेते हौस करुन.


आई : खरयं ताई. तुम्ही घ्या काढून मेहंदी मी राहिलेल काम आवरुन घेते. नंतर काढेल ती मला.


वन्स : अस्मि तुला कोण काढणार मेहंदी.


अस्मिता : आत्या एका हातावर काढते मी दुस-या हाताला टॅटू चिटकवणार.. 


आत्या : छानच की. झाली का काढून मस्त काढली. अगदी हात भरुन काढली मला हली तशी. तुला घे काढायला.


आई : काय ग अस्मि काय झालं. अग दादाची ती शेरवणीची पिशवी कुठं. त्यात मी माझे मेकअप चे सामान आणि त्यात मेहंदीचा टॅट्यू ठेवला होता. दादाला बोलव ना.


सुहास : अग निघताना तू घेतली होतीस ना. सोफ्यावर ठेवली होती मी. 


अस्मिता : काय....??? राहिली घरी आता. मला वाटल तू घेतली असणार. 


सुहास : अग माझी शेरवाणी विसरली तू. आता परवा लग्न. मी काय एकाच ड्रेसवर राहू का. माझा मूड घालवला तू.


अस्मिता : माझ्यावर का ओरडतो. तुझी बॅग मला वाटल तू घेतली असशील.


आत्या : आरडाओरड कसली चालली. राहूलला घेवून जा ड्रेस घ्यायला. 


राहूल : माझ्याकडे नविनच शेरवाणी आहे एक. मित्रा ने गिफ्ट केल होतं. ती लग्नात घाल. तिकडे गेल्यावर नविन घेतलेली आहेच तुला.


सुहास : चालेल का तुला.


राहुल : हो. चालेल ना. घाल तू. 


अस्मिता : तुमचं झाल. पण माझ काय. मी काय अशी दिसू. मेन कलवरी आहे मी.


आत्या : ते पण सोडवू प्रश्न. मेकअप वाली ठेवूया तुला खास. माझी मैत्रिण आहे एक. तीला सांगते. खूश का आता सगळे.


अस्मिता : माझ्या डोक्यावरचे मोठ ओझ हलके केल आत्तू. तू सुपर आहेस. झटक्यात प्रश्न सोडवला.


आत्या : मी त्या मैत्रीणीला बोलवते तुझ्या हातावर मेहंदी काढून देईल ती. 


अस्मिता : छान काढली ग मेहंदी आत्या तीने. 


वन्स : उद्या हाॅलवर जाण्याच्या बॅगा अस्मि, सुहास, वहिनी, राहूल भरुन घ्या. परत घाई आणि रात्रीच जागरण नको.


राहूल : माझी झाली भरली आहे बॅग. अस्मि एकदा चेक कर ग. हळदीचा ड्रेस, सुट, शेरवाणी. 


अस्मिता: करते चेक. आहे बरोबर सगळे. तुझे बाशिंग, मुंडावळ्या, टिकली यातच ठेवते. परत सापडा - सापडी नको.


राहूल : समजत होतो तेवढी वेडी नाहीस तू.


अस्मिता : काय रे राहूल तु पण असा. तुझं आता लग्न आहे उद्या. वहिनीला पण असच करणार का.


राहूल : ती घरात आल्यावर कळेलच तुला. बर चल आवरुन घे. सकाळच्या ड्रेसवर तू आणलेला तो ब्रोच दे मला. आई तो टोप आणलेला कुठे ठेवलास.


आत्या : तुला असली एवढी घाई झाली. जणूकाही उतावळा नवरा... गुडग्याला बाशिंग अशी अवस्था झाली आहे तुझी.


राहुल : काही काय ग आई तुझं. उद्या गोंधळ नको म्हणून बोललो.


आत्या : मस्करी केली तूझी. उद्या सुनबाईंना राग आला तर. आजच बोलून घेते तुला.


राहुल : तु पण या पोरांना साथ देतेस. छान आहे. 


आई : नवरदेवाला अस पिळून घेत असतात. लग्नाआधी. बर चला झोपा लवकर. 


वन्स : किती गोड दिसते. कोणाची नजर न लागो तुला. अस वाटतय आज तुझ लग्न जमतय कि काय.


अस्मिता : काही काय ग आत्ता. माझ्यापेक्षा राहुल बघ भारी दिसतो. हिरो. 


आत्या : काजळ लाव त्याला कानामागे.


अस्मिता : लावले आत्तू.


बाबा : चला निघा आता. सगळ आठवणीने घ्या. ताई साखरपुडा अंगठी घेतली दाजींनी. नवरीचे पैंजण, जोडवी, मंगळसूत्र घ्या आठवणीन. 


आत्या : ठेवलय सगळ व्यवस्थित. आलो एकदाच हाॅलवर. दादा एवढीच नाव ना. साखरपुड्याला उठवण्याची. वहिनी बायका एवढ्या बास ना.


आई : बरोबर आहे. या कोण आहेत आणि त्यांचा तो मुलगा कोण...?? 


वन्स : अग तो स्वराज आहे त्याच करायच आहे यंदा लग्न. आणि हि माझी खास मैत्रिण आहे. चांगले आहे घरचे सगळे.


आई : हो का. ह्या विचारत होत्या. अस्मि तुमची मुलगी का.


वन्स : त्यांना आवडली कि काय आपली अस्मि.


आई : काहीतरीच काय. तश्या काही बोलल्या नाही.


वन्स : अग तेच आहे बघ. अस्मि आवडली आपली त्यांना. इतक की दादाशी बोलण पण झाल. दादाला चांगले वाटतात. माझ मत विचारत होता. 


आई : मुलगा छान आहे. अस्मिला विचारायला हवं. अस्मि तो पिस्ता कलरचा शर्ट घातलेला मुलगा कसा वाटतो ग. 


अस्मिता : चांगला आहे की. काग?? 


आई : त्यांनी मागणी घातली तुला. घरी चांगल आहे त्यांच्या. आपल्या आत्याची मैत्रिण आहे खास ती.


राहूल : अग नीट लाव जरा हळद. किती घेतली आहेस हातात.


अस्मिता : तू थोडी काही बोलणार आहे मला. एवढ्या लोकांमध्ये.


आत्या : ओवाळून घ्या आता. मिरवणूक आहे परत. अस्मिता डान्स कर छान.


अस्मिता : गोरी गोरी पान

       फुलासारखी छान

    दादा मला एक वहिनी आण. 


आत्या : गाण बोलायच नाही. डान्स कर. 


अस्मिता : हो.


मामा : चला हे सामान टाका आत. जावूद्या हा ट्रक घरी. कन्यादान आणि फेरे झाले की लवकर आवरा हाॅल रिकामा करावा लागणार.


बाबा : अस्मि जा गे आत्याला सांगून ये आवरा लवकर. 


अस्मिता : अजून फोटो राहिले काढायचे. दादा चल लवकर. 


आई : झाल लग्न एकदाच. पण किती गडबड सुरु होती महिन्यापासून. 


आत्या : होना. चला घरी तयारी केली असेल बिल्डींग मधल्या मावशींनी. सजावटीची. खेळ खेळून घेवूया.


फोनची रिंग वाजते आत्याच्या.

आत्या : बोल ग. काय म्हणते. ये मग संध्याकाळी तू. आहोत आम्ही सगळे इथे. 


आई : काय ओ. इथेच आहोत सगळे म्हणजे?? 


आत्या : स्वराजला आवडली अस्मिता. त्यांना उद्याची पूजा झाली की लगेच परवा साखरपुडा करायचा आहे. अश्या बोलत होत्या.


आई : हो का. 



वन्स : वहिनी काळजी नका करु. आपल्या अस्मि करता योग्य स्थळ आहे. तरी पाहून आपण विचार करु. पण मुलाला नाव ठेवायला जागा नाही कुठे. आज येणार आहेत संध्याकाळी.


बाबा : आल्यावर ठरवू.


सुहास : मजा आहे कोणाची तरी.


अस्मिता : दादा मला टेन्शन आलयं. मला करीअर नंतर करायच लग्न.


राहूल : स्वराज चांगला मुलगा आहे. तु पाहून बोलून बघ एकदा. मग ठरव काय ते.


आत्या : या. स्वराज ये. बस इथे.


आई : धर ग. पाणी घेवून जा. 


अस्मिता : हे घ्या. 


आत्या : बोला तुम्ही दोघं. आम्ही आहोत इकडे गप्पा मारत.


अस्मिता : मला करियर करायरा आवडते. माझी अस स्वप्ने आहेत.


स्वराज : काहीच हरकत नाही. आपण दोघे मिळून पूर्ण करु.


आई : अस्मिचा होकार डोळ्यातून दिसत होता. परवा साखरपुडा घरात करायचे ठरले.


आत्या : चल आपण अस्मिला साडी घेवून येवू वहिनी परवा घालायला.


बाबा : हे घे ग पैसे छान आणा. 


आत्या : दादा, मी घेणार आहे. तू हवतर आण दुसरी.


बाबा : एकच घालेल ती. तूच आण. नंतर घेता येतीलच.


आई : वन्स राहूलच्या लग्नाला आलो. अस्मिताचा सखरपुडाच करुन निघालो. आणि स्वराजला पुढच्या महिन्यात अमेरिकेला जायचे आहे. म्हणून दोन आठवड्यातच लग्न हि कसली ओ लगीनघाई.


वन्स : चांगल्या कामाला उशीर नको. आपण लग्नाच्या साड्या इथेच घेवू. अस्मिताच्या. 


बाबा : आपण एक अस करु शकतो. आता इथेच लग्न झाल की आपल्याकड रिसेप्शन देवू तिथूनच ते अमेरिकेला जातील. 


आई : मला तर विश्वासच बसत नाही. पोरीच लग्न ठरल आणि ती डायरेक्ट परदेशात. आपल घर किती सुनसुन होणार. तीची बडबड आता ऐकायला मिळणार नाही. 


बाबा : आपण उद्या इथ साड्या खरेदी करु. परवा सकाळी निघून. दागिण्यांची आॅर्डर देवू. सुहास आता काॅलेजला सांगून टाक. डायरेक्ट एक महिन्यात मध्ये अधे येवून जाशील ते. एकुलत्या एक बहाणीचे लग्न आहे.



सुहास : सांगतो बाबा.


आत्या : लग्न छान पार पडल आता. घाईत पण टप्याने. दादा तुला नियोजन उत्तम जमते. 


    राहूलच्या लग्नानंतर अस्मिताच आयुष्यच बदलून गेलं. मनी ध्यानी नसताना साखरपुड आणि आता लगीनघाई झाली लग्न सुद्धा झाले. पहिली बोळवण करुन दुस-याच दिवशी स्वराज आणि अस्मिता अमेरिकेला जातात. तिकडे त्यांचा सुखाचा संसार सुरु होतो. 


     इथे आपली कथामलिका समाप्त होते आहे. 


   नांदा सौख्य भरे.....!!!


  थांबा, थांबा.... जाता कुठ.


       अस्मिता आणि स्वराजच्या लग्नाची हि लगीनघाई झाली खर पण अस्मिताला उत्तम करिअर देखील करायला मिळाल अगदी ती च्या मनासारख. तीच स्वप्न स्वराज हळूहळू एक -एक करुन पूर्ण करत आहे. 


    






Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy