STORYMIRROR

Savita Tupe

Abstract

3  

Savita Tupe

Abstract

एक मनोगत!!

एक मनोगत!!

2 mins
203

  " विशाल असा अर्ध्यावर मला एकटं सोडून जाईल असं वाटलं नव्हतं . अवघा तीन वर्षाचा आमचा संसार . या वेलीवर फुल उमलण्याची चाहूल पण आत्ताच तर लागली होती . किती खुश होता विशाल . " आपलं कुटुंब आता पूर्ण होणार , " हे आनंदाने परत परत बोलून दाखवायचा . त्याचा वंश माझ्या उदरात वाढत होता आणि त्याच्या खुलण्याचे डोहाळे मात्र विशालला लागले होते . किती काळजी घ्यायचा तो माझी . अगदी आईच्या मायेने तो मला ह्या दिवसात जपत होता ."

   " दोनच महिने झाले होते ही बाळाची चाहूल लागून , पण हा मात्र लगेच बाळ जणू समोरच आहे अश्या काळजीने माझ्या पोटावर हात ठेवून तासनतास बोलत बसायचा. कधी कधी मला माझ्याच बाळाचा हेवा वाटायचा . वाटायचं हे आत्ताच असं आहे मग खरंच बाळ आल्यावर हा मला विसरूनच जाईन ."

     " पण दैवगतीने असा काही घाला घातला माझ्या आयुष्यावर की माझं जगच बदलून गेलं . कसं जगू मी तुझ्याशिवाय विशाल ? मला जगावंसंच वाटत नाही . कशी सांभाळू मी एकटी तुझ्या बाळाला ? "

   " सगळे म्हणताहेत गर्भपात करून घे , अजून तुझं वय लहान आहे , बाळामध्ये अडकून पुन्हा लग्न नाही करता येणार . पण कसं सांगू या लोकांना ? मला हे बाळ हवं आहे . तुझं बाळ ! " 

   " तू दूर निघून गेलास मला सोडून , आता बाळाला पण दूर कशी करू स्वतःपासून ? "

    " नाही ! मी हे नाही करू शकत , बाळाच्या रूपाने तुझा अंश मला माझ्या सोबत हवा आहे विशाल ! तू कायम माझ्या सोबत रहाणार आहेस . "

   " मला माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाचीही गरज नाही . मी या बाळाला जन्म देणार , त्याला तुझ्या इच्छेप्रमाणे वाढवणार . मग माझ्यासोबत अजून दुसरे कोणी नसले तरी चालेल .मला विश्वास आहे या प्रवासात तू कायम माझ्या सोबत रहाणार आहेस ."

   समाप्त !


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract