Abasaheb Mhaske

Fantasy Drama Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Fantasy Drama Inspirational

एक विचित्र स्वप्न

एक विचित्र स्वप्न

2 mins
1.3K


त्या दिवशी अचानक एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्न एवढं भयानक होतं की, विचारूच नका. स्वप्नात चक्क आधुनिक पुढारी अनं स्वातंत्र्यकालीन शहीद व तात्कालीन नेते आपापसांत बोलत होते. या देशाचे अमर शहीद व नेते भारतभूमीचे दर्शन करण्यासाठी धरतीवर आले. आणि त्यांनी पाहीलं ते सर्व अजब होतं. या अमर शहीदांनी पाहिलेले दॄष्य विदारक; ते पाहता शहीद ते बावरले. मातॄभुमीही नव्हेच आपुली क्षणभर त्यांना भासले. जणू महाबळेश्वरातही राजस्थानचे दर्शन घडले. असंख्य क्रांतीकारकांच्या आहुतीतून स्वातंत्र्य आम्हास लाभले. त्याच भारतभूमीचे देशबांधवांनीच होते लचके तोडले. स्वातंत्र्यसमयी जे खळखळून होते हसले. एकमेकांच्या गळयात पडून दॄष्य हे पाहता धाय मोकलून रडले. चला गड्यानो ते आपलेच बंधु त्यांना आपण समजावू म्हणून ते पुढे सरसावले. हल्लीच्या पुढारी यांच्यात जो संवाद घडून आला   तो असा सगळ्यांना उद्देशून कळक्ळीन  हात जोडून म्हणतात, " मित्रहो , आपणंच आता या देशाचे भाग्यविधाते आणि तारक आहात." तेंव्हा कुत्सीतपणे हासत हल्लीचे पुढारी म्हणाले, अहो, आम्ही कसले तारक नी मारक, आम्ही तर हिटलरचे वारस आहोत म्हणा हवं तर. तुमचा काळ वेगळा होता साहेब! तेंव्हा नुसती हाक दिली की लोक जीव द्यायला तयार असायचे. हल्ली मतं घ्यायला, निवडून यायला किती पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो ते तुम्हाला नाही समजणार? तुम्हाला बोलायला काय जातं, आता राजकारण करून बघा मग समजेल. त्यांच्या पाया  पडा, हात जोडा , विकास करा पण काही काही फायदा नाही. तिकीट मिळविण्यापासून ते सत्ता संपादन करू स्तोवर सर्व झोडाझोडी, फोडाफोडी करावी लागते. बरं निवडून आल्यावरही , सगळं- सगळं सांभाळणं अवघड होवून बसलंय. झालेला खर्च कुठून निघणार? तुमचं काय जातं बोलायला. एवढ्यात फोनची बेल वाजली तुझ्या सारखा तुच देवा,  आणि माझ स्वप्न सारं सारं धुळीस मिळालं सामान्य , प्रामाणिक  माणसाचं मिळतं अगदी तसं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy